<बिंदू - नॉनव्हेज विनोद नकोत>

'तर आजच्या मीटिंगमध्ये थोडं गंभीर विषयावर बोलायचं आहे' वेर्लेकरांनी घसा खाकरत बोलायला सुरूवात केली, आणि जमलेल्या लोकांत हळूहळू शांतता पसरली. फिदीफिदी हसणं थांबलं, व्हॉट्स्-ऍपच्या मेसेजांवर पटकन काहीतरी दाबून ते घाईघाईत पाठवले गेले, नवीन आलेल्या व अजूनही कु. लावणाऱ्या कुलकर्णीकडे चोरटे कटाक्ष टाकणंही थांबलं. वेर्लेकरांनी सगळ्यांकडे नजर फिरवून शांतता प्रस्थापित झाल्याचं पुन्हा एकदा तपासून बघितलं. फिरता फिरता त्यांची नजर चिटणीसवर स्थिरावली. त्यांच्या कपाळाला सूक्ष्म आठ्या आल्या न आल्याश्या झाल्या. या मीटिंगमध्ये बोलताना फक्त चिटणीसकडे बघत न बोलता सगळ्यांकडे बघत बोलायचं असं त्यांनी स्वतःशीच ठरवलं.

'माझ्याकडे गेल्या काही आठवड्यांत सातत्याने तक्रारी आलेल्या आहेत. आणि आपल्या टीममध्ये अशा कंप्लेंट्स येता कामा नयेत. वी हॅव टु बी सीरियस' वेर्लेकरांनी एक ड्रॅमॅटिक पॉझ घेतला आणि पुन्हा आपली नजर सर्वांवरून फिरवली. कु. कुलकर्णीने आतली बातमी माहित असल्याप्रमाणे सहानुभूतीदर्शक मान वरखाली केली.

वेर्लेकर आणि त्यांची सात लोकांची टीम बिंदू नावाच्या होटेल मॅनेजमेंट कंपनीत काम करते. 'सर्व' नावाची तीन शहरांमधली बारा होटेल्स चालवण्याची जबाबदारी वेर्लेकरांवर होती. पैसे टाकून हॉटेल्स काढायचा उत्साह अनेकांना असतो. पण लवकरच त्यांच्या लक्षात येतं की मालक असणं ग्लॅमरस असतं पण प्रत्यक्षात तेे हॉटेल चालवणं म्हणजे ढोरमेहेनत असते. मग ते मॅनेजमेंटचं काम देतात अशा कुठच्यातरी कंपनीला. चाललं हॉटेल तर मिळतात मालकांना पैसे. नाही तर नाही. 'सर्व' छान चाललेलं होतं. कारण त्यांचं ब्रीदवाक्य होतं 'सर्वांसाठी सर्व काही' पंजाबी, चायनीज, साउथ इंडियन, इटालियन, मेक्सिकन, बर्गर, फ्राइड चिकन - जे काही हवं ते तुम्हाला एकाच रेस्टॉरंटमध्ये मिळेल. शिवाय पार्टी करणाऱ्या पुरुष लोकांसाठी अंधारलेला दारूचा एरिया होता, घरगुती मध्यमवर्गीय लोकांसाठी साफसुथरा, सुसभ्य फॅमिली एरिया होता, मोकळी हवा एंजॉय करण्यासाठी गार्डन एरिया होता...

'वारंवार सूचना देऊनही असं लक्षात आलेलं आहे की काही लोक' वेर्लेकरांची नजर इच्छा नसतानाही चिटणीसकडे वळली. परत दुसरीकडे नजर वळवून घेईपर्यंत अजून एक ड्रॅमॅटिक पॉझ झाला. 'की काही लोक, नॉनव्हेज जोक्स करत राहतात. आणि तेसुद्धा लेडीज लोकांसमोर. त्यामुळे इतर अनेक लोकांना अनकंफर्टेबल वाटतं. आपल्या कंपनीची पॉलिसी आहे की ऑफिसमध्ये नॉनव्हेज जोक करणं हे नियमांविरुद्ध आहे. हे माहित असूनही काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपल्या कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंटने हे पत्रक काढलेलं आहे. यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अशा नियमांविरुद्ध वर्तन करणं कर्मचाऱ्यांनी थांबवावं.' वेर्लेकरांनी गंभीरपणे आपल्यासमोरची पत्रकं टीममध्ये वाटली. त्यात तेच लिहिलेलं होतं.

काही क्षण ते छोटंसं पत्रक वाचण्यात शांततेत गेले. लोकांनी आता कु. कुलकर्णीकडे चोरटे कटाक्ष टाकण्याऐवजी चिटणीसकडे टाकले. हे कोणाला उद्देशून होतं हे उघड होतं.

'सर पण मला एक प्रश्न आहे. नॉनव्हेज जोक्स म्हणजे नक्की काय?'
'तुम्ही मला विचारताय, नॉनव्हेज जोक्स म्हणजे काय?' वेर्लेकरांना हा प्रश्न अपेक्षित नव्हता.
'हो सर. या पत्रकात बंदी घातलेली आहे, पण ती नक्की कशावर घातलेली आहे ते कळलं नाही, तर आपण चूक करतो आहोत की नाही हे कसं कळणार?'
'नॉनव्हेज जोक्स म्हणजे... चावट, सेक्श्युअल जोक्स. खूप लोकांना ते ऑफेन्सिव्ह वाटतात.'
'तेच तर मला कळत नाही.'
'का नाही? एनिथिंग ऑफ सेक्श्युअल नेचर किंवा अल्युडिंग टु सेक्श्युअल रिलेटेड थिंग्ज... म्हणजे नॉनव्हेज' काहीतरी ठासून सांगायचं झालं की वेर्लेकर इंग्लिशवर घसरायचे. त्यासाठी ते नवीन नवीन शब्द पाठही करत. आज त्यांना अल्युडिंग शब्द वापरता आल्याबद्दल स्वतःचंच कौतुक वाटलं.
'पण लोकं कशानेही ऑफेंड होतात. आता परवाच बघा, मिस कुलकर्णींनी व्हेंडरकडे ऑर्डर करताना म्हणालं की साठ-पासष्ट सॉसच्या बाटल्या पाठवून द्या. तर मी म्हणालो, की आपल्याला यापेक्षा प्रिसाइजली बोलायला हवं. तेव्हा त्यांना सांगा एकसष्ट-बासष्ट सॉसच्या बाटल्या पाठवा. तर त्या म्हणाल्या की असले जोक्स करू नका. आता मला सांगा मी काय चुकीचं बोललो?'
'ते ऑब्सीन आहे.' कु. कुलकर्णींचा चेहरा लालीलाल झाला होता.
'तुम्हाला चूक दाखवली म्हणून राग आला'
'नाही, तुम्ही वर ज्या पद्धतीने हात हलवला ते तर फारच अश्लील होतं'
'कुठच्या पद्धतीने?'
'ते मला सांगता येणार नाही. बट दॅट वॉज ऑब्सीन.'
'म्हणजे हा असा?' चिटणीसने हात हलवून दाखवला. 'सॉसची बाटली आपण हलवून घेतो तसा?'
कु. कुलकर्णी लाजून अजून लालेलाल झाल्या. मीटिंगमधले इतर लोक हसावं की गंभीर चेहरा ठेवावा अशा संभ्रमात पडले. हसलं तर वेर्लेकरांचा राग ओढवणार, आणि शिवाय कु. कुलकर्णीवर लाइन टाकायची संधी जाणार. त्यामुळे बहुतेक लोक गंभीर राहिले.
'सर, पाहिलंत ना मी काय म्हणत होते ते'
'ऑलराइट, चिटणीस... हे फार झालं.'
'काय फार झालं?'
'यु नो व्हॉट आय मीन' वेर्लेकरांचा संयम आता सुटत चालला होता. 'हे थांबायलाच हवं. यू मस्ट पुट अ स्टॉप टू धिस!'
'पण सर मला दुसरा प्रश्न आहे' चिटणीसने आज वेर्लेकरांचं डोकंच फिरवायचं ठरवलं होतं बहुतेक. 'म्हणजे आपल्या कंपनीने नॉनव्हेज जोक्सवर बंदी घालणं हे कितपत बरोबर ठरेल?'
'का?' वेर्लेकर
'आता आपली कंपनी हॉटेल्स चालवते. आपल्या हॉटेल्सचा मोटो आहे की सर्वांसाठी सर्व काही. एकाच छताखाली आपण सगळ्या प्रकारचं अन्न देतो. दारू पिणं, सिगरेट ओढणं, मांस खाणं, न खाणं... सगळं चालवतो. किंबहुना या सगळ्यासाठी आपल्याकडेच सगळेच येतील अशी व्यवस्था करतो. सगळ्यांचंच स्वागत करतो. मग असं असताना ती चालवताना ऑफिसमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या जोकवरती कशी बंदी घालून चालेल? आय मीन, तसं केलं तर 'लोकां शिकवे इन्क्लुजनिझम आणि आपण करे ढोंगीझम' असं नाही का लोक म्हणणार?'

वेर्लेकरांनी एक दीर्घ श्वास घेतला. शाकाहार/मांसाहार आणि आपापसातलं बोलणं या कशा वेगळ्या गोष्टी आहेत, कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांवर बंधनं घालण्याचा कसा अधिकार आहे आणि तीच बंधनं गिऱ्हाइकांवर न लादण्याचा कसा अधिकार आहे वगैरे शक्य तितक्या शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. चिटणीसनेही काहींना जे नॉनव्हेज वाटतं ते इतरांना कसं आवडण्यासारखं असतं वगैरे मुद्दे लढवले. वेळ संपल्यामुळे मीटिंग संपली. सर्वच मीटिंगाप्रमाणे याही मीटिंगमधून तसं काही फारसं निष्पन्न झालं नाही.

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

Biggrin Biggrin
मजा आली. पण अबरप्टली संपल्यासारखंदेखील वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्लील आणि नॉनव्हेज प्रतिक्रिया!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
दादा कोंडके प्रतिक्रिया!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी अगदी ROFL

बाकी लेख आवडलाच. मस्त ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>मजा आली.<

मला आली तितकीच मजा तुम्हाला पण आली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्लील आणि नॉनव्हेज प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

:), लेख अधिक लांबला असता तर अधिक मजा आली असती.

बाकी केचपवरून ही जाहिरात आठवली:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL पण अर्ध्यात घाईनं संपवल्यासारखं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या जातीयवादाच्या निषेधात मी पुढचे चार तास जालसंन्यास घेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घाईत संपवलंच, शिवाय अजून एखाद दोन अधिक वेगळी विनोदी उदा देता आली असती.
केचप ऐवजी सोडा बॉटल्स अधिक चपखल बसल्या असत्या Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

केचप ऐवजी सोडा बॉटल्स अधिक चपखल बसल्या असत्या

बिंदूच्या कर्मचार्‍यांचे सरासरी वय चाळीसच्या वर असेल कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो! (नोंद: हा सोडा-बाटली फुटल्याचा आवाज नाही)
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या शाकाहारी लेखाला नॉनव्हेज प्रतिक्रिया चालतील का ? :-S

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेकी और पूंछ पूंछ?

नॉनव्हेज्जोक्की तमन्ना आज अपने दिल में है
देखना है जोर कितना आपके कळ्फलक्मे है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबुरावला पकडा सिनेमा फार आवडला कारण बघायला जमलेचं नाही.>>>>>>>>
खिक्क..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोक घरात तसे व्हेजिटेरियन असतात पण 'रुचिपालट' करण्यासाठी हॉटेलात येतात. मग आता तिथही ते काय व्हेजिटेरियन खाणार काय? ते लगेच नॉनव्हेज ची ऑर्डर देतात. घरात तो चान्स भेटत नाही मंग घ्या बाहेर, सेवा उपलब्ध आहे तर का सोडा? पुर्वी लोकांना वाटायच की ज्यांची घरी 'सोय' नाही तेच लोक हॉटेलमदी येतात. घरच चांगल चुंगल खायला भेटत आसन तर मंग मान्स कशाला हाटेलात येतीन. पन त्ये ख्वॉट हाये हे सिद्दच झाल. चांगली घरंदाज मान्स बी हाटेलात चापायला येउ लाग्ली. आन आमी तर म्हंतो विश्वामित्रान कुत्र्याची तंगडी बी खाल्ल्याली. भुक लागल्याव व्हेज काय नोनव्हेज काय? जव्हर दम निघतोय तव्हरच ही कौतिकं! आता सर्व म्ह्नल्यावर त्यात समद आल. लोकांची शेवा करन हा त्यांचा धर्म हाये. ज्यांना कळ निघत नाई तेच लोक येनार ना हॉटलमदी! बाकीचे ल्वॉक अपना हाथ जगन्नाथ म्हनुन घरीच सोय करनार ना! कंटाळा आला कि त्यो बी चट येतुय हॉटलमदी. खिशात पैशे असल्याव कव्हर आपल्या हातानी कर्नार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अवं ये गाव लई न्यारं, हितं थंडगार वारं, ह्याला गरम शिणगार सोसंना
याचा आदर्शाचा तोरा, याचा कागद हाये कोरा, हितं शाहिरी लेखनी पोचंना
हितं वरन-भाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
आरं सोंगा-ढोंगाचा बाज़ार हितला, साळसुद घालतोय अळिमिळी
अन् सार वरपती, रस्सा भुरकती, घरात पोळी अन् भायेर नळी, गं गं गं - गं गं गं - गं..
....
....
आवं दाजिबा गावात होईल शोभा हे वागनं बरं नव्हं...
.
(गीतकार : जगदीश खेबुडकर, चित्रपटः पिंजरा [१९७२])

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. मुद्दा गंभीर स्वरूपाचा आहे. शब्दांपेक्षा बोलणाऱ्याच्या हेतू मुळे कुठलेही वाक्य अश्लील किंवा श्लील ठरू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तुझे आहे तुजपाशी' कोंड्केदादाच्या चित्रपटाचे नाव असते तर त्यातही अश्लील अर्थ दिसला असता.
शब्द कशा प्रकारे सादर केले आहेत आणि लोक कुठला संदर्भ धरून ऐकतात्/वाचतात यातून श्लील- अश्लील अर्थ निघतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरी ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL
लेख अन प्रतिक्रिया वाचून फुटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाला स्वत:लाच उबळ आली पण अबरपटली दाबली.काही वेगळ्या माध्यमांचा आधार घेऊन पाहा श्रावणानंतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला अडाणी समजा पण हे काय आहे?
हे कशाचं विडंबन आहे का?
असेल तर मूळ स्त्रोत पण द्या ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0