दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ - ग़ालीब

मित्रहो,

आज आपण ग़ालीबच्या आणखी एका ग़ज़लेचा आनंद घेणार आहोत. मला तरी ही समजायला जरा अवघडच गेली. बघा आपल्याला काही वेगळा / बरोबर / आणखी चांगला अर्थ काढता येतो आहे का ?

दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ
है ये वो लफ़्ज कि शर्मिंदा-ए मानी न हुआ

या हल्लीच्या काळात प्रेमातील विश्वासाचा जो अर्थ काढला जातो त्याने व तो का काढला जातो, याने काही मनाचे समाधान होत नाही.
हाच तो शब्द आहे ज्याचा खरा अर्थ काढता काढता अनेकांची दमछाक झाली आणि त्यांनी शरमेने मान खाली घातली.

या काळात प्रामाणिकपणाचा नकाशा काढायचा/चित्र/अर्थ सांगायचा बराच प्रयत्न झाला पण त्याने काही आमचे समाधान झाले नाही.
हाच तो शब्द आहे ज्याचे चित्र काढता काढता त्या थोर चित्रकाराचीही मान खाली गेली.
दहर : काळ, नक्शे-वफा : विश्वासाचे चित्र, तसल्ली : आराम वाटणे, समाधान वाटणे, मानी : थोर चित्रकार.

सब्ज़ा-ए-ख़त से तेरा काकूले सरकश न दबा
ये ज़मुर्रद भी हरीफ़े-दमें-अफ़ई न हुआ.

पाचूच्या तेजापुढे नागाची दृष्टी जाते असे म्हणतात. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण इथे उलटेच आहे. तुझ्या गालावर रुळणार्‍या नागासारख्या बटांवर तुझ्या पाचूसारख्या ओठांच्या महिरपीचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. ते (बंडखोर) आपले सारखे गालावर रुळतच आहेत आणि (आम्हाला वेड लावत आहेत).
स्बज़ा – हा शब्द हिरवा रंग दाखवतो.
काकुले – कुरळ्या केसांची बट
सरकश – बंडखोर
हरिफ़ – प्रतिस्पर्धी
अफ़ई – नाग/साप

मैने चाहा था कि अंदोहे वफ़ा से छूटू
वो सितमगर मेरे मरने पे भी राज़ी न हुआ.

माझी खूप इच्छा होती त्या क्लेशकारक प्रेमातून सुटण्याची, त्यासाठी माझी मरणसुध्दा पत्करायची तयारी होती.
पण हाय ! ती मला मरूही देत नाही (आणि जगूही देत नाही.)

दिल गुज़रगाह-ख़याले-मय-ओ-साग़र ही सही
गर नफ़स जादा-ए-सरमंज़िले-तक्वी न हुआ.

या आयुष्याच्या विशाल वाटेवर माझे मन हे या दुनियेतील मोहांनी भरलेले असेलही...
पण आता या क्षणी या पायवाटेवर मला माझ्या इच्छा आकांक्षांचाही आधार नाही. मला हे सगळे फोल वाटते आहे.
गुज़रगाह : रस्ता
मय-ओ-सागर : मोहमयी दुनिया
नफ़स : क्षण
ज़ादाह : पायवाट

हूं तेरे वादा न करने में भी राज़ी कि कभी
गोश मिन्नतकशे-गुलबांगे-तसल्ली न हुआ.

तू ना आमच्याशी कधी बोललीस ना कधी वादा केलास पण ते ठीकच झाले. तुझ्या या नाजूक फुलासारख्या ओठातून काही शब्द आमच्यासाठी उमटले असते तर ते आमच्यावर उपकारच झाले असते. पण तेवढे कुठले आमचे नशीब ?
गोश : कान
मिन्नतकश : उपकारित
गुलबांग : फुलासारख्या ओठातून हाक मारणे.
तसल्ली : समाधान

किससे महरुमि-ए-किस्मत की शिकायत किजे
हमने चाहा था कि मर जाए, सो वो भी न हुआ.

आमच्या नशिबाने आमची जी आयुष्यभर निराशा केली त्याची तक्रार कुठे करायची ?
आम्ही तर त्याला कंटाळून मरायची तयारी केली होती, पण हाय तिथेही नशिबाने आमची निराशाच केली.
महरूमि : निराशा.

मर गया सदमा-ए-यक जुंबिशे-लब से ग़ालिब
नातवानी से हरिफ़े-दमे-ईसा न हुआ.

त्या मोहक ओठांच्या हालचालींनी आम्हाला अशी एक ठेच पोहोचली की जणूकाही आमचा मृत्यूच ओढवला.
ज्या येशूने अनेक मरणोन्मुख माणसांना पुनरुज्जीवन दिले त्याचाही आमच्या केसमधे पराभव झाला.
किंवा
मेलेल्या माणसांना येशू एका फुंकरीने जिवंत करतात असे म्हणतात,
पण आमच्या या प्रेमरोगात ज्यात आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांमुळे मागे पडलो, त्यात येशूचेही काही चालले नाही.
सदमा : ठेच
नातवानी : अशक्त, मरणोन्मूख
इसा : येशू

पकड़े जाते है फ़रिश्तों के लिखे पर नाहक
आदमी कोई हमारा, दमें-तहरीर भी था.

वरती “त्यानी” आमचे भविष्य लिहायचे आणि आमचे सगळे त्याप्रमाणे व्हायचे.... असे नसते तर आमच्याही शब्दांना काही धार होती......
तहरीर : अक्षर, शब्द, लिखाण...

न था कुछ, तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझको होने ने, न होता मै तो क्या होता.

पण त्याने हे लक्षात ठेवावे....
काही नव्हते तेव्हा “तो” होता,
काहीच नसले तरीही “तो” असतोच असे म्हणतात.
मी इथे अडकलो आहे म्हणून या सगळ्या गमजा आहेत, मी नसतोच तर काय “तो” असता ? आणि काय काय असतं ? उत्तर आहे “काहीच नाही.”

पूर्ण ग़ज़ल आपल्यासाठी -

दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ
है ये वो लफ़्ज कि शर्मिंदा-ए मानी न हुआ

सब्ज़ा-ए-ख़त से तेरा काकूले सरकश न दबा
ये ज़मुर्रद भी हरीफ़े-दमें-अफ़ई न हुआ.

मैने चाहा था कि अंदोहे वफ़ा से छूटू
वो सितमगर मेरे मरने पे भी राज़ी न हुआ.

दिल गुज़रगाह-ख़याले-मय-ओ-साग़र ही सही
गर नफ़स जादा-ए-सरमंज़िले-तक्वी न हुआ.

हूं तेरे वादा न करने में भी राज़ी, कि कभी
गोश मिन्नतकशे-गुलबांगे-तसल्ली न हुआ.

किससे महरुमि-ए-किस्मत की शिकायत किजे
हमने चाहा था कि मर जाए, सो वो भी न हुआ.

मर गया सदमा-ए-यक जुंबिशे-लब से ग़ालिब
नातवानी से हरिफ़े-दमे-ईसा न हुआ.

पकड़े जाते है फ़रिश्तों के लिखे पर नाहक
आदमी कोई हमारा, दमें-तहरीर भी था.

न था कुछ, तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझको होने ने, न होता मै तो क्या होता.

ऐका येथे –

जयंत कुलकर्णी.
आवडल्यास अजूनही टाकता येतील....

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

एक सुचना/विनंती: मुळ गझलेचे शब्द वेगळे वाटतील असे रंगवावे/ ठ़ळक करावे जेणे करुन गझल कुठली.. शब्दार्थ कुठला हे कळेल.
बाकी गझलेच्या शब्दार्थासोबत भावार्थ दिलात तर अधिक मजा येईल.

ही माझी अत्यंत आवडती गझल आहे
एका आवडीच्या शेराबद्दल लिहितो (माझ्या आठवणीनुसार शब्दात शोडा बदल केला आहे कसे जमुर्रद च्याऐवजी ज़ुम्मुर्द) कारण मी समजलेला अर्थ वेगळा आहे.

सब्ज़ा-ए-ख़त से, तेरा काकुल-ए- सरकश न दबा
यह ज़ुम्मुर्द भी हरीफ़े दम-ए-अफ़ई न हुवा

ज़ुम्मुर्द: पाचु , सब्जा-ए-खत = कानाजवळ येणारी नाजुकशी लव, काकुल= बट, सरकश= मान (सर) उचलणारा (सर उठानेवाला), हरीफः शत्रु/प्रतिस्पर्धी, दम: श्वास/जीवन, अफ़ई : नाग/काळा साप

या शेराला समजण्यासाठी (प्रेयसीच्या गालांवर रुळलेल्या) कुरळ्या बटेचा फारच अभ्यास गरजेचा आहे Wink एक तर बाकी तपशीलांकडे न बघता केवळ ती काळी बट रुळणे बघितले तर ते काळ्या नागीणीसारखे वाटते जी गालाला कधीही डसेल. दुसरे असे की वाढत्या तारुण्यासोबत कानाजवळ गालावर एक नाजुकशी लव येते, अगदी नाजुक, समोरच्याचा ठाव घेणारी! याच सुंदर बदलाला अनुलक्षुन ही गजल आहे. (ही लव म्हणजे जणू सुखद हिरवळ आहे असे शायर म्हणतो). या हिरवळीला शायर आधी प्रतिस्पर्धी म्हणतो. दुसरे असे की ज़ुम्मुर्द ही हिरवा असतो ज्याला बघुन साप आंधळा होतो. तेव्हा या शेराचा अर्थ मी तरी असा घेतो.

त्या सुंदरीच्या केसांची बट जिवघेणी होतीच मात्र त्या काळ्या नागिणीला आंधळे करेल की काय अशी भिती मला (नव्यानेच उठलेल्या या) हिरव्यापाचुसारखी (बटेची प्रतिस्पर्धी) लवेची हिरवळ बघुन पडला होता. पण नशीब! असे काहि झाले नाही तुझ्या केसांचा फणाही तितकाच घायाळ करतो! नवी उठलेली आंधळे करू पाहणारी लव मुळच्या रुळलेल्या बटेचं सौंदर्य कमी करू शकलेली नाही (तर उलट वाढवलेच आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

//या शेराला समजण्यासाठी (प्रेयसीच्या गालांवर रुळलेल्या) कुरळ्या बटेचा फारच अभ्यास गरजेचा आहे//

आपला अभ्यास चांगला आहे हे निर्विवाद ! Smile

जयंत कुलकर्णी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Contradictions do not exists ! If you find any, check your premises !

छान. सुंदरीच्या केसांची जीवघेणी बट वगैरे ठीक आहे पण
सबज़ा ए ख़त से तिरा काकुले सर-कश न दबा
यह ज़ुमुररूद भी हरीफ़े दमे अफ़`ई न हुआ

हा शेर नुकत्याच मिसरूड फुटू लागलेल्या पौगंडावस्थेतल्या मुलासाठी लिहिलेला आहे.

हुस्न था तेरा बहुत आलम फरेब
ख़त के आने पर भी इक आलम रहा

ह्या मीरच्या शेराबाबतही असेच म्हणतात. हे त्याकाळी फार सामान्य होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सांगता काय!!!
यात मुलावर लिहिलंय म्हणून ऑब्जेक्शन नाही मात्र काकुले सर-कश न दबा हे मुलाला कसं म्हणता यावं.. मिशिवरून हात फिरवू नकोस वगैरे?
मुलाच्या दृष्तीकोनातून अर्थ लागला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिशिवरून हात फिरवू नकोस वगैरे?

काकुले सर-कश न दबा चा अर्थ मिशीवरून हात फिरवून नकोस असा होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो मी रँडमली गेस करत होतो!
मला मुलाच्या दृष्टीकोनातून (मुलाला अनुलक्षुन) या शेराचा अर्थ लागतच नाहिये Sad जरा सांगाल का?
खरड/व्यनीत सांगितलात तरी चालेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ! आपण सुचवल्याप्रमाणे बदल करतोय !

जयंत कुलकर्णी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Contradictions do not exists ! If you find any, check your premises !

जयंत जी, खूप आभार!

ग़ालिब साहेबां बद्दल काय बोलू? लताबाईंचे अद्वितीय गायन.. धन्य वाटले..
फक्त एक नाही समजले.. शेवटचे दोन अशआर ह्या ग़ज़लचे तर नाहीत मग येथे कसे काय?
"पकड़े जाते है फ़रिश्तों के लिखे पर नाहक
आदमी कोई हमारा, दमें-तहरीर भी था.
न था कुछ, तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझको होने ने, न होता मै तो क्या होता."

ह्यांचे रदीफ़ तर वेगळेच आहेत मग... ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

हेच म्हणतो.
वर दिलेल्या गझलेत बरेच शब्द चुकीचे आहेत. वेळ मिळाल्यावर अख्खी गझल टाईपतो.
बाकी शेवटचा शेर गालिबच्या एका दुसर्‍या प्रसिद्ध गझलेतील आहे. ती गझल जालावर मिळाली आहे ती येथे कॉपी-पेस्ट करतो आहे:
न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझको होने ने, न मै होता तो क्या होता

हुआ जब ग़म से यु बेहिस तो ग़म क्या सर कटने का
न होता गर जुदा तन से तो जानू पर धरा होता

हुई मुद्दत की ग़ालिब मर गया पर याद आता है
वो हर एक बात पर कहना कि यु होता तो क्या होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

//न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझको होने ने, न मै होता तो क्या हो////
मी यातील तज्ञ नाही. जसे समजेल तसे लिहीतो त्यामुळे
माझ्या चूका होण्याची शक्यताच जास्त आहे पण मीही गजल अशीच कुठूनतरी घेतली आहे....
चुका जरूर दुरूस्त कराव्यात....

जयंत कुलकर्णी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Contradictions do not exists ! If you find any, check your premises !