सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.

गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.

पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.

अवनी बापट, पुणे: सचिनसरांचा खेळ मी लहाणपणापासून पाहते आहे. त्याचे रेकॉर्डचे मी बुक केले आहे. आता मी एमएस्सी (मॅथ्स) करते आहे. लग्नाला अजुन वेळ असल्याने पुढेमागे पीएचडी केली तर याच आकडेवारीचा स्टॅटेस्टीकल डेटा वापरणार आहे.

समीर तांबोळी, असोली ता.वेंगुर्ला,सिंधुदूर्ग: सचिन तेंडूलकर को मै बचपनसे खेलते देख रहा हूं. मच्छीमार्केटपे मैने उनके रिटायरमेंटका बॅनर लगाया है. त्येंला रिटायरमेंटच्या बधायी देतो.

राम गायकवाड, कुरणखेडः मी तर फार उदास झालो बातमी ऐकून. आता भारतीय क्रिकेटसंघाचे कसे होणार? सरकारने ग्रामीण भागातही क्रिकेटचे टॅलेंट शोधले पाहीजे. शाळेत अनुदान दिले पाहीजे.

कामेश शहा, बोरीवली: सचिन तेंडूलकरजी को अभीभी मेच खेलना चाहीये था. उनमे बहोत टॅलेंट है. उनकेउपर मैने चार बार पैसा कमाया, और सात बार गवाया है. उनको रिकवरी करनेके लिए अभी खेलना चाहीये.

समाधान डेंगळे, शिरसोली, धुळे: आम्ही सचिन तेंडूलकरची एकपण मॅच बघणे सोडायचो नाही. आमच्याकडे लाईट जरी गेली तरी शेतातले डिझेल जनरेटर गावात आणून मॅच बघीतली जाते.

प्रिया जोशी, पाषाण, पुणे: मी अन आमचा सिंबॉयसीसचा गृप सगळी जणं क्रिकेटमॅच असली की वैशाली, रुपाली, मॉडर्न किंवा इतर ठिकाणी पडीक असतो. उत्कर्ष तर कधीकधी मला गाडीतून फिरवतोही त्या त्या वेळी. खुप खुप मजा करतो तो त्या वेळी.

દર્પના પટેલ, અમદાવાદ: સચિન સર ખૂબ જ શ્રેષ્ઠ બેટ્સમેન છે. હું તેને આગળ સફળ કારકિર્દી માંગો.

पारूल मेहेता, वारछा, सुरतः सचिनजीके रिटायरमेंट के फंक्शनको सेलीब्रेट करनेके वास्ते हमारे क्लबने एक पार्टी रखी है. उसमे शामील होनेके लिए मैने एक डिझायनर साडी ऑर्डर की है.

हार्दीक तोमर, पलासीया, इंदोरः मै इंदौर क्रिकेट क्लब का सदस्य हूं. हमे सचिनजीके फायनल मैचकी १० तिकटें क्लबकी तरफसे मिली है. हम १७ तारीख को मुंबई मैच देखने यहांसे निकलेंगे. ताज हॉटेल मे रहेनेका बंदोबस्त किया है. देखते है क्या होता है.

सतविंदर भाटीया, (अक्री)राजपुरा, जिला पटीयाला: ओय, सचिनसर तो ग्रेट है जी. उनको हार्दीक बधायीयां जी. वो तो बडे शेरकी तरह बैटींग करते थे जी. पाकिस्तानवालोंकी खटीया खडी करते थे जी.

माधव गावडे, वाशी नाका, चेंबूरः सचिनच्या या शेवटच्या मॅचनंतर क्रिकेट बघणे सोडून देईन अशी शपथ आम्ही कॉलनीतल्या अंडरार्म क्रिकेट क्लबच्या मेंबर्सनी घेतली आहे. फार वाईट वाटते आहे.

राज आगलावे, न. ता. वाडी, पुणे: आमच्या राष्टवादी कार्यकर्त्यांनी संगमवाडी पुलावर मोट्टा बॅनर लावलेला आहे शुभेच्छांसाठी. तुम्ही जरूर बघा. शेवटची मॅचचे थेट प्रक्षेपणपण आम्ही आमच्या कॉलनीत पडद्यावर दाखवणार आहोत. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे.

विनोद गालफुगे, फुगेवाडी, दापोडी, पुणे: सचिन म्हणजे क्रिकेटचा बादशा. देवच म्हणाना. आता देवच जर मंदीरात नसेल आपलं क्रिकेटमध्ये नसेल तर मंदिरात काय बघणार, नुसती घंटा?

प्रतिक बंदसोडे, चदशां, पाचपाखाडी, ठाणे: क्रिकेट हे एक शरीर आहे. सचिन म्हणजे त्यातले हॄदय आहे. हॄदय आता बंद पडणार. भारतातले क्रिकेट मरणार.

असल्या बर्‍याच प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीकडे आलेल्या आहेत. यथावकाश आम्ही त्या प्रकाशित करूच. आपल्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या आपण येथे जरूर जरूर लिहा.

.
(सदर लेखन केवळ विनोदी अर्थाने घ्यावे. सचिनच्या खेळाचे कौतूक आहेच पण इतर सामान्यजनता किती अतिरेक करते यावर प्रकाश पडणेही आवश्यक आहे.).

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

उनकेउपर मैने चार बार पैसा कमाया, और सात बार गवाया है. उनको रिकवरी करनेके लिए अभी खेलना चाहीये.

सचिनच्या या शेवटच्या मॅचनंतर क्रिकेट बघणे सोडून देईन अशी शपथ आम्ही कॉलनीतल्या अंडरार्म क्रिकेट क्लबच्या मेंबर्सनी घेतली आहे.

वगैरे छानच. चेंबूरच्या अंडरार्म क्रिकेट क्लबने अशी शपथ घेतल्यावर त्यांचं क्रिकेट कसं सुधारणार म्हणून काळजी लागून राहिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Biggrin हा हा भारीच. फक्त ते गुजराती लिपीत काय लिहीलय ते देवनागरीत पण लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

દર્પના પટેલ, અમદાવાદ: સચિન સર ખૂબ જ શ્રેષ્ઠ બેટ્સમેન છે. હું તેને આગળ સફળ કારકિર્દી માંગો.

दर्पना पटेल, अमदाबादः सचिन सर खूब ज श्रेष्ठ बेट्स्मेन छे. हुं तेने खागळ सकळ कारकिर्दी मांगो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खागळ?
अहो त्यांनी आगळ लिवयंय की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद थत्तेचाचा. ख आणि अ मधला फरक लक्षातच आला नव्हता. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin त्यांचा ख = अ आणि ४५ अंशात कललेला फ = क. अर्थ काय ते पण सांग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थ थत्तेचाचांना विचारणे. मने गुजराती आवडतो नथी Wink फक्त लिपी समझती जराजरा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुढच्या सफल कारकीर्दीची इच्छा व्यक्त केली आहे पण वाक्यरचना गंडली आहे बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अच्छा असा अर्थ आहे होय. धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राध्यापक बारटक्के (प्रा. तोरडमलांनी साकारलेले) जर सचिनचे चाहते असते तर त्याच्या निवृत्तीबद्द्ल ऐकून त्यांनी काय प्रतिक्रीया दिली असती ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0