व्यक्तिस्तोमाचे डंके

व्यक्तिस्तोमाचे डंके वाजू लागले की समजून जायचे अनुयायांना करण्यासाठी काहीच राहिलेलं नाहिए. मुळात आपण भारतीयांना गुलाम होणे फार आवडते. सुरुवातीला अधीन होऊन दीनदुबळ्यासारखे शरण जातो. यामुळे लाचार होणे ठरलेलं असतं. भारतात सगळ्याच महापुरुषांच्या नावाने जो खेळखंडोबा करून ठेवलाय तो त्यांच्याच अनुयायांनी. एखादी व्यक्ती श्रद्धेय असेल तर तिच्या वाईट गोष्टी पोटात घालून उदो उदो करून अंधभक्तांच्या फौजेत सामील होणं हे भारतीयांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यातून कोणीही सुटलेला नाही. नीर क्षीर विवेक हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता. आवडत असलेली वा जवळ वाटणारी विचारसरणीचा नेता हाच तो चांगला बाकी सगळे वाईट याच एका मुद्यावर सुजाण नागरिकांचे गट तट पडलेले आहेत. सोयीस्कर भूमिका घेणे हे सध्याचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. २०१९ मध्ये आहोत याचं कसलही भान नाही. केवळ भूतकाळात आमच्यावर अन्याय झालाय म्हणून अमुक एका गटाकडून तमुक एका गटाचा द्वेष करणं आणि त्याचं उदात्तीकरण करणं हेच दूर्दैव आहे देशाचं. आज अवतीभवती जो कल्लोळ माजलाय तो गेल्या चार पाच वर्षातला नसून गेल्या कित्येक वर्षांपासून लपूनछपून ज्या गोष्टी चालू होत्या. त्यातील बऱ्यापैकी बाबी सर्वसामान्य लोकांना माहितच नव्हत्या. सध्याच्या समाजमाध्यांच्या जाळ्यात घरोघरी मला जे हवंय किंवा पक्षाला जे हवंय ते पोचवण्यासाठी सगळे सुष्ट भ्रष्ट उपद्व्याप करून झाले. आवडणाऱ्या संघटनेने नीचवृत्तीने केलेले कपटकार्य मनापासून पटलं नसलं तरी सत्तेसाठी सगळेच करतात असं बुळचट भूमिका घेणारेही बहाद्दर आहेत. शिवाय असं केलं ते फार काही टिकणारं नाही असं म्हणून मोघम भूमिका घेणारे ही अस्ताव्यस्त आहेत. सगळीकडेच पदोपदी बरबटलेल्या त्या त्या क्षेत्रातील लोकांनी आपापल्या प्रभाव पाडता येतील अश्या संघटना किंवा फंडिंग देणाऱ्या लॉब्या मजबूत करून ठेवल्यात. पैशाने काहीही विकत घेता येत हीच एकमेव मानसिकता झालीय. ज्याच्याकडे मँन, मनी आणि मसल पॉवर आहे तोच श्रेष्ठ. बाकीची सगळीच जनता ही महामुर्ख आहे. धर्म, जातपात आणि थुकरट अस्मितेच्या नावाने घाबरवून, हतबल करून बहुसंख्य लोकांच्या पाठिंब्यावर डोलारा संभाळणे हेच एकसुरी झाले आहे. या मुळे समाजस्वास्थ्य तर बिघडतेच पण स्वतंत्रपणे विचार करुन व्यक्त होणारी, मुल्ये जपणारी स्वायत्त संस्था, संघटना आणि व्यक्ती कृश झाल्या आहेत.

© भूषण वर्धेकर
२२ अॉगस्ट २०१९
पुणे

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

प्रथम आपल्याला भावणार्‍या वा आदर्श व्यक्तीबाबत आत्मीयता.प्रेम त्यानंतर आदर नंतर कृतज्ञता नंतर पूजा व नंतर स्तोम असा तो प्रवास आहे. बर्‍याचदा त्या व्यक्तीविषयी आदर व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या श्रद्धेचा आधार घेत असतो. मग त्या व्यक्तीविषयी कुणी वावग बोलल तर आपण चिडून उठतो व त्या व्यक्तीविषयी आदराची आक्रमकता वाढवत जातो. त्या व्यक्तिमुळे आपल्याला काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ झालेले असतात. मानसिक शांतता समाधान विचारांचा सहप्रवास वगैरे गोश्टी आपल्या अस्तित्व टिकवायला पूरक अशा ठरत असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सोयीस्कर भूमिका घेणे हे सध्याचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

सध्याचे?
ही तर पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

खर आहे. आपल्यावर वेळ आली कि आपणही सोयिस्कर भुमिका घ्यायला पुढे मागे पहात नाही. सर्वायवल स्किल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अगदी उपयुक्त स्किल आहे हे.

स्वत: ला सोयीची भूमिका घेण्यात तसं गैर काही नाही. पण आपली सोय पाहताना दूसऱ्या कुणाला तुम्ही त्रास तर देत नाही ना? कुणाचे नुकसान तर तुम्ही करत नाही ना? हे तपासणे गरजेचे आहे. पण काही लोक तेव्हढही करत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

जिथे सामान्य मनुष्य दैववाद, अंधश्रद्धा, बाळबोध समाजवाद (लुळीपांगळी श्रीमंती इ.) इ. गोष्टींच्या आहारी गेलेला असतो आणि त्याच्याकडे लोकशाहीमुळे अमर्याद शक्ती हातात आलेली असते, तिथे लोकानुनयी भूमिका घेणं हे भाग पडतंच. त्यामुळे 'सत्तेसाठी सगळेच करतात' ही भूमिका बुळचट असली तरी व्यवहार्य ठरते. आपण स्वत: चिरीमिरी देऊन सुटण्याची भाषा जिथे पावलोपावली करतो तिथे आपल्यातूनच निवडून आलेले सत्ताधारी काहीतरी वेगळं करतील ही अपेक्षा अनाठायी आहे. अर्थात, ह्यावर नियंत्रण तर हवंच. तो वेगळा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

लोकानुनयी भूमिका घेणं हे भाग पडतंच.

मग अशा व्यक्तीला नेता का म्हणावे? नेतृत्व हे दिशादर्शक असायला पाहिजे. भरकटलेल्या समाजाला योग्य वळण लावणारे असायला पाहिजे. सर्व काही आदर्श आहे, मग नेतृत्वाचे कर्तृत्व ते काय ?

आपण स्वत: चिरीमिरी देऊन सुटण्याची भाषा जिथे पावलोपावली करतो तिथे आपल्यातूनच निवडून आलेले सत्ताधारी काहीतरी वेगळं करतील ही अपेक्षा अनाठायी आहे.

हे वाचून आश्चर्य वाटले.
आपल्यासारखे चिरीमिरी देऊन सुटण्याचा प्रयत्न करणारे सर्वसामान्य असतात. जो असे करण्याचे नाकारतो, आणि तत्वांशी तडजोड करित नाही तो आदर्श नेता ठरतो. नेत्याकडून अशी अपेक्षा करणे अनाठायी नाही तर जरूरीचेच आहे. अपेक्षांचा मापदंडच जर इतका खालावलेला असेल, तर समाज उन्नती करणारच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

आदर्शवा॒द स्केलवर मांडावा लागेल.नेतृत्व व आदर्शवाद याची सरमिसळ व्हायला लागलीये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कोणत्या स्केलवर? वजनकाटा की मोजपट्टी ?

मी आदर्शवादाबद्दल काहीच लिहीले नाही. मी नेत्यांच्या आदर्श गुणांबद्दल लिहीलय.

तुमचा काहीतरी गोंधळ होतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

नेत्याने आदर्श असण्याचा गुणांक म्हणतोय मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मग अशा व्यक्तीला नेता का म्हणावे?

ते तसं काही केलं की सत्ता टिकत नाही. वळण लावण्यासाठी सत्ता टिकवणे आणि सत्ता टिकवण्यासाठी बिघडलेले वळण कायम ठेवणे, किंबहुना थोडंसं खतपाणीच घालणे असं ते दुष्टचक्र आहे इतकंच म्हणायचं होतं.
इथेही प्रॉब्लेम मेंटॅलिटीचाच आहे. कर्तृत्व न पाहता जात, धर्म, कायदे वाकवण्याची क्षमता इ.वर निवडून आलेल्या माणसाला तात्त्विक अर्थाने नेता म्हणता येत नसलं तरी तो आजकाल नेता म्हणूनच गणला जातो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

ते तसं काही केलं की सत्ता टिकत नाही. वळण लावण्यासाठी सत्ता टिकवणे आणि सत्ता टिकवण्यासाठी बिघडलेले वळण कायम ठेवणे, किंबहुना थोडंसं खतपाणीच घालणे असं ते दुष्टचक्र आहे

म्हणजे आधी स्वत:च रोग निर्माण करायचा, आणि नंतर त्यावर मीच उपचार करीन असं भासवायचं .. असच ना?

इथेही प्रॉब्लेम मेंटॅलिटीचाच आहे. कर्तृत्व न पाहता जात, धर्म, कायदे वाकवण्याची क्षमता इ.वर निवडून आलेल्या माणसाला तात्त्विक अर्थाने नेता म्हणता येत नसलं तरी तो आजकाल नेता म्हणूनच गणला जातो.

ही लोकशाहीची शोकांतिकाच म्हणायाला पाहिजे. तुमच्याकडे संख्याबळ असेल तर तुम्ही एखाद्या तद्दन चुकीच्या/असत्य गोष्टीलाही मान्यता मिळवून देऊ शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

म्हणजे आधी स्वत:च रोग निर्माण करायचा, आणि नंतर त्यावर मीच उपचार करीन असं भासवायचं .. असच ना?

अर्थात. ही एकच बाजू झाली. रोग हा खराच वाईट असतो त्यामुळे त्याचं उच्चाटन हा प्रकार जरातरी क्षम्य आहे. म्हणजे दूषित पाण्याचा पुरवठा करून मग ते शुद्ध करणं, किंवा इलेक्ट्रीसिटी उगीच खंडित करून निवडून आल्यावर ती सरळ करणं. (स्वानुभव.) हे निवडून देणाऱ्यांना कळत असतं.
दुसरी बाजू म्हणजे पूर्णच अपप्रवृत्तींना खतपाणी घालणं; जे घातक आहे. ह्या वाईट प्रवृत्ती आहेत हे समाजाला कळलेलं नाही.
जसंकी सणांचं उन्मादी स्वरूप, त्याला प्रोत्साहन देणं, गुन्हेगारांना पदं देणं, भूखंड लाटणं, इ. गोष्टी. समाज हे चक्क चालवून घेतो, आणि त्याला त्यात काही चूकही वाटत नाही.
पुढच्या परिच्छेदाशी सहमतच. शोकांतिका आहे खरीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

इथे कोण गांधी, शिवाजी महाराज, मोदी , तेंडुलकर , आंबेडकर यांना मानत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

यादीत शाहू, फुले, हिटलर, नेताजी, साने गुरुजी, मानुएल आंतोनिओ वासालो ए सिल्वा वास्को द गामा, तथा सुशेगाद, ही नावे घालायची राहून गेली काय?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साल्झर च नाव अपेक्षित होत , तुमचा तो बिनशेपटीचा वाघ ठाकऱ्या राहिलाच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

एखादा प्रश्न सोडवतो असं सांगत नेता होता येतं. दुसऱ्या कुणी (अगोदरच्याने)सोडवला नाही हे सतत बोंबलावं लागतं. सत्ता हातात आल्यावर पोळू लागलं तर प्रश्नच सोडायचा पाचसहा वर्षं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0