खट्टे अंगूर १ : काळे मॅडमचे मिस्टर

Grapes

ज्याचा हात उंच द्राक्षवेलीपर्यंत पोहोचतो. असा एखादाच अपवाद वगळता कुणी द्राक्षे मिळवायची संधी सोडत नसतो. मधुर द्राक्षे तोडून मनमुराद आस्वाद घेत असतो. द्राक्षे सुकवून त्याचे मनुके बनवतो, तर दारू बनवतो, उच्च शौकीन व्यक्ती द्राक्षाची वाईन बनवून आनंद लुटत असतात. मात्र प्रयत्न करूनही ज्यांचा हात द्राक्षवेलीपर्यंत पोहोचत नाहीत असे अपयशी ममव (मराठी मध्यमवर्गीय) लोक ‘द्राक्षे आंबट’ म्हणत ते द्राक्ष सेवन करणे अनैतिक असते, मनाची समजूत घालत असतात. अशा नैतिक-अनैतिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तींच्या काही गोष्टी.

सरकारी कार्यालय दुपारचे चार वाजलेले.

“भाऊसाहेब, गाडीचा हॉर्न वाजतोय, बाहेर माझे मिस्टर आले आहेत, उद्या दसरा आहे, बरीच खरेदी करायची आहे, आज मी दोनेक तास लवकर जाते, तुम्ही ऑफिसचे काम सांभाळून घ्याल..”
“ठीक आहे मॅडम, जाण्यापूर्वी टेबलवरच्या तीन डॉक्युमेंटस आणि रिपोर्टस वर्क स्टेटमेंट्स आहेत त्यावर सह्या करून ठेवा. म्हणजे फाइल्स पेंडिंग राहणार नाहीत. परवा सकाळी हेडऑफिसला जाऊन सारे रिपोर्ट वर्क स्टेटमेंट्स देऊन येईन.”

डॉक्युमेंट्सवर सह्या होईपावेतो, काळेमॅडमचे मिस्टर ऑफिसात येऊन उभे राहिले. ऑफिसच्या टेलिफोनची रिंग वाजली.

“हॅलो..
नमस्कार.... ,
थॅंक यू सर.......
तुम्हालाही दसऱ्याच्या शुभेच्छा,.....
काळेमॅडम ना, हो आहेत ना, एक मिनिट हं, फोन देतो त्यांच्याकडे...”

“मॅडम, हेडऑफिसवरुन फोन आहे, चौरेसाहेब बोलत आहेत..”

“साहेब नमस्कार, तुम्हाला आणि ऑफिस स्टाफ सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा....आणि........”

काळे मॅडमच्या मिस्टरांनी लगबगीने पुढे येत त्यांच्या हातून रिसिव्हर हिसकाऊन घेतला,

“काय रे चौऱ्या, तुला जास्त माज आलाय का हरामखोरा, एकदा सांगून कळत नाही का, किती वेळा सांगितलेय, पुन्हा फोन करू नकोस, एकदा समोर भेट तुझी सारी मस्ती जिरवतो....”

फोन कट करून दोघेही झटपट निघून गेले.

* * *

हेडऑफिस

“नमस्कार चौरेसाहेब, ऑफिसचे मंथली स्टेटमेंट रिपोर्ट मीटिंगसाठी घेऊन आलोय.”

“व्हेरी गुड, काय घेणार चहा कॉफी..?”

“काही नको.. सर ते परवाच्या मॅटरबद्दल सॉरी, मला काहीही ठाऊक नव्हतं, उगाचच तुम्हाला काळे मॅडमच्या मिस्टरांची बोलणी ऐकावी लागली...”

“काळे मॅडमचे मिस्टर..? तुम्हाला कुणी सांगितले?”

“काळे मॅडमनीच ओळख करून दिली होती...”

“अरे तो येडा चव्हाण आहे, पूर्वी आपल्या इथे टाउन प्लॅनर होता, आता त्याची बदली झेडपीत आहे. काळे मॅडम माझ्याशी फ्री फ्रेंडली गप्पा मारत असतात, त्यामुळे तो माझ्यावर संशय घेऊन खुन्नस खाऊन असतो, परवा मी पण त्याला मजबूत शिव्या हाणल्यात. सोडतो का काय त्याला.... येऊदेच एकदा समोर सर्वासमक्ष ...”

“.........”

“सुरूवातीला काळे मॅडम माझ्यासोबत फिरत असत. दोनेक वर्षापूर्वी चव्हाण इकडे बदलून आला, त्याने नवीन कार घेतली. मग मॅडमला पटवून त्यांना कारमधून फिरवू लागला. आताही तो मॅडमला सकाळी सायंकाळ कारमधून सोडत असतो. ड्रायव्हर झालाय तो..”

“ठीक आहे सर येतो मी..”

* * *

थोड्याच दिवसांनी मॅडमची बदली दुसऱ्या जिल्ह्यात झाली. दोनेक वर्षांनी बातमी आली. एक्स्प्रेस हायवेवर कार अपघात झाला. त्यात काळेमॅडम ठार झाल्या तर चव्हाण जबर जखमी होऊन कायमचा जायबंदी झाला. महिनाभर हॉस्पिटलला अॅडमिट होता. चव्हाणची पत्नी-मुले कुणीही त्याला बघायला आले नाही. ते कायमचेच दुरावले.

* * *

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कथानक एकदम फास्ट करून संपवलंत हां. पुढची द्राक्ष पेटी लवकर पाठवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमी छापल्यासारखं लिखाण झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।