कोबीची वडी by Namrata's cookbook: २

लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बरीक चिरलेला कोबी(२०० ग्रॅ )
१ वाटी बेसन पीठ (१०० ग्रॅ )
१/२ वाटी तांदळाचे पीठ (५० ग्रॅ)
१/२ चमचा हळद
3 मिरची
3 लसूण पाकळ्या
१/२ आल
कोथिंबीर
२ छोटे चमचे लाल तिखट (optional)
२ छोटे चमचे जिरे
२ छोटे चमचे ओवा
२ छोटे चमचे तिळ
तेल
मीठ
लिंबाचा रस
पाणी

क्रमवार पाककृती:
१. कोबी बारीक चिरुन धुवून घ्या
२. प्रथम लसूण + अदरक + मिरची + जिरे पेस्ट करुन घ्या
३. स्टीमर प्लेट घ्या आणि त्याला तेल लावून घ्या
४. आता बेसन पीठ, तांदळाचे पीठ, लसूण + अदरक + मिरची + जिरे पेस्ट, कोथिंबीर, ओवा, जिरे, तिळ, मीठ, लिंबाचा रस, हळद घाला.
५. पाणी न घालता सर्व एकत्र करा.
६. आता थोडे थोडे पाणी घालत, जाडसर मिश्रण बनवा
७. स्टीमरमध्ये ३ ग्लास पाणी घाला (१ इंच पाणी पातळी)
८. आता स्टीमर प्लेटमध्ये मिश्रण पसरवा
९. आता प्लेट स्टीमर मध्ये ठेवा २० मिनिटे वाफवून घ्या
१०. स्टीम झाल्यावर प्लेट बाहेर कढून घ्या आणि वडी थंड होऊ द्या
११. आता वाडी कट करुन घ्या
१२. पॅन घ्या आणि शॅलो फ्राय करण्यासाठी तेल घ्या
१३. गोल्डन रंग होईपर्यंत वडी दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करुन घ्या
तयार आहे आपली खुसखुशीत कोबीची वडी

अधिक टिपा:
*ही वडी तळूनही घेऊ शकता
* स्टीमर ऐवजी कुकर वापरु शकता
पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://youtu.be/AkH3GlwLM3k

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जे इतरत्र उपलब्ध आहे त्याचा दुवा द्यावा हवा तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0