असले कसले जेवण केले

असले कसले जेवण केले

जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

घरी येतांना खुप भुक लागली
लगेच आयत्या ताटावरती बसले

आमटीत होते पाणीच पाणी
जळक्या पोळ्यांचेही आकार कसले!

ईईई आळणी भेंडी करपा भात
तसेच खावून उपाशी मी उठले

काय नशिबी आले माझ्या
जेवण हे बेचव असले

कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला
तेथेच आयटीतली बाई मी फसले

सांगितले कितीदातरी त्याला
नको बनवूस जेवण असले कसले

पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच
करायचे लग्न मनी ठसले

एकदाचे जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

- डू द लुंगीडान्स, पाभे

------------------------
दिर्घोत्तरी प्रश्न:
१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे कोठे कोठे जाणवते?
२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते? त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. (शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.)
३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलींसाठी आहे.)
४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलांसाठी आहे.)
---------------------------
एका वाक्यात उत्तरे द्या:
१) आयटीत कोण कोण कामाला आहेत?
२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)
३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत?
---------------------------
जाहिरात:
आमच्याकडे घरगुती चविचे जेवणाचे डबे मिळतील. मंथली मेंबर्सनी चौकशी करावी.
घरगुती चव असलेले अन्नपदार्थ बनवण्याचे क्लासेस घेतो.
- अन्नपुर्णा मेस, आयटी पार्क (फेज २) जवळ, हिंजेवडी
---------------------------
सरकारी जाहिरात:
अन्नका हर दाना महत्वपुर्ण है|

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

दिर्घोत्तरी प्रश्न: ( उत्तर सावकाश दीर्घ श्वसन करत वाचल्यास अट पूर्ण झाल्याचा फील येईल . )
१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे कोठे कोठे जाणवते?

आधुनिक कसली बुरसटलेली आहे झालं , या जन्मीच दुसरे लग्न करता येईल की म्याड लेकाची . गेला बाजार लिव्ह इन तरी ट्राय करावे …. अरेरे ! :O

२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते? त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. (शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.)

नवरा मठ्ठ आणि स्वयंपाकी असावा . त्याने बायकोला जेवण भरवून द्यावे , म्हणजे तिला हात धुवून सारखे टॉवेलला पुसत बसावे लागणार नाही . अधून मधून दोघांनीही घोड्यासारखे हरभर्याचे तोबरे लावून टीव्ही बघत बसावे तेवढाच चेंज होतो शिवाय प्रोटिन्स मिळतात ते वेगळेच . (कवींसाठी सुचना : कविता पाडून झाल्यावर प्रश्नरूपी भुंगे बेसावध वाचकाच्या मेंदूत सोडून द्यावे . त्यातच कवितेच्या चर्वणाचा कडेलोट होणे अनिवार्य आहे . )

३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलींसाठी आहे.)

सुचना देऊन कोणी पाळत नाही त्यापेक्षा एखादे गुलाबी डुक्कर पाळावे झकास मनोरंजन सुद्धा होते . ;;)

४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलांसाठी आहे.)

इथे उघड उघड जेन्डर बायसतेची पराकाष्ठा झालेली दिसते . शिवाय सगळ्या सुचना जेवणाशी संबंधित कशाला मागवाव्यात ? खुशाल सलाइन लावून पडून रहावे हाय काय अन नाय काय !!
---------------------------
एका वाक्यात उत्तरे द्या:
१) आयटीत कोण कोण कामाला आहेत?
जनगणना झाल्यावर सांगू की , काय घाई आहे ?
२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)
भेंडीची भाजी करू म्हणून सुरणाचे पिठले करावे आणि भेंडीला बनवावे .
३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत?
नोकरी लागली की सगळेच आयटीत असतात . :-B

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त

असे भुकेले नक्का जाऊ
थांबा करते गोड खाऊ

ची आठवण झाली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!