कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बे ऑफ पॅशन

पार्श्वभूमी:

गोव्यावरून आणलेल्या पॅशन फ्रूट लिक्युअर (भ्रष्ट भारतीय नक्कल) वापरून बरेच दिवस झाले होते. आज त्या लिक्युअरच्या गुलाबी रंगाची पुन्हा एकदा भुरळ पडली. अ‍ॅबसोल्युट वोडकाचे संस्थळ चाळता चाळता पॅशन फ्रूट लिक्युअर वापरून केलेल्या कॉकटेल्स्ची खाणच मिळाली. मग एक मस्त आकर्षक रंगाचे बे ऑफ पॅशन आवडले. महत्वाचे म्हणजे सर्व  साहित्य मिनीबार मध्ये दाखल होते. Smile

प्रकार: वोडका बेस्ड, कंटेम्पररी कॉकटेल, लेडीज स्पेशल

साहित्य:

वोडका 1.5 औस (45 मिली)
पॅशन फ्रूट लिक्युअर 1 औस (30 मिली)
क्रॅनबेरी ज्युस 4 औस (120 मिली)
पायनॅपल ज्युस 2 औस (60 मिली)
बर्फ
लिंबचा 1 काप सजावटीसाठी
1 स्ट्रॉ

ग्लास:हाय बॉल

Cocktail

कृती:

ग्लासमधे बर्फ भरून घ्या.

बर्फाच्या खड्यांवर वोडका ओतून घ्या

आता लिक्युअर आणि क्रॅनबेरी ज्युस वोडकावर ओतून घ्या

मस्त लाल रंग आला आहे ना! :)  आता त्यात पायनॅपल ज्युस घाला. कॉकटेला वरच्या भागात मस्त पिवळसर रंग येइल.
लिंबाचा काप घालून सजवा आणि स्ट्रॉ टाकून सर्व्ह  करा किंवा पिऊन टाका.

वर पिवळसर आणि खाली लाल अशा मस्त रंगाचे बे ऑफ पॅशन तयार आहे. Smile

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

हा गुलाबी रंग आवडला. पुढच्या वेळेस शेवटच्या फोटोसाठी वेगळी पार्श्वभूमी वापरून फोटो काढशील का?

कॉकटेल वाचून तरी आवडलं; यथावकाश बनवलं जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाह छान दिसतंय.
पण आम्ही जीन+टॉनिक वॉटरशी एकनिष्ठ आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान दिसतय कॉकटेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मस्त...पण कॉकटेल हा प्रांत माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे. कधी हुक्की आली काही कॉकटेल बनवण्याची तर ह्या कॉकटेल लाऊंज ची नक्की आठवण होईल.

आधीच्या कुठल्याशा धाग्यात 'कॉरिंथियन्स क्लब' चा उल्लेख केला होतात...मी अजून तिथे जाऊ शकलेली नाही.पण काहींना जाऊन पहा म्हटल, त्यांना ते खूप आवडल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0