ती......

मन आतुर झाले तेव्हा
ती खूप दूर होती....
मग मी वायुवेगाने
तिच्या दिशेने धावत गेलो....
ती तिथेच अजून निश्चल उभी असलेली पाहून
माझे मन मोर झाले....
आता, पुढे होउन तिला कवेत घेणार तोच
कळून चुकले की..
फाटत चालली आहे खाली धरती
अन् तिच्या आसवांचा समुद्र
रिता झाला आहे माझ्या या
हातावरती......
- सुभाष अक्कावार, नाशिक.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ऐसी अक्षरेवर स्वागत!
ही कविता मला फारशी भावली नसली तरी इतर कविता वाचायला आवडतील..
येत रहा लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!