सेलिब्रिटी कल्चर

वाढतं सेलिब्रिटी कल्चर आणि त्याचा जनमानसातला परिणाम ही एक चिंताजनक गोष्ट आहे. मात्र त्याबद्दल विशेष चिंता आजूबाजूला दिसत नाही ही त्याहून मोठी चिंतेची बाब आहे.

काही व्यवसाय हे लोकाभिमुख असतात. ह्या व्यवसायातल्या माणसांना जराही यश मिळालं तरी आपसूकच प्रसिद्धी मिळते. इतर अनेक क्षेत्रात अनेक यशस्वी, पराक्रमी आणि उत्तुंग व्यक्ती आहेत. मात्र केवळ प्रसिद्धी हे त्यांच्या कामाचं Biproduct नसल्याने त्यांची ओळख ही फारच मर्यादित राहते. रंजन आणि क्रीडा ह्या क्षेत्रातील लोकांना घेऊन आपापल्या Product चं मार्केटिंग करणं हा अनेक कंपन्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. ह्यात चूक काही नाही. मात्र सेलिब्रिटी होणं म्हणजेच यशाची अंतिम पायरी ह्या विचाराला दिवसेंदिवस जास्त खतपाणी घातलं जाणं हे वाईट आहे. आज जिथे तिथे फक्त ह्या सेलिब्रिटीची सद्दी आहे. आणि आपल्या दैनदिन आयुष्यात ती येऊन पोचली आहे. अगदी दहिहंडीच्या फ्लेक्स पासून ते फेसबुक भिंत भरून टाकणाऱ्या पोस्टींपर्यंत.

तुमच्या नात्यात जर का कोणी सेलिब्रिटी असेल तर त्यांना घरगुती कार्यक्रमातून मिळणारी वागणूक आणि तिथे असलेली त्यांची वागणूक पाहून तुम्हाला नक्कीच विषाद वाटला असेल. अशाच एका कार्यक्रमात मला एक सेलिब्रिटी पाहण्याचा योग आला. कोण, कुठली सिरीयल आणि त्यात वर्णी लागली काय, आपण अगदी इंग्रीड बर्गमन आहोत ह्या थाटात ती वावरत होती. बिनसाखरेच्या चहा पासून ते स्पेशल फोटोसेशन पर्यंत तिचं कौतुक पुरवण्यापर्यंत यजमानांसकट सगळे मग्न होते. इतर लोकही आपल्या आमंत्रणाखातर आले आहेत आणि आपण त्यांना अतिशय दुय्यम वागणूक देतो आहोत ह्याची कुठे जाणीव ही नव्हती. एकंदरीतच कोणत्याही विशेष कर्तृत्त्वाशिवाय त्या सेलिब्रिटीला डोक्यावर घेणारी जनता पाहून वैषम्य वाटलं. मात्र एकदा मी मुंजीला गेलो असताना, तिथे नंदन निलेकणी आले होते. ते मुंजमुलाच्या जवळच्या नात्यात होते. त्यांचा एकंदरीत वावर हा इतर कोणत्याही नातेवाइकापेक्षा वेगळा नव्हता. त्या माणसाविषयी असलेला आदर अनेक पटींनी वाढला. ह्या दोन घटनांची तुलना केल्यावर सेलिब्रिटी कल्चरचा उथळपणा अगदीच जास्त जाणवला. माझ्या ओळखीच्या एका प्रथितयश पोटाच्या डॉक्टरने क्लिनिकच्या उद्घाटनाला Jacky Shroff बोलावला होता. ह्याच्याकडे तो आला म्हणून बाकीच्यांची पोटं दुखून लगेच खूप पेशंट मिळतील अशी बिचाऱ्याची भाबडी समजूत असावी.

रियुनिअन ला जाऊन आलेले अनेकजण म्हणाले की त्यांच्या शाळेच्या गेटटुगेदरला "सेलिब्रिटी" विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणसंस्थेला सेलिब्रिटीची पडणारी भूल हा तर खूपच मोठा धोका आहे. असाच अनुभव मलाही आला. आमच्या शाळेचा एक कार्यक्रम मागच्या वर्षी होता. मी पुण्याहून काय करू शकतो हे विचारायला मुख्याध्यापकांना फोन केला. एकंदरीत रूपरेषा काय आहे हे विचारलं. त्यांनी स्टेजवर Avadhoot Gupte, Guru Thaakur वगैरे मंडळी असतील हे सांगण्यातच सगळा वेळ खर्ची केला. ही मंडळी स्टेजवर असतील म्हणून इतर विद्यार्थी येण्याची शक्यता वाढेल हे विशेष नमूद केलं. मी ही मग फक्त शुभेच्छा व्यक्त केल्या. इथे ह्या दोघांबद्दल, त्यांच्या प्रसिद्धीबद्दल मुळीच कणभर ही आकस नाही. उलट ह्या दोघांचं कौतुक आणि अभिमानच आहे. अवधूत तर मित्रच आहे. पण यशस्वी विद्यार्थी म्हणून फक्त सेलिब्रिटी प्रोजेक्ट करण्याइतका व्यावसायिक दृष्टीकोन शाळेने ठेवावा?

आज ही मंडळी आयडॉल्स आहेत, रोल मॉडेल्स आहेत, हिरो आहेत. समाजातल्या अप्रसिद्ध हिरोना कोणी फारसं विचारत नाही. राजू परुळेकर "संवाद" हा मुलाखतीचा कार्यक्रम करत असे. त्यात अशा अनेक व्यक्तींच्या मुलाखती ऐकायला मिळाल्या. हा कार्यक्रम करावा असं वाटण्याचं कारण सांगताना Raju Parulekar म्हणतात "The thought of ‘Sanvad’ germinated in my mind, on the onset of one incidence. A world renowned gynecologist, Dr. Mhatre was awarded the Man World award in 2005. He stays in Dadar, Mumbai but his identity is restricted to the fact that, he stays below Anup Jalota’s apartment." त्यानंतर असा अजेंडा दीर्घकाल राबवणारं काही फारसं पाहण्यात आलं नाही.

आज चंदेरी सृष्टी आणि व्यवसायाचं आकर्षण इतकं वाढलं आहे की बाकी क्षेत्रात जाऊन हिरो होण्याची महत्त्वाकांक्षा आकसते आहे. स्वत:ला Brand म्हणून विकसित करून मिळेत त्या सुपाऱ्या खाऊन पोट भरणे ही यशाची परिसीमा असावी. त्यामुळेच आजूबाजूला फिल्म, सिरियल्स आणि नाटक ह्या सगळ्याशी निगडीत कार्यशाळांचं पीक आलं आहे. आपण कोणत्या सेलिब्रिटीसारखे दिसतो हे जाणून घेण्याचं प्रचंड आकर्षण असणारे आणि तोंडाला मेकप फासला तरी आपण विदूषक दिसतो हे न जाणता आपलं कसं शाहरुख नाहीतर करीना शी साधर्म्य आहे हे फेसबुकवर सांगू पाहणाऱ्या पालकांची पुढची पिढी ह्या कार्यशाळांत भविष्याची स्वप्नं रंगवते आहे. असो.

कार्यक्रम नको पण सेलिब्रिटी आवर अशी भावना समाजात वाढो हीच सदिच्छा !

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बघा हं ! तुम्ही पण "हल्ली" वाढलेल्या सेलिब्रिटी कल्चरबद्दल बोलताय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐसीकरांना अजुन एक मिळाला हलाल करायला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळेच काही हलाल वाले नसतात ! काही झटका वाले पण असतात ना !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुतै , हलाल करण्यातली गळ्याला लावलेली पहिली पवित्र सुरी तुमची पण असते हे विसरू नका , आठवा ते चांगदेवांचे पत्र !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापटण्णा, नविन मेंबरचा गैरसमज होइल हो माझ्या बद्दल तुमच्या अश्या बोलण्यानी. मी साधी , सज्जन ,१००% शाकाहारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर लोकही आपल्या आमंत्रणाखातर आले आहेत आणि आपण त्यांना अतिशय दुय्यम वागणूक देतो आहोत ह्याची कुठे जाणीव ही नव्हती.

ही अशी जाणीव नसणे हे इष्टच आहे. मी त्याचे स्वागत करतो. सिरियसली. भेदभाव व्हायलाच हवा. भेदभाव करणे हे जीवनाचे मूलभूत अंग आहे. सिरियसली. सगळ्या पाहुण्यांनी त्यांना समान वागणूक मिळावी अशी अपेक्षा करणे हा खरोख्खर चक्रमपणा, बेअक्कलपणा आहे.
.
------
.

कार्यक्रम नको पण सेलिब्रिटी आवर अशी भावना समाजात वाढो हीच सदिच्छा !

बक्कळ कार्यक्रम हवेत व ढीगभर सेलिब्रिटी सुद्धा हव्यात - ही भावना समाजात वाढीस लागो ही सदिच्छा.
.
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

मराठीत सिलेब्रटी( =?) कोण?
ज्यांना पाहण्यासाठी धडपड होईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हाग्रू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुजो, तुमचा मंप होण्यापासून थांबवा बरं..
नाही लिहिताय बरं पण धडाधडा टाकू नका.
अनु राव, बापट यांचा आदर्श घ्या, लेख न टाकता पण त्यांचा कसा दबदबा आहे पहा.
Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पुंबा, तुम्हाला सुचवलेली सिरिअल तुम्ही बघत नाहीत तो पर्यंत ऐसीवर फिरकु नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी इथे नवखा आहे .. शिकायला अवधी द्या Smile मंप म्हणजे काय हे आधी मला पहावं लागेल ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का हो पुम्बा आमच्यावर उडताय ?
आम्ही किरकोळ वाचक मंडळी , जरा लेखकाला जास्त 'समजून' घेतले तर काय बिघडलं ?
( आम्हाला लिहिता येत नाही हा गुन्हा समजला जाऊ नये . वाचता येतं ...हाही गुन्हा नसावा )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हसण्यावारी घ्या अशी विनंती करायला हवी होती..
बापटसाहेब, उलट लेख न लिहिता मध्ये तुम्हाला उचकवण्याचा हेतू होता..
चिडू नका.. लोभ असू द्या..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

यावरून एक किस्सा आठवला. आमच्या शाळेचं एकदा गेटटुगेदर ठेवलेलं. शाळेत असताना काही ठराविक सेलिब्रिटी विद्यार्थी असतातच. पण गेट टुगेदरच्या वेळी हे काही दिसेनात. कार्यक्रम सुरु असताना अचानक त्यापैकी काहींचं आगमन झालं सर्वत्र कुजबुज सुरु झाली. सगळ्यांच्या कौतुकी नजरा तिकडेच वळल्या. कार्यक्रम संपल्यानंतरही अनेक शिक्षक त्यांनाच घेरून उभे होते. १५ वर्ष उलटली तरी त्यांचं ग्लॅमर असं अबाधित राहिलेलं पाहून हेवा वाटलाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण ओ कोण हे? ते राज्यात पहिले आलेले तेच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या रियुनिअन गेटटुगेदरनंतर आम्हाला कायम आमंत्रण असते.
कोणी साम्पल असल्याशिवाय मजाच येत नाही ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0