Cold Blooded - १० (अंतिम)

रोशनी, जवाहर आणि अखिलेश या तिघांचीही हत्या करण्यासाठी बॅट्रॅकटॉक्सिन वापरण्यात आलं आहे हे ऐकून चारु नखशिखांत हादरली होती. रोहित बँगलोरला डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये आलेला असतानाची सारी चर्चा क्षणांत तिच्या नजरेसमोर फिरुन गेली!

"मिसेस द्विवेदी, तुम्ही डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करता, राईट?"

"येस!" चारु स्वत:ला सावरत उत्तरली.

"तुम्ही आणि शेखर अमेरीकेहून परत येताना कोलंबियात थांबून बॅट्रॅकटॉक्सिन घेवून मुंबईला आलात, करेक्ट?"

"येस! मी व्हेकेशनसाठी स्टेट्सला जाणार आहे हे कळल्यावर परत येताना बॅट्रॅकटॉक्सिनचा स्टॉक आणण्याची डॉ. मालशेंनी सूचना केली होती. त्याप्रमाणे कोलंबियात किबदो इथे ते माझ्या हाती येण्याचीही त्यांनी अ‍ॅरेंजमेंट केली होती!"

"मुंबई एअरपोर्टवरुन बाहेर पडण्यापूर्वी बॅट्रॅकटॉक्सिन कस्टम क्लिअरन्स केलं होतं?"

"येस! डॉ. मालशेंनी त्यासंदर्भातलं आवश्यक ते सर्व पेपर्स पूर्ण करुन माझ्याकडे दिले होते. मुंबईला लॅन्ड झाल्यावर कस्टम्स क्लिअरन्सची सर्व प्रोसेस पूर्ण करुनच मी ते बाहेर आणलं होतं!"

"बॅट्रॅकटॉक्सिन तुम्ही कसं आणलं होतं? आय मिन अ स्पेसिफीक कंटेनर ऑर समथिंग एल्स?"

"ती एक लहानशी बॉटल होती. कोणत्याही सामान्य औषधाच्या बॉटलसारखीच! एका मेटल कंटेनरमध्ये ठेवलेली होती!"

"तुम्ही अमेरीकेहून परतल्यावर चार दिवस मुंबईतच मुक्कामाला होतात तेव्हा ते पॉयझन तुमच्या ताब्यात होतं का मुंबईत आल्यावर तुम्ही ते बँगलोरला डॉ. मालशेंकडे पाठवलंत?"

"मुंबईला आल्यावर मी सरांना फोन केला आणि बॅट्रॅकटॉक्सिन मिळाल्याचं त्यांच्या कानी घातलं. मी आणि शेखर मुंबईला तीन - चार दिवस राहणार होतो, त्यामुळे ते कुरीयरने बँगलोरला लॅबमध्ये पाठवण्याबद्दल मी त्यांना विचारलं, तेव्हा मात्रं त्यांनी नकार दिला. मोठ्या मुष्कीलीने मिळवलेलं आणि डेडली डेंजरस असलेलं बॅट्रॅकटॉक्सिन कुरीयरने पाठवताना मिसप्लेस झालं तर रिसर्चच्या दृष्टीने फार मोठं नुकसन झालं असतंच, पण त्याबद्दल काही माहिती नसणार्‍या माणसाच्या हातात ते चुकून पडल्यास त्याचे परिणाम भयानक झाले असते! त्यापेक्षा चार दिवस उशीरा ते लॅबमध्ये पोहोचलं तरी चालेल, पण तू स्वत: ते बँगलोरला येताना बरोबर घेवून ये असं त्यांनी मला बजावून सांगितलं!"

"रोशनीला तुमच्या रिसर्चच्या कामात खूप इंट्रेस्ट होता आणि तुम्ही मुंबईत असतानाच्या त्या चार दिवसांत तुमचं त्याबद्दल तिच्याशी बरंच डिस्कशनही झालं होतं, राईट? नाऊ टेल मी, तुमच्या बोलण्यात कधी बॅट्रॅकटॉक्सिनचा उल्लेख आला होता?"

चारु चकीत होवून त्याच्याकडे पाहतच राहिली. डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये तिच्याशी बोलताना त्याने एक्झॅक्टली हेच प्रश्नं विचारले होते. आता तेच प्रश्नं सर्वांसमोर पुन्हा विचारण्यात त्याचा नेमका कोणता हेतू होता याचा तिला अंदाज येत नव्हता.

"ऑफकोर्स! आम्ही मुंबईला अंकलच्या घरी पोहोचल्यावर बॅट्रॅकटॉक्सिनची बॉटल असलेला कंटेनर मी फ्रीजमध्ये ठेवला आणि त्याला कोणीही चुकूनही स्पर्श करुन नये असं सर्वांना बजावलं होतं! रोशनीने त्याच्यामागचं कारण विचारलं तेव्हा रिसर्चसाठी आणलेलं एक अत्यंत डेडली पॉयझन त्यात असल्यामुळे त्यापासून दूर राहण्याची मी पुन्हा एकदा सर्वांना वॉर्निंग दिली! त्यानंतर रोशनीने मला त्याविषयी विचारुन अक्षरश: भंडावून सोडलं होतं! बॅट्रॅकटॉक्सिनची संपूर्ण माहिती, त्याचे परिणाम, त्याचं डोसेज इत्यादी बारीक-सारीक माहिती अगदी अगदी खोदून खोदून विचारली होती. इनफॅक्ट ब्रेकफास्टच्या वेळेलाच हा विषय निघाला त्यावेळी शेखर, रेशमी आणि अंकलही तिथे होते!"

"व्हेरी इंट्रेस्टींग!" रोहितच्या चेहर्‍यावर नकळत गूढ स्मित झळकलं, "रोशनीचा मृत्यू झाल्या त्या ८ - ९ ऑक्टोबरच्या रात्री तुम्ही एअरपोर्टजवळच्या ओरीएंटल इंटरनॅशनल हॉटेलमध्ये राहिला होतात, राईट? त्या रात्री तुम्ही किंवा शेखर हॉटेलमधून बाहेर पडला होतात?"

"नो सर! अनफॉर्च्युनेटली बँगलोरला जाणारी आमची रात्रीची फ्लाईट कॅन्सल झाली. दुसर्‍या दिवशी सकाळच्या फ्लाईटमध्ये आम्हाला कन्फर्म सीट्स मिळत होत्या. अंकल आणि रेशमी दोघंही रात्री घरी नाहीत हे आम्हाला माहीत होतं आणि सगळं लगेज घेवून अंकलकडे जा आणि सकाळी पुन्हा एअरपोर्टवर या ही धावपळ करण्यापेक्षा हॉटेलमध्ये राहणं जास्तं कम्फर्टेबल होतं. आय वॉज सो टायर्ड, त्यामुळे रुममध्य चेक-इन केल्यावर मी लगेच झोपून गेले!"

"अ‍ॅन्ड व्हॉट अबाऊट यू शेखर?"

"फॉर सम टाईम, मी हॉटेलच्या लॉबीत असलेल्या कॉम्प्युटरवर ऑफीसचे मेल्स चेक करत होतो, पण हॉटेलच्या बाहेर मात्रं गेलो नव्हतो! सुमारे तासाभराने मी रुमवर परत आलो तेव्हा चारु झोपलेली होती. देन आय ऑल्सो रिटायर्ड टू बेड!"

"आय सी! मि. द्विवेदी, तुमच्याकडे एकूण दोन कार्स आहेत, राईट?"

रोहितच्या या अनपेक्षित प्रश्नाने द्विवेदी एकदम दचकलेच! पण दुसर्‍याच क्षणी त्यांनी स्वत:ला सावरलं.

"येस! मी ब्लॅक मर्सिडीज वापरतो. व्हाईट स्कोडा रेशमीची आहे."

"व्हाईट स्कोडा.... रेशमी, ८ - ९ ऑक्टोबरची संपूर्ण रात्रं तू मढ आयलंडला मैत्रिणीच्या बंगल्यावरच होतीस?"

"ऑफकोर्स सर! मी रात्रंभर आणि दुसरा दिवसभर तिथेच होते. संध्याकाळी घरी परत आले!"

"रोशनीच्या मृत्यूनंतर तू कलकत्त्याला गेली होतीस?"

"येस सर! मी, चारुदी, पपा सगळेच गेलो होतो. तिथून आम्ही दिल्लीला गेलो. शेखरदा आम्हाला दिल्लीला भेटला आणि मग आम्ही हरिद्वारला जाऊन रोशनीचं अस्थिविसर्जन केलं. शेखरदा आणि चारुदी तिथून बँगलोरला गेले आणि मी आणि पपा मुंबईला परत आलो."

"किती दिवस होतीस कलकत्त्याला?"

"मी आणि चारुदी तीन - चार दिवस होतो. पपा आले त्याच्या दुसर्‍या दिवशी आम्ही दिल्लीला गेलो!"

"शेखर, ही दिल्लीतल्या एका कुरीयर कंपनीची रिसीट आहे! १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी दोन वेगवेगळी पॅकेट्स पाठवल्याची रिसीटवर नोंद आहे. पॅकेट्स पाठवणार्‍या व्यक्तीचं नाव आहे शेखर द्विवेदी! रिसीटवर सिग्नेचरही आहे! ही सिग्नेचर तुमचीच आहे ना?"

शेखरने ती रिसीट निरखून पाहिली. ती रिसीट पाहताना त्याचे डोळे विस्फारलेले रोहितने अचूक टिपले.

"धिस इज नॉट माय सिग्नेचर! मी कधीही कोणालाही कुरीयर पाठवलेलं नाही!"

"रेशमी, तू १८ ऑक्टोबरच्या सकाळी नऊ वाजता कलकत्त्याच्या डमडम स्टेशनवर शाकीब जमालला भेटली होतीस?"

"डमडम स्टेशनवर? नो सर! नेव्हर!"

"वेल! अवर इन्व्हेस्टीगेशन इंडीकेट्स समथिंग एल्स!"

रोहित शांतपणे म्हणाला तसे सगळे त्याच्याकडे पाहतच राहिले!

"८ ऑक्टोबरच्या रात्री बँगलोरला जाण्यासाठी शेखर एअरपोर्टवर आला खरा, पण काहीतरी कारण काढून बँगलोरला जाणं पुढे ढकलून त्या रात्री मुंबईतच थांबण्याचा त्याचा इरादा होता! फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे शेखरला आयतीच संधी मिळाली आणि कोणतंही निमित्त काढण्याची वेळच आली नाही! शेखरच्या मुंबईत थांबण्यामागचं कारण होतं ते म्हणजे त्याच रात्री रोशनीचा खून करण्याचा प्लॅन! त्या रात्री दहाच्या सुमाराला रेशमी मढ आयलंडवरच्या मैत्रिणीच्या बंगल्यातून बाहेर पडली. तिने हॉटेल गाठलं तेव्हा तिथे शेखर तिची वाटच पाहत होता! रेशमीने शेखरला गोडाऊनच्या गेटवर सोडलं आणि थोडी पुढे रोडसाईडला कार पार्क करुन ती तिथेच थांबून राहिली. रोशनी आणि अखिलेश बाहेर पडलेलं दोघांच्याही दृष्टीस पडलं होतं. शेखरनेच गोडाऊनच्या बाहेर असलेल्या पब्लिक फोनवरुन कॉल करुन रोशनीला धमकावलं आणि पुन्हा गोडाऊनमध्ये येण्यास भाग पाडलं! रेशमीनेच आपल्या एका मित्राकरवी गोडाऊनमध्ये रोशनीच्या शेजारची स्टोरेज रुम मिळवली होती! मिसेस द्विवेदींजवळचं बॅट्रॅकटॉक्सिन मिळवण्यास शेखरला काही अडचण येण्याचा प्रश्नच नव्हता! रोशनी गोडाऊनला परत येताच शेखरने बॅट्रॅकटॉक्सिन लावलेली नीडल खुपसून तिचा खून केला आणि सूटकेसमधे तिची डेडबॉडी भरुन तो तिथून बाहेर पडला! रेशमी कारमध्ये त्याची वाटच पाहत होती! वरळीला रोशनीची डेडबॉडी डिस्पोज ऑफ केल्यावर शेखरला पुन्हा हॉटेलवर सोडून तिने मढ आयलंडवरचा आपल्या मैत्रिणीचा बंगला गाठला!

शेखर आणि रेशमी आ SS वासून रोहितकडे पाहत होते! आपल्यावरचा खुनाचा आरोप नाकारण्याचंही त्यांना भान नव्हतं!

"अखिलेश आणि जवाहरने ब्लॅकमेल करण्यास सुरवात केल्यावर रेशमीने त्यांचाही काटा काढण्याचा प्लॅन बनवला आणि त्यासाठी कलकत्त्याजवळच्या नजत गावच्या शाकीब जमालकडून दोन खास रिव्हॉल्वर्स बनवून घेतली. रिव्हॉल्वर्स रेडी होताच रेशमीने डमडम स्टेशनवर ती कलेक्ट केली आणि टॉय गन्सच्या पॅकींगमध्ये टाकून त्याच दिवशी दुपारच्या फ्लाईटने तिने इतरांबरोबर दिल्ली गाठली! रेशमीकडून ती रिव्हॉल्वर्स ताब्यात येताच शेखरने रिव्हॉल्वर्समधल्या त्या सुयांना बॅट्रॅकटॉक्सिन लावलं आणि कुरीयरने ती रिव्हॉल्वर्स, पैसे आणि दोघांचे फोटो अल्ताफ कुरेशीला पाठवून दिले! शेखरनेच त्याला जवाहर आणि अखिलेश यांची सुपारी दिली होती!

या सगळ्यामागचं कारण होतं ते म्हणजे द्विवेदींची प्रॉपर्टी! कितीही झालं तरी रोशनी द्विवेदींची सख्खी मुलगी होती आणि रेशमीला त्यांनी दत्तक घेतलेलं होतं! उद्या प्रॉपर्टीचा मेजर शेअर किंवा कदाचित सगळी प्रॉपर्टी आणि बिझनेसच द्विवेदींनी रोशनीच्या नावावर केला असता तर रेशमीच्या हाती काहीच लागणार नव्हतं! रोशनीला मार्गातून हटवणं हा एकच पर्याय तिच्यापुढे होता! प्रॉपर्टीच्या शेअरसाठी शेखरने तिला साथ द्यावी यात काहीच आश्चर्य नव्हतं!"

"व्हॉट द हेल इज गोईंग ऑन?" द्विवेदी संतापाने धुमसत म्हणाले, "प्रधान, तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय रेशमी आणि शेखरवर वाटेल ते आरोप करत आहात! रोशनीच्या मृत्यूचा उलगडा तुम्हाला करता आलेला नाही म्हणून तुम्ही रेशमी आणि शेखरला स्केपगोट बनवण्याचा प्रयत्नं करत आहात! आय विल नॉट टॉलरेट धिस नॉन्सेन्स!"

"एक मिनिट मि. द्विवेदी! तुमच्या सख्ख्या मुलीचा खून झालेला आहे आणि तो तुमच्या सावत्रं मुलीने आणि पुतण्याने केला आहे याचा तुम्हाला शॉक बसणं अगदी नॅचरल आहे! आय कॅन अंडरस्टँड इट अ‍ॅन्ड द फ्रस्ट्रेशन अ‍ॅज वेल, पण रेशमी आणि शेखर इनोसंट आहेत आणि पोलीस त्यांना स्केपगोट बनवण्याचा प्रयत्नं करत आहेत हा तुमचा आरोप मात्रं मी अजिबात मान्यं करणार नाही! वी हॅव प्रूफ अ‍ॅन्ड विटनेसेस फॉर एव्हरी सिंगल स्टेटमेंट!"

रोहित इतक्या ठामपणे आणि कठोर स्वरात उद्गारला की सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहिले!

"अ‍ॅज पर अवर इन्फॉर्मेशन, रेशमी १८ ऑक्टोबरच्या सकाळी नऊ वाजता डमडम स्टेशनवर शाकीबला भेटली, त्याच्याकडूण तिने रिव्हॉल्वर असलेलं पॅकेट कलेक्ट केलं आणि त्याला कॅश असलेलं पॅकेट दिलं!"

"नो सर! धिस इज नॉट ट्रू! मी कधीही डमडम स्टेशनवर गेलेले नाही!"

रोहितने कदमना खूण केली तसे ते इन्क्वायरी रुममधून बाहेर पडले आणि मिनिटभरातच शाकीबसह परतले.

"शाकीब, १८ ऑक्टोबरच्या सकाळी, डमडम स्टेशनवर तू ज्या बाईला ते पॅकेट दिलंस त्या बाईला ओळखू शकशील?

"हां! साब!" शाकीब रेशमीकडे बोट दाखवत उत्तरला, "ये वो औरत है! मैने इसीके हात में वो पॅकेट दिया था!"

रोहितने कदमना खूण केली तसे ते पुन्हा बाहेर गेले आणि मिनिटभरातच दोन्ही हातात बेड्या अडकवलेल्या अल्ताफ कुरेशीसह इन्क्वायरी रुममध्ये परत आले.

"अल्ताफ, जवाहर आणि अखिलेशचा खून करण्यासाठी तुला सुपारी देणार्‍या माणसाला ओळखू शकतोस?"

"हां साब!" अल्ताफने शेखरकडे बोट दाखवलं, "ये ही वो आदमी है साब! इसीने मुझे दो खून करनेकी सुपारी दी थी और दो लाख रोकडा दिया था! लेकिन बाद में इसने मुझे धोका दिया साब! बाकीके आठ लाख रुपये मुझे कभी नहीं मिले!"

रोहितने खूण केली तसे कदम अल्ताफ आणि शाकीबसह इन्क्वायरी रुममधून बाहेर पडले.

"नॉन्सेन!" शेखर रागाने म्हणाला, "धिस इज ऑल बुलशीट! माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही! मी कधीही त्या गोडाऊनमध्ये पाय ठेवलेला नाही किंवा कोणाला खून करण्यासाठी पैसे दिलेले नाहीत! या अल्ताफला आज मी पहिल्यांदाच पाहतो आहे!"

"रेशमी, तू व्हाईट कलरची स्कोडा वापरतेस ना? रोशनीचा खून झाला त्या रात्री तू जर मढ आयलंडला आपल्या मैत्रिणीच्या बंगल्यावरच होतीस, तर मग तुझी स्कोडा त्या रात्री सी-लिंकवरुन कशी काय पास झाली?"

"माझी कार...." रेशमी गोंधळली, "नो सर! ती दुसरी कोणतीतरी कार असेल!"

"सी-लिंकच्या टोल बूथवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत रेशमी!" रोहितचा आवाज कठोर झाला, "त्या कॅमेर्‍यात ९ ऑक्टोबरच्या पहाटे दोन वाजता तुझी कार पास होताना स्पष्टं दिसते आहे!"

प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर एक फोटो झळकला. फोटोमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कॅप्चर झालेली पांढर्‍या रंगाची स्कोडा स्पष्टं दिसत होती! द्विवेदी आणि रेशमी डोळे फाडून त्या फोटोकडे पाहत होते. द्विवेदींनी पुन्हा-पुन्हा कारची नंबरप्लेट तपासून पाहिली! हा प्रकार इतका अनपेक्षित होता, की काय बोलावं हे त्यांना कळत नव्हतं.

"सर ही कार.... " रेशमीला रडवेली झाली होती "कार माझी आहे, पण ती तिथे कशी गेली मला माहीत नाही! मी त्या रात्री मढ आयलंडच्या बंगल्यातून बाहेर पडले नव्हते सर! मला यातलं काही माहीत नाही!"

"अच्छा? कदम, जरा त्या वॉचमन रामाश्रयला बोलवा!" रोहितने इन्क्वायरी रुममध्ये परतलेल्या कदमना सूचना दिली.

मिनिटभरातच वॉचमनचे कपडे घातलेला सुमारे पन्नाशीचा एक माणूस इन्क्वायरी रुममध्ये आला.

"रामाश्रय, ८ ऑक्टोबरच्या रात्री तू गोडाऊनमध्ये ड्यूटीवर होतास?"

"जी साब!"

"त्या रात्री यांच्यापैकी कोणी तिथे आलं होतं?"

रामाश्रयने इन्क्वायरी रुममध्ये बसलेल्या सर्वांवरुन एकदा नजर फिरवली.

"या मॅडम आणि हे साब आले होते त्या रात्री!" रेशमी आणि शेखरकडे बोट दाखवत तो म्हणाला, "त्यांच्याकडे सफेद कलरची स्कोडा गाडी होती! रात्री अकराच्या सुमाराला मॅडमनी या साबना गेटवर सोडलं आणि थोडीशी पुढे कार पार्क करुन त्या आतच बसून राहिल्या. रात्री दीडच्या सुमाराला हे साब एक मोठी बॅग घेऊन खाली आले. त्यांना पाहिल्यावर या मॅडमनी गाडी गेटसमोर आणून उभॉ केली. या साबनी ती बॅग डिकीत टाकली आणि दोघं निघून गेले!"

"ती कार स्कोडा होती हे कशावरुन?"

"साब, मी गेल्या दोन वर्षांपासून वॉचमनचं काम करतो आहे, पण त्यापूर्वी मी ड्रायव्हर होतो! गेल्या तीस वर्षात मी अँबॅसेडर आणि फियाटपासून मर्सिडीजपर्यंत सगळ्या गाड्या चालवल्यात साब! गाडी ओळखण्यात माझी चूक होणं शक्यंच नाही! ती सफेद कलरची स्कोडा कारच होती साब!"

"तुझी पक्की खात्री आहे रामाश्रय? त्या रात्री व्हाईट स्कोडामध्ये तू ज्यांना पाहिलं होतंस ते हेच दोघं होते?"

"बिलकूल साब! मी याच दोघांना पाहिलं होतं!"

"दॅट्स इट!" रोहित शांतपणे द्विवेदींकडे पाहत म्हणाला, "या तिन्ही खुनांची मास्टरमाईंड रेशमी आहे आणि शेखर तिला सामिल आहे! ८ - ९ ऑक्टोबरच्या त्या रात्री दोघं गोडाऊनवर गेले, शेखरने रोशनीचा खून करुन दोघांनी तिची बॉडी वरळीला डिस्पोज ऑफ केली. अखिलेश आणि जवाहरने ब्लॅकमेल करण्यास सुरवात केल्यावर रेशमीने ती रिव्हॉल्वर्स बनवून घेतली आणि कलकत्त्यात कलेक्ट करुन दिल्लीला आणून शेखरला दिली. शेखरने अल्ताफला सुपारी दिली आणि त्याने जवाहर आणि अखिलेशचा खून केला! अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट!"

"स्टॉप धिस नॉन्सेन्स प्रधान!" द्विवेदी संतप्त सुरात उद्गारले, "तुम्ही तुमच्या मनाने काय वाटेल ती कहाणी रचून सांगत आहात! रोशनीचा मृत्यू कसा झाला हे अद्यापही तुम्हाला शोधून काढता आलेलं नाही आणि ते फेल्युअर कव्हर अप करण्यासाठी आणि स्वत:ची इनकपेबलिटी लपवण्यासाठी तुम्ही रेशमी आणि शेखरला या केसमध्ये सिस्टीमॅटीकली फ्रेम करण्याचा प्रयत्नं करत आहात! त्या रात्री या दोघांपैकी कोणीही त्या गोडाऊनमध्ये गेलेलं नव्हतं! रोशनीच्या मृत्यूशी त्यांचा काहीही संबंध नाही! दे आर कंप्लीटली इनोसंट! आय विल सी टू इट दॅट इट गेट्स प्रूव्हड इन कोर्ट!"

"इनफ मि. द्विवेदी!" रोहितचा आवाज चढला, "अ‍ॅज आय सेड, आय कॅन अंडरस्टँड युवर फ्रस्ट्रेशन, पण आमच्यावर इनकेपेबलिटीचा आरोप केलात तर तो खपवून घेणार नाही! रोशनीचा खून रेशमी आणि शेखरनेच केला आहे! त्या रात्री ते दोघेच वडाळ्याच्या त्या गोडाऊनवर गेले होते आणि या रामाश्रयने त्यांना तिथे पाहिलेलं आहे!"

"रेशमी इज टोटली इनोसंट!" द्विवेदी रागारागाने उद्गारले, "त्या रात्री ती मैत्रिणीच्या बंगल्यातून बाहेरही पडलेली नव्हती! सेम विथ शेखर! त्याने देखिल हॉटेलमधून बाहेर पाऊल टाकलं नाही याची मला पक्की खात्री आहे! हा माणूस ते दोघं गोडाऊनवर आले होते असं उघड-उघड खोटं बोलतो आहे आणि तरीही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताहात?"

"ओ साब!" रामाश्रय गरम झाला, "या मॅडम आणि हे साब त्या रात्री गोडाऊनवर आले होते! हे साब ती बॅग घेऊन खाली आलेले आणि सफेद कलरच्या स्कोडामध्ये बसून गेलेले मी स्वत: पाहिलं आहे! या मॅडमच ती स्कोडा चालवत होत्या! खोटं बोलायची आदत नाही मला!"

"यू जस्ट शटअप!" द्विवेदी रामाश्रयवर खेकसले, "हा गोडाऊनचा वॉचमन? हा असला वॉचमन होता म्हणूनच रोशनीचा गोडाऊनमध्ये खून झाला! स्वत:चं काम धड करता येत नाही आणि दुसर्‍याकडे बोट दाखवायला हे सगळ्यात पुढे हजर! रेशमी स्कोडामधून गोडाऊनवर आली होती म्हणे.... स्कोडा गाडी अशी दिसते हे माहित आहे का रे? आयुष्यात कधी पाहिली आहेस का? माझ्या मुलीचा काही संबंध नसताना कोणीतरी काहीही पढवलं म्हणून वाटेल ते आरोप करायला लाज नाही वाटत?"

"ओ साब! मेरेपे फालतूमें चिल्लानेका नहीं!" रामाश्रयनेही भांडणाचा पवित्रा घेतला, "बहोत सुन लिया आपका! मला कोणीही काही पढवलेलं नाही आणि पढवण्याची गरजही नाही! मी माझ्या डोळ्यांनी जे काही पाहिलं, ते खरंखरं सांगितलं आहे! मी स्वत: ड्रायव्हर होतो आणि गाडीबद्दल माझी चूक होणं शक्यंच नाही! ती सफेद स्कोडाच होती आणि त्या रात्री या मॅडमच ती गाडी घेऊन गोडाऊनवर आल्या होत्या! गेटच्या अगदी बाजूलाच त्यांनी गाडी उभी केली होती, त्यामुळे मी त्यांना अगदी स्पष्टपणे पाहिलं होतं!"

"अरे नीच माणसा, किती खोटं बोलशील?" द्विवेदी संतापाने थरथरत होते, "गेटच्या बाजूला गाडी पार्क केली होती काय? तिथे जागा तरी होती का? एकापाठी एक असे दोन ट्रक उभे होते तिथे रेशमी गाडी कशी पार्क करणार होती रे? ते ट्रक दिसले नाहीत वाटतं तुला?"

"ट्रक उभे असले तर दिसणार ना साब? माझं वॉचमन केबिन गोडाऊनच्या गेटला लागूनच आहे! दोन्ही बाजूच्या पार सिग्नलपर्यंतचा रस्ता दिसतो मला केबिनमधून! रस्त्याच्या कुठल्याच बाजूला एकही ट्रक उभा नव्हता! या मॅडमची गाडी तेवढी उभी होती आणि माझ्या केबिनमधून ती स्पष्टं दिसत होती! ट्रकबिक काही नव्हतं तिथे!"

"शटअप यू लायर! एक नंबरचा खोटारडा माणूस आहेस तू! सिग्नलपर्यंतचा रस्ता दिसतो काय? तुला गेटच्या बाजूला उभे असलेले दोन ट्रक दिसले नाहीत, त्यांच्यापलीकडे उभा असलेला टेम्पो दिसला नाही, दुसर्‍या बाजूला असलेल्या तीन-चार व्हॅन्सही दिसल्या नाहीत, पण रेशमीची स्कोडा तेवढी बरोबर दिसली?"

"हे सगळे डिटेल्स तुम्हाला कसे कळले द्विवेदी?" रोहितने अगदी सहज सुरात प्रश्नं केला.

"आय हॅव सीन इट विथ माय...."

द्विवेदी बोलताबोलता एकदम गपकन् थांबले आणि हादरुन रोहितकडे पाहत राहिले....
रोहित शांतपणे त्यांच्याकडेच पाहत होता....
आपण शब्दांत फसलो!
.... पण आता फार उशीर झाला होता!

"मि. द्विवेदी," एकेक शब्द सावकार उच्चारत रोहितने विचारलं, "रोशनीचा मृत्यू झाला त्या रात्री तुम्ही बिझनेस ट्रीपवर पुण्यात होतात. असं असतानाही वडाळ्याच्या गोडाऊनबाहेर पार्क केलेल्या प्रत्येक व्हेईकलची पोझीशन तुम्हाला कशी काय दिसली?"

इन्क्वायरी रुममध्ये असलेल्या प्रत्येकाची नजर द्विवेदींच्या चेहर्‍यावर रोखलेली होती....

अनुभवी पोलीस अधिकारी असलेल्या कोहली, खत्री आणि घटकना रोहितच्या प्रश्नाचा अर्थ बरोबर समजला होता.
या प्रकरणाला मिळालेली कलाटणी पाहून ते देखिल आश्चर्याने थक्कं झाले होते.
सुरेंद्र वर्मा आणि मुखर्जी तर पार गोंधळून गेले होते. चारूचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती
शेखर आणि रेशमी तर वेड्यासारखे एकदा रोहितकडे आणि एकदा द्विवेदींकडे पाहत होते.
पोलीसांनी आपल्यावर खुनाचे आरोप केले, तसे साक्षीदारही उभे केले....
त्यांच्यापैकी एकाशी स्वत: द्विवेदींचं जोरदार भांडण झालं....
आणि
अगदी अचानक रोहितच्या एका साध्या प्रश्नावर द्विवेदींचा आवाज एकदम बंद झाला होता!

द्विवेदी भकास चेहर्‍याने खुर्चीत बसलेले होते. अवघ्या काही क्षणांपूर्वी रामाश्रयवर खेकसणारा आणि तावातावाने भांडणारा हाच माणूस आहे हे कोणाला सांगूनही खरं वाटलं नसतं! त्यांचा सगळा आवेश, सगळा आक्रमकपणा पार नाहीसा झाला होता. वॉचमन रामाश्रयचा वापर करुन पोलीसांनी आपल्याला शब्दांच्या जाळ्यात अडकवलं आणि आपण त्यात पूर्णपणे गुरफटलो याची त्यांना कल्पना आली.

"तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे द्विवेदी!" रोहित कठोर स्वरात म्हणाला, "रोशनीचा खून झाला त्या रात्री गोडाऊनच्या बाहेर दोन ट्रक उभे होते, त्यांच्यापलीकडे टेम्पोही उभा होता आणि त्या टेम्पोशेजारी एक रेड कलरची कार उभी होती! रोशनीची डेडबॉडी व्हाईट कलरच्या स्कोडातून नाही तर या कारमधून वरळी सी फेसवर डम्प करण्यात आली, हीच कार ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावरुन पहाटे तीन वाजता पास झाली आणि मुद्दाम लांबच्या वाटेने कल्याण बायपासवरुन शीळफाटा, पनवेल या मार्गे लोणावळ्याला गेली! ही कार लोणावळ्यातच एका टॅक्सी ड्रायव्हरला भरपूर पैशांचं आमिष दाखवून त्याच्या नावावर हायर करण्यात आली होती! खरं की नाही द्विवेदी?"

रोहितच्या प्रत्येक वाक्यासरशी द्विवेदी खचत होते. त्याने टेम्पोच्या शेजारी उभ्या असलेल्या लाल कारचा उल्लेख केल्यावर आणि लोणावळ्यापर्यंतचा मार्ग आणि टॅक्सीवाल्याचा उल्लेख केल्यावर तर त्यांच्या चेहर्‍यावर प्रेतकळा आली होती. नखशिखांत हादरलेली रेशमी आ SS वासून एकदा रोहितकडे तर एकदा द्विवेदींकडे पाहत होती! चारुने तिचा हात घट्ट धरुन ठेवलेला असला तरी रेशमीप्रमाणेच तिलाही जबरदस्तं धक्का बसलेला होता. शेखर अद्यापही पोलीसांनी आपल्यावर तिहेरी खुनाचा आरोप ठेवल्याच्या शॉकमध्येच होता. वर्मा आणि मुखर्जी अद्यापही गोंधळून द्विवेदींकडे पाहत होते.

"इसका मतलब सरजी, द्विवेदींनीच रोशनीचा खून केला आणि जवाहर आणि अखिलेशची सुपारी दिली? पण का? आणि आतापर्यंत जे झालं ते सर्व नाटक होतं?" कोहलींनी आश्चर्याने आणि तितक्याच उत्सुकतेने विचारलं.

"अ‍ॅब्सोल्यूटली कोहली! ते सगळं नाटक होतं! द्विवेदींकडून सत्यं वदवून घेण्यासाठी आम्हाला ते नाटक करावं लागलं! शेखर आणि रेशमीचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही! रेशमीच्या व्हाईट स्कोडाचा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कॅप्चर झालेला तो फोटो ही फोटोशॉपची ट्रीक आहे! या ट्रिपल मर्डरचे मास्टरमाईंड द्विवेदीच आहेत! त्यांनीच त्या स्टॉकपैकी थोडंस बॅट्रॅ़कटॉक्सिन चोरलं आणि त्याच्या सहाय्याने गोडाऊनमध्ये रोशनीचा खून केला! द्विवेदींनीच अल्ताफ कुरेशीला सुपारी दिली होती!" रोहितची नजर द्विवेदींवर रोखली होती, "इट्स ऑल ओव्हर मि. द्विवेदी! आय थिंक इट्स टाईम नाऊ टू कम आऊट क्लीन!"

द्विवेदींची हताश नजर पाळीपाळीने इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेल्या प्रत्येकावरुन फिरली. सर्वांची दृष्टी त्यांच्यावरच खिळलेली होती. रेशमीशी नजरानजर होताच क्षणभरच त्यांच्या नजरेत वेदना उमटली.

"आय कन्फेस!" द्विवेदींनी घोगर्‍या स्वरात कबुली दिली, "रोशनीचा खून माझ्या हातूनच झालेला आहे! जवाहर आणि अखिलेशची सुपारीही मीच दिलेली होती!"

"एक मिनिट द्विवेदी! तुम्ही जवाहर आणि अखिलेशची सुपारी दिलीत हे बरोबर आहे! त्याचबरोबर वरळी सी फेसवर ज्या मुलीची डेडबॉडी सापडली त्या मुलीचा वडाळ्याच्या गोडाऊनमध्ये तुम्ही खून केलात हे देखिल बरोबर आहे, पण तुम्ही रोशनीचा खून केलेला नाही!"

द्विवेदींनी एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं.

"रोशनी द्विवेदी म्हणून ज्या मुलीला तुम्ही सिमल्याहून मुंबईला आणलंत, गेल्या सहा महिन्यांपासून ती तुमच्या घरात राहत होती, ती मुलगी प्रत्यक्षात रोशनी नसून दिल्लीची पिक-पॉकेटर आणि कॉलगर्ल श्वेता सिंग होती! शी वॉज जस्ट अ‍ॅन इम्पोस्टर! खरं की नाही द्विवेदी?"

शेखर, चारु आणि रेशमी तिघंही हादरुन रोहितकडे पाहतच राहिले! खासकरुन रेशमीला तर जबरदस्तं शॉक बसला होता. गेले सहा महिने रोशनी म्हणून आपण ज्या मुलीबरोबर राहत होतो, अनेक ठिकाणी फिरलो, तासन् तास गप्पा मारल्या, आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर भटकलो ती प्रत्यक्षात रोशनी नसून भलतीच कोणीतरी होती? ज्या मुलीने हॉस्पिटलमध्ये असताना आपली एवढी काळजी घेतली ती इम्पोस्टर होती?

"रोशनी.... रोशनी वॉज इम्पोस्टर.... ओ गॉड! बट, हाऊ इज धिस पॉसिबल.... " रेशमीला काय बोलावं हे कळत नव्हतं.

"पण... रोशनी आय मिन श्वेता सिंग इम्पोस्टर होती तर मग रोशनी कुठे आहे?" शेखरने गोंधळून विचारलं.

"शेखर, या केसमध्ये एकूण तीन खून झाले आहेत असं मी सुरवातीला म्हणालो होतो, पण प्रत्यक्षात तीन नाही तर चार खून झाले आहेत! श्वेता, जवाहर, अखिलेश आणि रोशनी! मिसेस मेघना द्विवेदीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची सुरवात झाली! रोशनी सिमल्याच्या कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिथेच हॉस्टेलमध्ये राहत होती. अखिलेश आणि आणि श्वेता यांनी रोशनीचा कझिन शेखर आणि त्याची बायको असल्याचं नाटक करुन तिला सिमल्याहून मंडी इथे नेऊन तिचा खून केला आणि तिच्याजागी रोशनी म्हणून श्वेता मुंबईला आली! द्विवेदींची प्रॉपर्टी आणि बिझनेस गिळंकृत करण्यासाठी आणि त्याचबरोबर वर्मांकडूनही शेअर मिळवण्याच्या हेतूने जवाहर कौलने हा प्लॅन आखला होता! द्विवेदींना श्वेता इम्पोस्टर आहे हे कळल्यावर त्यांनी तिच्याकडून सत्य वदवून घेतलं आणि मग तिच्या हत्येचा सूड घेण्यासाठी श्वेता, जवाहर आणि अखिलेश यांना संपवलं!"

शेखर आणि चारु वेड्यासारखे रोहितकडे पाहत राहिले. अखिलेश आणि श्वेताने रोशनीचा खून करण्यासाठी आपलं नाव वापरल्याचं कळल्यावर शेखर चांगलाच हादरला होता.

"द्विवेदी, आय थिंक आता तुम्हीच सर्वकाही स्पष्टपणे सांगितलंत तर बरं होईल! श्वेता इम्पोस्टर आहे हे तुम्हाला कसं कळलं?"

"रोशनीला सिमल्याहून मुंबईला आणल्यावर जवळपास चार - पाच महिन्यांनी सप्टेंबरच्या सुरवातीला मला एक दिवस ऑफीसमध्ये एक फोन आला. फोन करणार्‍याने आपलं नाव - गाव काही सांगितलं नाही, पण रोशनी ही माझी मुलगी नसून दिल्लीची एक हार्डकोअर क्रिमिनल आहे असा त्याने दावा केला! तिच्याबरोबर तिचा एक साथीदारही मुंबईत आहे आणि या दोघांपासून जपून राहवं असंही त्याने मला बजावलं! दिल्लीत चौकशी केल्यास माझ्या बोलण्यातली सत्यता तुम्हाला पटेल एवढं सांगून त्याने फोन कट् केला!"

"इंट्रेस्टींग! व्हॉट वॉज युवर रिअ‍ॅक्शन?"

"टोटल शॉक अ‍ॅन्ड डिसबिलीफ! वीस वर्षांनंतर माझी मुलगी मला परत मिळाली होती, आमच्यातलं मिसअंडरस्टँडींग क्लीअर झाल्यावर आता कुठे ती घरात सेटल होत होती आणि अशा वेळेला तो फोन आला होता! सुरवातीला तर मी त्याच्याकडे पार दुर्लक्षंच केलं! आऊट ऑफ जेलसी किंवा मुद्दाम खोडसाळपणा म्हणून कोणीतरी तो फोन केला असावा अशी माझी कल्पना झाली! मला मानसिक त्रास देण्याच्या हेतूने जवाहरने हा उद्योग केला असावा अशीही मला शंका आली. रेशमी हॉस्पिटलाईज असताना रोशनीची सतत सुरु असलेली धडपड पाहिल्यावर तर मुद्दामच तिच्यविरुद्ध मला भडकवण्याचा प्रयत्नं केला जात आहे अशी माझी जवळपास खात्रीच पटली होती! तिचा जवळचा मित्रं असलेला तो रुपेश मात्रं सुरवातीपासूनच समहाऊ बरोबर वाटत नव्हता. रोशनीमार्फत मी त्याला अनेकदा भेटायला बोलावूनही तो भेटायचं टाळत होता! रेशमीच्या मैत्रिणीच्या पार्टीत फोटोवरुन घडलेला प्रकार तर खूपच संशयास्पद होतं! त्यातच या फोनची भर! दिल्लीतले माझे कॉन्टॅक्ट्स वापरुन रुपेश आणि कोणताही संशय नको म्हणून स्वत:ची खात्री करुन घेण्यासाठी रोशनीचीही इन्फॉर्मेशन काढण्याची व्यवस्था केली. मुंबईतही मी त्या दोघांना फॉलो करण्यासाठी प्रायव्हेट डिटेक्टीव्हज् हायर केले होते! रोशनी आणि रुपेश दर तीन - चार दिवसांनी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये रुम हायर करुन तिथे राहत होते! बर्‍याचदा त्या गोडाऊनमधल्या स्टोरेज रुममध्येही दोघं भेटत होते! आता तिथे ते दोघं नेमकं काय करत होते त्याचे परिणाम तुमच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये समोर आले आहेतच! मि. प्रधान, ती खरोखरच रोशनी असती तर तारुण्याच्या कैफात झालेली ही चूकही एकवेळ मी पोटात घातली असती, पण..... अनफॉर्च्युनेटली ऑर रादर फॉर्च्युनेटली, दिल्लीहून मिळालेल्या रिपोर्टने तिच्या आणि त्या रुपेशच्या चेहर्‍यावरचा सभ्यतेचा बुरखा टराटरा फाटला होता! रोशनीच्या नावाने माझ्या घरात बिनधास्तपणे राहणारी ही मुलगी प्रत्यक्षात एक पाकीटमार आणि कॉलगर्ल होती! तिचा सिमल्याशी काहीही संबंध नव्हता!

फ्रँकली स्पिकींग, आय वॉज कम्प्लीटली लॉस्ट! मी तो रिपोर्ट किमान चार ते पाच वेळा वाचून काढला! सर्वात पहिला विचार माझ्या मनात आला तो म्हणजे ताबडतोब घर गाठावं आणि तिला खडसावून जाब विचारावा! रागाच्या भरात मी ऑफीसमधून घरी येण्यासाठी निघालोही होतो पण हाफ वे गेल्यावर चिडून काही उपयोग नाही हे माझ्या लक्षात आलं! या सगळ्याचा छडा लावायचा असेल तर डोक्यात राख घालून न घेता अत्यंत थंड डोक्याने आणि विचारपूर्वक पाऊल टाकावं लागणार होतं! या प्रकरणात जवाहरचा हात आहे यात मला शंकाच नव्हती कारण त्यानेच मला सिमल्याचा पत्ता दिला होता आणि तिथे ही श्वेता भेटली होती! त्याचबरोबर आणखीन एक प्रश्नं माझ्यापुढे उभा राहीला तो म्हणजे माझी मुलगी रोशनी नक्की कुठे आहे? कोणत्या परिस्थितीत आहे? सिमल्यातच आहे का आणखीन दुसरीकडे?

रोशनीच्या नावाने वावरणार्‍या श्वेताला बोलतं करण्यासाठी माझे हात शिवशिवत होते. अर्थात घरात तसं करणं शक्यंच नव्हतं म्हणूनच एका ड्रायव्हरला हाताशी धरुन बोगस नावाने मी वडाळ्याच्या त्या गोडाऊनमध्ये तिच्या स्टोरेज रुमशेजारची रुम मिळवली! माझ्याकडून सर्व तयारी पूर्ण झाली होती, पण नेमक्या त्याच वेळेस अगदी अनएक्सपेक्टेडली स्टेट्सवरुन परत येताना शेखर आणि चारू मुंबईला आल्यामुळे मला माझी योजना पुढे ढकलावी लागली! चारुच्या बोलण्यात बॅट्रॅकटॉक्सिनचा उल्लेख आल्यावर श्वेता खूप एक्साईट झाली होती! तिने चारुला त्याबद्दल अगदी बारीकसारीक प्रश्नं विचारुन इतकी इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्नं चालवला होता की माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली! तिने चारुकडे इतक्या खोदून खोदून चौकशी करण्याचा माझ्या दृष्टीने एकच अर्थ निघत होता! रेशमी आणि माझ्यावर त्या पॉयझनचा उपयोग करण्याचा प्लॅन तिच्या डोक्यात होता! त्याचवेळी आपणही ते पॉयझन वापरु शकतो ही कल्पना माझ्या डोक्यात आली! शेखर, चारु, रेशमी आणि श्वेता बाहेर गेलेले असताना मी अगदी काही ड्रॉप्स पॉयझन बेमालूमपणे काढून घेतलं! नॉट ओन्ली दॅट, श्वेताच्या हाती ते लागू नये म्हणून शेखर आणि चारु बँगलोरला जाण्याच्या दिवसापर्यंत ऑफीसमध्ये न जाता घरीच राहण्याचा मी निर्णय घेतला!

शेखर आणि चारु बँगलोरला जाणार होते त्याच दिवशी रेशमी तिच्या फ्रेंड्सबरोबर मढ आयलंडला जाणार असल्याची मला कल्पना होती. त्याच रात्री श्वेताला गोडाऊनमध्ये गाठून जाब विचारण्याचा मी प्लॅन बनवला आणि बिझनेस मिटींगच्या निमित्ताने डेलिब्रेटली पुण्याला निघून गेलो! दुपारी रेशमीला फोन करुन ती मढ आयलंडला गेल्याची मी खात्री करुन घेतली. संध्याकाळी सहाच्या सुमाराला मी हॉटेलवर चेक-इन केलं, बरोबर नेलेली बॅग आणि माझा मोबाईल रुममध्येच ठेवला आणि रुमच्या दारावर 'डू नॉट डिस्टर्ब'चा टॅग लावून हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये शिरलो आणि तिथून अगदी सहजपणे बाहेर निघून गेलो! कार हॉटेलच्या पार्कींगला तशीच राहू दिली आणि टॅक्सीने लोणावळा गाठलं! टॅक्सीवाल्याकडूनच पैशांच्या मोबदल्यात मी कार हायर करुन घेतली आणि रात्री अकराच्या सुमाराला मी गोडाऊनवर पोहोचलो. श्वेता आणि रुपेश बाहेर पडत असलेले माझ्या नजरेस पडले! अर्थात तिथे पोहोचण्यापूर्वी मी माझा वेश पूर्णपणे बदलला होता, त्यामुळे श्वेता मला ओळखणं शक्यंच नव्हतं! मी गोडाऊनच्या बाहेर माझी कार पार्क केली आणि पंधरा - वीस मिनिटांनी तिथे असलेल्या कॉईनबॉक्सवरुन श्वेताला फोनवर धमकावून तिला एकटीलाच पुन्हा गोडाऊनमध्ये येण्यास फर्मावलं. अर्थात ती एकटीच परत न येता रुपेशलाही बरोबर आणण्याची शक्यता नाकारता येत नव्हती! पावणेबाराच्या सुमाराला ती घाईघाईने परत आल्याचं मी पाहीलं होतं, पण तरीही न जाणो रुपेश लपून बसला असल्याची शक्यता ध्यानात घेत मी सुमारे अर्धा तास वाट पाहिली आणि कोणताही धोका नाही याची पूर्ण खात्री केल्यावर मी तिच्या रुममध्ये घुसलो! माझ्याकडे असलेलं लायसन्स रिव्हॉल्वर मी बरोबर घेतलं होतं. त्याचबरोबर पॉयझन असलेली एक लहानशी इंजेक्शन सिरींजही माझ्याकडे होती!

स्टोरेज रुममध्ये ध्यानीमनी नसताना अचानक मला समोर पाहून श्वेताला चांगलाच शॉक बसला! अर्थात ती पक्की बनेल आणि मुरलेली क्रिमीनल असल्याने मी अ‍ॅलर्ट होतो. तिला गनपॉईंटवर ठेवत मी तिचा सगळा गुन्हेगारी इतिहास तिच्यापुढे मांडला आणि रोशनीची चौकशी केली. सुरवातीला थातूर-मातूर उत्तरं देत आणि इमोशनल ब्लॅकमेल करत तिने मला घोळात घेण्याचा बराच प्रयत्नं केला, पण मी तिच्याकडे साफ दुर्लक्षं केलं! तिने गडबड केली आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नं केला तर मी तिला गोळी घालेन याची मी तिला स्पष्टं शब्दात जाणिव करुन दिली पण तरीही ती बधली नाही! मात्रं माझ्याकडे पॉयझनने भरलेली सिरींज पाहिल्यावर मात्रं तिचं अवसान गळून पडलं आणि अखेर तिने तोंड उघडलं! हा सगळा कट जवाहरने रचला होता आणि त्याप्रमाणे तिने आणि रुपेश उर्फ अखिलेशने रोशनीचा खून केल्याचं तिने कबूल केलं!

रोशनीचा खून झाल्याचं तिच्या तोंडून ऐकल्यावर माझी काय अवस्था झाली असेल याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही मि. प्रधान! त्याच क्षणी त्या तिघांनाही खलास करण्याचा मी निश्चय केला! त्या परिस्थितीतही शक्यं तितकं डोकं शांत ठेवत श्वेताच्या तोंडून मी रोशनीच्या मृत्यूची पूर्ण हकीकत वदवून घेतली. इतकंच नव्हे तर मुंबईला आल्यानंतरही सुरवातीला माझ्याशी आणि रेशमीशी फटकून वागण्याचं आणि नंतर प्रेमाचं नाटक केल्याचंही तिने कबूल केलं. रेशमीला झालेलं फूड पॉयझनिंग हा देखिल जवाहरच्याच प्लॅनचा एक भाग होता. इट वॉज अ प्लॅन टू मर्डर रेशमी! केवळ नशीब म्हणूनच ती वाचली होती! पण या सिच्युएशनचाही श्वेताने रेशमीच्या आणखीन जवळ जाण्यासाठी उपयोग करुन घेतला!"

रोहितने कदम आणि देशपांडेंकडे एक अर्थपूर्ण कटाक्षं टाकला! रेशमीला झालेलं फूड पॉयझनिंग हा तिच्या हत्येचा प्रयत्नं असू शकतो हा त्याचा अंदाज अगदी अचूक निघाला होता!

"जवाहरने श्वेता आणि अखिलेशमार्फत रोशनीचा खून करवला होता आणि त्या दोघांमार्फतच रेशमी आणि माझाही काटा काढण्याचा त्याचा इरादा होता! आम्हाला दोघांना मार्गातून हटवल्यावर माझी सर्व प्रॉपर्टी आणि बिझनेसवर श्वेताचा पर्यायाने जवाहरचा कब्जा होणार होता हे उघड होतं! श्वेताकडून हे सर्व वदवून घेतल्यावर तर त्या तिघांनाही खलास करण्याचा माझा निश्चय आणखीनच पक्का झाला! पण ते तितकंसं सोपं नाही याची मला कल्पना होती. कितीही झालं तरी श्वेता निर्ढावलेली गुन्हेगार होती आणि स्वत:च्या प्राणावर बेतल्यावर ती निकराचा प्रतिकार करणार हे उघड होतं! तिला बेसावध गाठणंच माझ्यादृष्टीने सोईचं ठरणार होतं. तिने केवळ भरपूर पैशाच्या लालसेने जवाहरला साथ दिली होती. जवाहरविरुद्ध तिने मला साथ दिल्यास त्यापेक्षा दुप्पट पैसे देण्याची ऑफर देताच ती त्याला डबलक्रॉस करण्यास एका पायावर तयार झाली! याबद्दल अगदी अखिलेशजवळही कोणतीही वाच्यता न करण्याचं तिला बजावल्यावर मी तिला तिथून जाण्याची परवानगी दिली! आपली सुटका झाल्याच्या आनंदात निर्धास्तपणे ती रुमच्या दाराकडे निघाली असतानाच मी पॉयझनने भरलेली सिरींज तिच्या मानेत खुपसली! तिला कोणताही प्रतिकार करण्याची मी संधीच दिली नाही! जेमतेम मिनिटभरातच तिचा खेळ आटपला!

श्वेताला खलास केल्यावर मी रुमच्या दारापाशी आलो आणि बाहेर कोणी नाही याची खात्री पटताच शेजारी असलेल्या माझ्या रुममधून मीच तिथे ठेवलेली रिकामी सूटकेस आणली. तिची डेडबॉडी कशीबशी त्या सूटकेसमध्ये कोंबून मी रुमबाहेर पडलो. गोडाऊनमध्ये सूटकेस ठेवल्याची माझ्याकडे रिसीट असल्याने बाहेर पडताना काहीच अडचण आली नाही! सुरवातीला खंडाळ्याच्या घाटात बॉडी डिस्पोज ऑफ करण्याचा माझा विचार होता, पण तसं केल्यास त्याच दिवशी मी पुण्याला गेलो असल्याने पोलीसांचा संशय सरळ माझ्यावरच आला असता! ते टाळण्यासाठी मी वरळी सी फेसवर आलो आणि तिथे श्वेताची डेडबॉडी टाकून दिली. त्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने कल्याण बायपास रोडपर्यंत जात मी श्वेताच्या मोबाईलवरुन रेशमी आणि माझ्या स्वत:च्या नंबरवर रुपेशबरोबर सेल्वासला जात असल्याचा मेसेज पाठवला आणि तिचा फोन स्विच्ड ऑफ करुन पहाटे पाचच्या सुमाराला लोणावळा गाठलं. तिथल्या कार सेंटरच्या पार्कींग लॉटमध्ये मी कार पार्क केली, चावी इग्निशनमध्येच ठेवली आणि टॅक्सीने पुण्याला आलो! सकाळी सातच्या सुमाराला मॉर्निंग वॉकवरुन परत येत असल्याच्या अविर्भावात मी हॉटेलमध्ये शिरलो!"

शेखर, चारु आणि रेशमी विमनस्क झाले होते. वर्माही चांगलेच अस्वस्थ झाले होते. रोशनीची हत्या करुन श्वेताने तिची जागा घेतल्याच्या धक्क्यातून अद्यापही कोणी सावरलेलं नव्हतं आणि त्यात द्विवेदींनी योजनाबद्ध रितीने श्वेताला बोलतं करुन मग तिचा खून केल्याचं स्पष्टं झाल्यावर सर्वांना अधिकच हादरा बसला होता. द्विवेदींनी आपल्याकडचं बॅट्रॅकटॉक्सिन चोरल्याचं लक्षात आल्यावर चारु तर अक्षरश: सुन्न झाली होती. तिला पुन्हा पुन्हा डॉ. मालशेंचे शब्द आठवत होते. बॅट्रॅकटॉक्सिनसारखं डेडली डेंजरस पॉयझन भलत्याच व्यक्तीच्या हाती पडलं तर त्याचे भयानक परिणाम होतील अशी भीती त्यांनी व्यक्तं केली होती ती नेमकी खरी ठरली होती!

"तुम्ही शाकीब जमालपर्यंत कसे पोहोचलात?" रोहितने शांतपणे विचारलं.

"श्वेताच्या मृत्यूच्या संदर्भात स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलो होतो त्यावेळेस पोस्टमॉर्टेममध्ये तिचा मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळे झाल्याचं पोलीसांकडूनच समजलं होतं! त्यामुळेच श्वेताप्रमाणेच जवाहर आणि अखिलेशचा खून करण्यासाठी ते पॉयझन वापरण्याचा मी निश्चय केला आणि या कामासाठी सुपारी देण्याचं ठरवलं! आता प्रश्नं होता तो म्हणजे ज्या कोणा व्यक्तीला मी सुपारी देणार होतो, तो ते पॉयझन वापरुन त्यांचे खून कसे करु शकतो? त्या पॉयझनबद्दल इंटरनेटवर मी थोडीफार माहिती वाचली होती. त्यात कोणत्या तरी आदिवासी जमातीच्या ब्लो पाईपचा उल्लेख आला होता. ते आठवल्यावर ब्लो पाईपऐवजी नीडल फायर करणार्‍या गन्स बनवून घेण्याची माझ्या डोकयत कल्पना आली! इम्पोर्ट - एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये असल्याने नाईलाजाने का होईना, पण एका लिमिटपर्यंत दोन नंबरचे धंदे करणार्‍यांशी माझे थोडेफार संबंध होते. त्यांच्याकडे अशा प्रकारची गन बनवण्यासाठी मी चौकशी केली तेव्हा त्यांच्यापैकी एकाच्या कलकत्त्याच्या कॉन्टॅक्टने माझं शाकीबशी बोलणं करुन दिलं. सुरवातीला त्याने खूप आढेवेढे घेतले, पण मी पैशाच्या बाबतीत हात सैल सोडल्यावर अखेर तो तयार झाला! डील फायनल होताच हवालामार्फत मी कलकत्त्याच्या त्या माणसाला अ‍ॅडव्हान्स पैसे पाठवले. दोन - तीन दिवसांनी कलकत्त्याला पोहोचल्यावर मी त्याला फोन केला तेव्हा गन्स तयार असल्याचं त्याच्याकडून समजलं. मी उरलेले पैसे कलकत्त्याच्या त्या माणसाच्या हातात दिले आणि त्या गन्स ताब्यात घेण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे त्याने एका बंगाली मुलीमार्फत डमडम स्टेशनवर त्या गन्स ताब्यात घेतल्या. त्या गन्स हाती येताच त्यातल्या नीडल्सना बॅट्रॅकटॉक्सिन लावल्यावर मी पुन्हा त्या गन्स त्याच्या ताब्यात दिल्या आणि अर्जंट कुरीयरने दिल्लीला अल्ताफ कुरेशीच्या पत्त्यावर पाठवून देण्यास बजावलं. दिल्लीतल्या एका मध्यस्थामार्फत मी अल्ताफला जवाहर आणि अखिलेशचा खून करण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिली होती आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून दोन लाख पाठवले होते. अल्ताफने त्या दोघांचा खून केला, पण त्याच्या मूर्खपणामुळे एक नीडल पोलीसांच्या हाती लागली आणि त्यामुळे बॅट्रॅकटॉक्सिनचा ट्रेस लागला!"

"शाकीबकडून तुम्ही बनवून घेतलेल्या गन्सपैकी हीच एक गन ना द्विवेदी?"

जवाहरच्या बंगल्याच्या बागेत मिळालेलं ते लहानसं रिव्हॉल्वर रोहितने द्विवेदींसमोर ठेवलं. ते रिव्हॉल्वर पाहताच द्विवेदींचे डोळे एकदम विस्फारले! रोहितने कोणताही धागा मोकळा सोडलेला नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आली.

"मि. मुखर्जी, तुम्ही मार्च महिन्याच्या सुरवातीला सिमल्याला गेला होता?" रोहितने अचानक मुखर्जींवर नजर रोखत विचारलं.

"आमी...." त्याच्या अनपेक्षित प्रश्नाने मुखर्जी एकदम गडबडले, "ना प्रोधानबाबू! आमी ना!"

"मि. मुखर्जी, १ मार्चच्या दिवशी तुम्ही रोशनीच्या कॉलेजवर गेला होतात?"

"आमी? ना! मी कशाला तिथे जाणार? माझा काय संबंध तिच्याशी?"

"वेल मि. मुखर्जी, तुम्ही रोशनीच्या कॉलेजमध्ये गेलात आणि आपण मिसेस द्विवेदींचे बंधू आणि रोशनीचे मामा असल्याचा दावा करुन तिला आपल्याबरोबर चलण्याचा आग्रह केलात! रोशनीने तुम्हाला दाद दिली नाही तेव्हा तुम्ही तिथे बराच तमाशाही केलात, पण अखेर कॉलेजच्या सिक्युरीटीने तुम्हाला बाहेर काढलं! त्यानंतर तिच्या मागावर तुम्ही तिच्या हॉस्टेलवरही पोहोचलात, पण रोशनीने पुन्हा तुम्हाला झिडकारल्यावर 'तुझ्या बापाला पाहून घेईन' अशी धमकी देत तुम्ही तिथून निघून गेलात! डू यू रिमेंबर नाऊ?"

"ए मिथ्या (हे खोटं आहे) प्रोधानबाबू!" मुखर्जी कसेबसे सावरत म्हणाले, "मी कधीही सिमल्याला गेलेलो नाही!"

रोहितने एक शब्दही न बोलता देशपांडेना खूण केली तशी त्या इन्क्वायरी रुममधून बाहेर पडल्या आणि मिनिटभरातच रेक्टर बहुगुणाबाईंसह परतल्या. बहुगुणाबाईंना तिथे पाहून मुखर्जी एकदम दचकले!

"येस मि. प्रधान! हाच माणूस आमच्या हॉस्टेलवर आला होता!" बहुगुणाबाई मुखर्जींकडे निर्देश करत म्हणाल्या, "रोशनीला आपल्याबरोबर नेणासाठी तो हट्टालाच पेटला होता, पण ती ऐकत नाही असं म्हटल्यावर तो तणतणत निघून गेला!"

"ए मिथ्या! बिशुद्धो मिथ्या!" मुखर्जी रागाने म्हणाले, "ही बाई खोटं बोलते आहे! मी कधीही सिमल्याला गेलेलो नाही!"

रोहितने काही न बोलता खत्रींकडे कटाक्षं टाकला. खत्रींनी आपल्या खिशातून एक पेपर बाहेर काढला.

"ही सिमल्याच्या महाराजा हॉटेलच्या रजिस्टरची झेरॉक्स आहे!" रोहितच्या हाती तो पेपर देत खत्री म्हणाले, "१ आणि २ मार्च हे दोन दिवस मुखर्जी इथे राहिल्याची नोंद आहे! हॉटेलच्या रेकॉर्ड्समधून त्यांच्या पॅन कार्डची ही झेरॉक्सही मिळालेली आहे!"

मुखर्जी हवालदील झाले. आता लपवालपवी करण्यात काहीच अर्थ नाही याची त्यांना कल्पना आली.

"हो मी गेलो होतो सिमल्याला! या हलकट माणसामुळेच मला तसं करणं भाग पडलं होतं!" द्विवेदींकडे निर्देश करत मुखर्जी दात ओठ खात म्हणाले, "माझ्या बहिणीला फूस लावून तिच्याशी लग्नं केलं, आमच्यावर केस केली आणि आता चित्राच्या मृत्यूनंतरही माझा पिच्छा सोडत नव्हता! हजारवेळा सभ्यपणे समजावून सांगूनही तो ऐकत नाही हे म्हटल्यावर शेवटी मी अखेरचा मार्ग पत्करला. याची स्वत:ची मुलगी सिमल्याला असल्याचं मला माहीत होतं. सिमल्याहून तिला कलकत्त्याला आपल्या घरी न्यावं आणि मग याला केस काढून घेण्यास भाग पाडावं असा माझा विचार होता! पण ती बापाच्या वरताण हट्टी होती! शेवटपर्यंत ती माझ्याबरोबर आलीच नाही!"

"मुखर्जी, तुम्ही मला मूर्ख समजता काय?"

रोहितने शांतपणे विचारलं तसे मुखर्जी त्याच्याकडे पाहतच राहिले!

"रोशनीच्या हत्येच्या कटात जवाहर कौलबरोबर तुम्हीसुद्धा सामिल होता मुखर्जी! कोर्टात सुरु असलेल्या केसमध्ये आपला पराभव होणार याची कल्पना आल्यावर तुम्ही द्विवेदींचा शत्रू म्हणून जवाहर कौलशी संपर्क साधलात आणि दिल्लीला जावून त्याची गाठ घेतलीत! त्याने रोशनीची हत्या करण्याचा प्लॅन तुमच्यासमोर मांडल्यावर तुम्ही त्याला मदत करण्यासाठी एका पायावर तयार झालात! रोशनीचे मामा म्हणून तुम्ही तिला हॉस्टेलवरुन पिकअप करुन सिमल्यातून बाहेर काढावं आणि अखिलेशने तिचा खून केल्यावर श्वेताने तिची जागा घ्यावी असा जवाहरचा ओरीजनल प्लॅन होता! रोशनीने तुमच्याबरोबर येण्यास साफ नकार दिल्यावर तुम्ही दिल्लीला परत येऊन जवाहरची गाठ घेतलीत! त्यानंतर अखिलेश आणि श्वेता सिमल्याला आले आणि व्यवस्थित नाटक करुन त्यांनी रोशनीचा विश्वास संपादन केला अ‍ॅन्ड द रेस्ट इज हिस्ट्री! २६ मार्चच्या दिवशी त्या दोघांनी रोशनीला हॉस्टेलवरुन पिकअप केलं तेव्हा त्या रात्री ते सिमल्याल्या ज्या हॉटेलमध्ये राहिले होते, त्याच हॉटेलमध्ये तुम्हीदेखिल राहीलेले होतात आणि जवाहरच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये होतात! अखिलेश आणि श्वेता रोशनीसह मंडीला आले तेव्हा त्यांच्या पाठोपाठ तुम्हीदेखिल मंडी गाठलंत! रोशनीच्या हत्येनंतर तुम्ही दिल्लीला परत येऊन जवाहर कौलला भेटलात आणि मग कलकत्त्याला निघून गेलात! तुमच्या सिमला आणि मंडी इथल्या हॉटेलच्या रजिस्टरमधल्या बुकींग आणि चेक-इन डिटेल्सची कॉपी इथे माझ्या समोर आहे. नॉट ओन्ली दॅट, तुमच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन रेकॉर्ड्सही आमच्याकडे आहेत! ऑल धिस इज गुड इनफ टू प्रूव्ह युवर गिल्ट इन धिस कॉन्स्पिरसी फेअर अ‍ॅन्ड स्क्वेअर!"

मुखर्जी समूळ हादरले होते! काय बोलावं हेच त्यांना समजत नव्हतं! इतक्या पद्धतशीरपणे आणि खोलवर तपास करुन पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती!

"दॅट रिमाइंड्स मी ऑफ समथिंग! द्विवेदी, तुम्ही प्रॉपर्टी क्लेमसाठी मुखर्जींवर केलेली केस विड्रॉ का केलीत?" रोहितने अगदी सहजपणे प्रश्नं केला, "जवळपास अठरा वर्षांनी एकदम अचानकपणे केस मागे घेण्यासारखं नेमकं काय घडलं?"

द्विवेदी क्षणभर काहीच बोलले नाहीत. रोहितने हा प्रश्नं विचारण्यामागे निश्चितच काहीतरी कारण आहे याची त्यांना कल्पना आली होती. पण नेमकं काय? त्याची धारदार नजर त्यांच्यावर रोखलेली होती. ते त्याच्या नजरेला नजर देत त्याने हा प्रश्नं विचारण्यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्नं करत होते. अर्थात नजरेच्या खेळात रोहित आपलं बारसं जेवलेला आहे याची त्यांना कल्पना नव्हती!

"आय वॉज फेड अप विथ धिस मॅन मि. प्रधान!" मुखर्जींकडे बोट दाखवत द्विवेदी म्हणाले, "मुळात चित्राने केस केली तेव्हाही मी तिला समजावण्याचा आणि त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नं केला होता. केवळ तिच्या इच्छेखातर गेली अठरा वर्ष मी ही केस पुढे चालू ठेवली होती, बट आय हॅड इनफ ऑफ इट नाऊ! त्यातच रोशनीचा मृत्यू झाल्याचं कळल्यावर तर मला कसलीच इच्छा उरली नाही! माझ्यापाशी जो काही थोडाफार पैसा होता तो रेशमी आणि शेखरसाठी पुरेसा होता, त्यामुळे मी केस काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे तो अंमलात आणला!"

"बस्सं? एवढंच कारण आहे? एनी अदर रिझन?"

"ऑफकोर्स मि. प्रधान! नो अदर रिझन!" द्विवेदी सावकाशपणे म्हणाले.

"अच्छा? मुखर्जी, काही दिवसांपूर्वी मी कलकत्त्याला आलो असताना तुम्हाला भेटलो होतो, त्यावेळेस या केसचा विषय निघाला असता, अ‍ॅज पर लॉ, तुम्हाला रेशमीला तिचा शेअर द्यावाच लागेल याची मी तुम्हाला कल्पना दिली होती! त्यावेळेस तुम्ही म्हणालात की तुम्हाला प्रॉपर्टीचा शेअर देण्याची वेळच येणार नाही! डू यू रिमेंबर? नाऊ टेल मी, द्विवेदींनी केस विड्रॉ करण्यापूर्वीच तुम्ही हे इतक्या कॉन्फीडंटली मला कसं सांगितलंत?"

"आमी जानी ना प्रोधानबाबू!" मुखर्जी कसेबसे उत्तरले, "मी अगदी सहजपणे तसं म्हटलं होतं!"

"नाही मुखर्जी! इतकं सोपं नाही ते! मी कलकत्त्याला येण्यापूर्वीच तुम्ही द्विवेदींना फोन केलात आणि त्यांना केस विड्रॉ करण्यासाठी धमकावलंत! नुसत्या धमकीवर न थांबता तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरवात केलीत! इंट्रेस्टींगली, अठरा वर्षांत अथक प्रयत्नं करुनही तुम्हाला दाद न देणार्‍या द्विवेदींनी नुसत्या एका फोनवर केस काढून घेण्याचं मान्यं केलं आणि त्याप्रमाणे केस काढून घेतलीही! नाऊ द सिंपल क्वेश्चन इज, फोनवर नेमकं असं काय बोलणं झालं ज्यामुळे द्विवेदींना केस विड्रॉ करण्याची उपरती झाली?"

द्विवेदी अक्षरश: भूत दिसल्यासारखे डोळे विस्फारुन त्याच्याकडे पाहत होते! मुखर्जींचीही अवस्था त्यांचासारखीच झाली होती. दोघांच्याही तोंडून शब्दंही फुटत नव्हता! रोहितची नजर आळीपाळीने द्विवेदी आणि मुखर्जींच्या चेहर्‍यावरुन फिरत होती. दोघांचेही भयचकीत झालेले चेहरे पाहूनच आपला बाण अचूक वर्मी लागल्याची त्याची खात्री पटली!

"ऑलराईट! मी सांगतो...."

रोहित इतक्या सहजपणे उद्गारला की कोहली, खत्री आणि घटक यांच्यासह सर्वजण आश्चर्याने आणि त्यापेक्षाही उत्सुकतेने त्याच्याकडे पाहतच राहिले! आता आणखीन काय बाकी राहिलं आहे?

"सिमल्याच्या कॉलेजमध्ये शिकणारी आणि रोशनी द्विवेदी या नावाने हॉस्टेलमध्ये राहणारी मुलगी, ज्या मुलीचा जवाहर कौलच्या प्लॅनप्रमाणे अखिलेश आणि श्वेता यांनी मंडी इथे खून केला, ती महेंद्रप्रताप द्विवेदींची मुलगी रोशनी नव्हती!"

रोहितचं हे विधान इतकं स्फोटक होतं की द्विवेदी ताड्कन उभे राहिले! रोहित शांतपणे त्यांच्याकडे पाहत होता. द्विवेदींच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर पालटत होते. एका क्षणी तर खुनशीपणाची झलकही त्यांच्या नजरेत चमकून गेली! आपण सीआयडी हेडक्वार्टर्समध्ये आहोत याचं भान आल्यावर उठले होते तसेच खाली बसले. मुखर्जींचीही फारशी वेगळी अवस्था नव्हती! रेक्टर बहुगुणाबाई तर आ SS वासून रोहितकडे पाहत होत्या! कोहली, खत्री आणि घटकनाही तो शॉक होता! शेखर, चारु, रेशमी आणि वर्मा यांना इन्क्वायरी रुममध्ये आल्यापासून एकापाठोपाठ एक धक्केच बसत होते, त्यात आणखीन भर पडली होती!

"व्हॉट नॉन्सेन्स इज धिस मि. प्रधान?" द्विवेदी रागाने थरथरत म्हणाले, "श्वेता आणि अखिलेशने रोशनीचा खून केला होता असं खुद्दं श्वेताने त्या गोडाऊनमध्ये माझ्यासमोर कन्फेस केलं होतं! रोशनीच्या मृत्यूची शिक्षा म्हणून मी त्या दोघांना आणि जवाहरला संपवलं आणि आता तुम्ही म्हणता ती रोशनी नव्हतीच? आय कॅन नॉट अ‍ॅक्सेप्ट धिस एनीमोर! आमच्या इमोशन्सशी खेळण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही!"

प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर एक रिपोर्ट झळकला.

"हा एक डीएनए रिपोर्ट आहे! हिमाचल प्रदेश पोलीसांना मंडी इथे सापडलेल्या स्केलेटनचा आणि द्विवेदींचा डीएनए पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे! त्या स्केलेटनचं डीएनए सँपल आणि द्विवेदींचं डीएनए सँपल यांच्यावर करण्यात अलेली पॅटर्निटी टेस्ट पूर्णपणे निगेटीव्ह आहे! नॉट ओन्ली दॅट, इव्हन फॅमिली ट्री टेस्टही निगेटीव्हच आली आहे! साध्या शब्दांत सांगायचं तर तो स्केलेटन आणि द्विवेदी यांच्यात कोणत्याही प्रकारचं ब्लड रिलेशन आढळून आलेलं नाही! तो स्केलेटन द्विवेदींच्या मुलीचा - रोशनीचा असणं शक्यंच नाही!" रोहित ठामपणे म्हणाला.

"मि. प्रधान," बहुगुणाबाई गोंधळून गेल्या होत्या, "सात वर्ष माझ्या हॉस्टेलमध्ये रोशनी द्विवेदी या नावाने राहणारी मुलगी खरी रोशनी नव्हतीच? ज्या मुलीला भेटण्यासाठी मिसेस द्विवेदी दिल्लीवरुन सिमल्याला येत होत्या, ती त्यांची स्वत:ची मुलगीच नव्हती? आणि हे त्यांना कधी कळलं नाही? का त्यांना माहीत होतं? आणि जर त्यांना याची कल्पना होती तर कळूनसवरुन स्वत:ची मुलगी म्हणून तिला भेटण्यासाठी त्या दरवर्षी येत होत्या? आय... आय अ‍ॅम लॉस्ट फॉर वर्ड्स!"

"सरजी, तो स्केलेटन रोशनीचा नव्हता तर मग कोणाचा होता?" कोहलींनी बुचकळ्यात पडत विचारलं.

"रोहितबाबू, ती रोशनी नसेल तर मग आता रोशनी कुठे आहे?" घटकनी सगळ्यांच्याच मनातला प्रश्नं नेमका विचारला.

"एव्हरीबडी, प्लीज हॅव सम पेशन्स! तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथेच मिळणार आहे! आधी मंडीला सापडलेल्या या स्केलेटनला धक्क्याला लावू दे!" रोहित मिस्कीलपणे म्हणाला आणि त्याने प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर आणखीन एक रिपोर्ट ओपन केला. "तो स्केलेटन रोशनीचा नाही आणि द्विवेदींशी त्याचा काही संबंध नाही हे क्लीअर झालंच आहे, पण तो स्केलेटन पूर्णपणे बेवारसही नाही! स्केलेटनच्या मालकिणीचं - त्या दुर्दैवी तरुणीचं ब्लड रिलेशन एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि ती नेमकी कोण होती हे सिद्धं करण्यासाठी तेवढं पुरेसं आहे!"

बोलताबोलता रोहित मध्येच थांबला आणि त्याने मुखर्जींकडे कटाक्षं टाकला. मुखर्जींनी त्याची नजर चुकवली!

"मंडी इथे सापडलेल्या त्या स्केलेटनचा डीएनए मुखर्जींच्या डीएनएशी मॅच झाला आहे! धिस इज नॉट अ फादर - डॉटर रिलेशनशीप, पण या दोघांच्या सँपल्सवर केलेली फॅमिली ट्री टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे! तो स्केलेटन ज्या मुलीचा होता ती मुलगी आणि मुखर्जी यांच्यात ब्लड रिलेशन्स होते हे सिद्धं झालं आहे! इन सिंपल वर्ड्स, अखिलेश आणि श्वेता यांनी मंडी इथे ज्या मुलीची हत्या केली ती मुलगी मुखर्जींची भाची आणि चित्रलेखाची मुलगी होती! रेशमी!"

सर्वजण अक्षरश: थक्कं होत रोहितकडे पाहत राहिले! काय बोलावं हेच कोणाला समजत नव्हतं!
सिमल्याच्या कॉलेजच्या रजिस्टरमध्ये आणि सगळ्या रेकॉर्डवर रोशनी द्विवेदी असंच तिचं नाव होतं!
रेक्टर बहुगुणा सात वर्षांपासून तिला रोशनी म्हणून ओळखत होत्या!
खुद्दं मेघना द्विवेदी आपली मुलगी म्हणून तिला भेटण्यासाठी दरवर्षी सिमल्याला येत होती!
अखिलेश आणि श्वेता यांनी रोशनी द्विवेदी म्हणूनच तिला हॉस्टेलमधून पिकअप केलं होतं आणि तिचा खून केला होता!
पण....
डीएनए रिपोर्टप्रमाणे ती रोशनी नसून चित्रलेखाची मुलगी आणि मुखर्जींची भाची होती?
रेशमी ??

"ती बिभूतीबाबूंची भाची होती?" घटकबाबूंनी कसंबसं विचारलं, "चित्रलेखाची मुलगी?"

उत्तरादाखल रोहितने कोलाज केलेले तीन फोटो प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर झळकवले! इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेला प्रत्येकजण डोळे विस्फारुन ते तीन फोटो पाहत होता! बँगलोरहून परत आल्यावर रोहितने कदम, देशपांडे आणि नाईकनी ते फोटो दाखवले होते तेव्हा त्यांची एक्झॅक्टली तीच अवस्था झाली होती!

"यू कॅन सी इट फॉर युवरसेल्फ! या तीनही फोटोंमधल्या व्यक्तींचे फीचर्स, स्पेसिफीकली फेशियल फीचर्स एकच फॅमिली ट्रेट दर्शवतात! सिमल्याला कॉलेजच्या रेकॉर्डवरचा रोशनीचा फोटो पाहताच मला ही शंका आली होती! तिचा फोटो पाहताच द्विवेदींच्या घरी पाहिलेल्या चित्रलेखाच्या फोटोची मला आठवण झाली! दोघींमध्ये जाणवण्याइतकं साम्यं होतं! कलकत्त्याला मुखर्जींना भेटल्यावर तर माझी जवळपास खात्रीच पटली! त्यामुळेच तिचा डीएनए द्विवेदींशी मॅच झाला नसल्याचं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही! आय अ‍ॅम शुअर, सिमल्याला रेशमीला पाहिल्याबरोबर मुखर्जींनी तिला ओळखलं असणार! राईट मुखर्जी?"

"मी.... तिला पाहताक्षणीच ती चित्राची मुलगी आहे हे मी ओळखलं होतं!" मुखर्जींना खरं बोलण्यावाचून पर्याय नव्हता!

"जवाहरने ज्या मुलीच्या खुनाचा प्लॅन आखला आहे ती आपली भाची आहे हे ओळखल्यानंतरही मुखर्जींनी ही गोष्टं त्याच्यापासून लपवून ठेवली! जवाहरशी झालेल्या डीलप्रमाणे द्विवेदींच्या संपत्तीतलाही काही शेअर त्यांना मिळणार होता, पण कोणावरही विश्वास न ठेवणार्‍या मुखर्जीना जवाहरचा तर बिलकूल भरोसा नव्हता! उलट या सगळ्या प्रकरणात तो आपल्यालाच अडकवण्याचीच शक्यता त्यांनी गृहीत धरली होती! रोशनी म्हणून श्वेता मुंबईला गेल्यावर मुखर्जीनी ताबडतोब कोणतीही हालचाल केली नाही! चार महिने उलटल्यावर एक दिवस द्विवेदीना फोन करुन श्वेता आणि अखिलेशपासून जपून राहण्याचं बजावत त्यानी जवाहरलाच डबलक्रॉस केलं!"

"द्विवेदींना श्वेताबद्दल निनावी फोन बिभूतीबाबूंनी केला होता?" घटकबाबू आश्चर्याने थक्कं झाले.

"येस सर! तो निनावी फोन मुखर्जीनीच केला होता! श्वेता, जवाहर आणि अखिलेश तिघांचाही खून होईपर्यंत मुखर्जी गप्प बसले आणि कोणतेही धागेदोरे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत याची पूर्ण खात्री झाल्यावरच त्यांनी द्विवेदीना फोन करुन केस मागे घेण्यासाठी धमकावलं! सुरवातीला द्विवेदींनी नकार दिला, पण रेशमीच्या मृत्यूचा मुखर्जीनी उल्लेख करताच द्विवेदींची बोलती बंद झाली आणि त्यांनी गुपचूप केस काढून घेतली!"

इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेला प्रत्येकजण तिरस्काराने मुखर्जींकडे पाहत होता. मुखर्जींच्या चेहर्‍यावर प्रेतकळा पसरली होती. रोहितने आपल्याला पुरतं नामोहरम केल्याचं त्यांना कळून चुकलं होतं!

"सर, रोशनीच्या ऐवजी रेशमीचा खून झाला याचा अर्थ रोशनी अद्यापही जिवंत आहे?" चारुने सगळा धीर एकवटून विचारलं, "आणि ती जिवंत असेल तर ती आता कुठे आहे?"

"ती जर रेशमी होती तर मी.... " रेशमीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता, "मी कोण आहे? माझी आयडेंटीटी काय?"

"तुझी आयडेंटीटी...."

रोहितने वाक्यं अर्धवटच सोडलं आणि अगदी सहजच द्विवेदींकडे कटाक्षं टाकला. द्विवेदींचे डोळे घट्ट मिटलेले होते. इतर सर्वजण श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होते.

"रेशमी, जवाहर कौलने ज्या रोशनीचा खून करण्याचा प्लॅन आखला, अखिलेश आणि श्वेता यांनी त्या प्लॅनप्रमाणे रोशनी समजून रेशमीची हत्या केली आणि त्याच कारणामुळे द्विवेदींनी श्वेता, जवाहर आणि अखिलेश यांचा खून केला, ती दुसरी-तिसरी कोणी नसून तू स्वत:च आहेस! मेघना आणि महेंद्रप्रताप द्विवेदींची एकुलती एक मुलगी! रोशनी द्विवेदी!"

इन्क्वायरी रुममध्ये टाचणी पडली तरी आवाज झाला असता अशी शांतता पसरली होती!
आतापर्यंतचा प्रकार काहीच नाही इतका हा अकल्पित हादरा होता!
रेशमी हीच रोशनी आहे?
रोशनीचा खून केला म्हणून द्विवेदींनी श्वेता, जवाहर आणि अखिलेश यांचा जीव घेतला होता....
त्याचवेळेस रोशनी त्यांच्याच घरी रेशमी म्हणून राहत होती....
.... आणि हे स्वत: द्विवेदींना माहीत होतं?

"ही.... ही रोशनी आहे?" सर्वप्रथम वर्मा भानावर आले, "मेघनाची मुलगी रोशनी?"

प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर आणखीन एक रिपोर्ट झळकला.

"येस मि. वर्मा! ही रोशनीच आहे! अ‍ॅन्ड धिस इज अ डीएनए रिपोर्ट टू प्रूव्ह दॅट! हा रिपोर्ट तीन वेगवेगळ्या सँपल्सवर करण्यात आलेल्या टेस्ट्सचा आहे. द्विवेदी आणि रोशनी यांच्यातली फादर - डॉटर रिलेशनशीप पॅटर्निटी टेस्टने एस्टॅब्लीश झाली आहे! अ‍ॅट द सेम टाईम, मि. वर्मा, तुम्ही आणि रोशनी यांच्यातही ब्लड रिलेशन आहे हे फॅमिली ट्री टेस्टमुळे सिद्धं झालं आहे!"

वर्मा आळीपाळीने तो डीएनए रिपोर्ट आणि रेशमीकडे पाहत होते.

"एक कळलं नाही सर!" देशपांडेनी प्रथमच तोंड उघडलं, "द्विवेदींचा डिव्होर्स झाल्यावर रोशनीची कस्टडी मेघनाला मिळाली होती. मेघनाचे आई-वडील गेल्यावर तिने रोशनीला सिमल्याला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं, मग ती द्विवेदींकडे मुंबईला आणि तिच्याजागी रेशमी सिमल्याला ही अदलाबदल कशी झाली? हे मेघनाच्या लक्षात कसं आलं नाही? आणि लक्षात आलं असलंच तर ती त्याबद्दल गप्प का राहिली? नॉट ओन्ली गप्प राहिली, दरवर्षी रेशमीला भेटायला ती सिमल्याला का जात होती?"

रोहितच्या चेहर्‍यावर हलकीशी स्मितरेषा झळकून गेली. इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेल्या प्रत्येकालाच या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची उत्कंठा होती! रोहितची नजर द्विवेदींकडे गेली. द्विवेदींचा चेहर्‍यावर अगदी सर्वस्व लुटलं गेलेल्या माणसासारखे भाव उमटले होते. इतक्या वर्षांपासून अतिशय काळजीपूर्वक हे रहस्यं त्यांनी जपलं होतं, पण आता सगळंच संपलं होतं.

"या सर्व प्रश्नांची उत्तरं द्विवेदीच देतील!" रोहित शांतपणे म्हणाला, "इट्स टाईम नाऊ टू कम आऊट विथ द ट्रूथ द्विवेदी! लपवण्यासारखं आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही, सो प्लीज स्पीक अप नाऊ!"

द्विवेदींनी अभावितपणे रोशनीकडे पाहिलं. तिने आधारासाठी चारुचा हात घट्ट धरला होता! एकापाठोपाठ एक बसलेल्या धक्क्यांतून सावरायला तिला वेळच मिळाला नव्हता! अर्थात चारुचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती, पण रोशनीच्या मानाने ती आणि शेखर बरेच सावरले होते.

"मि. प्रधान, तुम्हाला मिळालेला डीएनए रिपोर्ट सेंट पर्सेंट सत्य आहे!" द्विवेदी म्हणाले, "ही माझी मुलगी रोशनीच आहे आणि इतके वर्ष ती लेखाची मुलगी रेशमी म्हणूनच मी तिला वागवत होतो! सुरवातीला तसं करण्यामागे काही स्पेसिफीक रिझन होतं. मेघना गेल्यावर रोशनीला त्याची कल्पना देण्याचं मी ठरवलं होतं, पण रोशनी म्हणून श्वेता मुंबईला पोहोचली आणि त्यानंतर जे काही झालं त्यामुळे अखेर हे सत्यं बाहेर पडलंच!

मेघनाशी माझा डिव्होर्स झाल्यावर मी मुंबईला आलो तेव्हा पूर्णपणे उध्वस्तं झालो होतो. त्यानंतर माझी लेखाशी भेट झाली आणि आम्ही लग्नं केलं. अनफॉर्च्युनेटली, आमच्या लग्नानंतर वर्षभरातच एअर क्रॅशमध्ये लेखा आणि माझे भाऊ - वहिनी मरण पावले. बिझनेसची आणि शेखर - रेशमीची जबाबदारी माझ्यावर एकट्यावर येऊन पडली. बहिणीच्या फ्यूनरलसाठी आलेल्या शेखरच्या मावशीने त्याला आपल्याबरोबर युकेला नेल्यावर मी आणि रेशमी दोघंच राहिलो. आणि त्याच वेळी अगदी अनपेक्षितपणे रोशनीशी पुन्हा माझी भेट झाली!

लेखा गेल्यावर सात - आठ महिन्यांनी एक दिवस मला दिल्लीहून फोन आला. फोनवर मेघना होती! त्या नतद्रष्टं जवाहरच्या नादाला लागून केलेल्या चुकीचा तिला आता पश्चात्ताप झाला होता! मेघना त्याच्याबरोबर राहत होती पण इतर बायकांबरोबर रंग उधळण्याचे त्याचे धंदे पूर्ववत सुरु झाले होते! त्याला मेघना आणि रोशनीपेक्षा माझ्याकडून दर महिन्याला त्यांना मिळणार्‍या पोटगीच्या रकमेशी फक्तं मतलब होता! फ्रँकली स्पीकींग, मेघनाची रडकथा ऐकण्यात मला काडीचाही इंट्रेस्ट नव्हता! तिच्याबद्द्ल मला कणाचीही सहानुभूती वाटत नव्हती. सगळं विसरुन मी तिला पुन्हा माझ्या घरात घेणं तर अशक्यंच होतं! तिला मी तसं स्पष्टं शब्दांत सुनावलं. अर्थात, तिलाही ते फारसं अनपेक्षित नव्हतं! तिने असं अचानकपणे मला कॉन्टॅक्ट करण्यामागचं कारण होतं ते म्हणजे रोशनी!

जवाहरच्या बाहेरख्यालीपणामुळे त्याचे आणि मेघनाचे सतत वाद-विवाद आणि भांडणं होत होती. त्यातच मेघनाला दारु पिण्याचंही व्यसन लागलं होतं. लहानग्या रोशनीवर याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून मेघनाने तिला आपल्या आई-वडीलांकडे ठेवलं होतं, पण तिने स्वत: मात्रं जवाहरचं घर काही सोडलं नाही. आई - वडीलांच्या मृत्यूनंतर मेघनाने रोशनीला सिमल्याला बोर्डींग स्कूलमध्ये ठेवलं! त्यावरुन तिचं आणि सुरेंद्रचं जोरदार भांडण झाल्याचंही तिने माझ्याजवळ कबूल केलं! तो रोशनीला सांभाळण्यास तयार असूनही जवाहरने भरीला घातल्यामुळे तिने नकार दिला होता! नंतर तिला आपली चूक कळली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती! दारुच्या व्यसनापायी मेघना स्वत: रोशनीला सांभाळू शकत नव्हती आणि तिला बोर्डींग स्कूलमध्ये ठेवल्याचीही तिला टोचणी लागून राहिली होती! शेवटचा मार्ग म्हणून तिने मला फोन केला होता!

मी रोशनीला मुंबईला न्यावं आणि तिची जबाबदारी घ्यावी अशी मेघनाची इच्छा होती. माझी अर्थातच या गोष्टीला तयारी होती, पण त्याचबरोबर माझ्या दोन अटी होत्या. एक म्हणजे एकदा रोशनीला माझ्या स्वाधीन केल्यावर मेघनाने पुन्हा कधीही तिची भेट घेण्याचा प्रयत्नं करु नये! तिची किंवा त्या हरामखोर जवाहरची सावलीही रोशनीवर पडलेली मला चालणार नव्हती! दुसरी अट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत रोशनी किमान अठरा वर्षांची होईपर्यंत या गोष्टीचा जवाहरला पत्ता लागता कामा नये! जवाहरसारखा पाताळयंत्री आणि नीच माणूस कोणत्याही थराला जावू शकेल याचा मला चांगलाच अनुभव होता! रोशनी मुंबईला माझ्याघरी असल्याचं जवाहरपासून लपवून ठेवण्याचा एकच उपाय होता तो म्हणजे ती सिमल्याला बोर्डींग स्कूलमध्येच आहे असं नाटक करत राहणं!

त्याच वेळी माझ्या डोक्यात रोशनी आणि रेशमी यांची अदलाबदल करण्याची कल्पना आली!

काहीही झालं तरी रोशनी माझी मुलगी होती आणि रेशमीला मी दत्तक घेतलं होतं! त्यावेळेस मी स्वत:चा आणि माझ्या मुलीचा स्वार्थ पाहिला हे मी नाकारत नाही! रेशमीसह मी सिमल्याला गेलो आणि तिथल्या एका दुसर्‍याच बोर्डींग स्कूलमध्ये रोशनीचे पेपर्स वापरुन मी तिची अ‍ॅडमिशन घेतली! माझ्या प्लॅनप्रमाणे मेघना सिमल्याला आली आणि रोशनीला बोर्डींग स्कूलमधून काढून तिने माझ्या स्वाधीन केलं! हे नाटक तसंच पुढे सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी 'रोशनी'ला भेटण्यासाठी म्हणून सिमल्याला येण्याचं आणि रेशमीची भेट घेण्याचं मी मेघनाला बजावलं! रोशनीच्या भल्यासाठी तेवढं करणं तिला सहज शक्यं होतं, त्यामुळे तिने अर्थातच होकार दिला! रेशमीची समजूत घालण्यासाठी ती मेघनाचीच मुलगी असल्याचं आणि लेखाने तिला अ‍ॅडॉप्ट केल्याचं मेघनाने तिला सांगितलं! रोशनीसह मी मुंबईला परतलो आणि सर्वात पहिली गोष्टं केली ती म्हणजे माझं राहतं घर बदललं! पुढे उद्भवू शकणारा कोणताही प्रॉब्लेम टाळण्यासाठी मी रोशनीला रेशमी म्हणूनच वागवू लागलो! रोशनी जेमतेम सहा वर्षांची होती. ती रोशनी नसून रेशमी आहे हे तिच्या मनावर ठसवण्यास सुरवातीला मला थोडा त्रास झाला, पण लवकरच ती रोशनीला विसरुन गेली आणि रेशमीचं नाव आणि तिची आयडेंटीटी तिने आत्मसात केली!

रेशमीला मी हॉस्टेलमध्ये ठेवलं असलं तरी तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्षं केलं असं मात्रं नाही! वर्ष - दोन वर्षांतून मेघना मला कॉन्टॅक्ट करुन तिच्याबद्दल अपडेट्स देत असे. अर्थात ती सिमल्याला नेमकी कुठे आहे याची मात्रं मला कल्पना नव्हती अ‍ॅन्ड टु बी ऑनेस्ट, मी फारशी फिकीरही केली नाही! अनफॉर्च्युनेटली मेघनाला कॅन्सर झाल्याचं डिटेक्ट झाल्याचं मला कळलंच नाही, नाहीतर तिच्याकडून मी रेशमीबद्दल सगळी माहिती काढून घेतली असती आणि जवाहरने तिला गाठण्यापूर्वीच मी तिच्यापर्यंत पोहोचलो असतो! मेघनाच्या मृत्यूनंतर जवाहरने रेशमीला रोशनी म्हणून माझ्या स्वाधीन करण्यासाठी मला फोन केला तेव्हा अद्यापही त्याला त्या दोघींची अदलाबदल झाल्याची कल्पना आलेली नाही हे माझ्या लक्षात आलं! त्याने रेशमीचा ठावठिकाणा कळवण्यासाठी माझ्याकडे साठ लाख रुपये मागितले त्यालाही मी होकार दिला आणि तेवढे पैसे त्याच्या उरावर घातले! त्यानंतर तरी त्याच्याशी काही संबंध येणार नाही अशी माझी अपेक्षा होती, पण जवाहरने रेशमीचा खून करुन तिच्याजागी श्वेताला माझ्या घरात घुसवल्याचं आणि माझा आणि रोशनीचाही खून करुन माझा बिझनेस आणि प्रॉपर्टी गिळंकृत करण्याचा त्याचा प्लॅन असल्याचं कळल्यावर आय लॉस्ट इट टोटली! रोशनीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्वेता, अखिलेश आणि मुख्य म्हणजे जवाहरला खलास करणं हा एकच मार्ग मला दिसत होता! पुढे काय झालं ते सगळ्यांनाच माहीत आहे! कम व्हॉट मे, रोशनीला कोणताही धोका झालेलं मला सहन होणं शक्यंच नव्हतं!"

"प्रिसाईजली फॉर द सेम रिझन, रोशनीला ट्रिपल मर्डरमध्ये तिला गुंतवण्याचं आम्ही नाटक केलं!" रोहित मिस्कीलपणे डोळे मिचकावत म्हणाला तसे द्विवेदी त्याच्याकडे पाहतच राहिले!

"द्विवेदी, रोशनीचा त्या तिघांच्या खुनाशी काही संबंध नाही हे तुम्हाला व्यवस्थित माहीत होतं! "रोहितचा स्वर अचानक कठोर झाला, "स्वत:चं पाप आपल्या मुलीच्या माथी मारण्यात येत आहे हे पाहिल्यावर तुम्ही तिला वाचवण्यासाठी चवताळून उठणार आणि त्याच भरात स्वत:च्या तोंडाने आपले गुन्हे कबूल करणार हा आमचा अंदाज होता आणि तो अचूक होता ते तुम्हीच सिद्धं केलंत!

तुम्ही आता ऐकवलेली इमोशनल स्टोरी ऐकायला फार छान वाटते द्विवेदी, कदाचित तुमच्या फॅमिलीवर त्याचा इफेक्ट होईलही, बट डोन्ट एक्स्पेक्ट अस टू ब्लाईन्डली बिलीव्ह इट! रोशनीला रेशमी म्हणूनच तुम्ही वाढवलं असलंत तरीही तिच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही तिची खरी आयडेंटीटी तिच्यापासून का लपवून ठेवलीत? रोशनी कायद्याने सज्ञान झाल्यावर जवाहर कौल तुमचं काहीही बिघडवू शकत नव्हता आणि जरी त्याने तसा प्रयत्नं केलाच असता तर, स्वत: मेघनानेच रोशनीला तुमच्या स्वाधीन केलं होतं हे तुम्ही कोर्टात सिद्धं करु शकत होतात! मेघनाच्या स्टेटमेंटवरुन हे अगदी सहज सिद्धं झालं असतं! तुम्ही तसं का केलं नाही याचं काही उत्तर आहे तुमच्याकडे द्विवेदी? आणि रोशनी म्हणून रेशमीला तुमच्या स्वाधीन करण्याची किम्मत म्हणून जवाहर कौलला साठ लाख देण्यासाठी तुम्ही सुखासुखी तयार झालात यावर मी विश्वास ठेवावा अशी तुमची अपेक्षा असेल तर सॉरी, आय डोन्ट बाय दॅट आर्ग्युमेंट! रोशनी म्हणून तुमच्या घरात घुसलेली श्वेता होती हे तुम्हाला नंतर कळलं द्विवेदी, पण सिमल्याहून ती रेशमी आहे याच समजुतीने तुम्ही तिला मुंबईला आणलंत! त्यामागचं कारण ओळखणं अगदी सोपं आहे. रोशनीला तुम्ही रेशमी म्हणूनच वाढवलेलं असल्याने ती स्वत: वर्मांच्या प्रॉपर्टीवर क्लेम करु शकत नव्हती! त्यासाठी रोशनी द्विवेदी म्हणून आयडेंटीटी असलेल्या मुलीची तुम्हाला आवश्यकता होती! ऑन द अदर साईड, रोशनीचा मुखर्जींशी काही संबंध नाही हे व्यवस्थित माहीत असूनही रेशमी म्हणून तिच्या नावाने मुखर्जींच्या प्रॉपर्टीवर क्लेमसाठी केस सुरुच होती! तुमचा प्लॅन अगदी सिंपल होता द्विवेदी, रोशनी आणि रेशमी दोघीही तुमच्याकडे असताना पुढेमागे त्यांची आयडेंटीटी एस्टॅब्लीश करण्याचा प्रश्नं निर्माण झाला आणि डीएनए टेस्ट्स करण्याची वेळ आलीच, तरीही तुम्हाला फरक पडत नव्हता! रेशमीचा खून झाल्यामुळे तुमचा हा प्लॅन तर फसलाच आणि तुमच्यापेक्षा सवाई असलेल्या मुखर्जीनी ब्लॅकमेल करुन तुम्हाला केस काढून घेण्यास भाग पाडलं!"

द्विवेदी सुन्नपणे रोहितकडे पाहत राहिले! बोलण्यासारखा एक शब्दही उरला नव्हता!

"आय हेट धिस मॅन सर!" रोशनी संतापाने थरथरत म्हणाली, "लहानपणापासून आजपर्यंत मी अ‍ॅडॉप्टेड आहे हे मी कधीही विसरू शकले नाही! प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क असतानाही केवळ या माणसामुळे मला सर्व काही मिळालं आहे हीच उपकार आणि कृतज्ञतेची भावनाच कायम माझ्या मनात राहिली! आय सिंपली डीझर्व्ह्ड एव्हरीथिंग विच आय हॅड, बट आय ऑल्वेज फेल्ट आऊटसाईडर अ‍ॅन्ड आय विल नेव्हर फरगिव्ह हिम फॉर धिस! फॉर व्हॉटेवर रिझन....."

"एक मिनिट रोशनी!" तिचं बोलणं अर्ध्यावरच तोडत रोहित काहीशा कठोर स्वरात म्हणाला, "आय अंडरस्टँड युवर इमोशन्स अ‍ॅन्ड रिस्पेक्ट युवर फिलींग्ज, पण हे सीआयडीचं ऑफीस आहे! धिस इज नॉट अ प्लेस फॉर इमोशनल आऊटबर्स्ट! वी फॉलो द लॉ अ‍ॅन्ड अ‍ॅज पर लॉ, आवश्यक त्या सगळ्या फॉरमॅलिटीज संपल्या की द्विवेदी अ‍ॅन्ड मुखर्जी विल बी प्लेस्ड अंडर अ‍ॅरेस्ट! अ‍ॅन्ड आय होप मि. वर्मा, रोशनीला तिच्या प्रॉपर्टीच्या शेअरसाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही!"

"सर्टनली नॉट!" वर्मा स्मितं करत म्हणाले, "आय मस्ट अ‍ॅडमिट मि. प्रधान, मुंबई पोलीसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी का केली जाते हे आज मला पटलं! हॅट्स ऑफ टू यू!"

"थँक्स फॉर द कॉम्लिमेंट्स! आय अ‍ॅम शुअर यू ऑल्सो लर्न्ड अ लेसन मिसेस द्विवेदी! पुढल्या खेपेला बॅट्रॅकटॉक्सिन आणलंत तर कुठेही न थांबता आधी ते लॅबमध्ये डिलीव्हर करा! न जाणो पुन्हा त्याला पाय फुटले तर... यू नो व्हॉट आय मिन!"

चारुने काहीही न बोलता होकारार्थी मान हलवली फक्तं!

"ऑलराईट! यू ऑल मे लिव्ह नाऊ! केस स्टँड झाली की तुम्हाला विटनेससाठी कोर्टात हजर राहवं लागेल! त्याबद्दल कोर्टाकडून आणि पोलीसांकडून तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेलच!"

रोशनी उठली आणि द्विवेदींकडे वळूनही न पाहता इन्क्वायरी रुमच्या बाहेर निघून गेली! चारु आणि शेखर तिच्यामागे धावले. सुरेंद्र वर्मा, डॉ. भरुचा, फिंगर प्रिंट्स एक्सपर्ट सुळे, रेक्टर बहुगुणा हे सर्वजणही निघून गेले. रोहितने कदम आणि नाईकना द्विवेदी, मुखर्जी, अल्ताफ आणि शाकीब यांना लॉकअपमध्ये बंद करण्याची सूचना दिली आणि इतरांना इन्क्वायरी रुममध्येच थांबण्यास सांगून त्याने कमिशनर मेहेंदळेंंचं ऑफीस गाठलं. केस निकालात निघाल्याचं कळल्यावर कमिशनरसाहेब खूष झाले! तो इन्क्वायरी रुममध्ये परतला तेव्हा सर्वांना कोठडीत बंद करुन कदम आणि नाईकही परतले होते. रोहितने आपल्या ऑर्डलीला सर्वांसाठी चहा मागवण्याची सूचना दिली. अतिशय किचकट आणि सर्वांना गोंधळात पाडणारी केस अखेर डिटेक्ट झाली होती, त्यामुळे सर्वजण खुशीत होते.

"रोहितबाबू, वीस वर्षांपासून मी पोलीस खात्यात आहे, पण इतक्या गुंतागुंतीची केस आजपर्यंत पाहिली नव्हती!" इन्स्पे. घटक चहाचा कप उचलत म्हणाले, "त्या द्विवेदीनी रोशनीच्या जागी रेशमीला तिच्या नावाने सिमल्याला ठेवलं, बिभूतीबाबू आपल्या सख्ख्या भाचीला ओळखूनही तिच्या खुनात सहभागी झाले, नंतर त्यांनीच त्या श्वेता आणि अखिलेशला इनडायरेक्टली द्विवेदींसमोर एक्सपोज केलं! काय बोलावं कळत नाही!"

"इट्स ऑल अबाऊट मनी घटकबाबू!" रोहितने दीर्घ श्वास घेतला, "प्रॉपर्टी आणि पैसा याचा मोह भल्याभल्यांना सोडवत नाही आणि माणसाच्या हातून नको ते करवून घेतो हेच खरं! जवाहरने ज्या मुलीच्या खुनाचा प्लॅन केला आहे ती आपलीच भाची आहे हे लक्षात आल्यानंतरही मुखर्जीनी त्याला विरोध तर केला नाहीच, उलट अखिलेश आणि श्वेताने रोशनी म्हणून तिचा खून केला तेव्हा स्वत: मंडी इथे हजर राहून तिचा मृत्यू झाल्याचं त्यानी कन्फर्म केलं, इन कोल्ड ब्लड! याला कारण एकच, पैशाचा मोह आणि लालसा! त्याच मोहापायी रेशमीचा बळी देण्यासही या मुखर्जीनी अनमान केला नाही! तिच्या मृत्यूबरोबरच आपल्या संपत्तीतला एकमेव वाटेकरी संपला म्हणून मुखर्जी निर्धास्तं झाले! द्विवेदींनी रेशमीसाठी जवाहरला साठ लाख मोजणं हे तिच्यामार्फत वर्मांच्या प्रॉपर्टीत शेअर मिळवण्यासाठीच ना? अर्थात ती रेशमी नसून श्वेता आहे याची त्यावेळेस त्यांना कल्पना नव्हती हा भाग वेगळा! आणि ते कळल्यावर आणि आपल्या आणि रोशनीच्या जीवाला धोका आहे हे लक्षात आल्यावर अतिशय कोल्ड ब्लडेडली त्यानी त्या तिघांचाही काटा काढला!"

"सरजी, मुखर्जीनी रेशमीला ओळखलं होतं तर मग द्विवेदींनी श्वेता, जवाहर आणि अखिलेश या तिघांचाही खून करेपर्यंत त्यानी केस मागे घेण्यासाठी द्विवेदींवर प्रेशर का आणलं नाही?"

"वेल कोहली! मी आधीच म्हणालो त्याप्रमाणे मुखर्जीना जवाहरवर मुळीच विश्वास नव्हता! रेशमीच्या खुनात जवाहर आपल्याला ट्रॅप करु शकतो याची कल्पना असल्यामुळेच त्यानी द्विवेदीना अ‍ॅलर्ट करुन जवाहरला डबलक्रॉस केलं होतं! नॉट ओन्ली दॅट, मुखर्जीनी द्विवेदींवर वॉच ठेवला असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, कारण श्वेता, जवाहर आणि अखिलेशचा खून होईपर्यंत ते गप्प बसून राहिले! रेशमीच्या खुनाचे धागेदोरे आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत ही खात्री झाल्यामुळे अगदी निर्धास्तपणे द्विवेदीना ब्लॅकमेल करुन केस मागे घेण्यास मुखर्जीनी भाग पाडलं!"

"सर, द्विवेदींचा प्लॅन तर अगदी निर्दोष होता, पुण्याच्या त्या हॉटेलमधून कोणाच्याही नजरेस न पडता ते बाहेर पडले, वेषांतर करुन टॅक्सीवाल्यामार्फत त्यांनी लोणावळ्यात भाड्याची कार मिळवली, श्वेताचा खून करुन आणि तिची बॉडी वरळीला टाकून ते गुपचूप लोणावळ्याला आणि तिथून पुण्याला परतले. एक्सप्रेस हायवेवरच्या खालापूर टोलनाक्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आपल्याला ती कार सापडली, पण द्विवेदीना ओळखणं अशक्यंच होतं. शाकीब आणि अल्ताफलाही ते स्वत: कधीच भेटले नाहीत. असं असतानाही तुम्हाला त्यांचाच नेमका संशय कसा आला सर?" देशपांडेनी उत्सुकतेने विचारलं.

"श्रद्धा, द्विवेदींचा प्लॅन ऑलमोस्ट फ्लॉलेस होता यात डाऊट नाही, आणि त्यांनी तो पर्फेक्टली एक्झिक्यूटही केला! या सगळ्या प्रकरणात त्यांच्या हातून केवळ दोनच चुका झाल्या, विच वेअर इनफ फॉर अस टू एक्सपोज हिम!

पहिली चूक म्हणजे रेशमीच्या मैत्रिणीच्या पार्टीत काढलेला अखिलेशचा फोटो अल्ताफला पाठवणे! रेशमीने तो फोटो पोलीसांना पाठवला होता आणि नेमका तोच फोटो मला अल्ताफच्या घरी आढळला! दॅट इटसेल्फ लिमीटेड द स्कोप ऑफ द इन्व्हेस्टीगेशन डाऊन टू ओन्ली थ्री पीपल - द्विवेदी, रेशमी आणि रेशमीची मैत्रिण निधी! अर्थात तू निधीकडे इन्क्वायरी केलीस तेव्हा तिचा यात काहीच संबंध नाही हे क्लीअर झालं, मग उरले फक्तं द्विवेदी आणि रेशमी!

पण दुसरी आणि सगळ्यात मोठी घोडचूक म्हणजे मर्डर करण्यासाठी बॅट्रॅकटॉक्सिनसारखं दुर्मिळ पॉयझन वापरणं! ऑटॉप्सीमध्ये बॅट्रॅकटॉक्सिन ट्रेस होणार नाही ही द्विवेदींची अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे श्वेताच्या ऑटॉप्सीत ते डिटेक्ट झालंच नाही, त्यामुळे जवाहर आणि अखिलेशला मारण्यासाठी त्याचाच वापर करण्याचं द्विवेदीनी ठरवलं! अनफॉर्च्युनेटली फॉर हिम, अखिलेशच्या गळ्यातून नीडल काढून घेणं अल्ताफला शक्यं झालं नाही आणि ती नीडल आपल्या हाती लागली! जवाहरच्या बंगल्यात ते रिव्हॉल्वर सापडल्यावर त्याचा खून करण्यासाठी कोणतं तरी पॉयझन वापरलं असणार याची मला खात्री झाली होती!

अर्थात ती नीडल आणि रिव्हॉल्वर आपल्या हाती लागलं नसतं तरी आपण द्विवेदींपर्यंत पोहोचलो असतोच, फक्तं थोडा वेळ लागला असता एवढंच! श्वेताची बॉडी डम्प करण्यासाठी वापरलेली कार लोणावळ्यात हायर करणं, त्याच वेळी द्विवेदी पुण्यात असणं आणि अल्ताफच्या घरी पार्टीतला अखिलेशचा फोटो सापडणं एवढ्या गोष्टी द्विवेदींकडे बोट दाखवण्यासाठी पुरेशा होत्या. त्यातच डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये चारुने कोलंबियातून बॅट्रॅकटॉक्सिन आणल्याचं कळलं आणि डीएनए टेस्टच्या रिपोर्टमुळे रेशमी हीच रोशनी आहे हे सिद्धं झाल्यावर केस डेड ओपन झाली!"

थोडावेळ कोणीच काही बोललं नाही.

"कदम, अ‍ॅज अर्ली अ‍ॅज पॉसिबल आपलं सगळं पेपरवर्क पूर्ण करा!" रोहितनेच शांततेचा भंग केला, "पेपरवर्क पूर्ण झालं की मुखर्जी, अल्ताफ आणि शाकीब या तिघांचाही ट्रांझिट रिमांड घ्या आणि मुखर्जींना खत्रींच्या तर अल्ताफ आणि शाकीबला कोहलींच्या ताब्यात द्या!"

कोहली आणि खत्री गोंधळून त्याच्याकडे पाहतच राहिले.

"या केसमधल्या चार खुनांपैकी केवळ श्वेताचा खून मुंबईत झाला आहे! ती केस आम्ही इथल्या कोर्टात स्टँड करुच, पण बाकीच्या तीन केसेस तुमच्या आहेत! रेशमीच्या खुनात श्वेता, अखिलेश, जवाहर आणि मुखर्जी सामिल होते. त्यापैकी एकटे मुखर्जीच जिवंत आहेत! रेशमीचा खून मंडी इथे झाला होता, त्यामुळे ही केस हिमाचल पोलीसांची आहे! जवाहर आणि अखिलेशचा खून दिल्लीत झाल्यामुळे या दोन्ही केसेस दिल्ली पोलीसांनाच हँडल कराव्या लागणार आहेत! ऑफकोर्स, या संपूर्ण केसच्या सुरवातीपासून शेवटपर्यंतच्या इन्क्वायरीमध्ये प्रत्येक केससाठी आवश्यक ते पेपर्स आणि रिपोर्ट्स तुम्हाला मुंबई सीआयडींकडून मिळतीलच, पण अल्टीमेटली तुम्हालाच कोर्टात केसेस स्टँड कराव्या लागणार आहेत!"

कोहली आणि खत्री काही बोलण्यापूर्वीच रोहितचा मोबाईल वाजला. डॉ. सोळंकी!

"गुड इव्हिनिंग सर!"

"काँग्रॅट्स रोहित! यू हॅव वन मोअर फेदर इन द कॅप! भरुचाने माझ्याकडे पाठवलेल्या व्हिसेरामध्ये मला बॅट्रॅकटॉक्सिनचे ट्रेसेस आढळले आहेत! श्वेताच्या खुनासाठीही बॅट्रॅकटॉक्सिनच वापरण्यात आलं होतं यात कोणताही डाऊट नाही!"

डॉ. सोळंकींशी काही क्षण चर्चा करुन रोहितने कॉल डिसकनेक्ट केला तेव्हा तो अगदी रिलॅक्स मूडमध्ये होता!

"श्वेताचा खूनही बॅट्रॅकटॉक्सिनमुळेच झाला आहे हे सिद्धं झालं आहे! द्विवेदींनी आपल्यासमोर कन्फेशन दिलं असलं तरी आपण त्यांच्याविरुद्ध ते कोर्टात वापरु शकत नाही. बट नाऊ, वी हॅव सायंटीफीक एव्हीडन्स! दॅट आय बिलीव्ह शुड बी द फायनल नेल इन द कॉफीन!

द गेम इज ओव्हर! वन्स अ‍ॅन्ड फॉर ऑल!
द कोल्ड ब्लडेड किलर इज डन फॉर!"

*******

समाप्त

(सर्व पात्रं, प्रसंग आणि घटना पूर्णपणे काल्पनिक. कोणाशीही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजाव).

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर्वप्रथम, (मेलेली का होईना, पण) आख्खी बाईच्या बाई (ग्रोन-अप, हं! दूध-पीती बच्ची नव्हे.) सूटकेसमध्ये मुळात मावलीच कशी?

(समजा, तुकडे करून कशीबशी कोंबलीच - गोडाऊनमध्ये तुकडे करणे अंमळ कठीणच म्हणा. तुकडे करण्याची उपकरणे आयत्या वेळी हाताशी सापडायची मारामार. पण ते तूर्तास सोडून देऊ. समजा कापली आणि कोंबली. - तरीही, एका आख्ख्या बाईचे वजन असलेली सूटकेस एका हाताने उचलून वाहून नेणे कितपत सहजशक्य असावे? कितीही हलकी बाई म्हटली - हे तिच्या वजनाचे वर्णन आहे, चारित्र्याचे नव्हे; ऑल्दो, इन धिस पर्टिक्युलर केस (सूटकेस नव्हे), ते तिच्या चारित्र्यासही फिट्ट बसू शकेल, परंतु येथे तो मुद्दा नाही - तरी तिचे वजन गेला बाजार पन्नास किलो तरी असेल? आंतरराष्ट्रीय उड्डाणांत विमानकंपन्या ३२ किलोवरच्या बॅगा अतिरेकी जड म्हणून स्वीकारत नाहीत, आणि २३ किलोवरच्या बॅगांवर अतिरिक्त पैसे आकारतात. इथे बाईचे वजन किमान पन्नास किलो अधिक रिकाम्या सूटकेसचे वजन गेलाबाजार पाच ते सहा किलो, अशी किमान पंचावन्न किलोची सूटकेस. तरी बाई गरोदर होती तिच्या गर्भाचे वजन जमेस धरलेले नाही. साधी तेवीस किलोची (विमानात चालणारी) बॅग उचलून मिरवून पाहा. हवा टाईट होते. इथे पंचावन्न किलोची सूटकेस मिरवायची? अगदी व्हीलर आहे म्हणून समजा, तरीही खेचताना फाटेल. (सूटकेस नव्हे.) आणि खेचताना चुकून पायावर आडवी पडली, तर ग्यारंटीड कपाळमोक्ष - नक्की कशाने कपाळमोक्ष, ते मी तुम्हांस सांगावयास नको. समझने वाले को इशारा, इ.इ.)

आणि, रेशमी हीच जर का रोशनी असू शकेल, तर मग इतःपर मी रोहित हाच डॉ. भरुचा; संजय हीच श्रद्धा; कोहली हेच अल्ताफ; सोळंकी हेच अखिलेश; डॉ. मालशे हेच जवाहर; द्विवेदी हेच आळीपाळीने रेक्टर बहुगुणा, घटक आणि श्वेता; झालेच तर मोदी हेच (मियाँ) मुशर्रफ; राहुल हाच स्वराजबाई; बापू हेच सुभाषबाबू; टिळक हेच फुले; फार कशाला, नेहरू हेच जीना हेदेखील मानायला तयार आहे. आय मीन, ते सस्पेंशन ऑफ डिसबिलीफ वगैरे वगैरे सगळे ठीक आहे, पण म्हणून किती त्याला काही मर्यादा? आणि ही काय पात्रे आहेत की मआंजावरले डुआयडी? की हा-म्हणजेच-ही म्हणून जोड्या जुळवत बसायचे?

बाकी, नेहरूंवरून आठवले.

(सर्व पात्रं, प्रसंग आणि घटना पूर्णपणे काल्पनिक. कोणाशीही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजाव).

हे लिहिलेत, ते चांगले केलेत. अन्यथा, त्या 'जवाहर कौल' नावावरून आमचा समज काही वेगळाच झाला होता. नेहरूंचे पारंपरिक कुलनाम कौल होते. मोतीलालजींनी अलाहाबादेस स्थलांतरित होऊन ओढ्याकाठच्या जागी स्थायिक झाल्यावर ('नहर'च्या काठी राहणारे ते 'नहरू', म्हणून) नेहरू हे उपनाम अंगीकारले, तेच पुढे कायम झाले. कथानकातल्या हरामखोर पात्रास 'जवाहर कौल' हे नामाभिधान हे रोचक आहे खरे, परंतु किं कारणेन? केवळ नुकत्याच होऊन गेलेल्या बालदिनाच्या सन्मानाप्रीत्यर्थ? की कोई पुरानी दुश्मनी? की संघं शरणं गच्छामि?

असो. प्रस्तुत कथा ही दिवाळी विनोद विशेषांकात चमकून गेली असती. कदाचित भरपूर खंडांत (किमान दोन; आशिया आणि द.अमेरिका) होती, म्हणून स्थलसंकोचास्तव तेथे बसवता आली नसावी; सबब इथे छापली, हेही नसे थोडके / हे तो उचितच झाले. (तशी पहिल्या खंडापासूनच विनोदाची थोडीफार चुणूक दिसू लागली होती, परंतु तिथल्या तिथे दाद देण्याऐवजी, आणखी कायकाय वाढून येत राहाते, ते पाहावे, अशा विचाराने गप्प राहून उत्कंठा शेवटपर्यंत ताणून धरली. त्याचे फलित आज मिळाले. आज भरून पावलो. अॅज़ फार अॅज़ ह्यूमरस राइटिंग गोज़, धिस टेलपीस टेक्स द केक.)

पुढील लेखनास शुभेच्छा.

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतका झकास रिव्ह्यू देऊन न.बांनी शेवटी "पुढील लेखनास शुभेच्छा." असंही म्हटलंय.
क्या बात!
============
कथा वाचली नाहीये अजून. पण माझ्यामते नोव्हेंबर २०१८ मधली ही मराठी आंजावरची सर्वश्रेष्ठ रहस्यकथा आहे असं म्हणायला हरकत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न बा यांच्याशी अतिशय सहमत. वस्तुतः लेखकाची या पूर्वीची कथा आवडली होती. पण इथे , विशेषतः भाग दहामधे गुंतागुंतीच्या रहस्यभेदाच्या जितक्या वेण्या सोडवल्या आहेत त्यांची जरुरी नव्हती असे वाटते.यातील एक दोन रहस्य उलगडून केस सोडवली असती तरी वाचकांची क्षुधा भागली असती बहुतेक. इतकी गुंतागुंत उलगडल्यामुळे कथा अवास्तव/ न बा म्हणतात त्याप्रमाणे विनोदी झाली आहे.
जवाहर कौल नावाबद्दल माहीत नव्हते.
आपण संघम शरणं गच्छामि असाल तर काही हरकत नाही ( आपणास तिकडे कदाचित vsm मिळू शकेल) पण जर तसे नसेल तर ही माहिती आपणास होती का हे विचारायला आवडेल ( कृपया गैरसमज करून घेऊ नका . मी (किंवा बहुधा न बा सुद्धा) तुम्हाला हे बदलायला वगैरे सांगत नाहींयोत. तुमचा अधिकार , काय लिहिणं वगैरे. कुतुहुल म्हणून विचारतोय फक्त. ( थेट विचारल्याबद्दल क्षमस्व , पण शेवटी आम्ही पेठी.. वगैरे)
पुढील लेखनासाठी शुभेच्छा आहेतच.
@न बा , मार्मिक दिलीय हो.मला तुम्ही कधी श्रेणी देणार ( आधी नुसतंच देणार विचारणार होतो. पण घाबरलो आणि संपूर्ण वाक्य लिहिले. असो)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिरंगाईबद्दल दिलगिरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जवाहर कौल नावाबद्दल माहीत नव्हते.

नेहरूंचे पारंपरिक कुलनाम कौल असल्याबाबतची (आणि त्याच्या 'नेहरू'मध्ये बदलण्यामागच्या कारणमीमांसेबाबतची) माझी माहिती जरी मूलतः चुकीची नसली, तरी अधिक उत्खननाअंती तिच्यातील तपशिलांबाबत काही दोष आढळून आले, त्यांची दुरुस्ती येथे नमूद करणे प्राप्त आहे.

नेहरूंचे पारंपरिक कुलनाम कौल होते.

हे बरोबर. मात्र,

मोतीलालजींनी अलाहाबादेस स्थलांतरित होऊन ओढ्याकाठच्या जागी स्थायिक झाल्यावर ('नहर'च्या काठी राहणारे ते 'नहरू', म्हणून) नेहरू हे उपनाम अंगीकारले, तेच पुढे कायम झाले.

ष्टोरीचे तत्त्व एकंदरीत बरोबर, परंतु अधोरेखितांबाबत तपशिलांत काही दुरुस्ती.

मोतीलालजी नव्हे. पंडित राज कौल. औरंगजेबोत्तर मुघल काळातला जवाहरलालजी/मोतीलालजी यांचा एक पूर्वज.

अलाहाबादेस नव्हे. दिल्लीस. राज कौल कश्मीरहून दिल्लीस स्थलांतरित होऊन स्थायिक झाला.

ओढ्याकाठी नव्हे. कालव्याकाठी. ('नहर' म्हणजे ओढा नव्हे. कालवा.) राज कौल यास स्थायिक होण्याकरिता दिल्लीत देण्यात आलेली जागा तथा जमीन/जहागीर एका कालव्याकाठी होती.

बाकी ष्टोरी बरोबर.

अधिक माहितीकरिता: दुवा. (दुवा विकीचा आहे, परंतु त्यात उपरोल्लेखित माहितीच्या आधाराकरिता खुद्द नेहरूंच्या आत्मचरित्रातील संबंधित परिच्छेद उद्धृत करण्यात आलेला आहे. त्यामुळे, थेट आश्वमुखिक माहिती म्हणून ग्राह्य धरण्यास प्रत्यवाय नसावा.)

..........

'आश्वमुखिक' की 'आश्वमौखिक'? (तसेच, 'आंतरलैंगिक' की 'आंतरलिंगिक'?) केवळ पहिल्या पदातील प्रथमस्वराची वृद्धी व्हावी, की दोन्हीं पदांतील? केवळ पहिल्या, अशी माझी समजूत होती१अ, परंतु 'सार्वजनिक' तथा 'सार्वभौम' असे दोन्हीं बाजूकडून उलटसुलट दाखले मिळत आहेत, सबब अंमळ कन्फ्यूजन आहे. श्री. कोल्हटकर यांनी वा अन्य जाणकारांनी कृपया खुलासा करावा. आगाऊ आभार.

१अ इन विच केस, 'आश्वमुखिक' हे बरोबर तथा 'आंतरलैंगिक' हे चूक ठरावे. अन्यथा, व्हाइसे व्हर्सा. अर्थात, नियमांचे माझे आकलन पूर्णतःच गंडलेले असल्याखेरीज. इन दॅट केस, यांपैकी कोठलेही बरोबर तथा कोठलेही चूक असू शकते. एतदर्थ स्पष्टीकरणाकरिता आवाहन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(हे उत्तर संस्कृताच्या पाणिनीय व्याकरणाबाबत आहे. ते पुष्कळदा तत्त्वतः मराठीला लागू पडते, पण तपशील मात्र लागू पडलेच पाहिजे असे काही नाही. म्हणजे "कुठल्या स्वरास वृद्धि याबाबत अपवाद असतात" हे तत्त्व मराठीला लागू आहे, परंतु मराठीत अपवादांची यादी कुठली, त्याबाबत सर्वेक्षण करावे लागेल, पाणिनीची यादी तपशीलवार मराठीला लागू करता येणार नाही.)

काही तद्धित प्रत्यय लागताना मूळ शब्दरूपाच्या पहिल्या स्वरात "वृद्धि" नावाचा बदल होतो. सामान्य नियम असा असल्यामुळे तद्धित प्रत्यय लागलेले शब्दरूप सामासिक असले, तरी केवळ सर्वात पहिल्या स्वरातच हा फरक होतो.
परंतु पाणिनीने नोंद केली आहे, की काही रूपांमध्ये समासाच्या दोन्ही पदांच्या आद्यस्वरांचे वृद्धिरूप होते. याबाबत उपनियम, उप-उपनियम, नियम-सांगता-येत-नाहीत असे अपवाद, वैकल्पिक अपवाद पाणिनीने अनेक सूत्रांत नोंदवले आहेत ७.३.१९ ते ७.३.३१.
यातली काही थोडी उदाहरणे मराठीभाषकांना ओळखीची असू शकतील : सौहार्द्य, सौभाग्य, ऐहलौकिक, पारलौकिक, सार्वलौकिक, सार्वभौम... पूर्ण यादी किंवा उपनियम वरील सूत्रांत तपासता येतील.

जाता जाता हेसुद्धा : सामान्यनियमावेगळे रूप असेही होऊ शकते, की पहिल्या सामासिक पदात काहीच बदल नाही, केवळ उत्तरपदाच्या पहिल्या स्वरातच बदल होणे. अशा रूपांची नोंदही पाणिनीने ७.३.१० ते ७.३.१८ सूत्रांत केलेली आहे. परंतु यांच्यापैकी मराठीभाषकांच्या ओळखीचे शब्द मला नजरेत भरले नाहीत.
परंतु भाषेच्या क्षेत्रीय लकबींकडे पाणिनी लक्ष देत असे, याचे एक गमतीदार उदाहरण तिथे दिसते. "पञ्चाल देशाच्या पूर्व दिशेकडील" या अर्थी फक्त उत्तरपदात वृद्धिरूप दिसते - पूर्वपाञ्चालक, पण "मद्र देशाच्या पूर्वे दिशेकडील" या अर्थी पूर्वपदात वृद्धिरूप दिसते - पौर्वमद्र. (हे टँजंटला उपटँजंट आहे, मान्य आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी शुद्धलेखनाचे नियम असे आहेत, की ते लावताना एखादा शब्द संस्कृत (तत्सम) मानायचा की मराठी (तद्भव) मानायचा हाच कळीचा प्रश्न असतो. ज्याचे उत्तर देण्यासंबंधीचे शासकीय धोरण अजूनही ठरत नाही.

प्रत्यय लावताना संस्कृत शब्दांसंबंधीचे काही विवेचन धनंजय ह्यांच्या प्रतिसादात आहे. मराठीसंबंधीचे नियम पुढीलप्रमाणे -

इक, ई, य, त्य प्रत्यय लागताना पहिल्या अक्षराच्या स्वराची वृद्धी होते (नि शेवटच्या अक्षराचा स्वर लोप पावून प्रत्ययस्वर जोडला जातो.)
स्वरांची वृद्धी पुढीलप्रमाणे -
अ --> आ
इ, ई, ए --> ऐ
उ, ऊ, ओ --> औ
आ, ऋ, लृ ह्या स्वरांची वृद्धी होते का नि असल्यास काय होते मला ठाऊक नाही.
(आ स्वराची 'वृद्धी' आ हीच राहत असावी. जसे भाषा -> भाषिक.)
--

इक प्रत्ययाची उदाहरणे :

अ --> आ
परंपरा पारंपरिक (पारं'पा'रिक x), वंश वांशिक, समाज सामाजिक, सर्वजन सार्वजनिक,
सर्वकाल सार्वकालिक (ईन प्रत्यय लागताना मात्र ह्याप्रमाणे वृद्धी होत नाही म्हणून सर्वकाल + ईन = सर्वकालीन. सार्वकालीन x).

इ, ई, ए --> ऐ
इ: इह ऐहिक, दिन दैनिक, लिंग लैंगिक
ई: ह्यासाठीची उदाहरणे आत्ता चटकन आठवत नाहीत.
ए: सेना सैनिक, वेद वैदिक

उ, ऊ, ओ --> औ
मुख मौखिक, पुराण पौराणिक
मूल्य मौल्यिक, भूगोल भौगोलिक
मोल मौलिक, लोक लौकिक
[रस रसिक, क्षण क्षणिक, धनिक, क्रमिक, सुवासिक असे काही अपवाद मानले जातात. का ते मला माहीत नाही.
परलोक इहलोक हे पारलोकिक, इहलोकिक न होता पारलौकिक, ऐहलौकिक असे का होतात ह्यांसंबंधीचा नियम मला ठाऊक नाही. धनंजय ह्यांनी दिलेला प्रतिसाद उपयोगी ठरावा. ]
--

'आश्वमुखिक' की 'आश्वमौखिक'?
अश्वमुख --> आश्वमुखिक असावे असे वाटते (जसे अनुवंश आनुवंशिक. आनुवांशिक नाही. अनुवांशिक असा बनवता येईल ('अनुक्रमे'प्रमाणे) बहुधा पण त्याचा अर्थ वेगळा असेल.)
अश्वमौख असा शब्द नाही. तसा हेतूपूर्वक तयार केल्यास मात्र त्याचे आश्वमौखिक होईल.
आश्व + मौखिक असा जोडशब्द हेतूपूर्वक तयार करायचा तर आश्व ह्या शब्दाला अर्थ नाही (नसावा).
अश्व + मौखिक असा जोडशब्द बनवता येईल. जरी दोनही शब्दांना आपापला अर्थ असला तरी जोडशब्दाला अर्थ असेलच असे नाही.

तसेच, 'आंतरलैंगिक' की 'आंतरलिंगिक'?

इथेही नियमाप्रमाणे शब्द तयार करू शकू पण त्यांना तुम्हांला हवे ते अर्थ असतीलच असे नाही. जसे -

लैंगिक ह्या विशेषणाचा अर्थ लिंगासंबधीचा/ची/चे. (संदर्भानुसार लिंग म्हणजे अवयवासंबंधी की जेन्डरसंबंधी हे ठरेल.)
आंतर + लैंगिक = आंतरलैंगिक ‌(आंतर + देशीय = आंतरदेशीय म्हणजे विविध देशादेशांतला. ह्याप्रमाणे 'विविध लैंगिक गोष्टींतला' असा अर्थ होईल‌. )
अंतर + लैंगिक = अंतरलैंगिक (अंतर् देशीय = अंतर्देशीय म्हणजे देशांतर्गत. ह्याप्रमाणे अंतर्लैंगिक शब्द होईल. परंतु अंतर (र् नव्हे र) + लैंगिक ह्या जोडशब्दाला काही अर्थ नसेल. अंतर म्हणजे डिस्टन्स् पकडून कोटी वगैरे करायची असल्यास गोष्ट वेगळी.)

अंतरलिंग ‌(असा एक शब्द मानल्यास ) + इक = आंतरलिंगिक
(अंतरलिंग ह्या शब्दाला काही अर्थ असेल का? वरीलप्रमाणेच एक वेळ अंतर्लिंग होईल (लिंगाच्या (शिश्नाच्या) आतले?) पण अंतर + लिंग ह्याला अर्थ नसावा‌.)
आंतरलिंग + इक = आंतरलिंगिक (आ स्वराची वृद्धी आ होते असे मानून)
(आंतरलिंग म्हणजे विविध लिंगांत असा अर्थ लिंग हा अवयव मानून लावता येईल)
आता तुम्हांला ह्यातल्या कुठल्या अर्थाने शब्द वापरायचा आहे ते ठरवून योग्य तो पर्यात निवडावा लागेल असे वाटते.

अधिक विचार करायला नि संदर्भ शोधायला वेळ मिळाल्यास पुन्हा लिहेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत "पारलौकिक" शब्द वापरला, तर बहुतेक मराठीभाषकांना "परलोक"शी व्युत्पत्ति+अर्थसंबंध जाणवेल.
"सार्वभौम"चा "सर्व-भूमी"शी व्युत्पत्ति+अर्थसंबंध जाणवणारे खूप असतील -- पण याबाबत माझे मत तितके ठाम नाही.
जर संस्कृताची आठवण न-काढता व्युत्पत्ति-आणि-अर्थसंबंध जाणवत असेल, तर त्या अपवादांची सोय मराठीकेंद्रित लावावी लागेल -- "तत्सम" बिरूद देऊन झटकता येणार नाही.
जर अशा अपवादांची यादी करणे नाहीतरी होणारच असेल, तर यादीत "पारंपारिक" हे वैकल्पिक रूप घालता येईल.
मला तरी वाटते, की लिखित नियमानुसार केलेला "पारंपरिक" हा उच्चार बहुतेक सुशिक्षित मराठी भाषकांना अप्रचलित म्हणून जाणवेल, खटकेलही. सर्वेक्षणात असे खात्रीपूर्वक दिसल्यास "पारंपारिक" रूप कोशात प्राथमिक म्हणून द्यावे, "पारंपरिक" हे केवळ नियमकर्त्यांच्या सन्मानार्थ वैकल्पिक म्हणून नोंदवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0