जंबो जेट -जंबोजेट

सत्तर साली भारतात आलेल्या जंबोजेटने जंबो शब्द वापरात आणला. जंबोजेटच्या कहाण्यांनी-फोटोंनी पेपरांची पाने भरून वाहत होती. लांब पल्ल्याच्या ताफ्यातले एअर इंडीयाचे पहीले विमान. एअर पोर्टवर ते बघायला प्रचंड गर्दी व्हायची. सुरुवातीचे काही महीने पार्ला अंधेरी -सांताक्रुझ मध्ये लोकं गच्चीवर उभी राहून जंबो दिसायची वाट बघायची. मग जंबो सगळीकडेच दिसायला लागलं.
अंधेरीला नविन सोसायटी आली तिचं नामकरण जंबोदर्शन -
बाजूलाच दुसरी सोसायटी आली तिचं नाव विमान दर्शन
मोठं मंत्रीमंडळ आलं ते पण जंबो मंत्रीमंडळ -
मोठ्ठ्या थैल्या आल्या त्या जंबो बॅग -
मोठा वडापाव जंबो वडापाव.
सगळीकडे जंबो जंबो.
या सुमारास एक बालगीत पण आलं .बघता बघता ते लोकप्रिय झालं . बालगीताचं पिकनीक साँग झालं . गाणं कुणी लिहीलं कुणालाच माहीती नव्हतं. कुण्या कविने ते लिहील्याचं श्रेय पण मागीतलं नाही .गाण्याची लोकप्रियता वाढत गेली आज त्या गाण्याला चाळीस वर्षं होत आली पण अजूनही जंबोजेट जंबोजेट -लंडन मुंबई प्रवास थेट अशी सुरुवात कोणी केली की टाळ्या वाजवत आपोआप ठेका धरला जातो.
या गाण्याची आणखी एक गोष्ट आहे. डोंबीवलीला एका सुप्रसिध्द गायकांचा कार्यक्रम होता. गायक छान गात होते. वादकही मन लावून वाजवत होते पण मैफीलीत काही केल्या रंग भरेना. शेवटी गायकांनी आप्पा वढावकरांना विनंती केली "आप्पा आता तुम्हीच काहीतरी करा " आप्पांनी जंबोजेट -जंबोजेट म्हणायला सुरुवात केली. मैफीलीचा मूड एकदम बदलला. पहील्याच ओळीनंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत ताल धरला. कार्यक्रम नंतर रंगतच गेला आणि या गाण्याची लोकप्रियता रातोरात वाढली.
असाच कधीतरी या गाण्याचा विषय निघाला तेव्हा एका पत्रकार मित्रानी माहीती पुरवली की हे गाणं भाऊ तोरसेकरांनी लिहीलं आहे . भाऊ तोरसेकरांनी आणि बालगीत -हे समिकरण काही जमेना.भाऊ तोरसेकरांचं लक्ष भोजनाचं गाणं फार लोकप्रिय होतं पण ते गाणं म्हणजे त्या वेळी झालेल्या लक्षभोजना बद्दल होतं .थोडी आणखी चौकशी केली तेव्हा या गाण्याची जन्मकथा कळली. भाऊंनी आपल्या मुलीला घरीच शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. अभ्यास घेणं सोपं होतं पण लहान मुलांना आवडतील अशी बालगीतं कोठून आणणार ? मग भाऊंनी पहीलं बालगीत लिहीलं जंबोजेट -जंबोजेट .
आज मला माहीती असलेलं गाणं तुमच्यासमोर ठेवतो आहे . जसं मी त्या काळी लिहून घेतलं तसंच .
कदाचीत काही शब्द चुकीचे असतील किंवा काही पदरचे असतील
( अक्षरे गाळून वाची का ते घाली पदरची -तो एक मूर्ख असे रामदासांनी म्हटले आहे ) पण ते न्यून माझे आहे असे समजून दुरुस्त्या सूचवाव्या ही विनंती.

या निमीत्ताने अशाच काही कवितांची चर्चा व्हावी हा पण एक उद्देश आहेच.

जंबोजेट जंबोजेट
लंडन -मुंबै प्रवास थेट
जगलो वाचलो पुन्हा भेट
जंबोजेट जंबोजेट झुईई...
घराला धडक दाराला कडक
पकडली गाडी आणि निघाला तडक
विमानतळावर शोधतोय स्थळ
भारत सोडून काढतोय पळ
उंच आकाशामधले ढग
चमकून पाही सारे जग
भेदून गेले एक विमान
पंखावरती देऊन ताण
पंखाला त्या पंखे नव्हते
विमानाला शेपूट होते
वायू सागरी तरते जेट
जंबोजेट जंबोजेट झुईइई

विमानात या यानात
नव्हती कसली यातायात
आकाशाला खिडकी होती
डोकावणारी डोकी होती
प्रत्येकाशी सलगी होती
खुर्चीला एक पट्टा होता
फास त्याचा पक्का होता
मुलगी आली माझ्याजवळ
म्हणते गेला विमान तळ
बिअर ड्रिंक्स ऑर्डर स्ट्रेट जंबोजेट जंबोजेट झुईईइ

इथे सेवेला सुंदर गाणी
इथे शिबंदी शौच नहाणी
बिअर ब्रँडी बाटली फुटली
लिंबू सरबत तहान मिटली
इंग्लीश टाईम्स भरपूर वाचा
महाराजाचा होऊन भाचा
एकच फेरी मोठं बजेट
जंबोजेट जंबोजेट झुंईईइइईई

सगळे होते शांत शांत
विमान होते आकाशात
त्यात होतं माथेफिरू
त्यानी केलं काम सुरु
तो म्हणाला पायलटला
विमान वळव बैरुटला
विमान उतरव त्या शेतात
पिस्तूल आहे या हातात
त्यात आहेत सहा बुलेट
जंबोजेट जंबोजेट झुंईईईई

प्रत्येक देशात कस्टम्स आहेत
तपासण्याच्या सिस्टीम्स आहेत
लगेज बॅगेज तपासतात
सारे प्रवासी तपासतात
त्यात असला स्मगलर तर
गोंधळामधे पडते भर
सोन्याची विट त्याच्याजवळ
सामानाची ढवळाढवळ
पोलीस त्याला पकडतात
सारे प्रवासी रखडतात
बाहेर पडायला होतो लेट
जंबोजेट जंबोजेट झुंईईईईई

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

रामदास काकांनी एकदम भूतकाळात नेलं.. आता तर मुंबई - न्युयॉर्क प्रवास देखील थेट झाला आहे. पण हे गाणं म्हणजे खासच! जंबोदर्शन सोसायटीच्या नावापाठी हे गोष्ट आहे हे माहित नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच लेखन! जम्बोजेट चे गाणं माहित नव्हतं मस्तंय..
बालगीते- बडबडगीते वगैरेचा फॉर्मॅट मला फारच आवडतो.

या निमीत्ताने अशाच काही कवितांची चर्चा व्हावी हा पण एक उद्देश आहेच.

असंच "कशासाठी पोटासाठी" गाणं आहे.. अर्थात त्याला कवी वगैरे सगळं आहेत (कवी: माधव ज्युलियन)
झोपाळ्यावर बसून मुले आगगाडीचा खेळ खेळताहेत आणि सोबतीला हे गाणं म्हणताहेत अशी कल्पना आहे.
इथे आठवणीतून टंकत आहे काहि ओळी विसरलो आहे.. ज्यांना माहित आहेत त्यांनी वेगळ्या प्रतिसादात द्याव्यात म्हणजे सुधारणा करता येईल

कशासाठी? पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी ?
बाळू नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुक् शिटी झाली
बोगद्यात गाडी आली
खाड खाड भग भग
अंधारात लख लख
इंजिनाची बघा खोडी
बोगद्यात धुर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्हासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळलया दुधावाणी
आता जरा वाटेदाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तार खांब हे वेगात
मागे मागे धावतात
<मधल्या चार ओळी विसरलो आहे>
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी
कशासाठी? पोटासाठी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जंबोजेट हे गाणे ऐकलेले नाही. हे गाणे इंटरनेटवर कोठे मिळेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचायला घेतला तेव्हा याच गाण्याची आठवण झाली होती. आणि प्रतिसादात पहिल्या चार ओळी लिहायच्या असं ठरवलं होतं (कारण मला तेवढ्याच माहीत होत्या). पण स्क्रोल करून बघतो तो काय, आख्खं गाणंच सापडलं.

@नंदा प्रधान - हे गाणं अग्निरथ वृत्तातलं आहे. 'रेलगाडी' च्या चालीवर म्हणायचं.

त्यावरून आठवलं रुपारेलमधल्या मावश्यांकडून वगैरे असंच गाणं ऐकलेलं आहे.

रेलगाडी...
रेलगाडी रेलगाडी
रुप्पा रुप्पा रुप्पा रुप्पा रेलगाडी

अरे नाना भिडे
नाना भिडे जगाच्या पुढे
खाली धोतर वरती कोट
हातात काडी तोंडात बीडी
रेलगाडी..

इस्पिकचा एक्का...
इस्पिकचा एक्का बदामचा राजा
चौकटच्या राणीवर मारतोय मजा
आणि भोगतोय सजा...

वगैरे कडवी आठवताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेलगाडीच्या मागे आमचे आठवणीतले डबे:

रेलगाडी रेलगाडी झुकझुकझुकझुकझुकझुकझुकझुक
बीचवाले..

राजेश खन्ना
आहे चकणा
खातो वाटाणा
दिसतो देखणा
रेलगाडी..

जॉनी वॉकर
खातो भाकर
देतो ढेकर
आहे जोकर

रेलगाडी..

एक भय्या
गाडीत चढताना
म्हणतो अय्या
माझा पडला
एक रुपय्या..

रेलगाडी..

संत्री मंत्री
एका रात्री
घेऊन कात्री
घालतात दरोडा
बँक ऑफ बरोडा.

पुढचं आठवेना..

पण शाळेच्या आणि ज्यु. कॉलेजच्या दिवसांतले कॅम्प्स आणी कॅम्पफायर आठवले. रामदासकाकांचे आणि राघांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश, गवि, लय भारी! दोन्ही गाणी मजेशीर आहेत.. ग्रुपमधे दंगा करत म्हणायाला मजा येत असेल! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिल्यांदाच वाचतोय ह्या गाण्याबद्दल, पण आहे मात्र भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

मस्त आहे हे गाण रामदासकाका
आधी ऐकलं नव्हतं

गवि ते भय्याचं गाण अस होत का
अय्या
तुझा नवरा भय्या
देत नाही कुणाला फुकटचा रुपय्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

गाणं ऐकलं नव्हतं पण जंबो शब्द भारतात इतका पूर्वी आला असेल हे माहित नव्हते. जंबो जेट, म्हणजेच बोईंग ७४७, बद्दल जेव्हा सर्वप्रथम वाचलं, त्यानंतर जंबोशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचा संबंध कळल्याने तो शब्दप्रयोग नविनच असावा असे वाटले असावे. मध्यंतरी आमच्या गावात जंबो ग्लास, उसाचा रस फार गाजला होता. आम्ही जवळजवळ रोज प्यायला जायचो. बिअरच्या मोठ्या टंकर्डमधून तो जंबो रस मिळायचा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आई ग!!! ताज्या ऊसाच्या रसाची आठवण तेही सैंधव घातलेल्या नका काढू. प्लीSSSSSSSझ Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेत असताना एका नाट्यस्पर्धेत छबिलदास/रविंद्र,का गडकरी मध्ये (निटसं आठवत नाही. बहुदा जनरल एज्युकेशन ईंस्टीस्टुट च्या आंतरशालेय स्पर्धा असाव्यात छबिलदास लल्लुभाई मध्ये) कविता विडंबनाचा कार्यक्रम होता त्यामध्ये ही कविता ऐकली होती.

धन्यवाद रामदासकाका!

आठवणींच्या हिंदोळ्या वर बसुन १६-१७ वर्ष मागे मस्त झोके घेऊन आले.

--मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाणं मस्त आहेच पण सुरुवातीला जे गोष्टीवेल्हाळ कथानक सांगीतले आहे, ते खूप रोचक आहे. ते खास रामदास काकांचे लिखाण Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या गाण्याबद्दल प्रथमच ऐकलं. त्यामागची कथा आवडली ('जम्बोदर्शन' ह्या नावामागचा उलगडाही आजच झाला.)

भाऊ तोरसेकरांनी हे बालगीत कसं लिहिलं, ह्यावरून विंदांच्या 'एटू लोकांचा देश' ह्या काव्यसंग्रहाची जन्मकथा आठवली. मोठ्या मुलाला त्यांच्या घरी गमतीने एवन म्हटलं जाई. धाकट्या मुलाला त्याच्या आजारपणात रिझवण्यासाठी त्यांनी बालगीते लिहायला घेतली तेव्हा त्यांनी ह्या 'ए-टू' साठी नवीन काव्यसृष्टीची निर्मिती केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामदास काका-स्टाईल धागा आणि त्यावर ऋ, राजेश, नंदन यांच्या प्रतिसादांनी मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रामदासी लेखन. दाद तरी काय द्यायची हा प्रश्न. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0