(विविधरूपे एक जीव)

मूळ कवितेतलं मला काहीही कळलेलं नाही, तरी त्या कवितेचा कच्चा माल म्हणून वापर करून खालील विडंबनाचा एक क्षीण प्रयत्न केला आहे. या विडंबनाचा अर्थ लागेलच असे नाही, तेव्हा त्याचा अर्थ समजावून घेण्याकरता मला कॉल करू नये. ईतर कुणी आणखी कुणाला कॉल करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. तिसर्‍या कोणाला त्या दोघांमधे नाक खुपसावेसे वाटले तर जरूर खुपसावे.

ये संस्थळावर
रहायला
खुशाल
मुखवटा घालून

आयडीला बिलग
कर सलग
वाद प्रतिवाद.
हो व्हायरस
कर
इन्फेक्शन.
बेअक्कल!

(संपादकांच्या)मेंदूवरच्या
आठ्या
होऊन
वाट
डोक्यावर मिर्‍या
दे त्रास!

एकोळी धाग्यांच्या
लेखनामध्ये
विर्घळ

होऊ दे
वाद प्रतिवाद
ठणाणा!

वाद घाल
विचारहीन,
चिल्लर!

घातलाच आहे
तोंडावर
मुखवटा

मिळालंच आहे
विशाल व्यासपीठ
कर भूमिका
कर सगळ्या
घेऊन विविधरूपे एकजीव!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

All the internet's a stage,
And all the IDs merely players

ही उक्ती सत्य असेल तर एकाच वेळी वेगगवेगळ्या भूमिका करणाऱ्याच्या माइंडचा मेकप काय असेल याचा आढावा. आपली आयडी कुठे संपतात आणि खोडसाळ कुठे सुरू होतात हा प्रश्न विचारणारी.

अजून असंच लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा

मूळ कवितेपेक्षा विडंबन भारी आणि समझीँग्ड

ह्यावरुन विविध रुपे घेण्याऱ्‍या जत्रेतल्या सोँगाची आठवण झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आधुनिक जीवनातला वरवरचेपणा आणि फ्रॅगमेण्टेडनेस व व्हर्च्युअल जीवन जगण्याची मानसिकवृत्ती व्यक्तित्वातून थेट विडंबनात उतरल्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै भारी विडंबन रे! **(अरे हा आपलाच अनामिक आहे का खरोखर? इतका कधी बिघडला?) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile