अनिल कार्की यांच्या कविता

परवा परवा कविताकोश डॉट ऑर्ग साईटवरती 'अनिल कार्की' यांच्या 'रमोलिआ-१', 'उदास वख्त के रमोलिआ', आणि 'पहाडोंपर नमक बोती औरते' या व इतर कविता सापडल्या. साईटवरील, माहीतीनुसार, उत्तरखंड भागातील, एका गावी या कविचा जन्म झालेला आहे. पहील्यांदा भेदक वाटली ती या कवितांमधील भाषा. हिंदी पण प्रादेशिक बोली भाषेचा प्रभाव. कवितांमधील, शब्दाश्बदांतून, अक्षरक्ष: 'मिट्टी की सौंधी खुशबू' म्हणतात तसा भास होतो. खूपसे लोकजीवन, रीतीरिवाज या कवितांमधून लक्षात येते.

ए हो
मेरे पुरखो
खेत के हलिया [हल चालवणारा]
आँगन के हुड़किया[ हुडुक नावाचे वाद्य वाजविणारा]
आँफर[हत्यार बनविण्याची, हत्यारांना धार लावण्याची जागा] के ल्वार[ लोहार]
गाड़[ लहान नदी] के मछलिया[कोळी]
ढोल के ढोलियार[ढोल वादक]
होली के होल्यार[होळी गायक12]
रतेली[विवाह प्रसंगी नौटंकी करणाऱ्या वरपक्षाच्या स्त्रिया] की भौजी
फतोई[पहाडी बास्केट] के औजी
जाग जाग
मेरे भीतर जाग!

.
जसे लोकजीवन लक्षात येते तसेच या लोकजीवनाचा ऱ्हास होत चालला आहे, हेही लक्षात येते. कविने तेथील लोकांचाच तळतळाट, या कवितांमधुन व्यक्त केलेला आहे. बाप रे! शिव्या शापांची भाषा अतिशय उद्वेगी, आहे, मग त्यात कोणताही खोटा मुलामा नाही की सौम्यता नाही. मला पहील्यांदा वाचल्यावर ती भाषा शापवाणी आणि पोट ढवळून काढणारी वाटली होती. डार्क आणि ताकदवान वाटलेली.

तेरी गुद्दी[मेंदू1] फोड़ गिद्द खाए
तेरे हाड़ सियार चूसे
चूहे के बिलों धंसे तेरे अपशकुनी पैर
लमपुछिया[लांब शेपूटवाले] कीड़े पड़े तेरी मीठी जुबान में
तेरी आँखों में मक्खियाँ भनके
आदमी का ख़ून लगी तेरी जुबान
रह जाए डुंग[दगड] में रे!
नाम लेवा न बचे कोई तेरा
अमूस[अमावस्या] का कलिया
रोग का पीलिया
मार के निशान का नीला
ढीली हो जाय तेरी ठसक दुःख से

नक्की कोणाला उद्देशून हा तळतळाट आहे ते कळले नाही. पण एकंदर निसर्गाचा ऱ्हास अन्य काही सामाजिक समस्या या शापवाणीच्या तळाशी आहेत.

ए हो मेरे पुरखो
जागो जागो रे
मेरे भीतर जागो
इस बखत के बीच में

किंवा,

जै हो!
इस बखत की संध्या में
इस बखत की अमूसी रात की चाँख[दृष्ट] लगी है
तेरह बरस का राज्य
तेरह बरस का बछड़ा
बिज्वार[बैल] नहीं बनेगा
कौन मलेगा रे उसकी उगती जुड़ी पर तिल का तेल

करणी, जादूटोणा अशा प्रकारांची आठवण करुन देणारी, ही कविता खूप खूप डार्क जॉनरमधली, शाबर मंत्र वगैरे सारखी एकदम आदिवासी भाषा वाटली, जिला एक नाद आहे, जी काळजाला घरे पाडते, आपल्या आरामदायक शहरी मनाला जिची भीती वाटते.
.
'पहाड़ों पर नमक बोती औरतें ' या कवितेत मात्र वाचकांपुढे, मुख्यत्वे, स्त्रीजीवन येते. पहाडी स्त्रिया, पर्वतांवर जाउन, मीठ टाकून का येतात त्याचे वैद्न्यानिक कारण कळत नाही पण तशी काहीशी लोक-प्रथा दिसते. 'पलटनिया पिता-1', 'पलटनिया पिता-२' आदि कवितांमधून अजुन एक जीवनाचा पैलू लक्षात येतो तो म्हणजे, येथील पुरुष सैन्यात भरती होतात.'शेरपा' नावच्या कवितेत दु:ख मांडलेले आहे की या शेरपांनीच ज्यांना वाटाड्या या नात्याने वाट दाखविली, तेच लोक आता या जमातीला लुटत आहेत.
.
नेटवरती शोधून कवि 'अनिल कार्की' यांच्याबद्दल फारशी माहीती मिळाली नाही. हे एक युवा, उदयोन्मुख कवि असावेत. एखाद दुसरी कविता फेसबुकवरही सापडली.

चीख रहे हैं बीज
रो रही हैं झांड़ियां
असहाय बेलें
लड़खड़ाती
गिर रहीं धरती पर
जिसे डुब जाना है
एक दिन

उदास सावट असलेल्या या कविता, नेपाळ, उत्तरखंडमधील सामाजिक प्रश्न अधोरेखित करतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वाह!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

धन्यवाद पुंबा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.