जुनं तेच कसं सोनं

कायअप्पा सगळ्यांच्या फोनवर घुसल्यापासून 'जुनं तेच कसं सोनं' हे लेख आजकाल खूप वाहत असतात. एकंदरीतच नॉस्टॅल्जीया प्रत्येकाकडे असतोच आणि त्याद्वारे रंजन करून घेणं ह्यात काहीच आक्षेपार्ह नाही. मात्र जेव्हा त्याचा वापर करून आपली पिढीच कशी जीवनमूल्ये जपत होती आणि आताची पिढी कशी करंटी, मूल्यविहीन किंवा मातलेली आहे असा सूर जेव्हा त्यातून आळवला जातो तेव्हा हे लेख एकदम एकांगी वाटू लागतात. आपल्या कुटुंबात आणि समाजात चिकित्सेपेक्षा श्रद्धेला मोठं स्थान आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा केलीच जात नाही. अशा गोष्टीवर ती केली तर मग पाहायलाच नको !

आम्ही "अ, ब, क" कसं मस्त एन्जॉय करत होतो, आताच्या पिढीला हे सुखच नाही हा एक सूर. कसं असेल? काळ बदलला. एन्जॉयमेंट ही प्रत्येकच पिढीला हवी असते. त्यांना ती आपल्या मार्गानेच मिळावी हा अट्टाहास का? नवीन पिढीची मूल्ये बदलली हा त्याचाच पुढचा भाग. बदललेली मूल्ये योग्य आहेत का आणि अयोग्य मूल्यांमुळे होणारा परिणाम किती वाईट हा मुख्य प्रश्न आहे. जुन्या पिढीनेही अनेक अयोग्य मूल्यांचा पाठपुरावा केला, त्याचं काय?

प्रत्येक माणूस निवड करताना opportunity cost चा विचार करतो. हा अर्थशास्त्राचा मूलभूत नियम आहे. त्यामुळे एखादी गोष्ट केल्याने/न केल्याने मोजावी लागणारी किंमत किंवा ती केल्याने/न केल्याने मिळणारं मूल्य हे व्यक्ती आणि पिढीसापेक्ष आहे हे आपण कधी लक्षात घेणार? "वेळ" ही एकच गोष्ट लक्षात घेतली तर ह्यात किती फरक पडला आहे. आम्ही सुटीचे दोन महिने आजोळी सुपारीच्या बागेत लोळण्यात आणि आंबे चोखत बसण्यात घालवले आणि आता बघा तीन दिवस गोव्याला हॉटेल मध्ये घालवतात वगैरे वगैरे .. ह्यात किती अर्थ आहे? जर का ते कुटुंब मिळालेल्या वेळात आपलं सौख्य वेगळ्या प्रकारे जपत असतील तर ते महत्त्वाचं की त्यांचा मार्ग?

मी अगदी स्वत:च्या उदाहरणाने सांगतो. दर एक-दोन महिन्यात आम्ही हजारोंची पुस्तके विकत घेतो. आणि वाचतोही Smile आता काही जण आम्ही कसे वाचनालयात नंबर लावून पुस्तके मिळवत होतो, रविवारी जुन्या बाजारात जाऊन दिवसभर पायपीट करून ती कशी मिळवत होतो, असं बरंच सांगतात. ह्यात ह्या मंडळीनी त्यांच्या प्राप्त परिस्थितीत त्यांचं वाचनप्रेम जपलं आणि जोपासलं हे महत्त्वाचं. मी त्याच मार्गाने का जाऊ? त्याने मला मी आता वाचतो त्या गतीने किंवा प्रमाणात वाचता येईल का? माझा मार्ग खर्चिक आहे हा मुद्दा आहे की वाचनप्रेम महत्त्वाचं?
त्यामुळे "आम्हीच कसे भारी होतो आणि आताचे कसे नाठाळ" हा क्षणिक आनंद आपण किती पसरवावा?
मुख्य मुद्दा त्या ही पुढचा आहे. जुन्या पिढीने किती मूल्य त्यांची जीवनपद्धती म्हणून अंगिकारली आहेत असं दिसतं? ते दिसलं तर नवी पिढी ती मूल्ये आत्मसात करु शकतील. नाहीतर फक्त ह्या अशा post वाचून सोडून देतील.

वाडासंस्कृती आणि शेजारधर्म हा एक असाच कायआप्पाचा आवडता विषय. पूर्वी दोन खोल्यात आठ आठ जण राहणारे वगैरे किती आता शेजारी आजारी असला तर चौकशीला जातात हो? त्याला जेवण नेऊन वगैरे देणं लांबच. साधं शेजारच्या बाईने रविवारी २ तास माझं मूल सांभाळा असं विचारलं तर ह्या "विश्वची माझे घर" ची पाटी गळ्यात घालून फिरणाऱ्या ९० टक्के आजी आजोबांच्या कपाळावर आठ्या येतील. ह्याचा अर्थ त्यांनी कष्टाने दिवस काढले नाहीत किंवा अवाजवी तक्रारी केल्या असा मुळीच नाही. पण त्यातलं किती अंगिकारलेल्या मूल्यामुळे आणि किती नाईलाजास्तव होतं आणि म्हणूनच बदलत्या परिस्थितीप्रमाणे बदललं हे लक्षात नको का घ्यायला?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आम्ही सुटीचे दोन महिने आजोळी सुपारीच्या बागेत लोळण्यात आणि आंबे चोखत बसण्यात घालवले आणि आता बघा तीन दिवस गोव्याला हॉटेल मध्ये घालवतात वगैरे वगैरे

हो ना, नतद्रष्ट जुने कुठले! अहो, गोव्याला तीनच दिवसांत जरी दोनच आंबे चोखले तरी त्याची सर, त्या दोन दोन महिने बागेत लोळण्याला येणार आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्लील अश्लील !!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हापूस आंबे का. लै ग्वाड असत्यात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

गोवा असेल तर माणकूर (की माणकुराद?) असेल ना, हापूस नसेल बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile छान .. लिहिताना अचूक शब्दयोजनेचं किती भान ठेवावं लागतं ह्याचा धडा मिळाला.. धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण लेखाला अनुमोदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज जी पिढी नोस्टॉजिक होते, त्यांच्या आधीच्या पिढीने पण हेच त्यांना ऐकवले असणारच. बदल होणारच, तो स्वीकारून पुढे जावे लागणारच. मी स्वतः std बूथ वरून बोललोय, लहान असताना, नंतर लांब दांडीचे ( बहुतेक motorola) फोन आले घरात, मग दणकट ब्लॅक न व्हाईट.. आता अँड्रॉइड आहेत, उद्या अजून काही येईल.

आणि आपण तेव्हा म्हणू, आमच्या काळी आम्ही झकास पैकी whatsapp मेसेज फॉरवर्ड करायचो (पिडायचो).. नाहीतर तुम्ही लोक.. वगैरे वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

नंतर लांब दांडीचे ( बहुतेक motorola) फोन आले घरात, मग दणकट ब्लॅक न व्हाईट.. आता अँड्रॉइड आहेत, उद्या अजून काही येईल.

Motorola Ericsson Siemens चा अश्लील विनोद आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जमल्यास इथे लिहा, न जमल्यास व्यनि करा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

नक्कीच. पण आधी तुम्ही प्रौढ आहात हे सिद्ध करा.

( पळा पळा पळा ..... )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेव्हा रविवारी सकाळी दूरदर्शन वर सहकुटुंब, शेजारपाजाऱ्यांसोबत महाभारत बघताना "भूल कोई हमसे ना हो जाये" या गाण्यासोबतची जाहिरात (तेव्हाची एकमेव कदाचित) लागायची तेव्हा मी पाणी प्यायला निघून जायचो.
(धन्य ते टायमिंग)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

...तो क्या फायदा?

तोच ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मारे पास ... छे -- वाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त, आमच्या व्हर्जनीत मारा पती ने पास ... छे असे होते.

सेम डिफरन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाहीतर तुम्ही लोक वगैरे .. हे फक्त टाळता येणार असेल तर जमावं अशी इच्छा आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हे सर्व रिझॅाटमध्ये उपलब्ध आहेत.
*म्हशीच्या पाठीवर बसून नदीत जाणे,
*चिखलात डुंबणे,
*सर्व प्रकारचे झोपाळे,
*झाडावर चढणे
वगैरे.
तुम्ही शिदोरी बरोबर नेऊन नदीवर पोहोल्यावर खात असाल. लोणावळ्यात लायन पॅाइंटला धबधब्यात बसून भिजताना शेजारचा हॅाटेलवाला गरमागरम कांदा/पनीर/क्यापसिकम भजी आणून देतो. बरणीतले पेय बरोबर असतेच. मग इतरांना टुकटुक माकड करण्यासाठी लाइव अपडेट्स!!
तरुण पिढी पिकनिकला गेल्यावर म्हाताराम्हातारीला घर मोकळेच असते फायरस्टिक-टिव्हि, बाथरुमसकट एकांत. लाइव अपडेट्स देण्याचा ओप्शन चोखाळण्याचा मार्गही ज्याचीत्याची आवड.
//प्रौढ सर्टिफिकेट मागू नये.//

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बैलगाड्याबी असतात. पण रानात बैलगाडी दांडाळणं लै सुखद. कंबरपाठ एक हुन जाते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

<< तरुण पिढी पिकनिकला गेल्यावर म्हाताराम्हातारीला घर मोकळेच असते >> .. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी पटलं..
मुल्यांचं तर सोडूनच द्या.. आमच्या आधीच्या २-३ पिढ्या काय घंटा मुल्य -बिल्य पाळणाऱ्या नव्हत्या. असलंच तर मुल्ये या नावाखाली ढोंगच असे. नोकरीत कमी पैसा मिळत असूनसुद्धा राहण्याला 'निष्ठा' वगैरे नाव दिले जाई, प्रत्यक्षात ऑप्शन नाहीन हे कारण असे. आदर या नावाचे ढोंग तर बावनकशी होते. दिसेल त्याला पाया पड आणी दाखव आदर असला प्रकार. प्रत्यक्षात त्या माणसाला दिसला तर गळा आवळावा अशी इच्छा होत असली तरी आदर दाखवलाच पाहिजे. प्रेमळपणा वगैरे तर नंबर एकचे झूट. अस्मिता या नावाखाली मागास झुंडशाही जोपासली जाई. इतकी माणसं कुटुंबात असत की पाठच्या भावाभावात देखिल बंध नसत. करारीपणा या नावाखाली मोठ्यांचा दहशतवाद खपवला जाई, सोशीकपण या नावाखाली सर्व्हाईलपणा पेरला जाई धाकट्यांच्या आणि मुख्यता मुलींंमध्ये. आमची एलपीजी बेबीजची(१९८५- ९५ मध्ये जन्मलेली) पिढी आणि त्यांचे आईबाप सुटले बाबा या जंजाळातून(आई- बाप पूर्ण नाही सुटले अजून, पण प्रक्रिया चालू आहे.) बदल मस्त स्विकारत आहेत माझे आई- वडिल. समृद्धी केवळ भौतिक सुखे घेऊन येत नाही तर वैचारिक, मानसिक निवांतपणा, मस्त मोकळेपणा देखिल घेऊन येते. स्मृती रंजनाच्या कढांत पोरासोरांना गुदमरवून टाकणे बंद करताहेत निदान माझ्या आई- वडिलांच्या वयाची माणसे तरी. एक छोटे उदा. पुर्वी माझ्या आजीच्या देखरेखीखाली सोवळ्यात स्वयंपाक, कुळाचार करणारी, आजींचं सगळं शब्दश: ऐकणारी माझी आई काही वर्षांपासून बिनधास्त आजींना खोटे सांगून सोवळ्याला धाब्यावर टाकत असे. परवाच तिने लग्नात पत्रिका अन जात- बित बघणं मुर्खपणा आहे अशी टिप्पणी केली अन मला धक्काच बसला.
पुस्तकांच्या बाबतीत तर नॉस्टॅल्जियाचा बांध फुटतोच फुटतो. ते तुमचं किंडल अन फिंडल राहू द्या तुमच्याकडेच असला तुच्छतेचा सूर..
निदान आता मध्यमव्यात असणारी पिढी याबाबतीत चांगलीच ॲडाप्टेबल आहे, टेक्नॉलॉजी आली की शिका असा दृष्टीकोन असल्यामुळे जुन्या म्हाताऱ्यांच्या कर्मठपणातील कोतेपणा मागे टाकून चाललेली ही माणसे गोड वाटतात.
तरी आबा म्हटलेले तसे मिलेनियलांचा पण नॉस्टेल्जिया कुठेकुठे दिसतो मधूनमधून, दिसला की धरून ठोका त्याला तिथेच. Tongue Tongue

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पुंबांशी जोरदार सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्मरणरंजन करावं .. पण वर्तमानाला नाकारून आणि अव्हेरून नको .. बाकी तुम्ही दिलेला इतर दांभिकपणा चिकटलेला आहेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा, काय लिवलंय काय लिवलंय!!!! अगदी एक नंबर मस्त प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्येक माणूस निवड करताना opportunity cost चा विचार करतो. हा अर्थशास्त्राचा मूलभूत नियम आहे. त्यामुळे एखादी गोष्ट केल्याने/न केल्याने मोजावी लागणारी किंमत किंवा ती केल्याने/न केल्याने मिळणारं मूल्य हे व्यक्ती आणि पिढीसापेक्ष आहे हे आपण कधी लक्षात घेणार? "वेळ" ही एकच गोष्ट लक्षात घेतली तर ह्यात किती फरक पडला आहे. आम्ही सुटीचे दोन महिने आजोळी सुपारीच्या बागेत लोळण्यात आणि आंबे चोखत बसण्यात घालवले आणि आता बघा तीन दिवस गोव्याला हॉटेल मध्ये घालवतात वगैरे वगैरे .. ह्यात किती अर्थ आहे? जर का ते कुटुंब मिळालेल्या वेळात आपलं सौख्य वेगळ्या प्रकारे जपत असतील तर ते महत्त्वाचं की त्यांचा मार्ग?

ह्यावरुन http://aisiakshare.com/node/3290 हे आठवलं.
.
.
आणि

Permalink Submitted by पुंबा on गुरुवार, 12/10/2017 - 09:48.
अगदी पटलं..
मुल्यांचं तर सोडूनच द्या.. आमच्या आधीच्या २-३ पिढ्या काय घंटा मुल्य -बिल्य पाळणाऱ्या नव्हत्या. असलंच तर मुल्ये या नावाखाली ढोंगच असे. नोकरीत कमी पैसा मिळत असूनसुद्धा राहण्याला 'निष्ठा' वगैरे नाव दिले जाई, प्रत्यक्षात ऑप्शन नाहीन हे कारण असे. आदर या नावाचे ढोंग तर बावनकशी होते. दिसेल त्याला पाया पड आणी दाखव आदर असला प्रकार. प्रत्यक्षात त्या माणसाला दिसला तर गळा आवळावा अशी इच्छा होत असली तरी आदर दाखवलाच पाहिजे. प्रेमळपणा वगैरे तर नंबर एकचे झूट. अस्मिता या नावाखाली मागास झुंडशाही जोपासली जाई. इतकी माणसं कुटुंबात असत की पाठच्या भावाभावात देखिल बंध नसत. करारीपणा या नावाखाली मोठ्यांचा दहशतवाद खपवला जाई, सोशीकपण या नावाखाली सर्व्हाईलपणा पेरला जाई धाकट्यांच्या आणि मुख्यता मुलींंमध्ये. आमची एलपीजी बेबीजची(१९८५- ९५ मध्ये जन्मलेली) पिढी आणि त्यांचे आईबाप सुटले बाबा या जंजाळातून(आई- बाप पूर्ण नाही सुटले अजून, पण प्रक्रिया चालू आहे.) बदल मस्त स्विकारत आहेत माझे आई- वडिल. समृद्धी केवळ भौतिक सुखे घेऊन येत नाही तर वैचारिक, मानसिक निवांतपणा, मस्त मोकळेपणा देखिल घेऊन येते. स्मृती रंजनाच्या कढांत पोरासोरांना गुदमरवून टाकणे बंद करताहेत निदान माझ्या आई- वडिलांच्या वयाची माणसे तरी. एक छोटे उदा. पुर्वी माझ्या आजीच्या देखरेखीखाली सोवळ्यात स्वयंपाक, कुळाचार करणारी, आजींचं सगळं शब्दश: ऐकणारी माझी आई काही वर्षांपासून बिनधास्त आजींना खोटे सांगून सोवळ्याला धाब्यावर टाकत असे. परवाच तिने लग्नात पत्रिका अन जात- बित बघणं मुर्खपणा आहे अशी टिप्पणी केली अन मला धक्काच बसला.
पुस्तकांच्या बाबतीत तर नॉस्टॅल्जियाचा बांध फुटतोच फुटतो. ते तुमचं किंडल अन फिंडल राहू द्या तुमच्याकडेच असला तुच्छतेचा सूर..
निदान आता मध्यमव्यात असणारी पिढी याबाबतीत चांगलीच ॲडाप्टेबल आहे, टेक्नॉलॉजी आली की शिका असा दृष्टीकोन असल्यामुळे जुन्या म्हाताऱ्यांच्या कर्मठपणातील कोतेपणा मागे टाकून चाललेली ही माणसे गोड वाटतात.
तरी आबा म्हटलेले तसे मिलेनियलांचा पण नॉस्टेल्जिया कुठेकुठे दिसतो मधूनमधून, दिसला की धरून ठोका त्याला तिथेच.

ह्यावरुन http://aisiakshare.com/node/1603 हा धागा आठवला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

आला मनोबा, पण फक्त स्वताच्या धाग्याची जहिरात करण्यासाठी Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद .. वाचतो ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतके दिवस मुक्त अर्थवाद वि. समाजवाद, निधर्मी वि. हिन्दुत्ववादी, इथले वि. उपरे, मनूला शिवीगाळ करणारे वि. मनु-जुना-झाला-त्याला-सोडा-वाले, मोदी-अंध वि. मोदी-शत्रु, नागरी वि. ग्रामीण, पुण्यामुंबईचे वि. पुण्यामुंबईबाहेरचे, अतिस्त्रीमुक्तिवादी वि. स्वातन्त्र्य-जपून-वापरा-वाले, प्रमाणलेखन वि. स्वैर लेखन, शुद्ध मराठी वि. मिंग्लिश, श्रद्धा वि. विज्ञान असे अनेक वाद खलबत्त्यामध्ये कुटायला पडलेले आहेत. अशा सदाहरित विषयांवर प्रत्येकाला काहीतरी लिहिता येत असल्याने अशा वादांवरचे धागे मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढता वाढता वाढे असे वाढत राहतात. त्यात आता जुनी जीवनशैलीवाले वि.नवी जीवनशैलीवाले अशाहि एका नव्या वादाची भर पडत आहे ही गोष्ट चित्ताला सुखवीत आहे.

अर्थात हाहि वाद वाटतो तितका नवा नाही. त्याचा इतिहास कालिदासाच्या काळापर्यन्त तरी मागे खेचता येतो कारण त्यानेच म्हणून ठेवले आहे - पुराणमित्येव न साधु सर्वम् | न चापि काव्यं नवमित्यवद्यम् | (एखादे काव्य जुने आहे म्हणून सुंदर आहे असे नसते, तसेच एखादे काव्य नवे आहे म्हणून टाकाऊ आहे असेहि नसते.)

Long live ऐसी!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक लिहिण्याचे राहूनच गेले ते लिहितो.

'इथले वि. उपरे' ह्या वादाच्या अनेक पातळ्या आहेत. ते उतरत्या क्रमाने लिहितो.

१) भारतीय वि. अन्यदेशीय
२) महाराष्ट्रातील वि. उरलेले अन्य भारतीय
३) महाराष्ट्राच्या 'क्षयझ' भागातील वि. उरलेले अन्य महाराष्ट्रीय
४) महाराष्ट्राच्या 'क्षयझ' जातीचे वि. उरलेले अन्य महाराष्ट्रीय
५) महाराष्ट्रातील 'क्षयझ' जातीतील 'अबक' ह्या पोटजातीचे वि. अन्य सर्व, जसे की चित्पावन वि. उरलेले अन्य ब्राह्मण.

ह्या वादांची भेंडोळीच्या भेंडोळी कायप्पा आणि चेपु वरून समोर येऊन पडत असतात. त्यांना आता ऐसीवरहि स्थान मिळणार असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुंबा पेटले की काय?

मी सहमत. मी अगदी लहानपणापासून बय्राच गोष्टींत सुरुंग लावत आलो आहे. चर्चा नव्हे थेट कृती.

जुने लोक फार दबले होते त्यांच्या जुन्या पिढिपुढे. पण आता निर्ढावलेत. ताट वाढताना डावी उजवी बाजूचे पदार्थ वाढण्यात चूक झाल्यावर बोलणी खाल्लेले आता समारंभातल्या बुफेवर फारच खुश आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ज्या काही मोजक्या गोष्टींची भीती वाटते, त्यातली ही एक. कधी ना कधी, मीही म्हातारी होईन आणि "आमच्या काळी असं नव्हतं हो", असं म्हणायला लागेन. मला त्या दिवसाची भीती अधूनमधून वाटत राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कधी ना कधी, मीही म्हातारी होईन आणि "आमच्या काळी असं नव्हतं हो", असं म्हणायला लागेन.

आम्ही तर आत्ताच म्हणतो. नव्हे, कित्येक वर्षांपासून म्हणत आलो आहोत.

आणि, पकविण्यासाठी आम्हांस आड्यन्स 'पुढच्या पिढी'तलाच लागतो, असेही नाही. वयाने किमान पाच वर्षांनी लहान असणे हे आमच्या लेखी 'पुढच्या पिढी'करिता क्वालिफाय होते. (बायकोलादेखील याच कॅटेगरीखाली पिडतो.)

इत्यलम्|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... isn't what it used to be.

-Peter De Vries ("probably the funniest writer on religion ever".)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0