सिंधुआज्जींच्या चमत्कारिक कहाण्या

अनेक वर्षे विस्मृतीत गेलेल्या सिंधुआज्जींची प्रकर्षाने आठवण झाली, आणि त्यांच्या आठवणी जणू चलचित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोरून झरझर गेल्या.

आमच्या सोसायटीत तळमजल्यावरील एक बिऱ्हाडात सिंधुआज्जी एकट्याच रहायच्या. म्हणजे त्या आणि त्यांचे पाळीव प्राणी. सिंधुआज्जींकडे एक काकाकुवा, फिशटॅन्कमधले मासे, एक पांढरीधोप मनीमाऊ, आणि एक झिपरे अस्वल होते. स्लाॅथ्या अस्वलाचे खेळ करून त्या स्वतःच्या टाईमपासची सोय करत. (अर्थार्जनासाठी त्यांचे एक प्रोटेक्शन रॅकेट होते.)

सिंधुआज्जी तशा धार्मिक होत्या. फावल्या वेळात वाती वळायला त्यांना खूप आवडायचे. सोसायटीतल्या पोराटोरांनासुद्धा त्या वेळीअवेळी वाती वळायला बसवायच्या. अळमटळम करणार्या मुलांना त्या धोत्र्याच्या चहाचं आमिष दाखवायच्या; आणि तरीही न ऐकणार्या मुलांना नाक दाबून धोत्र्याचा चहा पाजायच्या.

सुरकुतलेल्या हातांच्या आणि चेहर्याला व्रिंकल फ्री क्रीम लावणाऱ्या त्या म्हातारीने आमच्यावर खूप माया केली होती. त्यांच्या गोष्टी ऐकताना एखादे मूल पेंगाळले तरी त्याला घरी न सोडता सिंधुआज्जी दामटून मांडीवर झोपवून थोपटायच्या. पेस्टल कलर्सच्या त्यांची मऊसूत नऊवारी पातळं आणि त्यांचं तपकिरी बाॅम्बार्डियर जॅकेट यांचा स्पर्श आणि पोत मला अजूनही आठवतोय. त्यांच्या हातचे रवायुक्त जायफळाचे लाडू आणि सीफूड पाएला यांची चव मी कधीच विसरू शकणार नाही. बाकी सगळं काळाच्या पडद्याआड गेलं तरी सिंधुआज्जींची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही.

...

सिंधूआज्जी तशा खूप फिरल्या. वाकोल्यापासून अकोल्यापर्यंत आणि बांद्र्यापासून चांद्र्यापर्यंत महाराष्ट्र तर त्यांनी जणू पादाक्रांत केला होता. पण ताजमहाल, कोणार्क, निकोबार बेटे, अक्साई चिन इत्यादी प्रेक्षणीय स्थळेही त्या हिंडून आल्या होत्या. त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवासही झाला होता. फ्रान्स, पूर्व टिमोर अशा ठिकाणी त्या गमतीखातर फिरल्या होत्या. सफारीमध्ये स्लाॅथ्याबरोबर सहभागी होण्यासाठी त्या केनयात गेल्या होत्या, पण स्थानिक लोक स्लाॅथ्याला नंदीअस्वल समजू लागल्याने त्यांना पलायन करावं लागलं होतं.

पण त्यांची एक इच्छा अपुरी राहिली होती, त्याबद्दल त्या मला नेहमी सांगत. अचानक एके दिवशी 'नाऊ ऑर नेव्हर' अशी कृष्णप्रतिज्ञा करत त्या आमच्याकडे आल्या आणि मला सोबतीला घेऊन प्रवासाला निघाल्या. त्यानंतरचे काही आठवडे माझ्या आयुष्यातलं सर्वात रोमांचक (रोमान्सक नव्हे) पर्व होतं. सिंधूआज्जी तेव्हा उण्यापुर्या ब्याण्णव वर्षांच्या होत्या, तरी त्यांचा उत्साह, नियोजन आणि धाडस वाखाणण्याजोगं होतं.

पहिल्याप्रथम चार्टर्ड हेलिकॉप्टरने आम्ही बाॅम्बे हायला गेलो. तिथे सिंधूआज्जींच्या वशिल्याने आम्हाला एका पाणबुडीत स्टोअवे म्हणून लिफ्ट मिळाली आणि त्या मार्गाने मजल दरमजल करत आम्ही पापुआ न्यू गिनीला पोचलो.

पोर्ट माॅर्सबीमध्ये आठवडाभर राहून आम्ही पुढच्या प्रवासाची तयारी केली. म्हणजे मी स्काल्पिंग वर्कशाॅप्स बघत हिंडत होतो, तेवढ्या वेळात सिंधूआज्जींनी बालसा लाकडाचा तराफा बनवून घेतलाही. मग एका प्रसन्न पहाटे, उगवत्या सूर्याला वंदन करून आम्ही 'काॅर्न टिक्की' हा आमचा तराफा प्रशांत महासागरात लोटला.

प्रवाहांमुळे आम्ही मार्ग चुकलो आणि पूर्वेकडे जात जात आंतरराष्ट्रीय वार रेषा पार केली. मग 'काॅर्न टिक्की' रिव्हर्समध्ये टाकून आम्ही पुन्हा योग्य दिवसात पोचलो, आणि अखेरीस आमच्या गंतव्यस्थानी पोचलो - 'फेडरेटेड स्टेटस् ऑफ मायक्रोनेशिया'मध्ये!

सिंधूआज्जींची बकेट लिस्ट अखेरीस पूर्ण झाली होती!

तिथल्या अनुभवाबद्दल पुन्हा कधीतरी.

...

आता थोडा फ्लॅषबॅक. (प्रायोजक: पोटफोड्या ष प्रचारक समिती) (सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचा एक माजी अध्यक्ष आणि सिंधुआज्जींचा माजी स्नेही फ्लेश-बेक म्हणायचा. तेही जिभल्या चाटत.)

तर सिंधुआज्जी एकदा लेक्चर टूरवर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये गेल्या होत्या. म्हणजे त्यांच्या सावत्र पुतण्याच्या घरी त्या हवापालटाला गेल्या होत्या, आणि बदललेल्या हवेमुळे करवादून त्याच्या सख्ख्या मुलांना त्या सतत लेक्चर झोडत होत्या.

एके स्वच्छ सूर्यप्रकाशित सकाळी सिंधुआज्जींनी एकटीने पिकनिकला जायचा निर्णय घेतला. त्यांच्या फर्माईशीमुळे सावत्र चुलतसुनेने ज्वारीची भाकरी आणि वांग्याचे भरीत बनवले. रविवारी लवकर उठावे लागल्यामुळे ती आधीच वैतागली होती. त्यात भरीत भर म्हणजे, सिंधुआज्जींनी मोठा डबा टेबलावर ठेऊन "त्यात भरीत भर" असा तिला आदेश सोडला.

त्याच वेळी सिंधुआज्जींचा काकाकुवाने "पिसेस ऑफ एट, पिसेस ऑफ एट" असे तारस्वरात किंचाळून सावत्र पुतण्याच्या सख्ख्या तान्ह्या मुलाला उठवले. तो (पक्षी: तान्हा मुलगा) रडायला लागला तेव्हा वैतागलेल्या सावत्र पुतण्याच्या डोक्यात त्याचा (पक्षी: काकाकुवाचा (हो, काकाकुवा पक्षीच आहे; मत्स्य, उभयचर, सरीसृप किंवा सस्तन नाही)) गळा दाबावा असा विचार आला.

तर या गोंधळाला वैतागून सिंधुआज्जी घराबाहेर पडल्या. तरातरा चालत त्या वाट फुटेल तिथे चालत होत्या. एके ठिकाणी जरा गर्दी दिसली म्हणून त्या थांबल्या आणि ऐकू लागल्या.

शैक्षणिक अभ्यासक्रमात उत्क्रांतीवादाबरोबर धार्मिक समजुतींचा अंतर्भाव करण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी ती सभा होती. मानवाच्या उगमाबद्दलच्या धार्मिक समजुतींमधील अतार्किकता स्पष्ट करण्यासाठी वक्ता 'फ्लाईंग स्पॅघेटी माॅन्स्टर'ची संकल्पना सांगत होता.

सिंधुआज्जींना त्याचं म्हणणं पुरेपूर पटलं. फ्लाईंग स्पॅघेटी माॅन्स्टर - FSM त्यांना फारच आवडला. आणि तत्क्षणी त्यांनी निर्णय घेतला FSM - फेडरेटेड स्टेटस् ऑफ मायक्रोनेशिया बघायचा.

सिंधुआज्जी का दिमाग चाचा चौधरी से भी तेज चलता है!

...

सिंधुआज्जी सफारीसाठी केनयात गेल्या होत्या तेव्हा तिथले स्थानिक लोक स्लाॅथ्याला नंदीअस्वल समजले होते, ही गोष्ट कदाचित तुम्हाला आठवत असेल. नंदीअस्वलाबद्दल भीतीयुक्त घृणा असलेल्या, रागावलेल्या स्थानिकांचा जमाव दगड, काठ्या, हाॅकी स्टिक्स, कड्याकोयंडे, बझूका, भाले, लोकरीचे गुंडे इत्यादी हाताशी लागतील त्या वस्तू घेऊन सिंधुआज्जी आणि स्लाॅथ्यावर चाल करून आला.

बिलकुल न घाबरता सफारी जीप सफाईदारपणे चालवत सिंधुआज्जींनी तेथून पोबारा तर केला, पण जीपचे ब्रेक अनुत्तीर्ण झाल्यामुळे इंधन संपेपर्यंत त्यांना जीप चालवत रहावी लागली. प्रायोगिक तत्त्वावर जीपवर बसवलेल्या सौर जनित्रांमुळे माईलेज उत्तम होते, आणि अखेरीस टायर फुटून जीप थांबली तेव्हा सिंधुआज्जी मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकात पोचल्या होत्या.

जीप थांबताच, बघ्यांचा जमाव जमला. आपल्या तपकिरी बाॅम्बार्डियर जॅकेटवरील तपकिरी धूळ झटकत सिंधुआज्जी जीपमधून उतरल्या, आणि बघ्यांना उद्देशून म्हणाल्या, "टेक मी टू युवर चीफ." इंग्रजीचा गंध (आणि चवही) नसलेल्या बघ्यांना काहीच उमगले नाही; पण सिंधूआज्जींच्या आवाजातील जबर जरब ऐकून बघ्यांनी त्यांना व स्लाॅथ्याला आपल्या नेत्याकडे नेले.

त्यांना पाहताक्षणीच अध्यक्ष बोकासो उभा राहिला आणि उद्गारता झाला, "सिंधुआज्जी, आय प्रिझ्युम?" सिंधुआज्जींची काळजी घेण्याचा आदेश त्याने आपल्या मामाला दिला. पूर्ण सरकारी इतमामाने मामाने त्यांचे आदरातिथ्य केले.

रात्री जेवताना बोकासो फ्लेश-बेक खात होता, आणि सिंधुआज्जी वांग्याचं भरीत आणि चुलीवरची भाकरी खात होत्या. "मला लोक पुरेसा मान देत नाहीत; मी काय करू?" बोकासो तक्रारीच्या सुरात म्हणाला. "त्यांचा हृदयसम्राट हो," सिंधुआज्जी म्हणाल्या. एका कानाने उंच ऐकणार्या बोकासोने "हृदय" हा शब्द ऐकला नाही. पण त्याला ऐकू आलेल्या सल्ल्यामुळे खूष होऊन त्याने मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाचा, नव्हे - साम्राज्याचा - अभिषिक्त सम्राट होण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ तशी दवंडी पिटवली.

एका वर्षानंतर, मध्य आफ्रिकन साम्राज्याच्या वार्षिक बजेटच्या एक तृतीयांश रक्कम खर्चून बोकासोचा राज्याभिषेक साजरा झाला. पण मुळातच गरीब देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा यामुळे मोडला.

आजही जगात सर्वात कमी मानवी विकास निर्देशांक आहे तो मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाचा, आणि याला जबाबदार आहेत - सिंधुआज्जी!

...

सिंधुआज्जींना डोळे आले होते तेव्हा त्या गाॅगल लावून हिंडत. त्या काळात कंटेनर काॅर्पोरेशनला धावती भेट देण्यासाठी त्या गेल्या होत्या. अचानक Belgaum हे स्टेन्सिलने लिहिलेल्या एका कंटेनरचे दार किलकिले दिसले, आणि कुंद्याची आठवण येऊन पुढचामागचा विचार न करता त्या त्या* कंटेनरमध्ये घुसल्या. (* हा प्रकार ब्यूत्रास ब्यूत्रास घाली किंवा श्री श्री रविशंकर असा नसल्याचे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच.)

(सिंधुआज्जींच्या स्टोअवे म्हणून प्रवास करण्याच्या करियरची ही नांदी होती. पुढे जीप, पाणबुडी, उद्वाहन, अंतराळयान, बाबागाडी, इत्यादी अनेक वाहनांतून त्यांनी स्टोअवे म्हणून प्रवास केला.)

(चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच, की) तो कंटेनर बेळगावचा नसून बेल्जियमचा होता. (पण चाणाक्ष वाचकांचा गैरसमज दूर करण्यासाठी हे सांगू इच्छितो, की) ही गफलत सिंधुआज्जींच्या गाॅगलमुळे नसून, कंटेनर काॅर्पोरेशनच्या एका कर्मचाऱ्याच्या स्पेलिंग मिस्टेकमुळे झाली होती.

तर रेड आय फ्लाईटने बेल्जियमला पोचल्यावर ही गफलत सिंधुआज्जींच्या लक्षात आली. आपल्या बटव्यातील मीठ, रंगीत खडे व हस्तिदंत यांचा सौदा करून त्यांनी स्थानिक चलन प्राप्त केले. बियर आणि कुंदा हे तहानलाडू-भूकलाडू चाखत त्यांनी पूर्वेच्या दिशेने प्रवास सुरू केला. कुंदा संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या लाडक्या तस्करांकडून डिंकाचे लाडू मागवले, आणि मजल दरमजल करत त्या बोस्नियाची राजधानी साराजेव्हो येथे पोहोचल्या.

बोस्नियाची राजधानी साराजेव्हो येथे पहाट उमलत होती. शतकिरण उधळीत प्रभात रवि नभात उदयाला येत होता. बोस्नियाच्या पावन भूमीवर त्याचा वरदहस्त असल्याची खात्री सकल बोस्नियन जनतेला होती. परंतु ... युद्धाचे मेघ क्षितिजावर आगेकूच करत होते. सांप्रत युद्धमान परिस्थितीत बोस्नियाचा तारणकर्ता कुणी असेल का?

बाॅम्बार्डियर जॅकेटवरील धूळ झटकत सिंधुआज्जींनी साराजेव्होच्या दिंडीदरवाज्यातून शहरात प्रवेश केला. ती पवित्र धूळ मस्तकी लावायला त्या विसरल्या नाहीत हो!

"तुम्ही कोण?" गस्त घालणाऱ्या एका सैनिकाने सिंधुआज्जींना जरबेने विचारले. सिंधुआज्जींनी बाणेदार उत्तर दिधले, "आम्ही कोण म्हणोनि काय पुसता?" सैनिकाने रुमालाने घाम पुसला आणि सिंधुआज्जींना शहरात येऊ दिले.

लवकरच सिंधुआज्जींच्या लक्षात आले, की विविध जमातींच्या वादांमुळे शहरात संशयाचे वातावरण होते. ठिणगी पडायचा अवकाश, की यादवी युद्धाचा भडका उडाला असता. बाह्य शांतिसेना हा एकच उपाय होता, पण एकमेकांवरील संशयामुळे कोणतीही जमात शांतिसेनेला पाचारण करत नव्हती, आणि इतर जमातींनाही शांतिसेनेला पाचारण करू देत नव्हती.

सिंधुआज्जींनी क्लृप्ती लढवली. सर्व जमातींच्या प्रमुखांना एके ठिकाणी जमवून त्यांना डिंकाचे लाडू खाऊ घातले. "किती रुचकर आहेत हे लाडू!" बोस्नियाकांचा प्रमुख म्हणाला. "असे अजून द्याल का?" क्रोएटांच्या प्रमुखाने विचारले. "खरंच सिंधुआज्जी, तुमचे फार उपकार होतील," सर्बांचा प्रमुख म्हणाला.

"ठीक आहे. पण लाडू बनवण्यासाठी डिंक लागतो. खैराचा डिंक, बाभळीचा डिंक, वगैरे वगैरे." सिंधुआज्जी म्हणाल्या. "मला हव्या तेवढ्या डिंकांना आणायची परवानगी द्याल तर पुढचं मी पाहते."

तिन्ही जमातींनी तात्काळ संमती दिली. सिंधुआज्जींनी मराठीत तसा मजकूर लिहिला आणि तिघांच्याही स्वाक्षऱ्या घेतल्या.

त्या संध्याकाळीच सशस्त्र आणि सुसज्ज अशा डिंका सैनिकांची फौज सुदानमधून बोस्नियात येऊन दाखल झाली. या शांतिसेनेच्या उपस्थितीमुळे वातावरण निवळले, आणि बोस्नियात सुखसमृद्धीचे एक नवे युग अवतरले.

बोस्नियाचा तारणकर्ता कोण याची इतिहासात नोंद होवो न होवो, पण प्रत्येक बोस्नियन सिंधुआज्जींबद्दल सदैव कृतज्ञ राहील.

...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

भलतीच बिग बजेट आहे!
तुमची ट्रिक लक्षात येत होती तोवर आज्जीने मात्र कल्ला केलाय. आज्जीचा बटवा, आज्जीच्या वाती, आज्जीचा पोपट, मऊसूत लुगडी आणि सुरकुत्या आल्या, तहानलाडू-भूकलाडू आला. आणि भाकऱ्या काय म्हणताय? दशम्या म्हणा दशम्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

पुढील उताऱ्यातील विसंगती शोधा हा यत्ता सात्वीतला प्रश्न फारच मनावर घेतलाय जनूं !

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...गिळला, की काय वाट्टेल त्या कल्पना सुचत असाव्यात बहुधा.

फुल्टू धोत्रापिऊनटाइटावस्थेत लिहिलेली कथा आहे. (This may be construed as a compliment. Left-handed or otherwise.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अर्थार्जनासाठी त्यांचे एक प्रोटेक्शन रॅकेट होते.)

इथे फुटेश! सिंधुआज्जी म्हणजे तशा डॉन. त्यात पुन्हा तपकिरी बाॅम्बार्डियर जॅकेट ... एक फोटो पाहिजे होता आज्जींचा.

पण पुढे थोडं लांबलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लांबलं हे खरंय. मालिका स्वरूपात लिहिलं होतं मुळात - त्यामुळे एपिसोडही एकमेकांशी सुसंगत नाहीत. कदाचित टप्प्याटप्प्याने पोस्टायला हवं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तपकिरी बाॅम्बार्डियर जॅकेट

Bombardier

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बॉम्बर जॅकेट ऐकले होते.

कदाचित बम्बार्डियर कंपनीची विमाने चालविणारे पायलट घालत असतील. जाऊ द्या ना. आपल्याला काय करायचे आहे?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समानार्थी शब्द असावेत. उदा. कॅच-२२ मध्ये बाॅम्बार्डियर हा शब्द वापरला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्या गोष्टी ऐकताना एखादे मूल पेंगाळले तरी त्याला घरी न सोडता सिंधुआज्जी दामटून मांडीवर झोपवून थोपटायच्या. पेस्टल कलर्सच्या त्यांची मऊसूत नऊवारी पातळं आणि त्यांचं तपकिरी बाॅम्बार्डियर जॅकेट यांचा स्पर्श आणि पोत मला अजूनही आठवतोय. त्यांच्या हातचे रवायुक्त जायफळाचे लाडू आणि सीफूड पाएला यांची चव मी कधीच विसरू शकणार नाही.

आधी एक तर जायफळाचे लाडू, आणि तेही अगोदरच पेंगुळलेल्या मुलाला!

आणि पाएला नव्हे, पाएय्या.

बाकी, सीफूड पाएय्या बोले तो अगदीच नॉर्मल झाला. सीफूडऐवजी काही चित्रविचित्र इन्ग्रीडियंट्स टाकून त्याला एक्झॉटिक बनवता आला असता. सकाळीसकाळी धोत्र्याची मात्रा कमी पडली काय?

..........

उंदीर? घुशी? झुरळे??? व्हर्मिन पाएय्याची कल्पना वाईट नाही. किंवा पाली???? 'पालीचा पाएय्या'ला कशी छान अॅलिटरेटिव रिंग (बोले तो, मराठीत ज्याला तुम्ही अनुप्रास की काय ते म्हणता, ते.) आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे पालींवर अत्याचार नाहीत वाट्टं 'पालपाल' नबा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

आता इथे कशाकशावर अत्याचार झालेले नाहीत, की पालींनी स्पेशल ट्रीटमेंटची अपेक्षा करावी? सांगा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा लॉगिन झाले की 'ओ ओ ओ पालनहारे' गाणं वाजायची वेवस्था करा रे कोणी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पालीला उगाच आंघोळ कर म्हणून का सांगायचं?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई!!!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्क्विड इंक पायेया हे प्रकरण अत्यंत उच्चभ्रू समजलं जातं. फोडणीच्या भाताचा प्रकार असतो तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद. उच्चार मला ठाऊक नव्हता, तो कळला.

व्हर्मिन पाएय्या ही उत्तम आयडीया आहे. GM किंवा ऑर्गॅनिक व्हर्मिन वापरले की झालं.

जायफळाचे लाडू आणि पेंगणं याचा कार्यकारणभाव वेगळाहीअसू शकेल.

बाय द वे, 'न'वी म्हणजे 'n'th का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा व्हर्मिलियन पायेया करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हर्मिन पाएय्या ही उत्तम आयडीया आहे. GM किंवा ऑर्गॅनिक व्हर्मिन वापरले की झालं.

Smile

जीएम की ऑर्गॅनिक? नक्की काय ते ठरवा.

जायफळाचे लाडू आणि पेंगणं याचा कार्यकारणभाव वेगळाहीअसू शकेल.

ओहो! हे नव्हते लक्षात आले.

बाय द वे, 'न'वी म्हणजे 'n'th का?

हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण वाचून होण्याआधीच मागणी, विनंती, आवाहन वगैरे. ज्यांना चित्र काढता येतं, किंवा येत नाही त्यांनीही सिंधुआजींचं चित्र काढा. अस्वलानं त्यात सेल्फी डकवला तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सिंधु, शरयु वगैरे सेक्सी* नावाच्या बायका जुन्या साहित्यात खूप आढळून येत. पण त्या मानाने त्या नावाच्या आज्या कधी भेटल्या नाहीत. हे काय गौडबंगाल आहे? सिंधु नावाच्या बायकांना पोरे होत नसत काय?
*(म्हणजे सेक्सी इन अ घरंदाज वे, सॉर्ट ऑफ लाईक प्रिया बापट)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

फारच चमत्कारिक हो ही सिंधूआज्जी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

आवडली...

सिरियसली काय माल ओढून कथा लिवली होती तो माल आमालापण पायजेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0