कबुतरांच्या दहशतीचं इम्प्रेशन

अनोळखी गावातल्या पार्कात सकाळी सकाळी
फेरफटका मारत असताना
पाठीवरच्या ओझ्यानं आणि आभाळात दाटून आलेल्या ढगांच्या भारानं
किंचित दमून क्षणभर विसावा घ्यायला क्लासिकल डिजाईनवाल्या शेवाळी रंगाच्या
लाकडी बाकड्यावर बसतो:

पाण्याची बाटली ओठाला लावून खिशातून एक शेंगदाणा पाकीट काढतो,
दोन दाणे तोंडात टाकून अनोळखी गावाकडे पाहत राहतो
पार्कात ओळखीचीच वाटणारी कबुतरं असतात,
- मुझे तो सब कबूतरों की सूरतें एक जैसी नजर आती हैं -
अनोळखी गावातल्या ओळखीच्या वाटणाऱ्या कबुतराला लांबूनच ओळखीचाच शेंगदाण्याचा वास येतो
त्याच्या दुडक्या चालीनं मग ते माझ्यावर चाल करून येऊ लागतं
त्याच्यामागून भुऱ्या रंगाचं एक कबूतर आत्मविश्वासानं दमदार पावलं टाकीत क्षणार्धात माझ्यासमोर हजर होतं
नुसत्या नजरेनंच आपला वाटा मागू लागतं
मी अजून दोन दाणे फेकतो
जमिनीवर पडताच त्याची चार शकलं होऊन इतस्ततः पडतात
लगबगीने मग ती कबुतरं चहू दिशांना धावतात
चोचीत दाणे भरून घेतात

गंमत वाटून मी आणखी एक दाणा फेकतो

आजूबाजूला असलेल्या झाडांवरून , समोरच असलेल्या चर्चच्या मनोऱ्यावरून, गवतांतून फडफडाट होतो
विविध आकारांची , प्रकारांची कबुतरं आता दुडक्या चालीनं हलक्या आक्रमणाच्या पवित्र्यानं माझ्या दिशेने येऊ लागतात
आता मी पाकिटातले दाणे किंचित जलदगतीनं फेकू लागतो
पडणाऱ्या दाण्यांवर आणि त्यांच्या मायक्रोतुकड्यांवर
कबुतरांच्या छोटुल्या टोकदार चोची झपाझप वार करू लागतात,
त्यांच्या मानेचे झटके, त्यांचं घुटुर्रघूं आता सामूहिक होऊन एकजीव होतं
सकाळच्या शांततेत कबुतरांच्या कुरूप पायांचा, चोचीत दाणे टिपण्याचा टिचटिचाट वाढत जातो....
न जाणो कुठून तरी कबुतरांच्या थव्याची दुसरी फळी येते...
पहिली फळी माझ्या अगदी जवळ सरकते... घुटर्रघूंच्या कोरसला टिचटिचाटी पर्कशनची साथ मिळू लागते...
दाण्यांच्या आशेनं आलेले आडदांड मोठाल्या चोचीचे कावळे
या कबुतरी सैन्यापुढे हतबल होतात... त्यांच्या वाट्याला एकही दाणा येत नाही

कावळ्यांची खुशामद करण्याची पद्धत माणसांत... कबुतरांचा तो पिंड नाही...

गरीब बिचाऱ्या चिमण्या या खेळात येतच नाहीत, लांबून क्षीण चिवचिवाट ऐकू येत राहतो चिमणमायनॉरिटीचा...

आत्ता या क्षणी

हळूहळू सेकंदागणिक एकेक कबुतर कुठून कुठून उडू उडू येतंय
कबुतरांची पहिली फळी माझ्या अंगावर , डोक्यावर , हातावर ताल धरतेय , चोच मारतेय
पाकिटातले दाणे केव्हाच संपलेत
घुटर्रघूं घुटर्रघूं करणाऱ्या कबुतरांनी भवताल व्यापून टाकलाय
छपरांवर, झाडांच्या फांद्यांवर, चिमणीच्या धुराड्यावर, जमिनीवर, ...
सगळीकडे घुटर्रघूं घुटर्रघूं -टिचटिचाट टिचटिचाट
... चर्चच्या दगडी भिंतीत असलेल्या छोट्या उभ्या खाचेतून एक बिनडोक भोंगा डोकावतोय

त्यावर शुभ्रधवल रंगाचं कबूतर स्वस्थ बसलं आहे
भोंगा शांत आहे आणि शांतीचं प्रतीक असलेलं कबूतर ही...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला वाटलं कबुतरं पार्किंग च्या गाड्यावर असेडिक शिटतात ,रंग खराब करतात त्याच्यातून होणारे डिजाइन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भोंगा शांत आहे आणि शांतीचं प्रतीक असलेलं कबूतर ही.

हिंदू-मुस्लिम रुपक असलेली कविता आहे वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कबूतरांची दहशत' काय, 'मुझे तो सब कबूतरों की सूरतें एक जैसी नजर आती हैं' काय... झालेच तर

कावळ्यांची खुशामद करण्याची पद्धत माणसांत... कबुतरांचा तो पिंड नाही...

हे काय... (यात 'कावळे' कोण, हे जरी कळले नसले, तरी 'कबुतरे' ही 'माणसे' नव्हेत, असे किती खुबीने सुचविले आहे, हेदेखील आमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटलेले नाही, बरे का!)

पण, बाहेरून 'अनोळखी गावा'त येऊन 'कबुतरां'ना 'दाणे' फेकणारे हे महोदय कोण, ते मात्र कळले नाही. (निदान अद्याप तरी.) मात्र, त्यांनी 'Do not feed the birds' ही पाटी (इंग्रजी, पोल्स्की, हिंदी, उर्दू, मराठी ज्या कोठल्या भाषेतून असेल ती) एक तर वाचलेली तरी नसावी, किंवा (वाचली असल्यास) तिच्याकडे (सोयिस्करपणे) दुर्लक्ष तरी केलेले असावे, एवढे मात्र निश्चित!

..........

(बायदवे, 'भोंगा' आणि 'कबूतर' ही विरुद्ध'पक्षी'य रूपके कशी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुझे तो सब कबूतरों की सूरतें एक जैसी नजर आती हैं'

मला आता नर-मादी ओळखू येतात. शेपटीवरुन. मादीची शेपूट किंचित सुंदर असते - फॅनटेल. मादी जरा नाजूक, लहान असते. नर आक्रमक (म्हणजे कबूतर जितके आक्रमक होऊ शकते तितके) व आकाराने मोठा असतो.
मादी अंड्यावर बसून अंडी उबवते व नर पिलांना दूधावर वाढवतो. येस नराच्या चोचीतही मिल्क ग्लँड असाव्यात.
हे सर्व नीरीक्षण!!
काय भयानक शिटून ठेवलय आमच्या गॅलरीत. आई-वडील कबूतरांनी अगदी स्वच्छ ठेवले होते पण पिलां इकडे तिकडे फिरायला लागली आणि घाण करुन ठेवलीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रूपके आणि कबुतरे गंडतात कधीकधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमस्कार !

ही कविता ( कविताच ना ? !!! ) लिहिताना माझ्या मनात फक्त एक इमेज /चित्र होतं. मागे एकदा पार्कात बसून कबुतरांना दाणे टाकताना , खरोखरीच त्यांचे दोनचार थवे एकामागोमाग आल्यामुळे माझी धांदल उडाली होती. त्यावरून मला एक असं चमत्कारिक चित्र दिसलं. मी मुळात फारसा सामाजिक/राजकीय कविता/गद्य लिहिणाऱ्यातला नाही. त्यामुळे मूळ कविता लिहिताना माझा असा कोणताही छुपा/स्पष्ट हेतू नव्हता. त्यामुळे यात कबुतरे रूपक म्हणून कुणाला वाटत असतील तर ते वाचकाचं अन्वयार्थ स्वातंत्र्य आहे.

मला काहीएक चित्र दिसलं ते मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे इतकंच !

सोमा : हे नर-मादी पहचान कौन निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद !

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0