आमचा ऐसी अक्षरे वरील प्रवेश

दिनांक २७ नोव्हेंबर की २६ नोव्हेंबर यातील कोणतीतरी एक दिनांक उजाडली तीच मुळी माझ्यातल्या व्यामिश्र, बहुउद्देशीय सातत्यपूर्ण, गंभीर व उद्याच्या समाजाच्या जडणघडणीवर प्रभावी ठसा पाडणारे लेखन करणार्‍या कवी व लेखकाच्या चेहर्‍यावर रंगपंचमीचे अनेक रंग लेवूनच!

२६ की २७ हे आठवत नाही कारण त्याच दोन दिवसात मनाला एकाग्र करून या युगाला ऐंद्रीयलोलूपतेपासून आणि विलासी मानसिकतेच्या दूरगामी धोक्यांपासून वाचवण्यासाठी वारुणीच्या पेल्यात मन बुचकळत होतो.

एकदा मन बुचकळले की कवितेची एक ओळ सुचायची. पण त्यात माझीच अविरत चालू असलेली संस्कृतीहीनतेची पूजा डोकावत असल्याने प्रामाणिकतेचा आवेश तात्पुरता बाजूला ठेवून तो पापुद्रा भिजवून निघेल असे वाटून मन पुन्हा बुचकळायचो. दुसर्‍या वेळेला नेमके आधीच्याच ओळीशी ध्वनीसाधर्म्य दाखवणारे यमक सुचल्यामुळे आपल्यावर 'अर्थाच्या भूकेल्या समाजात शब्दांच्या दिखाऊ मुलाम्यांनी प्रसिद्धी ओढणारा कवी' असा आरोप होऊ शकेल याची यथार्थ किंवा सार्थ जाणीव होऊन त्या यमकासकट मी मन पुन्हा बुचकळायचो. मात्र यावेळेस बुचकळताना मी मनाला 'याद राख' अशा विनम्र धमकावणीसह बुचकळायचो. 'याद राख पुन्हा यमक सुचवलेस तर'! बराच वेळ भिजून मन बाहेर यायचे तेव्हा नेमकी समोरच्या बाल्कनीतील शेजारीण ('समोरच्या बाल्कनीत शेजारीण राहते' यातील विरोधाभास संशयास्पद वाटल्यास अमित बिल्डर्स यांच्या आर्किटेक्टला भेटून त्यांना नेमके काय करायचे होते हे विचारावेत) नुकतीच न्हाऊन येऊन केस विंचरत होती. या दारूण घटनेच्या उल्लेखाने आपल्याला ती सकाळची वेळ असल्याचे उगाचच जाणवेल, तसे काहीही नाही. वीक एन्डला कोण केव्हा 'न्हाईल' हे आपण कोण सांगणार! तर वारुणीत नखशिखांत ओलेते होऊन बाहेर आलेले माझे मन त्याला काय सुचले हे त्याचे त्याला समजायच्या आधीच त्या चमचमणार्‍या केसांच्या अवखळ लाटांमध्ये माझ्या मनाविरुद्ध गुंतले. मी अनेकदा नजर वळवून मन सोडवून घ्यायचा प्रयत्न केला तरी निघेना! शेवटी त्यावर जालीम उपाय आपोआप झाला. आतून माझ्याच सौ ची हाक आली आणि पाठोपाठ 'संसाराचा राहिला आहे तेवढा तरी रंग राहूदेत' अशी एक कडवट विनवणी ऐकू आल्यावर मी वारुणीच्या पेल्याकडे लटक्या रागाने पाहात तो दूर सारला. काहीतरी तिच्यामते किरकोळ आणि माझ्यामते महत्वाचे असे तिने सांगितलेले एक काम करून मी साहित्यसाधनेसाठी पुन्हा माझ्या खोलीत येऊन बसलो तेव्हा पाठमोरी शेजारीण आता केस विंचरता विंचरता आमच्याच खिडकीकडे तोंड करून उभी राहिली होती. निर्हेतूक नजरानजर होताच माझ्या डोळ्यातील नाजूक लाली तिच्या गोर्‍या गालांवर पसरली आणि मला 'जग सुंदर आहे' यावर एक लेख लिहावासा वाटू लागला. तिने गॅलरीतून खाली टाकलेल्या गुंतवळासहित माझ्या मनावर आत्तापर्यंत पसरलेली निराशेची झालरही खाली निघून गेली. नंतर लक्षात आले की ती चकणी असून आपल्याकडेच पाहात असेल असे काही समजण्यात अर्थ नाही. येथे शारिरीक व्यंग असलेल्यांवर काहीही टीका नसून तसे वाटल्यास निषेध व्यक्त केला तरी चालेल. मला माझ्या घरासमोर निदर्शने व्हावीत असे केव्हापासून वाटते.

तो प्रसंग घडल्यावर मात्र मला 'मानवी आयुष्य हे एक निराशेची नदी आहे' असा माहितीपूर्ण लेख लिहावासा वाटू लागला.

मला काहीतरी लिहावेसे वाटतच होते कारण मराठीत एक नवीन संकेतस्थळ निर्माण झाले होते. त्या संकेतस्थळाचा 'ई-पत्ता' समजताच आणि नवीन लेखनाचे पहिले पान दिसताच मी आंघोळ करून, देव्हार्‍यातील सर्व देवांना फुले वाहून, वडिलांना नमस्कार करून आणि सलवार झब्बा घालून आरश्यात पाहू लागलो. मी दिसायला साहित्यीक दिसतो आहे असे मला पटल्यावर मी घरात एक तास साहित्यिकाच्याच मूडमद्ये वावरलो. मधेच वडिलांनी विचारले की कोठे कार्यक्रम आहे का? त्यावर मी उत्तर दिले की रसिकांच्या टाळीसाठी साहित्यलेखन करताना आपल्याकडून टाळीचे लेखन होते व ते उथळ समजले जात असल्याने मी आता अंतर्मुख होत आहे. त्यावर वडिलांनी 'मी अंतर्मुख झालो असतो तर तू झालाच नसतास' असे विधान ऐकवले व माझ्या मुखावरील साहित्यिकाचा बुरखा फाडण्याचा एक वडीलधारी व हिणकस प्रयत्न केला. हिणकस हे विशेषण मला आत्तापर्यंत निर्माण झालेल्या मराठी संकेतस्थळांमधून माहीत झाल्यामुळे मी त्या सर्व स्थळांचे व तेथील सदस्यांचे आभार मानतो.

एका विशिष्ट क्षणी - साहित्यिकांना प्रेरणा वगैरे एका विशिष्ट क्षणी होते / मिळते असे ऐकून आहे - मला पूर्णपणे पटले की मी आता साहित्यसेवा करण्यास मनाने तयार झालो आहे. वेळ (ती मात्र) सकाळची होती.

अचानक सौ ला चादरी, पडदे व लॅम्प शेड्स हे सर्व एकदम घ्यायची प्रेरणा झाली व त्यामुळे सकाळच्या वेळेसचे रुपांतर संध्याकाळच्या वेळेत झाल्यावर मी या जगाला आपल्या अनमोल लेखणीने अचंबीत करायला मोकळा झालो.

कोंबडीला अंड व्हावे तशा मला गझला होतात असा एक समज पुर्वापार पसरलेला आहे.

तो मला मान्य आहे.

त्यामुळे मी चवथ्यांदा किंवा चौथ्यांदा (जे शुद्ध असेल ते मला मान्य व आधीच माहीत आहे असे समजावे) मन बुचकळून काढल्यावर एकदा नव्या स्थळाचे नांव नीट वाचले.

'आयझॅक शरे'

मी वाचत असलेल्या स्पेलिंगमधून हा जो उच्चार निर्माण होत होता त्याला मी आत्तापर्यंत घेतलेल्या दोन पेल्यांनी भागल्यावर मला सकाळचा उच्चार लक्षात आला.

'ऐसी अक्शरे'

मग त्या 'क्श ला मी 'समोरच्या शेजारील' गुंतवळाप्रमाणे झटकल्यावर नीट उच्चार करता आला.

'ऐसी अक्षरे'

स्वतःशीच पुटपुटताना कोण मौज वाटली. ऐसी अक्षरे, तैसी अक्षरे, कैसी अक्षरे, जैसी अक्षरे! यमकेच यमके! एखादी पाच शेरांची मक्ता नसलेली गझल सहज पडेल असा एक शब्दपूजक विचार आल्यावर मी मला झटकले.

लेखन, लेखन, लेखन!

आपण एक गंभीर लेखक असून आपण आज काय लिहिणार याची चातकाप्रमाणे वाट पाहणारे शेकडो नागरीक आज आंतरजालावर वावरत आहेत. नुसत्या 'ब' वरून 'बेफिकीर' ओळखणारे हजारो सदस्य आहेत येथे! आपली एक प्रतिमा हवी! अत्यंत सभ्य, अत्यंत दर्जेदार लेखन करणारा, मनमिळावू, कोणालाही कधीही न दुखावणारा, कंपूबाजीच्या प्लेगपासून सुरक्षित अंतरावर असलेला अशी आपली प्रतिमा बनायला हवी.

मग एक वही काढली. ही वही खास एकटाच बसलेलो असताना मी वापरतो. 'बसणे' या क्रियापदाचे अनेक अर्थ आहेत. त्या वहीत कित्येक युगप्रवर्तक कल्पना आणि मुद्दे अमूर्त किंवा अर्धमूर्त स्वरुपात नांदत असतात. ते मुद्दे मी हळूहळू या जगासमोर फेकतो. एकदम सगळे देऊन टाकले की जगही सोकावेल म्हणून हळूहळूच फेकतो. पण त्या वहीत मला हिने लिहिलेली कोणाच्यातरी ब्लाऊझची मापे दिसली. हिचा हा नवीन व्यवसाय मला माहीत नव्हता. उगाचच आपल्याला एखाद्याचे रहस्य कशाला कळायला हवे म्हणून मी वही तात्काळ मिटून तात्काळ पुन्हा उघडून पुन्हा तेच पान पाहिले. बराच वेळ त्या संख्याशास्त्राचा अभ्यास झाल्यानंतर मला एक मतला सुचला.

कुठे गेलो करायाला कधी मुद्दाम मी पापे
वही काढून बघतो तर तुझ्या ब्लाऊझची मापे

परंतु पहिल्या ओळीतील 'पापे' या शब्दावरून हल्लीच्या नवगझलकारांमध्ये असंतोष पसरू शकेल (मी स्वतःला पहिल्या दिवसापासून जुना गझलकार समजतो) हे लक्षात आल्यावर मी तो मतला बदलायचा प्रयत्न करू लागलो तर त्या वहीच्या त्या पानाच्या अगदी खाली बारीक अक्षरात 'गोदाक्का बेंद्रे आजींची मापे' असे लिहिलेले आढळले.

परिणामतः आपल्या मनातील पापाची जाणीव होऊन मी तातडीने हरविंदर सिंघप्रमाणे माझा हात उचलला आणि शरद पवारांप्रमाणे माझाच गाल पुढे केला. मात्र वारुणीने घोळ केला व ती स्वतःच सांडली. माझा गाल वाचला असला तरी गालाच्या अगदी जवळचाच अवयव कान सौ च्या आवाजाने फाटला. तिलाही तिची थोडी चूक कळावी म्हणून मीही ओरडून पाहिले.

"माझ्या या महत्वाच्या वहीत हे काय खरडलंयस तू???"

"तुम्ही नाही का वाट्टेल त्याच्या खरडवहीत काहीही लिहिता??"

बायकोचे हे विधान माझ्या आंतरजालीय साहित्यसेवेचा साईड इफेक्ट होता.

बर्‍याच वेळाने नवीन पेल्याचा साहसाने वापर सुरू झाला तेव्हा मनात लैंगीक उपासमार व गुन्हेगारी या विषयावर लेख लिहिण्याचा विचार पूर्ण झालेला होता. पण असा एक लेख आधीच टी आर पी चे नवीन विक्रम करत असल्याचे पाहून मी थंड झालो.

मग मी एकदा नवीन संकेतस्थळ पूर्णपणे माहीत करून घ्यायचे ठरवले. सर्व काही अप्रतीम होते. काहीही चांगले असले की त्याला किमान अप्रतीम तरी म्हणायचेच असा आंतरजालावरचा अलिखित नियम आहे. अप्रतिम हा शब्द अप्रतिम आहे की अप्रतीम हे व्याकरणावर नव्हे तर स्थळावरील शुद्ध मराठीचा अभ्यास असणार्‍यांच्या संख्येवर ठरते.

पलीकडे राहणार्‍या एका पटवर्धन आजोबांच्या निर्व्यसनी आचरणावर काही लिहिता येईल का हे तपासायला गॅलरीत गेलो तर त्यांच्या गॅलरीतून त्यांनी खाली तंबाखू थुंकली व खालून जात असलेल्या एका मोलकरणीच्या हेलकाव्यांचा अभ्यास ते करू लागले.

एखाद्या फारसी किंवा फार्सी गझलेचा भावानुवाद करून सर्वांना स्तिमीत करून टाकावे हे जेमतेम सुचते आहे तर असा एक भावानुवादही झळकला. त्या भावानुवादात गझल या शब्दातील 'झ' या अक्षराऐवजी नुकता (म्हणजे नुक्ता, नुकताच या अर्थी नुकता नव्हे) दिलेला 'ज' आहे हे पाहून त्यावर एक स्टॅन्ड घ्यावा असेही वाटले. पण स्टॅन्ड अंडरस्टॅन्ड होईल की मिसअंडरस्टॅन्ड (एक जबरदस्त व सामाजीक जाणिवा उलथ्यापालथ्या करणारी शाब्दिक कोटी) हे लक्षात न आल्याने थांबलो.

एका अफाट व्यासंगी लेखकाची ऐसी अक्षरे वर ऐसी लक्तरे होताना पाहून मला माझाच राग आला व त्या रागाच्या भरात मी पुढचा पेला भरला व नजर मार्गदर्शक तत्वे व उद्दिष्टे येथे वळली.

त्या सदरातील 'एकमेकांशी मैत्री व्हावी' हे वाचून मला ठसका लागला. आंतरजालीय संकेतस्थळ निर्मीतीमागे असाही एखादा निर्मळ हेतू असल्याचे प्रथमच जाणवून! माझी अजून स्वतःशीही पुरेशी मैत्री न झाल्याने मी त्या तत्वाकडे दुर्लक्ष करायचे ठरवले.

प्रसंगी आपल्या लेखनावर कठोर टीका होऊ शकते हे लेखकांनी ध्यानात ठेवावे हे तत्व मला आगामी परिस्थितीचे लक्षण वाटले. मैत्री करावी आणि कठोर टीकाही होऊ शकते याचे भानही ठेवावे ही दोन परस्परविरोधी तत्वे एकत्र आणून मराठी माणसाचे जे विलक्षण वर्णन प्रशासकांनी केले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

'आमची कोठेही शाखा नाही' हे वाक्य कसे काय नाही हे काही समजले नाही.

आपण काय लिहावे या घोर प्रश्नात जीव खालीवर होतानाच मला सदस्यांची नावे बघायला मिळाली.

'अरे??? हा तर हा'

'च्यायला... हाही इथे आला??'

'बोंबला... हा पण का??'

'ही इथे काय करतीय?? नुसते वाद तर घालायचेत... मग तिकडेच का नाही थांबली??'

असे सर्व विचार धबधब्याप्रमाणे कोसळू लागले. त्यांना आवर घालणे मला जमेना!

आता कसली प्रतिमा अन कसलं काय! आपलं तर बारसं जेवलेलेच लोक इथे आलेले आहेत. आता बिनधास्त व्हावे आणि सगळीकडे एकच लेखन टाकतो तसेच इथेही टाकून द्यावे झाले.

शेवटी हतबुद्ध झालो.

काहीतरी लिहायला तर हवे! कोणी सांगावे, येथेही एखादा फॅन क्लब निघायचा आपला!

अरे हां!

शेवटी एकदाचे सुचले.

'मी ऐसी अक्षरे वर कसा आलो' हे लिहिले तर??

झाले लिहून!

'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळा अनेक अनेक शुभेच्छा!

Smile

-'बेफिकीर'!

field_vote: 
3.90909
Your rating: None Average: 3.9 (11 votes)

प्रतिक्रिया

एका नवोदिताने "आहा क्या बात! वोट एन ओपनिंग शॉट! मेनी मोर सच अवेटेड... " म्हंटले तर पट्टीचे खेळाडू 'आमेन' म्हणतात काय बेफिकीर राव? जर तसे असेल तर म्हणाच.. आमेन.. !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

वारूणी इतकं काय-काय घडवते हे कळलं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे आलात का तुम्ही इथेही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

या एका लिखाणापाई तुम्हाला तुमच्या सगळ्या गजला माफ करुन टाकाव्या या दर्जाचे उच्च लिखाण! 'ऐअ' च्या अल्प कारकीर्दीतील हे एक मानाचे पान ठरणार! वारुणी जर इतके करु शकत असेल तर आधुनिक रामलालाची भूमिका घेऊन आम्ही सांगतो, 'सुधाकर, तुम्ही आमचे पाठचे भाऊ. आम्हीच तुम्हाला सांगणार, की तुम्ही नियमितपणे बरीशी घेत चला!'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ऐकदम 'ऐ' ग्रेड चा माल पाहिजे बरं का पण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हा हा हा.. भन्नाट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

ऐसी अक्षरेवर स्वागत.
लिखाण खुसखुशीतही आहे आणि एकंदर मराठी आंतरजालावरच्या दीर्घकालीन वावराची साक्ष देणारेही. आणखी येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लै भारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मजा आली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! धमाल आली! ओपनिंग शॉट लय भारी!
बाकी 'ऐ' या अद्याक्षराने सुरु होणारी संस्थळे पाहिल्यावर तुमची प्रतिभा अंमळ जास्तच खुलते असे दिसतेय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

च्यायला! जरा आमच्या प्रतिभेला श्वास घ्यायला जागा मिळेल अशा आशेत रहावं तर आलेच का हे वाटेकरी! Wink

एकदम जबराट ब्वॉ!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मस्त लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयझॅक शरे'

लिंक सापडानी तव्हा आमी बी गुग्लाया लाग्लो तव्हा मदीच ते याहु घुसल आन त्यानी असाच घोटाळा केला. तसबी झ लईच चावट अक्षर हाये ब्वॉ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

व्वा! मस्तच!!

संजोपरावांसारखेच म्हणावेसे वाटते, खुप प्या, खुप लिहा Smile

- (वारूणीशी जन्म-जन्मांतरीचे नाते असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांचा आभारी आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी वाचायचं का कोण जाणे राहिलं होतं. लेखन आवडलंच. झक्कास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेफिकिरराव,

गझल प्रांताबरोबरच लेखणी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे
विशेषतः लेखातील खालील स्वगत वाचून जाम हसू आले Wink

'अरे??? हा तर हा'
'च्यायला... हाही इथे आला??'
'बोंबला... हा पण का??'
'ही इथे काय करतीय?? नुसते वाद तर घालायचेत... मग तिकडेच का नाही थांबली??'
असे सर्व विचार धबधब्याप्रमाणे कोसळू लागले. त्यांना आवर घालणे मला जमेना!

ROFL

ऐसी अक्षरेवर तुमच्या नव-नवीन गझला नित्यनेमाने वाचायला मिळेल याची अपेक्षा (की खात्री?) ठेवतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुच्च लिखाण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खरे आहे. यानिमित्ताने निर्देशित करावेसे वाटते की आंतरजालावरील मराठी लेखन हे केवळ प्रतिसादांवरच बेतलेले आहे की काय असे वाटण्याइतके सापेक्ष होऊ लागले आहे. अ‍ॅब्सोल्यूट अभिव्यक्तिंची संख्या कमी होत आहे. निरलस निरपेक्ष लेखनाचे प्रमाण वाढण्याची आवश्यकता आहे.
विषय काही नसला तरी लेखन शैली उत्तम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखावर भन्नाट टवाळखोर प्रतिसाद दिला होता. तो इथल्या संपादकांनी उडवला वाटतं... (संपादकांनु, हलक्यान् घ्या). किंवा योग्य वेळी प्रकाशित करा बटणावर टिचकी न मारल्याने माझा कॉंप्युटर व आंतरजालीय अवकाश यांच्या मधल्याच मितीत त्रिशंकूसारखा घुटमळत किंवा अश्वत्थाम्यासारखा भटकत असेल...

पण त्यात माझीच अविरत चालू असलेली संस्कृतीहीनतेची पूजा डोकावत असल्याने प्रामाणिकतेचा आवेश तात्पुरता बाजूला ठेवून तो पापुद्रा भिजवून निघेल असे वाटून मन पुन्हा बुचकळायचो.

ही ओळ दुर्बोध झाली आहे.

बाकी लेख खुसखुशीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद भारी आहे राजेश घासकडवी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमी लई भारी हाय, ह्ये तुम्च्या आदुगरच्या ग्रेसी प्रतिक्रियांवरुन जाणलं व्हतं. आन आता या पैल्या 'पुन्यकर्मा'नंतर खात्रीच पटली बगा.
तुमचा वारुणीरथ असाच उधळू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै भारी! एकदाचे काय लिहायचे याचा निर्णय घेतलेला बघून निश्वास सोडला! हुश्श्य!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच !

त्या सदरातील 'एकमेकांशी मैत्री व्हावी' हे वाचून मला ठसका लागला. आंतरजालीय संकेतस्थळ निर्मीतीमागे असाही एखादा निर्मळ हेतू असल्याचे प्रथमच जाणवून! माझी अजून स्वतःशीही पुरेशी मैत्री न झाल्याने मी त्या तत्वाकडे दुर्लक्ष करायचे ठरवले

.
हे पटले !
~ वाहीदा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांचा आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धमाल लेख आहे . ROFL ROFL Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुचकळणे हे क्रीयापद असलेला सुरुवातीचा भाग सोडल्यास बाकी लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच की...!
आवडले..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे बेफिकीरपणे आम्हाला कुठे सोडून गेलात राव? का आहात कुठल्या दुसर्‍याच आयडीच्या मागे ? व्यनित कळवलं तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुर्वीच्या कवी ,लेखकांचं बरं होतं त्यांनी लिहिलेली पत्रंही जगभर वाचली जात आहेत.सर्वव्यापी जाळ्याचं कौतुक सांगणाय्रा आधुनिक लेखकांची परिस्थिती फारच केविलवाणी होत आहे वासुदेवासारखी. बोळाबोळात नाचत तीच गाणी ऐकवावी लागत आहेत.
पांढय्रावर काळे करावे हेच उत्तम.
जाळं मोठं होतंय ,वीण घट्ट होते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वासुदेवासारखी. बोळाबोळात नाचत तीच गाणी ऐकवावी लागत आहेत.

अरारारा Sad
बेक्कार!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0