उत्सव

उत्सव
तुझ्या मरणाचाही उत्सव
(झाला नसेल तर होईल..)

तुझ्याकडे बघतांना
मी ’राखेच्या नंतर काय”
हा विचार करणार..
वेगळ काही नाही ..
तेच माझ नेहमीसारख ..
नैराश्याच
भयाण काळकुट्ट चित्र वगैरे...

सिगरेट, लायटर ..
आणि तेवणारा
लावलेला दिवाही बघेन
(तुझा विश्वास नाही यावर
माहिती आहे मला)
भिती? हो, भिती वाटतेच की..
पण आशाही आहेच
च्यायला...
मॆडम ,तुमची ..तुझी.. माझी..
आयुष्यभर कोणतीही वाट घेतली
तरी शेवट तोच?

आत्मा अमर असतो
ही पळवाट आहे
भितीपोटी, जगण्याच्या इच्छेपायी
काढलेली स्वत:ची समजूत...
(या कवितेइतकीच तकलादू
आणि आपल्यासारखी संपणारी..)
तरी
आयुष्याच्या रंगमंचावर
एक नवा रोल मिळेल
यावर विश्वास बसतो ना मॆडम?
या, चहाचा कप तसाच आहे.
(माझा अर्धा संपला सुद्धा )
वाफांचा एक सुखद स्पर्श

ही जिवंत असल्याची जाणीव..
ही गोष्ट तुझ्यामाझ्यातच की
खरच इथे असतीस
तर एव्हाना
ओरडली असतीस,
" साय आवडत नाही म्हणून.."
कपही फेकून दिला असतास..
शांतपणे मग आपण बाहेर पडलो असतो
फिरायला..

एक नम्र सूचना:
ही ऑपरेशन- चिरफाड करायला दिलेली कविता आहे

या कवितेत सकारात्मक बदल काय करता येतील असे प्रतिसाद हवे आहेत:)
भाषा, शब्दांची निवड,
लय आहे का असल्यास कुठे गेली
नसल्यास गद्यच आहे का
याला कविता म्हणाल का
एक शंका ही टिपिकल 'गे पोएट्री' अशा सदरात बसणारी कविता वाटते का?
अशा प्रकारे प्रतिसाद आलेले फार आवडतील..
ही टिपिकल 'गे पोएट्री' नसल्यास तिला कशी त्या विभागात घालता येईल?
प्रेमकाव्याचा एक हा विशिष्ट विभाग अभिप्रेत नसल्यास असा विभाग इथे सुरु करावा का?
धन्यवाद

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

"एक नम्र सूचना ..." हा भाग टिप्पणीच असावा. कवितेचे शेवटचे कडवे नसावे. पण खात्री करून घेत आहे.
"गे पोएट्री" मध्ये "गे" शब्दाचा अर्थ "समलिंगी आकर्षण" असा आहे का? मला पहिल्या दोन वाचनांत तसा संदर्भ लागला नाही. (की "गाण्यास योग्य"="गेय" असे म्हणायचे आहे?)

प्रेमकविता म्हणून आवडली. (वेगळा विभाग वगैरे संदर्भ समजलेला नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेचे कडवे नाही.
मला पहिल्या दोन वाचनांत तसा संदर्भ लागला नाही.- तसे काही नाही!
अवांतर- हा एक मोनोलॉग म्हणून लिहिला होता. एकमेकेंशी घट्ट मैत्री असणे किंवा प्रोफेशनल नाते न राहता, हक्काचे नाते निर्माण होणे ही गोष्ट कालांतराने घडू शकते अशा वेळी ही कविता योग्य ..
पण यात छिंद्रान्वेषी पणा करणारे कसा कसा विचार करतील हा मुद्दा डोक्यात आला आणि अनेक शक्यता वाटल्या...
धन्यवाद, खुलासा करायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःची कविता चिरफाड करायला लोकांसमोर ठेवायची याला प्रचंड धैर्य लागतं. बांधून झाल्यावर फारतर बाहेरून ही इमारत बघायला मिळते. त्यातही लोकांनी नाकं मुरडली, इथे रंग बरोबर नाही, ही बाल्कनी चुकीच्या ठिकाणी आहे म्हटलं तरी दुखावलं जाण्याची शक्यता असते. इथे तुम्ही अर्धीकच्ची बांधलेली इमारत लोकांना आतमधून दाखवत आहात, आणि दुरुस्ती सुचवा वगैरे म्हणत आहात. त्याबद्दल प्रथम दाद स्वीकारा.

जमेल तसा कवितेविषयी प्रतिसाद देईनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धैर्य वगैरे लागत का माहिती नाही... अहंकार नसला तरी हे शक्य आहे अस मला वाटत. कविता हा माझ्या दृष्टीने केवळ स्वतःशी संवाद नसून सर्वांशी केलेला संवाद आहे.. संवाद् म्हटला की ऐकून घेणे सुद्धा आलेच ..
प्रतिसाद देणा-या सर्वांचे आभार.

दुसरा मुद्दा- हे धैर्य कवितच्या दर्जानुसार प्रकाशन्?असे काही संबंधित आहे का?
तर मग माझा नाईलाज आहे..:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

माफ करा , पण मला कवितेच्या शेवटी आलेला उपोद्घात हा कवितेचाच ( एक अत्यंत रंजक , आकर्षक) भाग वाटला होता !
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक नम्र सूचना: तुझ्या मरणाचाही उत्सव
म्हणजे ऑपरेशन- चिरफाड करायला दिलेली जणू एक कविताच आहे
(झाली नसेल तर होईल..)

तुझ्याकडे बघतांना
या कवितेत सकारात्मक बदल काय करता येतील असे प्रतिसाद हवे आहेत:)
मी ’राखेच्या नंतर काय”
हा विचार करणार..
भाषा, शब्दांची निवड,
वेगळं काही नाही ..
तेच माझं नेहमीसारखं ..
नैराश्याचं
भयाण काळकुट्ट चित्र वगैरे...
नसल्यास गद्यच आहे का
लय आहे का असल्यास कुठे गेली ?

सिगरेट, लायटर ..
आणि तेवणारा
लावलेला दिवाही बघेन
(याला कविता म्हणाल का
तुझा विश्वास नाही यावर
माहिती आहे मला)
भिती? हो, भिती वाटतेच की..
पण आशाही आहेच
च्यायला...
मॆडम ,तुमची ..तुझी.. माझी..
आयुष्यभर कोणतीही वाट घेतली
एक शंका ही
तरी शेवट तोच?
अशा सदरात बसणारी कविता वाटते का?

आत्मा अमर असतो
ही पळवाट आहे की टिपिकल 'गे पोएट्री' ?
भितीपोटी, जगण्याच्या इच्छेपायी
काढलेली स्वत:ची समजूत...
(या कवितेइतकीच तकलादू
आणि आपल्यासारखी संपणारी..)
तरी
आयुष्याच्या रंगमंचावर
प्रेमकाव्याचा एक हा विशिष्ट
एक नवा रोल मिळेल
असा विभाग इथे सुरु करावा
यावर विश्वास बसतो ना मॆडम?
या, चहाचा कप तसाच आहे.
(माझा अर्धा संपला सुद्धा )
धन्यवाद
वाफांचा एक सुखद स्पर्श

ही जिवंत असल्याची जाणीव..
ही गोष्ट तुझ्यामाझ्यातच की
खरच इथे असतीस
तर एव्हाना
ओरडली असतीस,
" साय आवडत नाही म्हणून.."
कपही फेकून दिला असतास..
शांतपणे मग आपण बाहेर पडलो असतो
फिरायला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तरी शेवट तोच?
अशा सदरात बसणारी कविता वाटते का?
हा हा.
छान चालू आहे.. उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

मॆडम म्हणजे काय?
मॅडम? मैडम? मेडम?? की अजून काही? हे नक्की कसं लिहिलं आहे, अन उच्चार काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मॅडम अपेक्षित आहे..( बराह चा प्रोब्लेम )
आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील--- अशी तुमची सही वाचल्यावर आम्हाला नटस ची अलर्जी नाही.. असा फलक इथे कुणाच्या हातात आहे ते शोधावेसे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

बदल वगैरे कृत्रिम गोष्टींनी ह्या स्फुरलेल्या काव्याला ठिगळ मारु नका...जे तुम्हाला पटले ते तुम्ही लिहिले आहे असे गृहित धरतो, मेघना पेठे कविता लिहायला लागल्या तर अशाच लिहितील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ही कविता वाचताना दिवंगत प्रेयसीच्या फोटोकडे पहाणारा, व तिच्याशी बोलणारा कवी डोळ्यासमोर उभा राहिला. कदाचित चहा पिताना तिच्या चहा पितानाच्या फोटोकडे बघताना सुचलेला संवाद असावा. ती गेली तसा फोटो जळल्यावर त्याच्या जळण्याचा कसला उत्सव होईल? नातं संपलं की त्यांच्या आठवणींचं काय करायचं?

मात्र या कवितेत, खुद्द कवितेचा उपमा म्हणून वापर तितका परिणामकारक वाटला नाही. तो आवश्यक आहेच का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0