बीती ना बिताई रैना

खिडकी समोर माझी rocking chair, उघड्या खिडकीतून salone च्या पंपातून निघणाऱ्या हलक्या फवाऱ्यागत आत येणारा पाऊस, आणि मोबाईलच्या एफएम वर वाजणारं गाणं...
बीती हुई बतीयां कोई दोहराए
भुले हुए नामों से कोई तो बुलाये
चांद की बिंदी वाली, बिंदी वाली रतीया
जागी हुई अंखियो में रात ना आई रैना....

का, कुणास ठाऊक, पण ही रात संपूच नये असं वाटतं.. आणि ही रात त्रास पण देतीय, आणि हा पाऊस वैऱ्यासारखा भासतोय. कारण; कारण हा पाऊस आठवण करून देतो, पाऊस म्हणतो की तू हरवलं आहेस काहीतरी. त्याच्या या आरोपासरशी आठवतं, की कपाटाच्या एका आतल्या खणात काही गुलाबी पत्रं आहेत. म्हणजे गुलाबी कागदावरली नव्हे, गुलाबी भावनांची पत्रं..
गिचमीड अक्षरातली, पांढऱ्या कागदावर काळ्या फाउंटन पेनाने लिहिलेली गुलाबी पत्रं.
वाटतं की उठून वाचावीत. कपाटावर नजर पडते खरी, पण पाय काही उठत नाही. तेच पाय आरामात खिडकीवर ठेवून, दोन्ही हात डोक्यामागे बांधून मी बसते शून्यात नजर लावून. अजाणताच हाताचा अंगठा, कानामागे, केसांच्या थोडं खाली जाऊन थांबतो, आणि तीच वेडी लहर पूर्ण अंगात दौडून जाते, जी तू तिथे ओठ टेकवल्यावर अधीर करायची..
काळ्या ढगांसारख्या तुझ्या सावळ्या खांद्याचा तो धुंद गंध वेचून, नाहणाऱ्या जमिनीगत गंधाळणारी मी.. सतारीवर छेडलेल्या तारेगत थरारून जाणारी मी, आणि तेव्हा लवकर सरणारी आणि म्हणूनही शत्रू वाटणारी, ही रात..

एक इच्छा होती तेव्हा, की या गाण्यासोबत तुझी आठवण कधीच यायला नको.. पण आलीच बघ.
युग आते हैं, और युग जाये
छोटी छोटी यादो के पल नहीं जाये
झूठ से काली लागे, लागे काली रतीया
रुठी हुई अंखियो ने लाख मनाई रैना...

आता मनसोक्त बरसल्याशिवाय ही रात जाणार नाहीच.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

याच गाण्यावर अजोंनी लेख लिहिलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्या लेखावर मी दिलेल्या प्रतिक्रियेत उल्लेख केलेला लेख (जिलबी) ती हीच.
आपल्याला लेख आवडला असावा अशी आशा करतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

याच गाण्यावर अजोंनी लेख लिहिलेला.

आणि त्यामुळेच त्यांच्यात असामान्य प्रतिभा दडलेली आहे, याचा ऐसीकरांना शोध लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

अहो, हे मात्र अति झालं हं. एखाद्या अभिनेत्याचा पहिलाच आणि तेवढा एकच चित्रपट चुकून माकून सुपरहिट होतो. नंतर तो कुठे दिसत पण नाही. माझं ते पहिलंच चिंतनपर लिखाण होतं. आपल्या ऐसिवरच्या लाईफ टाईम अवार्ड मिळवणाऱ्या लोकांमधे माझ्यामधे शोध लागावं असं काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुण दाते मप्रत गझल गायचे. त्यांनी भावगिते गायल्यावर लोकप्रिय झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेणो काम तेणो ठाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

मुक्तक आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक इच्छा होती तेव्हा, की या गाण्यासोबत तुझी आठवण कधीच यायला नको.. पण आलीच बघ.

असतात काही ॠणानुबंध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.