ब्रिटीशांची विनोदबुद्धी.

संस्थळाच्या मालकीण बाईंपाशी काही आवडलेल्या विनोदी टीव्ही मालिकांची शिफारस केल्यावर त्यांच्याकडून यावर वेगळा धागा काढण्याची (धमकीवजा) विनंती आली, त्या विनंतीला मान देऊन काही अतिशय आवडलेल्या तुफान विनोदी इंग्रजी मालिकांची एक धावती ओळख. यात नंतर अजून भर घालत राहीन पण सुरवातीला या तीन मालिका:

१) फॉल्टी टॉवर्स :
माँटी पायथॉनशी परिचित असणार्या प्रेक्षकांना जॉन क्लीजबद्दल अधिक काही सांगण्याची खरंतर गरजच नाही. विनोदाचे उत्कृष्ट टायमिंग काही लोकांना जन्मजातच लाभलेले असते, त्यातलाच हा एक गडी. शिवाय जोडीला तीक्ष्ण बुध्दी आणि केंब्रिजसारख्या संस्थांमधे उच्चभ्रू शिक्षण वगैरे मिळाले असेल तर मग हा विनोद वेगळ्याच पातळीला जाऊन पोहोचतो. फॉल्टी टॉवर्स या १९७५ सालच्या बीबीसीच्या (दोन सहा-सहा भागांच्या) मालिकेमधला हा विनोद खास जॉन क्लीजी विनोद आहे; विक्षिप्त, अतिशयोक्त आणि शारीर. उच्चभ्रू होण्याची आस असलेला कमालीचा उर्मट, कंजूस आणि भडक माथ्याचा बॅझिल फॉल्टी, जॉन क्लीजने अजरामर केला आहे. ही मालिका क्लीजने त्याची तेंव्हाची पत्नी कॉनी बूथ बरोबर लिहिली, दिग्दर्शित केली आणि या दोघांनी त्यात भूमिकाही केल्या. बॅझिल फॉल्टी ज्या एकमेव व्यक्तीला घाबरतो आणि जिच्या व्यवहारज्ञानाने त्यांचे छोटेसे हॉटेल सुरळीत चालू रहाते त्या सिबील फॉल्टीची भूमिका प्रूनेला स्केल्सने उत्तम वठवली आहे. याशिवाय मॅन्युएल (अँड्र्यू सॅक्स) हा फारच जेमतेम इंग्रजीए समजणारा बिचारा स्पॅनिश वेटर आणि एकमेव 'नॉर्मल' पात्र म्हणून पॉली (कॉनी बूथ) नावाची चेंबरमेड अशी गमतीशीर टीम आहे. अवश्य पहावी अशी मालिका, 'गोर्मे नाईट' आणि 'जर्मन्स आर कमिंग' वगैरे भाग तर एकदम छप्परतोड आहेत. ही मालिका नेटफ्लिक्सवर आहे आणि यूट्यूबवरही काही टीजर्स आहेत. हा एक,

२) आल्लो आल्लो:
बीबीसीची १९८०च्या आसपासची अजून एक मालिका, नाझी काळात जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या फ्रेंच कॅफेत घडणारी ही गोष्ट. ही गोष्ट तशी प्रत्येक भागात सारखीच असते, ह्रेने(René) हा एक कॅफेचा चालक, त्याची बेसुरे गाणारी पत्नी, तिची अंथरुणाला खिळलेली आई, मलकिणीच्या नाकाखाली ह्रेनेशी भानगडी करणार्या दोन चंट वेट्रेसेस, गाववर ताबा असलेले गेस्तापो, कॅफेत भूमिगतपणे रहात असलेले दोन ब्रिटीश एयरमेन,त्यांना सोडविन्याचा प्रयत्न करत असलेले ह्रेसिस्टाँस (रेसिस्टाँस) अशी सगळी पात्रे, त्यात एक सर्वांचा डोळा असलेले 'फॉलन मॅडोनाचे' पेंटींग, प्रत्येक परदेशी पात्राचे अतिशयोक्त उच्चार असलेले संवाद, फार्सिकल नाट्य, वाटेल तसा धुमाकूळ आणि शारीर विनोद. यात गंमत अशी आहे पात्रे ज्याप्रकारच्या अतिशयोक्त उच्चारात ही पात्रे बोलत असतील त्या भाषेत ती बोलताहेत असे समजायचे, म्हणजे संवाद इंग्रजीतच असतात पण ते फ्रेंच किंवा जर्मन किंवा इटालियन वगैरे भाषात असणे अपेक्षित असल्याने ती भाषा न बोलणार्या पात्रांना ते समजत नाही असे समजायचे. वाटेल तो धुमाकूळ आहे या मालिकेत आणि तो अनेक सिझन्समधे अविरतपणे चालू रहातो, सर्वांना आवडेलच याची खात्री नाही पण हा वेडपट जातीचा विनोद मला बेहद्द आवडला होता. बरेच भाग ऑनलाईन पहाता यावेत, त्याचा एक टीजरः

३) एपिसोड्सः
ही अलिकडच्या काळातली बीबीसी आणि अमेरिकन डेविड क्रेन यांनी सहनिर्मित केलेली मालिका. शॉन आणि बेव्हर्ली हे इंग्लंडमधे 'लायमन्स बॉईज' नावाची एक उच्चभ्रू विनोदी मालिका लिहिलेले एक सफल, सुसंस्कृत, विवाहित जोडपे. त्यांना हॉलिवूडच्या एका मोठ्या टीव्ही कंपनीकडून त्यांच्या लायमन्स बॉईजचे अमेरिकन रुपांतरण करण्याचे निमंत्रण येते. हॉलिवूडी रिवाजाप्रमाणे त्यांना हरबर्याच्या झाडावर चढविण्यात येते, पात्र निवडीबद्दल, संहितेच्या मूळ कल्पनेबद्दल वगैरे त्यांच्या सर्व मागण्या मान्य होतात आणि आपले हॉलिवूड ड्रीम पूर्ण करायला हे जोडपे अमेरिकेत येते. अर्थातच त्यांचा भ्रमनिरास होतो, त्यांच्या मालिकेचे अमेरिकीकरण होताना त्याची संहिता पूर्ण बदलली जाते, उतारवयीन पब्लिक स्कूलच्या स्थूल आणि उच्चभ्रू ब्रिटीश मुख्याध्यापकाच्या ऐवजी हॉकी कोचच्या भूमिकेत मॅट लब्लाँक येतो आणि शॉन आणि बेव्हर्लीचे आयुष्य एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे चालू रहाते. त्यातच भर म्हणून की काय पण मॅट लब्लाँक या 'सिरीयल वूमनाईझर'च्या रूपाने त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही वादळे येतात. ही मालिका आहे ब्रिटीश उच्चभ्रू विनोद आणि हॉलिवूडी मालिकांतल्या साचेबद्ध कॅन्ड विनोदातल्या संघर्षाची, दोन्हींतल्या विरोधभासांची आणि तरीही असलेल्या परस्परांबद्दलच्या आकर्षणाची. शॉनच्या भूमिकेतला स्टीव्हन मँगन, टॅम्सन ग्रेगची बेव्हर्ली आणि मॅट लब्लाँकच्या भूमिकेतला मॅट लब्लाँक अतिशय सहजपणे आपल्या भूमिकांत उत्तमपणे वावरतात, कोणतीही अतिशयोक्ती न करतानाही उत्तम पटकथेच्या जोरावर खुसखुशीत विनोद तयार करतात. त्यांच्या जोडीला मर्क लपिडसच्या भूमिकेत जॉन पन्कॉव, कॅरोलच्या भूमिकेत कॅथलिन रोज पर्किन्स आणि मर्कच्या आंधळ्या बायकोच्या (जेमी) भूमिकेत जेन्व्हिव ओरायली आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे वठवून मालिकेत रंग भरतात. या मालिकेचे पहिले दोन सिझन पूर्ण झाले आहेत आणि सद्ध्या तिसरा सिझन चालू आहे. आतापर्यंत पाहिलेल्या भागांप्रमाणे तिसरा सिझन थोडा फिका आणि 'तोच तोपणा' आलेला झाला आहे असे मला वैयक्तिकदृष्या वाटले पण तरी मालिका मस्त आहे आणि तिची मी नक्कीच शिफारस करेन. पहिल्या सिझनचा ट्रेलरः

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

भारी धागा. याच धाग्यावर क्राईम सिरियल्सबद्दल राधिकानं लिहावं अशी विनंती (ती न मानली गेल्यास मालकीणबाईंना राधिकास धमकी देण्याची विनंती लगेहाथ).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बिंज वॉचिंग साठी माल मिळाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अरे वा.. हे भारतात कुठेशिक मिळेल म्हणालात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'द ब्लॅक अ‍ॅडर' ही मालिका पाहिली असल्यास त्याबद्द्लही लिहा...यूट्यूबवर काही वर्षांपूर्वी बरेचसे भाग होते-आता आहेत की नाहीत ते माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"येस मिनिस्टर" राहिलं की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Only Fools And Horses, The Office, Waiting For God चे
काही भाग, म्हणजे जे पाहीले ते आवडले, बाकी वेळेचा लोचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि दोन राहिल्या - Yes Minister आणि Are You Being Served?. या दोन्ही सिरीअल्स मधे मंडळींची उत्तम कामं आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे पहिल्यातला सर हंफ्रेज आणि दुसर्‍यातला कॅप्टन पीकॉक!!

मिसेस 'बुके'ची Keeping up Appearances ठिक आहे एक - दोन एपिसोडस अधनं-मधनं बघायला. बिंज-वॉचिंग जमणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

माँटी पायथन ही एक कल्ट क्लासिक विनोदी ब्रिटिश मालिका. नंतरच्या काळात कल्ट ठरलेली आणखी एक ब्रिटिश विनोदी मालिका - अली जी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ब्येष्ट्च. Python ही प्रोग्रॅमिंग भाषा शिकत असताना तिला या मालिकेवरुन नाव दिले आहे हे समजलं. तेव्हा पाहिले काही भाग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॉँटी पायथनचे बरेच भाग माझ्याकडे डिस्कवर पडून आहेत. अनेक प्रयत्न करुनही अद्याप एकही भाग पूर्ण पाहू शकलो नाही. इतरांना ही मालिका का आवडली हे ऐकण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लिखाण आणि ज्या मालिकेबद्दल हे लिखाण आहे ती, हे दोन्ही प्रौढांसाठीच आहे.

एपिसोड्स ही एक विनोदी मालिका आहे. मालिकेत मानवी स्वभावाचे कंगोरे चांगले दाखवले आहेत. ब्रिटीश आणि अमेरिकन संस्कृतींमधल्या फरकाबद्दल कुरकुरीत टिप्पणी आहे. या मालिकेत आधुनिकोत्तर विनोद आहे. (चला, मलाही समीक्षक बनता येईल, अशी भावना निर्माण झाली.)

बेव्हरली - बेव्ह आणि शॉन हे ब्रिटीश लेखक जोडपं, ब्रिटनमधे आपल्या टीव्ही मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि पारितोषिकंही मिळाली म्हणून सुखावलेलं आहे. पारितोषिकांच्याच एका समारंभात, एका अमेरिकन टीव्ही नेटवर्कचा प्रमुख, मर्क, त्यांना येऊन भेटतो. ही मालिका या दोघांनी अमेरिकेत पुन्हा बनवावी अशी गळ घालतो. मालिका तर आधीपासूनच लिहून तयार आहे. अमेरिकेत पायलट एपिसोड बनवायला कितीसा त्रास होणार म्हणून हे दोघे, आधी आढेवेढे घेऊन, पण नंतर हो म्हणतात.

लॉस अँजेलिसला, हॉलिवूडमधे आल्यावर यांना समजतं की मर्कने ही मालिका पाहिलेलीच नाही. आणि हे समजतं, कॅरलकडून जी मर्कची साहाय्यक+गर्लफ्रेंड आहे. मर्कचं लग्न शाबूत आहे, पण बायको आंधळी झाल्याचा फायदा मर्क उठवतो आहे ... बायकोला समजतच नाही हा मर्कचा गैरसमज असणार, हे काही भागांनंतर दिसतंच. मर्क फार काही कर्तबगार नाही, पण कॅरल फारच हुशार आणि कर्तबगार आहे. तिच्या जीवावर मर्क, सगळ्याच प्रकारची, मजा मारतो आहे. कॅरल तशी कोरडी आणि फारच व्यवहारी बाई आहे. शॉन आणि बेव्ह हे जोडपं अगदी मेड-फॉर-इच-अदर आहे; दोघेही कामसू, कष्टाळू, फार थिल्लरपणा न करणारे, आणि एकंदर ब्रिटीश लोकांबद्दल जी प्रतिमा असते, तसे कोरडे आणि त्यांच्या अमेरिकन कलीग्जशी तुलना करता फारच उच्चभ्रू लोक आहेत. हॉलिवूडमधे नेटवर्कचे लोक आणि मालिकेत काम करणारे लोक यांच्याशी त्यांचं वाजत राहणार हे उघड आहे. पण पैसा, कामाची निश्चिती आणि इतर भानगडी (कोणत्या ते सांगत नाही.) यामुळे मालिका चालत राहणं त्यांच्या हिताचं आहे. ब्रिटीश आणि अमेरिकन संस्कृती कशा वेगळ्या आहेत, हे काहीही माहित नसेल तरीही असे सगळे विनोद समजतील. माहित असेल तर ते अधिक appreciate होईल.

एपिसोड्सच्या पोस्टरवरच मॅट ल ब्लॉंक उर्फ 'फ्रेंड्स'मधला जोई दिसतोय. या लेखकद्वयीच्या इच्छेविरोधात (मालिकेतल्या) मालिकेत मॅटला प्रमुख भूमिका मिळते. 'एपिसोड्स'मधे मॅट ल ब्लॉँकने स्वतःचंच काम केलं आहे. मॅट जरी यात स्वतः असला तरी त्याचं पात्र मात्र संपूर्णतः जोई आहे. 'फ्रेंड्स'मधला जोईसुद्धा नट असतो, अभिनेता बनण्याच्या प्रयत्नात असतो. जोई जसा womaniser दाखवला आहे, मालिकेतला मॅटही तसाच आहे. आणि त्याचं हे वर्तन पुरेसं नाही का काय, म्हणून त्याचे शारीरिक गुणधर्मही तसेच आहेत, असं सुचवलं आहे. (दाखवत काहीच नाही हो!) मॅट शारीरिकदृष्ट्या आणि वर्तनातून एकसारखाच दाखवला आहे, dick! निदान सुरूवातीला बेव्ह आणि शॉनला असंच वाटतं.

मॅट हा जोईच आहे, मॅट नाही हे सांगणारे अनेक मजेशीर प्रसंग मालिकेत आहेत. विशेषतः एक फारच आवडला. (रहस्यभेद नाही, पण तरीही ज्यांना प्रसंगांचे तपशील अजिबातच वाचायचे नाहीत त्यांनी हा परिच्छेद सोडून दिला तरी चालेल.) शॉन आणि मॅटचं काही कारणास्तव भांडण, मारामारी होते. त्याच्या नुकतंच आधी मॅटने शॉनला, 'जोई' या नावाचे बनवलेल्या कलोनचा मोठा खोका दिला आहे. या मारामारीत मॅट एका भिंतीसमोर उभा आणि शॉन त्याच्या अंगावर जोई कलोनच्या बाटल्या फेकतो. मॅट त्याचे नेम चुकवतो आणि बाटल्या भिंतीवर आपटून फुटतात. Now 'Joey' is all in the air ... सगळीकडे 'जोई' पसरला आहे. जोई आणि फ्रेंड्स असे संदर्भ अधूनमधून येत राहतात. ('एपिसोड्स' समजण्यासाठी 'फ्रेंड्स' बघण्याची काहीही गरज नाही. 'फ्रेंड्स' काय आहे याचा अंदाज असला तरी पुरेल.)

मॅटच्या करियरबद्दलही बरेच विनोद आणि संदर्भ मालिकेत आहेत. हॉलिवूडबाहेरचे बरेचसे लोक त्याला 'जोई' म्हणूनच ओळखतात. 'फ्रेंड्स' वगळता मॅटने कोणत्याही थोर मालिका, चित्रपटात काम केलेलं नाही, हा प्रत्यक्षातला संदर्भ 'एपिसोड्स'मधे येत राहतो. बाकी सगळीकडे मॅटचं पात्र जोईच असलं तरीही करियरबद्दल बोलताना मॅट आणि जोई अशी अदलाबदल होते.

मालिकेत दाखवल्याप्रमाणे हे लोक मालिका बनवत आहेत, आणि सगळी गोष्ट जी आहे ती बनवत असलेल्या मालिकेतल्या गोष्टीची आहे. नाही, हे मी मुद्दाम गोंधळ वाढवण्यासाठी लिहीलेलं नाही. एपिसोड्स या मालिकेत विनोदाचा तिसरा पापुद्रा आहे तो अशा प्रकारचा आहे. शॉन-बेव्हच्या लिखाणात, 'पक्स' नावाच्या काल्पनिक मालिकेत जे घडतं, तेच आपल्याला दिसणाऱ्या 'एपिसोड्स' मालिकेत थोड्या-बहुत फरकाने घडतं.

मॅटचं पात्र जोईसारखं ढ दाखवलेलं नाही. 'फ्रेंड्स'मधे जोई काहीही वाचन न करणारा, सामान्यज्ञान आणि तर्क वगैरे सगळ्याचा पूर्ण अभाव असणारा दाखवलेला आहे. पण तरीही जोई स्वभावाने गोड आणि सच्चा मित्र आहे. एका बाजूला सतत 'स्कोर करण्याच्या' प्रयत्नात असणाऱ्या जोईचं त्याच्या मित्रमंडळावर खरोखर प्रेम आहे. घटस्फोट झालेला असला तरीही पूर्वपत्नीची त्याला काळजी आहे, तिच्याबद्दल याला अजूनही प्रेम आहे. आपल्या दोन पोरांसाठीही तो जे जमेल ते करायला तयार आहे. करीयरसाठी काहीही तडजोडी करायला असणाऱ्या कॅरललाही मानवी स्वभाव आहे. तिच्या मैत्रिणीला, बेव्हला, तिच्याबद्दल असणारा उलुसा का होईना, आदर टिकवून ठेवावा असं तिला वाटतं. बाकी फार व्यवस्थित असल्यामुळे रटाळ वाटणाऱ्या बेव्ह आणि शॉनच्याही गमतीजमती आहेत. बेव्हला गिफ्ट हँपर गोळा करायचं व्यसन आहे. कोणत्याही चॅरिटी कार्यक्रमाला गेली की लोकांनी सोडून दिलेल्या हँपरच्या पिशव्या ती गोळा करते. शॉनला गाड्यांचं आकर्षण आहे. टकाटक गाडी दिसली की याचा तोल सुटतो.

विसंवादी पात्रांमधून निर्माण होणारे विनोद बरेचदा दिसतात. ते या मालिकेतही आहेत. पण त्यापुढे मालिका, मालिकेतली मालिका आणि प्रत्यक्षात जे काही घडतंय त्याचाही एक तुकडा जोडून निर्माण केलेला 'एपिसोड्स'मधला विनोद वेगळेपणामुळे खूप काळ लक्षात राहण्यासारखा आहे.

---

'कपलिंग' या ब्रिटीश मालिकेबद्दल आधी किंचित लिहीलं होतं. -

रुचीच्या सूचनेवरून 'कपलिंग' नावाची ब्रिटीश मालिका बघायला सुरूवात केली आहे. दोन दिवसात सहा भागांचा पहिला सीझन बघून संपला. ही मालिका 'सेक्स कॉमेडी' आहे, पण 'अमेरिकन पाय'सारखी गलिच्छ अजिबात नाही एवढं वगळता लिहीण्यासारखं मला फार काही सुचलं नाही. (या वाक्याबद्दलही रुचीचे आभार.) तीन मित्र, तीन मैत्रिणी एकत्र येऊन धमाल करतात हे वाचून 'फ्रेंड्स'ची आठवण होणं अपरिहार्य आहे. पण 'कपलिंग' त्यापेक्षा फारच वेगळी वाटते आहे.

एकटं बसून दारू पिणं अधिक miserable का ही मालिका एकट्याने/एकटीने बघणं हे मला ठरवता येत नाहीये. तेव्हा शक्य तेवढे डांबरट मित्रमैत्रिणी जमवून मालिका पहा, नाहीतर आपल्या नवरा/बायको/पार्टनरसोबत पहा. आपापली निवड.

हा या मालिकेचा यू ट्यूबचा दुवा
http://www.youtube.com/user/coupiing
मालिका नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

ही मालिका अमेरिकन टीव्हीसाठी पुन्हा बनवायची कल्पना होती. पण अमेरिकन लोकांना यातले विनोद अतीअश्लील वाटल्यामुळे ते बारगळलं. हे आठवून 'एपिसोड्स' पाहताना आणखी गंमत वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐला, जोई नावाचीच एक मालिका आहे त्याचं दिग्दर्शन फ्रेंड्सवाल्या रॉसने केलेलं आहे ती पाहीलेली. एपिसोड्समधे जोई आहे माहीतीच नव्हतं. आता शक्य तितक्या लवकर बघणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटीश 'ऑफिस' आणि अमेरिकन 'ऑफिस' मध्ये दोन्ही चांगली आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी दोन्ही मालिका पाहिल्या. प्रत्येकाला आवडीनिवडीचे स्वातंत्र्य आहेच. मला अमेरिकन ऑफिस बरेच चांगले वाटले. स्टीव कॅरलच्या कामाला तोड नाही. ब्रिटिश ऑफिसमधले काही संवाद अजिबातच कळत नव्हते त्यामुळेही ब्रिटिश आवृत्तीत फारसा रस निर्माण झाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही ऑफिस बाबतीत माझे मत प्रतिकूल आहे. जर्वेसचे विनोद आवडतात पण त्याच्या सिरीज आवडल्या नाहीत. नुकत्याच आलेल्या 'डेरेक'लाही चान्स दिला पण नाही आवडली.

अमेरिकेत ऑफिसचा चाहता वर्ग मोठा आहे, इथे माझ्या मताचे जाहिरप्रदर्शन संकटात टाकू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आयटी क्राऊड ही आवडलेली एकमेव ब्रिटिश विनोदी मालिका. त्यातील विशेषतः कॅथरिन पार्किन्सनचे काम फारच अफलातून आहे. साईनफेल्डमधील एलेन नंतर आम्हाला प्रेमात पडावे इतके विशेष आवडलेले हे दुसरे स्त्रीपात्र. होम्स वगैरे मालिका अर्थातच आवडल्या आहेत. मात्र त्या विनोदी नाहीत. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पण आवडली होती. तो प्रचंड कुरळे केस असलेला शेल्डन कूपर टाईप प्राणी तर लय भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वर उल्लेख झालेल्या 'यस मिनिस्टर' आणि 'ब्लॅक अ‍ॅडर'ला अर्थातच दुजोरा! त्याशिवाय बीबीसीने काढलेली 'जीव्हज अँड वूस्टर' ही मालिकाही छानच होती. जीव्हजच्या भूमिकेत स्टीव्हन फ्राय आणि वूस्टर म्हणून ह्यू लॉरी ही जोडगोळी अगदी मस्त जमली होती, विकत घेऊन संग्रही ठेवायलाही हरकत नाही अशी मालिका वाटली.
अलिकडच्या काळात 'फ्रेश मीट' नावाची एक मालिकाही आवडली होती, सर्वांच्याच पचनी पडेल असा विनोद नव्हे पण मला आवडली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिट ह्युमर असे खोड्साळ शिर्षक दिल्याने आता तुलना करणे अपरिहार्य आहे. Wink

स्टीवन फ्रायचे अमेरिकन वि. ब्रिटीश ह्युमर बद्दलचे मत इथे ऐकता येईल. (हे ऐकल्यानंतर ब्रिटिश आणि भारतीय (विशेषतः मराठी) विनोदाची जातकुळी मिळतीजुळती आहे असे वाटते.)

फ्राय अ‍ॅन्ड लॉरी ही सिरीज शोधून शोधून पाहिली आणि आवडली. (शोधायचं कारण फ्राय आणि लॉरी हे दोघे वेगवेगळ्या कारणांकरता आधी आवडले)

माझी सर्वात आवडती ब्रिटिश सिरीज म्हणजे टॉप गिअर. २००२ पासून (२१ सिझन्स!) चालू असलेल्या या 'कार शो' मधील विनोद अप्रतिम आहे. कॅरॅक्टर्स हे इतकी वर्ष होऊनसुद्धा कन्सिस्टंट आहेत, आणि तरीही रिपीटेटीव्ह वाटत नाही.
अशीच विनोदी मालिका नसतानाही ब्रिटिश विनोदबुद्धी आवडल्याची काही उदाहरणं म्हणजं, मायकल पेलिनची "हिमालया विथ मायकल पेलिन" किंवा "मायकल पेलिन इन सहारा".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

टॉप गिअरचा 'भारत स्पेशल भाग' पाहिला आहेस का? त्यावरून उगीचच नेहमीसारखे वाद उद्भवले होते. बाकी जेरेमी क्लार्क्सनला वेगवेगळ्या गटांच्या खोड्या काढायलाही आवडतातच म्हणा! कार शोज मधे रस नसतानाही आणि कधीकधी जेरेमी आयर्न्सला दोन ठेऊन द्याव्याश्या वाटतानाही शो मात्र आवडायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो! काय धमाल एपिसोड आहे तो!

टॉप गिअरचे स्पेशल्स (प्रत्येक सिझनमध्ये एक) हे विनोद, भुगोल, इतिहास, संस्कृती आणि कारप्रेमींसाठी मेजवानीच असते. मग बोलिव्हियातील अमेझॉन जंगल ओलांडून जाणे असो, उत्तर धुवावर जाणे असो नाहीतर मिडल ईस्टमधील 'थ्री वाईज मेन' थीमचा ख्रिस्तमस स्पेशल असो. तुम्हाला दमास्कस मधील रोमनकालीन ग्लॅडिएटर (रेस?) एरिनामध्ये बीएमडब्ल्यु, माझ्दा वगैरे कॅब्रिओले गाड्यांची रेस जगात कुठे बघायला मिळणार हो?

दोन मिनिट पासून पहा.

अमेरिकेतील 'डीप साऊथ' मध्ये या लोकांनी घातलेला गोंधळ पाहणे फार्फार धमाल आहे. फ्लोरिडातून न्यु ऑर्लिन्सला जाताना या दक्षिणेतल्या अमेरिकन लोकांशी घेतलेला पंगा चुकवू नये! (लोकल लोकांकडून मार खाता खाता वाचले!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

इटली स्पेशल पण छान आहे. ईटालियन स्टिग तर एक नंबर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आल्लो आल्लो ही माझी प्रचंड आवडती मालिका आहे. युरोपातल्या, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोलिश अशा बर्‍याच लोकांची जाम धमाल टर उडवली आहे. त्यातला नको तिथे आकार उकार वगैरेंची गल्लत करून (आय हॅव कम टू गिव यु अ मेसेज ऐवजी मसाज!) धमाल उडवणारा सार्जंट, जर्मन जनरल, गेष्टापो अधिकारी, जर्मन सेक्रेटरी, सतत 'गरम' इटालियन... एक से एक! बेष्टच!

माइंड युवर लँग्वेज किंवा यस मिनिस्टर वगैरेही प्रचंड आवडतात.

अ‍ॅस्टरिक्स हा ही असाच एक आवडता प्रकार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

सम मदर्स डू हॅव देम - हे कसं राहून गेलं? अत्यंत धमाल मालिका.

अ‍ॅलो अ‍ॅलो
येस मिनिस्टर
आर यु बिंयिंग सर्व्ड

आवडत्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आलो आलो'मधला रेने उर्फ गॉर्डन के या ब्रिटिश नटाचं, काल २३ जानेवारी रोजी निधन झालं. यूट्यूबवर 'आलो आलो'चे सुरुवातीचे दोन भाग बघून त्याची आठवण जागवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरेरे.. फारच सुंदर मालिका होती. टोरंट कृपेने कायमची मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. कीपींग अप अ‍ॅपीअरंसेस - नर्म विनोदी सिटकॉम आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Keeping_Up_Appearances

२. द थिन ब्लु लाइन : रीचर्ड कर्टीस / बेन एल्टनची मालिका. रोअन अ‍ॅटकीनसन नी एका पोलिस इन्स्पेक्टरची मुख्य भुमिका केली आहे. ही धमाल आहे.

https://en.wikipedia.org/wiki/The_Thin_Blue_Line_(TV_series)

३. ब्लॅकअ‍ॅडर : रीचर्ड कर्टीस / बेन एल्टनची मालिका. ह्यात पण रोअन अ‍ॅटकीनसन आहे. :

https://en.wikipedia.org/wiki/Blackadder

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या उच्च विनोदांच्या श्रेणीपुढे (समजा १ नं.), मराठीतल्या 'मॉकेडी ऐसपैस', टाईप इनोद कितव्या नंबरवर बसतील ? (१०-१०००)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0