आपापले भोपळे

अनायसे पानगळीचा , भोपळ्यांचा ऋतू आलेलाच आहे, तर भोपळ्यांविषयी काही का लिहू नये .... तर हे माझे भोपळापुराण ..

"आपण जोवर खुद्द पालक बनत नाही तोवर आपण एक आदर्श पालकच असतो"

हे महामार्मिक वाक्य काही वर्षांपूर्वी वाचले आणि खुदकन हसूच फुटले होते. जिनियस लेखकांचे हेच तर असते ना, निरीक्षणाचे सारण जबरदस्त असतेच पण ते सारण चपखल शब्दांच्या खुसखुशीत batter (मराठी शब्द? लिपते?) मध्ये घोळवून सादर करण्याची अप्रतिम कलाही त्यांना साध्य असते. तर अशी काही नाती, असे काही किस्से सांगा पाहू ज्यांमध्ये वरील वाक्याचा मतितार्थ चपखल बसतो, फिट्ट बसतो.
.
मी सुरुवात करते. लहानपणापासून गणित विषयाची गोडी होती. म्हणजे १२ वी पर्यंत कोणत्याही विषयाच्या अभ्यासाचा कंटाळा आला कि 'विरंगुळा/एका पालट' म्हणून मी गणिताचे पुस्तक उघडे. बरं बी एस्सी पर्यंत या आवडीने शिखर गाठले व माझी खात्रीच झाली कि गणितात आपल्याला आपले करियरची ध्येय सापडणार. पण एम एस्सी मध्ये मात्र खर्याखुर्या गणिती डोहात नाकातोंडात पाणी जाऊन, दे माय धरणी ठाय गत झाली तेव्हा लक्षात आले, की एम एस्सी ला जाईपर्यंत(च!) आपण एक आदर्श गणिती (निदान विद्यार्थी) होतो. आणि हा माझा भ्रम तसाच राहणार होता.
.
हीच गोष्ट लग्नाची. लग्न होईपर्यंत मला स्वतः: आदर्श प्रेयसी बनू शकण्याची खात्री होती. का? मी तर रीडर्स डायजेस्टमधील, 'वैवाहिक सल्ले' मन लावून वाचले होते की. आपण रोमँटिक आहोत लडिवाळ, लाघवी आहोत याची मला १०१% खात्री होती. विवाहानंतर मात्र अपेक्षांच्या ओझ्यायाखाली लडिवाळपणाचा कस लागला. मनात तुम्ही लाख रोमँटिक असाल, पण ते शब्द-कृतीतून तुम्हाला सहजसुंदरतेने व्यक्त करता येते का ते ही समोरच्याचे लाख लिमिटेशन्स माफ करून? अंहं!! नाही जमत. मला वाटतं २५ वर्षे लागली मला ते शिकायला. असतात काहीजण ढ ;). जर लग्नच झाले नसते अथवा प्रेमातच पडले नसते तर आदर्श प्रेयसी बनू शकण्याच्या भ्रमाचा भोपळा (अगदी एक म्हातारी सहज मावेल इतका विशाल, ढब्बू भोपळा) कधी फुटलाच नसता.
.
सांगायचा मुद्दा हाच की जोवर खोल पाण्यात परीक्षा होता नाही तोवर प्रत्येकालाच वाटते की आपण निष्णात जलतरणपटू आहोत बरं का. पाण्याच्या मध्यात धापा लागून जीव घाबरा होतो तेव्हा तो निष्णातपणा क्षणात विरून जातो. तुमचे असे भ्रमाचे लहान मोठे भोपळे आहेत का? असतीलच. ते मांडा पाहू.
.
https://www.tripsavvy.com/thmb/efGj_aA3NXYlol1mni4pvj-3Sfg=/960x0/filters:no_upscale():max_bytes(150000):strip_icc()/pumpkin-3212006_1920-5abbf3c8c064710036be4e62.jpg

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खरंच. भोपळेही खिदळताहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile हे पहा अजुन काही. या सीझनमध्ये भोपळ्यांची रेलचेल असते, फार फार सुंदर सजावट करतात इथे.
.
https://www.haunt.photos/haunt-photo/crooked-river-farm-pumpkin-patch-mo_78491.jpg
.
च्रट्जी अनेक वर्षांपूर्वी मुलीने, सासूबाईंनी व मी एक भोपळा असाच कोरला होता.
.
https://lh3.googleusercontent.com/sh7lzolP3hLOtK-HZsjEQW3Fqo_UZfs4OfCDGZHSNwG2e5JuFGLmcQF9pflRKLbTrv-kftm5hyos6RNDXGlDqVTy5jkgQDFqaPQfnT52B2OvioD_2T22_otLCAIsNz77dOiRe5U8o_a8TvEybpaAtKGnUXZJpYdaeh1tKDuDbUl7tqqz0euDuAsTq4PI-okuMyheSPMS1jxmsb-jZfifvHEUXL_Go_8O7e9n36w1WBe-RfK2ahtw8zC76zY1M36yRP04N9gqvnpx91HAQT9Jvuoj4IVKRoUfyyIP2ZNj2BbJOFIe2bADfgQakyJxTnR3lo8FjZn_h-cxwjNirE9PuXDtgD-Vj_EOfUkULDaU5FjnyX7_zvYvBb1DHHNFkQ4FxongcCf-zdIf52JrEXUimWhZNPkkfRhl--DMbVzRwEmnwrXzj-5nQsJZsK_h8alg7bN57g9MEB4208QblLJsX3u4-9VR8doIVJhslW1bL1tWJKgjTL5YXXvg6xDUclc1dqbHGTwo9HtWn66-14PKPJhbGaKCurKb_piTnIF8xt_YQukrl7C67CgwhPMe9TK248a9c4JstT9Dqx3fi6KYrFx7NTSxVoMZmAlbppdKbV4FPgKbJYESoHX4YxHdlYvLViGiqGG2fP0tQTT3TEqveCXWyHvCIP4gk99NzCTAJU3Qfe8hnUc-oP3TxXlbsuItqqEwyC9a2NXM_6i7y1Mt6OMArsj44om1wA-6CS7tWk-w6CVk=w195-h347-no

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

लेख आवडला
कद्दु क्युट आहेत.

आदर्श प्रेयसी बनू शकण्याची खात्री होती. का? मी तर रीडर्स डायजेस्टमधील, 'वैवाहिक सल्ले' मन लावून वाचले होते

इथेच तुम्ही चुकला तुम्ही " ताईचा सल्ला " वाचायला हवा होता
ताईंनी तुम्हाला रोमँटीसीझम आणि रीअलीझम चा ताळमेळ बसवुन दिला असता.
असो आता वेळ गेली
हल्ल्ली ताईंचा सल्ला ही कुठे मिळतांना दिसला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

" An egg today is better than hen tomorrow"

Smile हाहाहा.

रोमँटीसीझम आणि रीअलीझम चा ताळमेळ

अगदी अगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

वाहवा! मामी, बहारदार लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

Smile धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

इतरांना न कळू देण्याचे कसब आपल्याठायी आहे" हा भ्र. भो. आता आताशा फुटताना पाह्यलाय.
दुखऱ्या नसेवर का बोट ठेवताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह Smile आपण सगळे एकाच नावेतील यात्रिक आहोत अनंतयात्री Smile आपला भोपळा इथे मांडल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

आठवतं तेव्हापासून, मला थोडं काही तरी समजतं, ह्या पलीकडे माझे काही समज नाहीत.

ठाम आत्मविश्वास असणाऱ्या लोकांवर बराच अविश्वास टाकायला शिकावं लागलं. स्वतःबद्दल शंका व्यक्त करणाऱ्या सगळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही, हेही शिकावं लागलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याला इतर सर्वांपेक्षा भारी जमते असे पूर्वी वाटत असे. उदाहरणार्थ वगैरे, नेमाडपंथ मला स्वतःला 'लेखक राव' वाटत असे. "काय भिक्कार लिहिलीये ती 'कोसला'!" हॅ! आपण याच्यापेक्षा भारी लिहू शकतो, क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू राजाबाई टॉवरच्या घड्याळाला सांगून मारू शकतो, शंभरेक भाषा शिकू शकतो, एकट्याने जाऊन पाकिस्तान बेचिराख करू शकतो, कन्याकुमारी ते उत्तर धृव व्हाया एव्हरेस्ट चालत जाऊ शकतो, किशोर कुमारला गाण्यात हरवू शकतो, पहिली ते पीएचडी एकाच वर्षात पूर्ण करू शकतो,... वगैरे वगैरे वगैरे...! हे सगळे मनातल्या मनात अनेकदा केलं आहे.

आता अर्थात हे आकाशगंगेइतकाले भोपळे फुटून जमाना झाला. पण अद्याप मनात कुठेतरी असे वाटत राहते की पृथ्वीवरच्या 'अ' ह्या मनुष्याला जर एखादी गोष्ट करायला जमत असेल तर कुठल्याही 'ब'ला सुद्धा ती 'सैद्धांतिकदृष्ट्या' का जमू नये?
Wink

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला मग जबरा आत्मविश्वास व आशावाद असणार जन्मत:च. खरं तर उत्तम गुण आहे हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

अनायसे पानगळीचा , भोपळ्यांचा ऋतू आलेलाच आहे, तर भोपळ्यांविषयी काही का लिहू नये .... तर हे माझे भोपळापुराण ..

'पम्पकिन स्पाईस लाटे*ला जाऊन भांडं लपवायचा प्रयत्न की काय, मामी? Smile

*मराठी अर्थानेही लाट चालून जात असली, तरी इटालियनमधून स्टारबक्सने उसना घेतलेला शब्द इथे अभिप्रेत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा Smile येस. या सीझनात, आतापर्यंत एकच डंकिन डोनटसची पम्प्किन स्पाइस लाटे घेतली. अजुन स्टारबक्स ची घ्यायची आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.