कोकणातील शिमगोत्सव

कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !

कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा सुरमाडाच्या झाडाची होळी तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे, 15 वर्षे वयाचे , आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात ।

हे सगळे होईपर्यंत सकाळचे 4.00 वाजतात . मग होम केला जातो ,ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो ,तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात ,व त्याभोवति गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते,आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात .तो एक महत्त्वाचा विधी असतो.

होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी,चाकरमानी घरी जातात ॰ मग थोडेसे झोपून/आंघोळ -देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात .आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्‍हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

त्यानंतर तिसर्‍या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो ,यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो .

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव ! मंडळी , गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगली माहिती.
अजून थोडं लिहिता आलं असतं.
बादवे, शिगमोत्सव की शिमगोत्सव ?
मी शिगमोत्सव हाच शब्द गोवन व कोकणी लोकांकडून ऐकलाय.
पुणेकर कोकणस्थ शिमगा असेच म्हणतात सापडलेत.
(कोकणी आणि कोकणस्थ हे दोन शब्द दरवेळी interchangeable असतीलच असं नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोकणस्थ हा शब्द ब्राह्मणातील एका पोटजातीला उद्देशून वापरला जातो .
तर सर्वसामान्यपणे कोकणातून नोकरी- धंद्यासाठी गाव सोडून मुंबई /पुणॅ किंवा इतरत्र /परगावी राहणार्या लोकाना कोकणी चाकरमानी असे म्हणतात .

गोवा प्रान्तात या उत्सवाला शिगमोत्सव म्हणतात ,तर तळकोकणात आणि मध्यकोकणात "शिमगा" असे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

छान, वेगळा विषय. अजून थोडं विस्ताराने वाचायला आवडलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मंदार, तुझ्या लेखाने "सारे प्रवासी घडीचे"मधे (जयवंत दळवी) मधलं शिमग्याचं वर्णन आठवलं. 'नारळ हुडकून काढणे ' वर जरा सविस्तर लिहिशिल का? .......(संपादक, फोटोबकेटवर आहेत हि छायाचित्रं. त्यावर वळवून घेतल्येत आणि व्यवस्थित दिसतायत. काहि उपाय? img टॅग मधे ओरीएंटेशन बदलायची सोय असते का?)





  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

ह्यावरून आठवले.

माझ्या लहानपणी आमच्या (आणि अन्य बर्‍याच घरांमधून) कोकणी घरगडी असत. आमचे गंगारामकाका आमच्याकडे ३५ वर्षे होते आणि आम्हास ते घरच्यासारखेच होते.

गणपतीच्या दिवसात असे सगळे घरगडी वेगवेगळ्या घरांमधून आळीपाळीने जाऊन एक गोल फेर्‍यात करण्याचे एक लोकनृत्य (ज्याला आम्ही नाच म्हणत असू) करीत असत. एक दिवस आमचे गंगारामकाकाहि अन्य कोकणी गडी जमवून आमच्या अंगणात हा कार्यक्रम करीत असत. ह्या प्रथेची अन्य कोणास काही माहिती आहे काय आणि ती अजूनहि चालू आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लॉकवाइज दिशेने काही फेर्‍या मारून नंतर समेवर येत उलटी फेरी मारणारा हा नाच गणपतीच्या दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने दिसतो. आजदेखिल, मात्र सध्या नाचाची गाणी बॉलीवूडमधून आयात केलेली असतात!

७२ च्या दुष्काळानंतर बरीचशी देशावरील (बहुतांशी मराठवाड्यातील) कुटुंबे मुंबईत आली आणि त्यांच्या बाया-बापड्यांनी मुंबईत धुणी-भांड्यांची कामे करायला सुरुवात केली. त्यांनंतर हे बाणकोटी रामा दिसेनासे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या कॉलनीतही असेच कोकणी गडी येऊन घरोघरी डान्स करून पैसे घ्यायचे. आमचे वडील त्यांना तो डान्स न करण्याबद्दल पैसे द्यायचे हे आठवतंय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम माहिती. अधिक विस्ताराने वाचायला आवडेलच!

सदर माहिती मराठी विकीपिडीयामध्ये चढवाल काय?
किंवा मला परवानगी दिलीत तर यातील माहिती योग्य त्या फॉर्मॅटमध्ये घालुन तेथे चढवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जरुर विकि वर टाका . तुम्चा इमेल दिल्यास मी काही फोटो पाठवू शकेन. तसेच इथे फोटो देता येतात का? कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

आभार. होळी या विकीपानावर ही माहिती चढवली आहेच. फोटो थेटे विकीवर अपलोड करता येतीलच. वेळ मिळाल्यावर तुम्हाला व्यनी करून घेतो व करतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

मंदार साहेब, तुमचं गाव कोणतं ?

रत्नाग्रीकरांसाठी वेगळा कोपरा आहे मनात म्हणून विचारतो हो. चिपळूण, खेड, रत्नाग्री, लांजा ही पूजास्थानं आहेत मनात.

---

स्वगतः या धाग्यावर गविंचा काँमेंट नाही ??? हे कसं शक्य आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चोरवणे ,तालुका-संगमेश्वर ,जिल्हा-रत्नागिरी \ रत्नागिरी-कोल्हापूर हायवे वर पाली च्या पुढे नाणीज जवळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

गब्बरशेट..कोंकणाविषयी काय लिहायचे आणि किती लिहायचे? काही बांध न फुटू दिलेले चांगले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! प्रतिसाद फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...