काउंट अॉफ माँटेक्रिस्टो-The Count of Monte Cristo

सक्काळ सक्काळ ही मुंबईतल्या बँक अॉफ बडोदावरच्या लुटीची (https://m.timesofindia.com/city/mumbai/gang-digs-40-ft-tunnel-under-3-sh...) बातमी वाचली अन् द काउंट अॉफ माँटेक्रिस्टो चित्रपटाची बेदम आठवण आली. तसं पाहिलं तर बोगदा खणून चोऱ्या करणं जेलातून पोबारा करणं ह्या थीमेवर कैक हिंदी, अहिंदी चित्रपट आले, काही गाजलेही. पण त्यातल्यात्यात मला हाच चित्रपट आवडलेला.
दोन खलाशी मित्र आणि एक मैत्रिण असा प्रेमाचा त्रिकोण असलेलं  चित्रपटाचं कथानक नेपोलियन बोनापार्टच्या काळात रंगवलेलं/भासवलेलं आहे. अर्थातच प्रेमाचा त्रिकोण असल्याने हा सूडपटही आहे.
दोन मित्रांपैकी एका मित्रावर नायिकेचं आणि नायिकेवर दोघां मित्रांच प्रेम असतं. नायिकेचं प्रेम असणारा मित्र आणि नायिका त्याला खलाशावरुन कॅप्टनचं प्रमोशन भेटल्यावर लग्न करणार असतात पण दुसरा मित्र मात्र जळकुटा, कबाब में हड्डी टैप असतो. एवढंच नाही तर तो या आकसापोटी त्याला एका प्रकरणात गोवून त्याला एका खंदकवजा जेलात पोहचवतो आणि तो मेला असं जाहिर करुन नायिकेबरोबर लग्न करुन घेतो.
इकडं जेलातला मित्रं कायै हे म्हणून त्रागा करुन कसेबसे साहेक वर्ष कंठल्यावर स्वतःचाच खात्मा करण्याच्या बेतात असताना त्याच्या सेलातली एक फरशी उचकते, आणखी उचकते, आणखी...अन् त्याच्याखालून एक म्हातारबुवा प्रकटतात. तो म्हतारा पळून जायच्या चक्करमध्ये बोगदा खणत खणत बाहेर जायचा रस्ता चुकून त्याच्या सेलात पोहचतो. मरायचं सोडून है क्या यह म्हणत चौकशीअंती तो म्हताराही कैक वर्षांपासून इथलाच रैवाशी असल्याचं कळल्यावर व बऱ्याच हो नै हो नै नंतर हा पण त्याला मदत करायला राजी होतो. एक दिवस बोगदा खणताना तो अंगावर कोसळून म्हातारा गंभीर जखमी होतो पण मरायच्या आधी एका खजिन्याचा नकाशा त्याला सोपवून देतो.
नायक तिथून एकटा पडलेला असतानाही कसा सुटतो?
त्याला खजिना भेटतो का?
त्याच्या दगाबाज, जळकुट्या मित्राचा सूड घेतो का?
हे सगळे प्रश्न अनुत्तरीत सोडून अगदिच वेळ असेल तर (कारण चित्रपट चांगला दोन-सव्वादोन तासांचा आहे आणि थोडा स्लो पण आहे) हा चित्रपट अवश्य पहा असा फुकटचा सल्ला देतो.

अवांतर: जेल तोडून पळण्याच्या थीमांवरचा महा स्लो पण ट्विस्टींग शेवट असणारा आणखी एक चित्रपट, The Shawshank Redemption, पण त्याबद्दल नंतर कधितरी, निवांत...

IMDb Rating: 7.7/10

टीप: तुम्हाला मी समीक्षा लिहीलेले व/वा इतर चित्रपटांचे हिंदी dubbed version हवे असल्यास व्यनी करणे. जेंव्हा घरी जाईल आणि मूड असेल तेंव्हा नक्कीच लिंक व्यनी करेल.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान मांडलयत.

मरायचं सोडून है क्या यह म्हणत चौकशीअंती ....

खूप हसले परत.

बाय द वे सी एच एच ने "" लिहीता येत नाहिये. कोणितरी याल का सांगाल का? (हे वाक्य त्या "जाल का सांगाल का त्या कोकीळा, रात्री तरी" गाण्याच्या चालीवर वाचावे.)

वरील सर्व 'छ', मराठी चन्घाटी वर जाउन टायपलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

C+h = छ होईल. दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकेन, पण खात्री नाही.

नवं मॉड्यूल क्रोमवर चांगलं चालतंय, त्यात बोलनागरीही आणता येतं, लिपीबदल सोयीचा आहे, शिवाय गमभनचं ड्रूपाल ७चं मॉड्यूल उपलब्ध नाही. त्यामुळे ते परत येण्याची शक्यता कमी आहे.

'काउंट ऑफ माँटेक्रिस्टो' जेवता-जेवता एकदा बघायला ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसी टंकण वैगेरे...
मनोबा मी तुमचा फ्यान है (अजून भरपुर जणांचा है, पण ही खरड मनोबाच्या टंकण समस्या विषयी जवळची वाटल्याने असल्या कारणाने...). मनोबाची खायची स्टैल अन् माझी, सारखीच वाटली.
तर मी ज्या वेळी ऐसीवर पहिल्यांदा टंकायला बसलो तेंव्हा कहिपे निगाहे टैप टंकायला सुरु झालं. मग दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा...
मी सरळ गिव्हअप करुन गुगल मराठी इनपुट टुल्स वापरलं.
मग गुगल इंडिक किबोर्ड डाउनलोडला अन् टंकायच कष्ट वाचलं.
कॉलेजातले इतर मराठी टंकण्यासाठी एपिएस मग मागं पडलं. कारण इंडिक किबोर्ड किंवा गुगल इनपुट टुल्स युनिकोडमध्ये टंकल जातं थं एपिएस मध्ये टंकलेलं एपिएस/आयएसएम नसलेल्या संगणकात गंडतं.
मोबाइल वरुन टंकायला तर कैक पर्याय आहेत, उदा. स्वरचक्र (आयायटी निर्मीत), मिंग्लीश, गुगल इंडिक (इथेपण) इ. इ.
फक्त अॉटोकरेक्ट जपून वापरायचं. एकदा लै तंतारली होती त्यापायी, पण जवळची मैत्रीण असल्या कारणाने नो इश्यू झाला. मी चार महिने मिंग्लीश वापरलंच नै मग.
थोडक्यात, ऐसीचा किबोर्ड सळायला लागला की वरील अथवा वर नसलेल्या पण असलेल्या किबोर्डच्या सवत आणायच्या. १४टॅन यांनी एकदा विचाराच्या गतीत टंकता येत नाही असं म्हटलेलं आठवतं. जे ह्यामुळं थोडफार का होइना सुसह्य होत.
(किबोर्ड हा जरी पुल्लिंगी असला तरी किज ह्या स्त्रीलिंगी, म्हणून सवत. आधीच उरकलेलं बरं, कुणाला हा प्रश्न पडला नसता म्हणून हिंट पण )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

मन आणि तुमच्या आयडीतले साम्य पाहता मनोबाचे फ्याण तुम्ही असणं साहजिकच आहे.

(पळा!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही आणि मनोबा सट्टाककन लिहिता ते आवडतं. बोली गतीमानता असते.
लिहित राहा आठवड्याला एक नवीन लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोली गतीमानता असते.

अगदी बरोब्बर च्रटजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोनेक आठवड्यांनी तरी प्रयत्न करेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

पळा

असं काही नसतं.
बाकी तुमचे मनोबा बरोबरचे खरडफळ्यावरचे लालेलाल युद्ध वाचून आहे हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

छान लिहिले आहे. imdb रेटिंगदेखील दिलेत ते बरे केले:)

टीप: तुम्हाला मी समीक्षा लिहीलेले व/वा इतर चित्रपटांचे हिंदी dubbed version हवे असल्यास व्यनी करणे. जेंव्हा घरी जाईल आणि मूड असेल तेंव्हा नक्कीच लिंक व्यनी करेल. >> मला करा व्यनि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक पाठवली आहे (व्यनी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

लेख मस्त आहे.
पिक्चर पहावासा वाटत आहे. पुस्तक वाचायचा यत्न केला होता, जमले नव्हते.
आयएमडीबी वर किती विश्वास ठेवावा असा एक प्रश्न पडतो कधीकधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आयएमडीबी वर किती विश्वास ठेवावा असा एक प्रश्न पडतो कधीकधी. >> imdb असो किंवा goodreads फक्त रेटिंग न पाहता कितीजणांनी रेटिंग दिलंय तेपण पहायच.

goodreadsवर तर मी लाख+ जणांनी रेट केल्याशिवाय त्या पुस्तकाच्या वाटेला शक्यतो जात नाही.

===
पण एक गोष्ट लक्षात आली आहे की मला आवडतील असे चित्रपट, पुस्तक मला imdb, goodreads वरूनच मिळतील .... मराठी आंजवरून नाही मिळणार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

imdb असो किंवा goodreads फक्त रेटिंग न पाहता कितीजणांनी रेटिंग दिलंय तेपण पहायच.

+११११

पण एक गोष्ट लक्षात आली आहे की मला आवडतील असे चित्रपट, पुस्तक मला imdb, goodreads वरूनच मिळतील .... मराठी आंजवरून नाही मिळणार

मला मिळते माझ्या आवडीचे बरेच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************