(एरोप्लेन)

सकाळचे पावणेअकरा वाजण्याचा सुमार असेल. काल रात्रपाळी होती त्यामुळे पलंगावर झोपलो होतो. म्हणजे स्वप्नात यंत्रावर वीजनिर्मीती कशी करायची याचे दृष्य पाहत होतो. स्वप्न सुरू होवून मुख्य विषयात शिरत होतो तोच गल्लीतल्या लहान मुलांचा आरडाओरडीचा आवाज, मागोमाग विमानाचा घरघराट. झोप थोडी विस्कळीत झाली. पुन्हा एखाद्या मिनीटाने घरघराट झाली. असा प्रकार तिनेक वेळा घडला. आता एरोप्लेन म्हणजे काही नवलाई नाही हे खरे पण आवाजावरून ते बरेच जवळ वाटले. झोपेच्या अंमल अजून असल्याने सुर्यप्रकाश न येवू द्यावा म्हणून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्या भागात आर्टीलरीचे शिकावू हेलिकॉप्टर नेहमी उडतात. अगदी खालून त्यांचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम चालतो. त्यामुळे हेलिकॉप्टरचा नित्याचा आवाज परिचयाचा होता. हा नक्की एखाद्या मोठ्या विमानाचाच आवाज आहे हे त्याच्या आवाजावरून व लहान मुलांच्या आरड्याओरड्यावरून जाणवत होते. मराठी संकेतस्थळांवर गविंनी विमानांच्या अपघांतांची सिरीज चालू केल्याने त्यातील घटना डोक्यात होत्याच. त्यातच सर्वसाक्षींचा हेलिकॉप्टर हा धागाही लक्षात होता.

आज शहरात काही समारंभ, उद्घाटन, मंत्र्यांची बैठक, एखाद्या अभिनेत्याचा/ अभिनेत्रीचा कंबरडान्स चा स्टेज शो असला काही प्रकार आहे का हे आठवण्याचा प्रयत्न केला. पवारसाहेबांच्या घटनेचा काही इफेक्ट असावा असे वाटले पण ते विमान बघून तसे काही वाटले नाही. ते विमान एटीसीचा उतरण्याचा हुकूम अजून न आल्याने इंधन जाळण्यासाठी आकाशात घिरट्या घालत असावे इतके ज्ञान गविंचे लेख वाचून आले होते.

झोप तर बावचळलीच होती म्हणून म्हटले की आता उठावे अन छतावरच जावून पहावे की नक्की काय आहे ते. उठलो, कॅमेरा घेतला आणि घराच्या छतावर गेलो अन पहातो तर एक राखाडी रंगाचे एरोप्लेन भिरभिरत होते.

1

हे नक्कीच लष्काराचे विमान होते. त्याच्या पंखांखाली भारतीय तिरंग्याचे गोल व काहितरी नावही रेखाटले होते.
3

ते विमान वेगवेगळ्या दिशांनी गोल चकरा मारत होते.
2

4

5

6

ते विमान शिकण्याचे होते व वैमानिक शिकावू दिसत होता. त्याने वेगवेगळ्या व्यासांच्या पाच सहा गोल चकरा मारल्या व माझी सुखाची झोप मोडून पुन्हा धावपट्टीच्या दिशेने निघून गेले.

अवांतर: विमान, विमानतळ, त्यातील वातावरण हे सर्वसामान्यांसाठी गुढ वलय असलेला व्यवसाय आहे. खालील मनातल्या शंका/ प्रश्न खास गविंसाठी किंवा तुम्हा माहितगारांसाठी आहेत.
हे असले लष्करी विमांनाचे प्रशिक्षण नागरी वस्तींच्या वरून करणे हे त्यांच्या नियमात आहे काय? कारण लष्कराची फार मोठी जागा मोकळी आहे. ती जागा नागरी वस्तीची नाही. बक्खळ शेते डोंगररांगा त्या मोकळ्या जागेत येतात. असे असतांना केवळ उड्डाण व उतरणे नागरी वस्तींच्या वरून झाले तर समजू शकते. पण हे शिकावू वैमानिकांचे प्रशिक्षण नागरी वस्तीवरून एवढ्या खालून करणे योग्य आहे काय? मागे असलाच एक अपघात लष्करी हेलिकॉप्टरचा येथे झाला होता. ते हेलिकॉप्टर एका अपार्टमेंटला उडतांना धडकले होते व दोन्ही वैमानिक ठार झाले होते.

लष्करी व कमर्शीयल प्लेन्स नागरी वस्तीवर धडकले तर जिवीत व वित्त नुकसानभरपाई मिळते काय? जिवनविम्यात विमानांचा अपघात कव्हर होत नाही ही माझी समजूत आहे. जाणकार यावर प्रकाश टाकतील काय?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अनेकांना हे विडंबन आहे हे लक्षात आलं नाही बहुतेक. मूळ लेखाचा दुवा दिला असतात तर बरं झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0