माझ्या मायेचं भवितव्य

महाराष्ट्रातील एकूण मराठी शाळांची संख्या अन त्यातल्या मुलामुलींची पटसंख्या याबाबत हे संस्थळ पाहण्यात आले. संस्थळ-चालकांचा उपक्रम स्तुत्यच आहे पण एकूण संस्थळावरील माहिती वाचून काळजात कुठेतरी लक्क झाले. आजवर दिसत असलेली पण त्यांचा अर्थ मनापर्यंत न पोचलेली काही सत्ये नजरेसमोर आली. चिकित्सकपणे पाहिले तर दिसते की नुसतीच मराठी शाळांची संख्या कमी झाली आहे असे नसून या शाळांमधील शिक्षणाचा दर्जाही खालावला आहे. आणखी म्हणजे या शाळांमधील विद्यार्थी कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा त्याहून खालच्या कामकरी समाजातील आहेत, त्यातही अर्ध्याहून अधिक विद्यार्थी, मराठीची गोडी म्हणून नव्हे तर इंग्रजी माध्यम आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून फक्त मराठी शाळेत आलेले दिसतात.
याचा अर्थ समाजाच्या सुसंस्कृत पांढरपेशा वर्गातील मुले मराठी माध्यमाच्या शाळांमधून दिसेनाशी होऊ लागली आहेत. याचा परिणाम आज दिसू लागला आहेच. आमची मुले आज मराठी बोलतात खरी. पण लेखन-वाचनाच्या नावाने उजेडच आहे. बोलतानासुद्धा वाक्यात दहापैकी चार शब्द इंग्रजी, दोन हिंदी अन चार मराठी. साहित्यिक मराठी भाषा तर जवळपास नामशेषच होत चालली आहे.
अमृताते पैजा जिंकणाऱ्या माझ्या मराठी मायेची आजच अशी अवस्था झाली आहे. मग आणखी दहा-पंधरा वर्षांनी तर मराठी लेखन वाचन अन मराठी साहित्य ही भूतपूर्व कल्पनाच उरणार, यात काही शंका नाही. आंतरजालावर कुठे दिसलीच मराठी तर ती मिंग्लिश नाहीतर हिराठी याच स्वरुपात दिसेल. ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास हे मायमराठीचे आद्य धुरंधर अन अत्रे , पु.ल. जी.ए., दळवी यासारखे दिग्गज साहित्यिक ‘हे कोण?’ असे पुढची पिढी विचारणार हे नक्की.
माझ्या पिढीतले लोक याच मायेचे बोट धरून लिहा-वाचायला शिकले. तिच्या लालित्यपूर्ण वळणांवरून मजेत बागडले. तिच्या लचकदार अंगवैशिष्ट्यामधून वाद-विवाद, संवाद शिकले... कदाचित हीच अखेरची पिढी माझ्या मायेची थोडीफार सेवा करणारी. कारण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी या मायेचं दूध नाकारून इंग्रजी वाघिणीचं दूध आमच्या मुलांना पाजण्याचा अट्टाहासही आम्हीच केला आहे....!
माझ्या मायेचं दहा वर्षानंतरचं भवितव्य आज माझ्या डोळ्यांना स्पष्ट दिसतं आहे...!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

"मग आणखी दहा-पंधरा वर्षांनी तर मराठी लेखन वाचन अन मराठी साहित्य ही भूतपूर्व कल्पनाच उरणार, यात काही शंका नाही. "
दहा-पंधरा वर्ष म्हणजे फारच कमी धरता आहात मराठी साहित्याचं आयुष्य...आणि बदल हे होणारच. आज बोलत लिहित आहोत ती मराठी अशी किती जुनी आहे...भाषा आहे तशीच रहाणार नाही ह्यात हळह्ळण्या सारखं काही वाटत नाही.एका पिढीची हळहळ ही होणार्या बदलांशी जुळवून न घेता आल्यामुळे होत असावी...भाषेचा 'इनर्शिया' म्हणावा का याला?

इंग्रजी शिकल्यामुळे होत असलेले फायदे पालक-विद्यार्थ्यांच्या समोर आहेत. मराठी माध्यमाकडे वळण्यासाठी कोणते फायदे दाखवावेत?

शाळां मधून उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं जावं याबाबत सहमत...कोणत्याही माध्यमातल्या शाळा असल्या तरी हे महत्त्वाचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< मग आणखी दहा-पंधरा वर्षांनी तर मराठी लेखन वाचन अन मराठी साहित्य ही भूतपूर्व कल्पनाच उरणार, यात काही शंका नाही. >>
यामागची तुमची काळजी मला समजते. पण 'साहित्य-संस्कृती यांच पुढं (आपल्यानंतर) काय होणार' अशी काळजी प्रत्येक पिढीला वाटत आलेली आहे. त्यात नवीन काही नाही. अशी काळजी वाटणं हे आपलं वय झाल्याचं लक्षण असतं Smile

भाषेचं स्वरुप बदलतं, तिचा उपयोग बदलतो, तिच्या वापराची तीव्रता बदलते. हे बदल होत राहतात.

मराठी भाषा बोलणा-या लोकांची आजची संख्या पाहता ती अशी लगेच नामशेष होणं अवघड वाटतं. आपणच ती नामशेष करायची ठरवलं - तरीही. माझ्या मते तंत्रज्ञानामुळे आता भाषा टिकवणं, ती वापरणं हे पुष्कळ सोपं झालं आहे. हे तंत्रज्ञान किती लोकांना उपलब्ध आहे असा एक कळीचा प्रश्न आहेच त्यातही दडलेला. भाषा वाढवणं हा वेगळा मुद्दा आहे. पण तितकं दर्जेदार लिहिणारे प्रत्येक पिढीत मोजकेच लोक असणार. प्रत्येकजण काही उच्च प्रतीचं साहित्य लिहू शकणार नाही, शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मराठी साहित्य केवळ कल्पनेत राहणार अशी चिंता करायला नको.

मराठी माध्यमातून शिकायचं का नाही हा प्रश्न 'शिकायचं कशासाठी' या प्रश्नाशी जोडलेला आहे. 'शिकायचं अधिक चांगली उपजीविका मिळवण्यासाठी' - हेच उत्तर आहे. मग ती उपजीविका ज्यातून अधिक चांगली मिळेल, त्या माध्यमातून मुलांना शिकवणारच लोक.

अर्थात अति काळजी करणं हे एक टोक होईल आणि त्याबद्दल बेदरकार राहणं हे दुसरं टोक! मध्यममार्ग नेहमीच असतो - तो शोधायला लागतो. तुम्ही ज्याचा दुवा दिला आहे त्या 'मराठी अभ्यास केंद्रा'चा प्रयत्न स्तुत्य आहे. असे प्रयत्न अनेक लोक करत आहेत - ही चांगली गोष्ट आहे.

थोडक्यात, इतकं काही वाईट नाही हो मराठीचं भवितव्य!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी भाषा टिकणे म्हणजे नक्की काय?

अमृतातेही पैजा जिंकणारी प्राकृत भाषा ही मराठी होती. (परंतु ती टिकलेली नाही)
शिवाजी महाराजांच्या काळातली फारसीमिश्रित भाषासुद्धा मराठी होती. (परंतु ती टिकलेली नाही)
तुकाराम, रामदासांची भाषा मराठी होती.
एकोणिसाव्या-विसाव्या शतकापासून प्रचलित असलेली संस्कृताळलेली भाषा मराठीच होती. त्याच काळात हिंदीचा प्रभाव दाखवणारी 'काकाजीं'ची भाषाही मराठी होती आणि बेळगावी लोकांची कन्नडमिश्रित भाषाही मराठीच आहे.

तर यापुढे अस्तित्वात येऊ घातलेली हिंदी मिश्रित इंग्रजाळलेली भाषाही मराठीच आहे.

संस्कृताळलेली* मराठी भाषा कदाचित नष्ट होईलही. पण मराठी भाषा (वेगळ्या स्वरूपातली) मात्र नक्कीच असेल.

*जिला पुण्यामुंबईची भाषा असे वैदर्भीय आणि इंदुरी लोक म्हणतात.

बाकी मराठी शाळेतल्या शिक्षणाचा दर्जा** खालावला आहे हे काही मान्य नाही. तो पूर्वी जितका होता तितकाच आहे.

**केवळ राखीव कोट्यातले शिक्षक येण्याने किंवा समाजातल्या कनिष्ठ वर्गातली मुले शाळेत येण्याने*** तो खालावला असे बर्‍याच लोकांना वाटते. पण जेव्हा राखीव कोट्यातले शिक्षक नसत तेव्हाही शिक्षणाचा दर्जा ऑन द होल यथातथाच होता.

***माझ्या मुलीस शाळेत घालण्याच्या वेळी अमूक शाळा चांगली आहे कारण अजून तिथे अमूक अमुक (जातीची) मुले जातात; तमुक शाळेत हल्ली सगळी @#$% मुले असतात अशी माहिती माझ्या हितचिंतकांनी पुरवली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सुंदर प्रतिसाद. लहानपणी माझ्या गावाशेजारच्या दुसऱ्या एका थोड्याश्या मोठ्या गावात इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू झाली होती. आणि त्याच वर्षी आमच्या (किमान 25 वर्षे जुन्या, जिल्हा परिषदेच्या मराठी) शाळेचा दर्जा या (सहा महिन्यांपेक्षाही नव्या असलेल्या) शाळेच्या तुलनेत कसा घसरलेला आहे आणि डाऊनमार्केट लोकच फक्त तिथे शिकतात असे सांगत काही हितचिंतक पालकांनी माझ्या पालकांकडे (माझी) शाळा बदला म्हणून बोंबाबोंब सुरू केली होती हे आठवते. सुदैवाने आर्थिक व अन्य कारणांनी माझी शाळा बदलली नाही आणि मराठी शाळेत शिकल्याने काही नुकसान झाल्याचे अजूनतरी वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो मराठी अभिजात भाषा आहे असेही ऐकू आलं होतं Wink
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणखी दहा-पंधरा वर्षांनी तर मराठी लेखन वाचन अन मराठी साहित्य ही भूतपूर्व कल्पनाच उरणार

मग?

नाहीतरी आत्ता तरी ती अभूतपूर्व कल्पना कुठे आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0