तुझ्या कवितेची ओळ

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
जिंदगीच्या निवडुंगा
इवलेसे फूल येते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
पाखराच्या लकेरीने
गचपान थर्थरते

कवितेची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा ओठी येते
पुन्हा पुन्हा रुजूनिया
पुन्हा पुन्हा उगवते

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जिंदगीच्या निवडुंगा
इवलेसे फूल येते

वाह वाह!!! आवडली ही उपमा.

गचपान थर्थरते

यातील गचपान शब्द मस्त.
.

कवितेची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा ओठी येते
पुन्हा पुन्हा रुजूनिया
पुन्हा पुन्हा उगवते

छानच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा शब्द मला नवीन आहे, शिकायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गच्च करवंदाची जाळी किंवा तत्सम दाट पानाफुलांचे नैसर्गिक गच्च्पण, दाटिवाटी डोळ्यांसमोर आली माझ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद - चांगला शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गचपण = दाटीवाटीने गर्द वाढलेली झुडूपं / बसकी झाडं, ज्यातून वाट काढून जाणं कठीण / अशक्य व्हावं. "कुणा एकाची भ्रमणगाथा" मधे गोनीदानी नर्मदामाईची साथ सोडायची नाही म्हणजे नाही या निश्चयापायी एका गचपणातनं त्याना जावं लागलं त्याचं सुरेख वर्णन केलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

बाकीच्या सर्व शब्दांत, जिंदगी हा शब्द उपरा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहे तसा उपराच शब्द
पण जिंदगी हा शब्द मालमत्ता मिळकत या अर्थाने सरकारी कागदपत्रांमध्ये देखील वापरलेला बघितलाय.
अर्थ नेमका माहीत नाही पण जिंदगी चा असा एक अशा वेगळ्या अर्था ने "आर्थिक" उपयोग पण आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुष्य = मिळमिळीत
जिंदगी = कलंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0