मेघ ..असाही ( अष्टाक्षरी )

मेघ कैवल्याचे देणे
मुक्त-सावळा-सुंदर
जणू चालता चालतो
माझ्यासवे मुरलीधर

मेघ वारीत चालतो
वारकर्‍यासवे दंग
जलधारांच्या अंगांनी
नाचतसे पांडुरंग

मेघ क्षणात लिलया
काढी मांगल्याची नक्षी
लख्ख केशरी पंखाचे
किती आभाळात पक्षी

मेघ वात्सल्याची भाषा
येई उरात दाटून
तृष्णावल्या धरेसाठी
जाई फुटून फुटून

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

मेघ कैवल्याचे देणे
मुक्त-सावळा-सुंदर
जणू चालता चालतो
माझ्यासवे मुरलीधर

सुंदर !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह.. बर्‍याच दिवसांनी छंदोबद्ध कविता वाचली..
आशय.. कविता दोन्ही आवडले.

येऊद्या असेच अजून काहि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुरेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कित्येक दिवसांनी एक चांगली छंदबद्ध कविता वाचून खरंच खूप बरं वाटलं.आपल्यासोबत चालणारा मुरलीधर नि आकाशात नाचणारा पांडुरंग या कृष्णमेघाविषयीच्या कल्पना खरंच खूप आवडल्या! असंच अजून येऊ दे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान कल्पना.

(शीर्षकात "अष्टाक्षरी" लिहिले आहे, म्हणून ... "माझ्यासवे मुरलीधर" ऐवजी "माझ्यासवे मुर्लीधर" असे लिहायला हवे होते. त्याहीपेक्षा "माझ्यासवे गिरिधर" हे बरे दिसले असते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जितक्या वेळा वाचते तितक्या वेळा आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0