नटरंग

मराठी सिनेमात काय तो अभिनय, काय ती कथा, अन गाणी तर अहाहा!!! यापेक्षा जीव दिलेला बरा...पटकथा, नाविन्य वगैरे तर फार म्हणजे फार्फारच दूरच्या गोष्टी...अशीच काही दशके गेली..नाही का??
मराठी सिनेमात पैसा नाही म्हणून चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते इकडे फिरकत नाहीत वगैरे आक्षेप तर जुनेच...अरे पण अगदी ऐंशीच्या दशकात सुद्धा मराठी सिनेमा छान होतं...मग अचानक काय झेंडू फुटले?

अचानकपणे काहीतरी चमत्कार व्हावा तसं दोन हजार सालापासून जरा नवीन , उत्तम दर्जाचे सिनेमे यायला सुरुवात झाली...चूकभूल द्यावी घ्यावी. दुकानात चांगल्या मराठी सिनेमांच्या सीडी विकत घ्यावा म्हणून गेले अन तिथल्या मुलाने "वळू" सुचवला. म्हंटल काही हरकत नाही, काय होईल फार फार तर १०० रु. वाया जातील...अगदी नवी कल्पना, मस्त अभिनय ..मला खूप आवडला "वळू". मग हळू हळू बरीच नवीन नावं ऐकू यायला लागली रात्र आरंभ, गाभ्रीचा पाऊस, हल्लीच देऊळ त्यातच एक नाव होते नटरंग. विषय वाचला "तमाशा", आधी वटला काय असणार नवीन ? फार फार तर गाणी आणि सजावट. पण विषय बराच वेगळा आहे. कथा, अभिनय अन गाणी सगळेच अप्रतिम. एकाच उणीव ती म्हणजे गावठी हेल काढून बोलणे, गावठी स्क्रिप्ट लिहिणे तितकेसे जमत नाही.

सुरुवात होते एका पुरस्कार समारंभाने ज्यात गुणा आपले मुख्य पात्र याला जीवनगौरव पुरस्कार मिळतो. हा एक बायका -पोरं अन म्हातारा बाप असलेला सामान्य शेतमजूर ज्याला तमाशाची आवड / नाद असतो. त्याच्या शेतमालकाने नवीन साधनं आणल्याने त्याची मजुरी सुटते. हा गुणा वाग लिहिण्यात हुशार असतो अन त्याला त्याची खूप आवडही असते. त्याच्यासारख्याच मजुरांना घेऊन तो तमाशाचा फड उभा करू लागतो...त्याचा म्हातारा बाप त्याच्या विरोधात असतो..सासरासुद्धा येतो कि " हवं तर मी तुम्हाला नवीन धंदा उघडून देतो पण तमाशा नको"...गुणा त्याच्या निश्चयावर ठाम असतो. धडपड करून एक एक करत सगळे जमत आलेले असते पण तमाशा म्हंटल्यावर बाई हवीच...तीसुद्धा चांगली नाचणारी, दिसणारी अन गाणारीसुद्धा...ते कसं जमायचं? जमवतात कसंतरी...
बरीच धावपळ केल्यावर अन मार खाल्ल्यावर एक तमासगीर मुलगी अन तिची आई तयार होतात पण एका अटीवर "तमाशात नाच्या हवा त्याशिवाय नाचणार नाही". आली का पंचाईत!! इथे सगळे "मर्द" तर नाच्या कोण होणार? सगळं फिसकटतय का काय अशी परिस्थिती येते...शेवटी आपला गुणा तयार होतो.

मुख्य नाचणारी त्याला स्त्रीचे हावभाव, चालणे, बोलणे, मुराकणे शिकवते अन एका नव्या आयुष्याला सुरुवात होते. दोन फड लावल्यानंतर लगेच त्यांना सुपाऱ्या मिळायला लागतात...लोकांना फड खूप आवडलेला असतो. इकडे गावातील लोक त्याच्या बायकोला नक्को जीव करून सोडतात...बायका टोमणे मारतात, पुरुष तिचा गैरफायदा घ्यायला बघतात अन लोक त्याच्या मुलाला त्रास देऊ लागतात..काहीबाही बोलू लागतात. खुद्द त्यालासुद्धा त्याच्याच तमाशात नवीन आलेल्या ढोलकीवाल्याकडून अंगचटीला जाणे अन शारीरिक सुखाची मागणी याला सामोरे जावे लागते.

दौर्यावर असताना दोन राजकीय गटांमधील सुंदोपसुन्दीत त्याच्या थेटरला आग लावली जाते अन त्याच्यावर बलात्कार होतो. सगळं उन्मळून पडल्यावर तो घराकडे जातो तर घर बंद असते...बायको मुलांसाठी सासरी जातो तर त्याची छी थू करून हाकलला जातो...अगदी त्याच्या मुलाकडूनसुद्धा. आता त्यांना तरी कसा दोष देणार? परत आल्यावर कोणताही साथीदार नवीन सुरुवात करायला तयार होत नाही, एक सोडून ..त्याची नर्तकी. ती त्याची साथ देते अन शेवटी जीवनगौरव पुसार्कारापाशी येऊन सिनेमा थांबतो.

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (8 votes)

प्रतिक्रिया

तुम्ही समीक्षा अंतर्गत लिहिले आहे पण यात चित्रपटाची समीक्षा कोठेही दिसून येत नाही. ढोबळमानाने चित्रपटाची कथाच तुम्ही इथे थोडक्यात मांडली आहे.
नटरंग बद्दल बर्‍याच ठिकाणी बरेच चर्वितचर्वण झालेले आहेत. इतक्या उशिरा त्याची कथा येथे देण्याचे प्रयोजन समजले नाही.

बाकी शुद्धलेखनाच्या इतक्या चुका तुमच्यासारख्या जेष्ठ सदस्येकडून अभिप्रेत नव्हत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

एक म्हणजे मला काही समीक्षा लिहायची नव्हती पण चित्रपटविषयक भाग दिसला नाही म्हणुन इथेच लिहिलंय. मला नटरंग बद्द्ल हल्लीच समजलं अन त्यावरचं चर्वितचर्वण मी वाचलं नाही. शुद्धलेखन अन जेष्ठता वगैरे यांचा संबंध नाही अन चुकाही खुप नैत. अजुन कै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला नटरंग बद्द्ल हल्लीच समजलं

आश्चर्य वाटलं.

त्यावरचं चर्वितचर्वण मी वाचलं नाही.

तुमचा प्रचंड असलेला आंतरजालीय वावर बघता पुन्हा एकदा आश्चर्य वाटले.

शुद्धलेखन अन जेष्ठता वगैरे यांचा संबंध नाही

मी वयाच्या ज्येष्ठतेबद्दल बोलत नव्हतो. मराठी संकेतसस्थळांवरील जालीय वावराच्या ज्येष्ठतेबद्दल बोलत होतो.

चुकाही खुप नैत

तुम्हीच तपासून बघा.

अजुन कै?

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

तुमचं आश्चर्य तुमच्यापाशीच ठेवा..ऑनलाईन असले म्हणजे सगळं सगळं वाचते असं नै...अन असुद्या चुका असल्या तर पुढच्या लेखात सुधारता येतील. (आधी मी नीट वाचलं नसल्याने दाखवुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं आश्चर्य तुमच्यापाशीच ठेवा..

आता ते आमच्यापाशीच कसं काय ठेवता येईल? ते तर प्रतिसादात जाहीर झालंय ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

नटरंग अजिबातच आवडला नाही. आता "का नाही आवडला" हे नाही सांगू शकणार.
पण काय आवडले ते सांगू शकतो. हल्लीच्यांपैकी :- थोडाफार "श्वास" आवडला,वळू, हरिश्चंद्राची फ्याक्टरी, मुंबै-पुणे-मुंबै.
जुन्यांपैकी तू तिथे मी, झपाटलेला, चौकट राजा, पिंजरा, सिंहासन आणि काही प्रमाणात "सामना" सुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चिंतातुर जंतूंच्या शंकेखोर मनाला 'नटरंग' पाहून आलेल्या शंका इथे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मिपा वर मी भाग घेतलेल्या एकमेव चर्चेची आठवण करून दिलीत! Smile धागा पुन्हा वाचून मजा वाटली.

नटरंग सिनेमा ठीकच होता, पण त्यातील संगीत हाच खरा मैलाचा दगड म्हणायला हवे. गायन, पार्श्वसंगीत, गीत आणि पडद्यावरचे दृश्य हे सगळेच अनेक वर्षांनंतर इतके सुरेखपणे एकत्र आले. "वाजले की बारा" मध्ये एकमेव रसभंगाचा क्षण म्हणजे ऑर्गन आणि घुंगरूंची जुगलबंदी चालली आहे हे कळल्यावर अतुल कुलकर्णीच्या चेहर्‍यावरचा भाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संगीत उत्तम यास अनुमोदन
बरीच दिवस लावणीत मराठी पिक्चर गुंतून पडला आहे अशी टीका होऊन होऊन अन मग कालांतराने दर्जेदार लावण्याही येण्याचे बंद झाल्यानंतर एका मोठ्या कालावधीनंतर उत्तम लावणी ऐकायला मिळते हे एक (अन माझ्यामते एकच) या चित्रपटाचे बलस्थान.
(पण समहाऊ, पिक्चर तसा रिसेंट असला तरी त्यातली गाणी फारशी ऐकायला येईनात अताशा? हे कसं काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फाउस्टियन ढंगाची कथा असलेली कादंबरी थोडी बटबटीत पण चांगली वाटली होती. चित्रपट बघितला नाही. त्यातली गाणी सुरेखच आहेत यात वाद नाही.

समीक्षा लिहिताना चित्रपटांतले काही अत्यंत कळीचे प्रसंग उघड सांगू नये असा प्रघात आहे. अर्थात हा चित्रपट आता तसा जुना झाला आहे, त्यामुळे कितपत फरक पडतो माहीत नाही. समीक्षेचा प्रयत्न आवडला. तुम्ही पार्श्वभूमी सांगितली आहे, कथा थोडक्यात सांगितली आहे. त्याची शक्तिस्थानं आणि वीक लिंक्सबद्दल अधिक टिप्पणी आवडल्या असत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वळू आणि गाभ्रीचा पाऊस हे दोन्ही सिनेमे अप्रतिम आहेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0