किरमीजी शिडे

उपकार त्या युट्युबाचे. काय नाही दिले त्याने? जगाच्या कोपर्‍यात कुणा हौशाकडे असलेल्या क्लिपा, व्हिडिओ अपलोड केल्या जातात, दुसर्‍या कोपर्‍यात कुणाच्या तरी आठवणीत त्या पुसट झालेल्या पुन्हा ताज्या होतात. काय, कुठे, कसे मिळून जाईल सांगणे मुश्कील.
कलर कोड चेक करताना अचानक एका रंगाचे नाव दिसले क्रिम्सन. कोण जाणे पण क्रिम्सन नावाची आठवण ताजी झाली. नुसत्या क्रिम्सन शब्दाने किती मोठी सफर घडवली. क्रिम्सन सेल्स.
शाळेतला मी उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास मोठ्या आत्याकडे राहायचे वेध लागलेले. मोठ्या आत्याचे यजमान एअरफोर्स रिटायर्ड. कुटुंबाचा बराचसा काल पठाणकोट, अंबाला अशा ठिकाणी गेलेला. आत्येभावंडाचे फ्लुयेन्ट हिन्दीइंग्लिश आणि पुस्तकी मराठी हा जरी आम्हा इतर भावंडासाठी हसायचा विषय असला तरी त्यांचे वाचन आणि हजरजबाबीपणा आमच्यात नावालाही नव्हता.
आत्याचे घर म्हणले की आठवायचा तो प्रशस्त बंगला, तितकेच प्रशस्त मागे पुढे असणारे अंगण. पेरु, जांभळे आणि आंब्याची डेरेदार झाडे. वाळ्याचे पडदे लावलेला मोठा व्हरांडा आणि काट्यांच्या मध्यभागी मोठे होत जाणारे गायरोस्कोपिक डिझाईन असलेले घड्याळ, कॅसेटचा ढीग आणि मोठा टूइनवन, फोर्सवाल्यांची खूण म्हणजे हाताने फिरवायचे शिलाई मशीन आणि पत्र्याच्या काळ्या ट्रंका. खूप सार्‍या सामानात एक खोली भरली होती पुस्तकानी. त्या खजिन्यातच गवसले मला क्रिम्सन सेल्स.
भारत सोविएट मैत्रीच्या काळात रादुगा मॉस्कोच्या प्रकाशनाची कित्येक रशिअन पुस्तके मराठीत अनुवाद होऊन यायची. अनिल हवालदारांचे अनुवाद असत बहुधा. त्यात मिळालेली कादंबरी 'किरमीजी शिडे' अर्थात अलेक्सांद्र ग्रीन ची क्रिम्सन सेल्स. कधी १९२३ ला लिहिलेली. अनुवाद बराच नंतर झालेला.
........................
लाँग्रेन हा खलाशी सुट्टीला आपल्या घरी येतो तेंव्हा त्याला कळते की आपली बायको मेरी मुलीला जन्म देऊन स्वर्गवासी झालेली आहे. शेजारणींने त्या मुलीला सांभाळले आहे. मेरीला आजारपणात पैसे हवे असतात पण गावातील गुत्तामालक मेन्नर्स पैशासाठी तिच्याकडे अनैतिक संबधांची मागणी करतो. ती झिडकारते पण पावसात भ्जून न्युमोनियाने मरते. लाँग्रेन मुलीसाठी खलाशाची नोकरी सोडतो आणि खेळण्यातील छोट्या बोटी बनवून त्या विकून उदरनिर्वाह चालू करतो. आईवेगळ्या आस्सोल चे पालनपोषण तो अत्यंत प्रेमाने करत असतो पण त्याच्या एकलकोंडेपणामुळे गावांशी जास्त संपर्क टाळतो. एक दिवस मेन्नर्स समुद्रात बुडत असताना शक्य असूनही तो त्याला मदत करत नाही. तो ही कथा सार्‍या गावकर्‍यांना सांगून मरतो. सारे गाव लाँग्रेनवर अघोषित बहिष्कार टाकते. ह्याचे पडसाद त्या चिमुरड्या आस्सोलवरही पडतात. गावातल्या मुलांच्या चेष्टेचा विषय असलेली आस्सोल मात्र तिच्या निरागस भावनात आणि वडीलांच्या बाहुपाशात सुरक्षित असते. एक दिवस त्या खेळण्यातील एक छोटे जहाज (ज्याची शिडे लालभडक सॅटिनचा कापडाची असतात) ती ओढ्याच्या पाण्यात सोडते. ती वाहत वाहत एका भटक्याला सापडते. भटका तिला ते खेळणे परत देतो पण एक भविष्य सांगतो. एक दिवस अशाच एक लाल शिडाच्या जहाजातून एक राजपुत्र येईल आणि आस्सोलला घेऊन जाईल.
आस्सोल हे सारे बापाला सांगताना एक भिकारी ऐकतो आणि हि बातमी गावभर होते. किरमीजी शिडाची आस्सोल हे नवीन नाव तिला मिळते. बापाचा व्यवसाय फारसा चालत नसला तरी तारुण्यात पदार्पण केलेली आस्सोल ते किरमीजी शिडांचे स्वप्न उराशी जपून असते.
उमराव घराण्यातल्या लिओनेल ग्रेचा एकुलता एक वारस ऑर्थर ग्रे हा स्वभावतःच बंडखोर असतो. अभ्यासापेक्षा दर्यावर्दी जीवनाची आवड त्याला एक दिवस पळून जायला भाग पाडते. जहाजावर पोर्‍याचे काम करत करत तो खलाशी होतो, खलाशाची बढती कप्तानपदाकडे व्हायला वेळ लागत नाही. एक दिवस स्वतःचे जहाज घेऊन तो धाडसाने व्यापार चालू करतो.
एक दिवस आस्सोल रात्रभर घरातील कामे करुन भल्या पहाटे घराजवळील समुद्राशेजारी असलेल्या झाडीत फिरतानाच थोडीशी झाडाखाली लवंडते. त्याच वेळी मासे पकडण्यासाठी आलेला ग्रे तिला पाहतो. तिचे निरागस लावण्य पाहून तिच्या प्रेमात पडतो. आस्सोल झोपेत असताना खूण म्हनून एक अंगठी अलगद तिच्या बोटात सरकावून निघून जातो. गावात तिची चौकशी करताना तिच्या किरमीजी शिडांचा इतिहास त्याला समजतो.
पुढे काय? एक सुंदर परिकथा पूर्ण होते. ऑर्थर ग्रे आपल्या जहाजाला किरमीजी शिडांनी सजवूनच त्या गावात प्रवेश करतो. आस्सोलला घेऊन जातो.
.........................
कथा साधीशीच, सोपी. निरागस अन देखणी. त्या आस्सोलसारखीच.
जेंव्हा हे पुस्तक वाचले तेंव्हाच त्याच्या प्रेमात पडलो. कित्येक पारायणे केली. भाषा फारशी सुरेख नव्हती, कित्येक रशिअन संदर्भ कळायचे नाहीत पण मन मोहून टाकणारं असं काहीतरी त्यात होते. हे पुस्तक कितीजणांनी वाचलंय, ते प्रसिध्द आहे का नाही, जगात त्याबद्दल काय काय बोललं जातं हे कळायचं ते वय नव्हतं आणि गरजही नव्हती.
.........................
पुस्तके जमा करायचा अन वाचायचा काळ संपलाही पण मनात दडलेली किरमीजी शिडे एक दिवस गवसली इंटरनेटवर. तिथे मात्र पुस्तकाने क्रिम्सन सेल्स नाहीतर स्कार्लेट सेल्स नाव धारण केलेले. क्रिम्सन की स्कार्लेट. दोन्ही शेडस ब्राईट रेडच्याच. कुठल्याही दुसर्‍या रंगाचा प्रभाव नसणार्‍या. पूर्ण आरक्त.
इंटरनेटने चक्क ह्या कादंबरीवर झालेली रशिअन फिल्मही सजेस्ट केली. Алые паруса नावाची. १९६१ ला सोविएट फिल्मसने निर्मीती केलेली. आस्सोल होती अ‍ॅनास्ताशिया वर्तिनस्काया आणि ग्रे होता वासिली लेनोव्हाय. सबटयटल असलेल्या ह्या चित्रपटाने ती आस्सोल अगदी जशी मनात होती तशीच दाखवली. रुबाबदार ऑर्थर ग्रेही अगदी तस्साच. लालभडक शिडांचे जहाज कापेर्नाकडे येताना जमा झालेले सारे गाव, आश्चर्यचकीत अन भांबावलेली आस्सोल, तिला तसेच उचलून प्रेमाची कबुली देणारा अन घेणारा ऑर्थर. सजवलेल्या सिक्रेट(जहाजाचे नाव) कडे नेणारा कप्तान ऑर्थर. शेवटी निरागसपणे "माझ्या लाँग्रेनला घेशील ना बरोबर?" हा प्रश्न विचारणारी अन ग्रे च्या होकारानंतर समाधानाने त्याच्या कुशीत विसावणारी आस्सोल.
आह्ह्ह. व्हरांड्यातल्या कोपर्‍यात बसून ते पुस्तक वाचतानाचा एकेक क्षण पुन्हा अनुभवला गेला. अगदी यथार्थपणे उभा झाला. इतक्या बॉलीवूडी, हॉलीवूडी अन साउथी फिल्मस्च्या मारधाडी पाहून ह्या चित्रपटात का गुंतलो गेलो? की आधी गुंतलेला मी फक्त हे क्षण शोधित होतो? तो निरागसपणा नसेल आजच्या जगात पण आस्सोल अन ग्रे भेटल्यावर उगीच डोळे ओले झाल्यासारखे का वाटले कुणास ठाऊक.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अस्सल सौंदर्य नेहमीच झाडाच्या सावलीत लवंडलेले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अति अस्सल लिखाण अभ्या. खूप आवडले.

इतकेच म्हणतो कारण भाव महत्त्वाचा. जास्त शब्दांनी त्याला डागाळू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय गोड कथा आहे. झोपेत अलगद अंगठी सरकावुन जातो. सॉलिड!!
या लेखाचा शेवट फार आवडला. खरे आहे असे हरवलेले 'निरागसपण' क्वचित भेटावे. नाहीतर आहेच जगायची जकात भरत जगणे. निबर, निगरगट्ट होत जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाहवा, अभ्या, जबरदस्त! व्हिडियो पाहून आणखी लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं एकेकाळचं अत्यंत आवडतं पुस्तक Smile याचं मुखपृष्ठ अजूनही डोळ्यासमोर आहे ! किरमिजी या शब्दाची पहिली गंमत या पुस्तकामुळेच समजली !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

छान लिहिलय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेख अतिशय आवडला.

'चंद्रमाधवीचे प्रदेश'मधली 'किरमिजी वळणाचा धुंद पाऊस येतो, निळसर कनकांचे दीप हातात देतो' अद्भुतरम्य ओळ डोक्यात रेंगाळत राहिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ह्या पुस्तकाबद्दल पहिल्यांदाच ऐकलं.

येता विकेण्ड सत्कारणी लावण्याचा विचार होता. आता हा सिनेमा बघेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट बघेन मी कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

सिनेमा बघतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार निरागस कथा..
तुमचे लेखणही छान आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्म.

Scarlet sails navacha Russia madhe ek mohotsav asato
https://en.wikipedia.org/wiki/Scarlet_Sails_(tradition)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0