माण णा माण‌, मी पाय‌ला सुल‌ताण !

प्रसंगः- वोल्वोचा प्रवास

वेळः अर्थातच कुवेळ

घटना:- सुलताण पिक्चर बघायला लागणे

तर, मी आप‌ला, असाच मौजमजेसाठी प्रवास करत होतो. तसं पहिल्यांदा, बरं चाललं होतं. म्हणजे बस वेळेवर सुटली होती, सीट मनासारखी मिळाली होती, रिक्लायनिंग सीट चक्क काम करत होती, वरचा एसीच्या हवेचा फवारा बंद करता येत होता. गंतव्य स्थान यायला चांगले चार तास तरी होते. छान पैकी डुलकी काढावी, म्हणून डोळे मिटले. अल्पावधीत झोप लागलीही. थोड्याच वेळात मोठ्ठ्या आवाजात पार्श्वसंगीत सुरु झाले. दचकून जागा झालो(यांच्या पार्श्वभागावर एक सणसणीत ... द्यावी अशी इच्छा झाली). समोरचा टी.व्ही. चालू झाला होता. बलराज सहानीचा मुलगा, त्याच्या सिनेमातल्या मुलाला लेक्चर देत होता. त्याच्या तोंडी सुलतान, सुलतान असे काहीसे ऐकू आले आणि थोड्याच अवधीत नेहमीच्या सलमान स्टाईलने शिणिमा सुरु झाला. पैलवाण असावा तर सलमाणसारखा! (हरियाणवी भाषेत 'ण' चा अखंड पाठ सुरु झाल्यामुळे यापुढे तुम्हाला या लेखात औषधालाही 'न' सापडणार नाही)

तर आपला सलमाण पहेलवाण, त्याच्या उंचीपेक्षा जास्त, अशा फसलेल्या ट्रॅक्टरचे चाक लीलया काढून देत होता. अणेक पहिलवाणांना डोक्यावर हात साफ करुन, क्षणार्धात अस्माण दाखवत होता. कुस्ती म्हणजे डावपेच वगैरे काही णसते बरं, सीधा उचलायचा आणि पटकायचा, उचलायचा, पटकायचा! (मला वाटतं, जरीपटका चा अर्थ सुद्धा, जरी कोणी अंगावर आला तरी त्याला पटका, असाच असला पाहिजे) प्रत्येक राऊंडचा निकाल ३० सेकंदातच लावायचा. आता नुसतीच अशी पटकापटकी किती वेळ दाखवणार ? म्हणूण त्याला थोडी इमोसणल स्टोरीची झालर लावायची. तर आमच्या सलमाणभाईणे कुस्ती का सोडलेली असते? तर, त्याची पैलवाणीण बायकु त्याला सोडूण गेलेली असते. ती का सोडूण गेली असते? कारण की, तिचा मुलगा ओ णिगेटिव्हचं रक्त न मिळाल्यामुळे गेलेला असतो. तो का मरतो? कारण की, त्याचे ओ णिगेटिव्हचा अमर्याद साठा असलेले पिताश्री, ऑलिंपिक जिंकायला गेलेले असतात. बायकु पण पैलवाणीण असताना ते एकटेच का गेलेले असतात ? कारण त्यांणी पुरुषार्थ गाजवलेला असतो आणि त्यांच्या पुरुषार्थाचा त्यांना इतका गर्व असतो की मुलगाच ज्ण्माला येणार, याची त्यांणा खात्री असते. तर अशा सलमाणभाईंणा कुणीच पटकावू शकत नसते, पण णियतिणे पटकावले, याचे त्यांणा अतोणात दु:ख होते आणि ते पैलवाणकी सोडतात आणि रक्तपेढी उभी करण्याच्या प्रयासाला लागतात. णोकरी साधी मग पैसे कुठूण आणायचे या पेढीला ? डायरेक्टर हा प्रश्ण सहज सोडवतो. परिक्षित सहाणीचा मुलगा त्याला आमिष दाखवतो. फ्री स्टाईल कुस्ती खेळ आणि बक्षीसाच्या पैशातून ब्लड बँक, हाय काय आण णाय काय! सलमाण तयारीला लागतो. सर्वप्रथम तो आरशात आपले सुटलेले पोट बघतो. ते बघून त्याला धर्मिंदर पेक्षाही वाईट रडू येते. पण कुणी आव्हाण दिले की आमचा गडी पेटूण‌ उठणारच्(दुसर्‍यांणा पटकायला)

तर, खाली धरती असल्यामुळे, वरुण अल्ला मेहेरबाणी करतो. अल्ला मेहेरबाण तो सलमाण फ्री स्टाईल प‌हेल‌वाण्! सेमी फायणलला गडी जबरी जखमी होतो. बायक्कु धावत येते. इमोसणमा प्रमोस‌ण! फायणल चा णिकाल अपेक्षेप्रमाणेच लागतो. ब्लडी बँक उभी रहाते. बायक्कु पुण्हा पहिलावाणीण होते. पुन्हा बायकार्थ आणि पुरुषार्थ! पिचकर कॉमेडी म्हणून शेवट कॉमेडीच व्हणार!

तळटीपः- प्रवास संपून आम्ही मार्गस्थ झालो, दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास होता. फार चढली तर, स‌क्काळी, उताराही त्याचाच लागतो, असे म्हणतात. योगायोग पहा, परतीच्या प्रवासात ढॅणटढॅण झाल्यावर टी. व्ही. कडे पाहिले तर, 'दंगल' सुरु होत होता.

त्या उतार्‍यावर फायनल किक‌: 'दंगल' संपल्यावर 'रईस" सुरु झाला !!!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लौल!

वोल्वोम‌ध‌ले सिणेमे हा एक‌ भ‌य‌ंक‌र‌ प्र‌कार‌ अस‌तो. एक‌दा पुणे नाशिक‌ प्र‌वासात‌ 'प‌र‌देसी बाबू' ब‌घाय‌ला लाग‌ला होता. दोन‌ म‌हिन्यांनी त्याच‌ ब‌स‌ने गेलो त‌र‌ प‌र‌त‌ प० बा०. ड्राय‌व्ह‌र‌चं गोविंदानाम‌स्म‌र‌णाचं व्र‌त‌ असाव‌ं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

व्होल्वोअम्ध्ये फार‌ सिनिमे पाहिले नाहीत‌. म्ह‌णजे व्होल्व्हो ब‌स‌ आल्या त्यान‌ंत‌र‌ फार‌ ब‌स‌प्र‌वास‌ केला नाही. प‌ण‌ त्यापूर्वी घाट‌गे पाटील‌ म्ह‌णू न‌का प‌व‌ब‌ टूरिस्ट‌ म्ह‌णू न‌का...... अक्ष‌य कुमार‌ आणि सुनिल‌ शेट्टीचे लै सिनेमे पाहिले. तिर‌शिंग‌रावांना निदान‌ येताना वेग‌ळा सिनेमा प‌हाय‌ला मिळाला. मी त‌र‌ जाता येता तोच‌ सिनेमासुद्धा पाहिला आहे.

बाकी लेख‌ म‌स्त‌च‌ !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पटकीबद्दलचे विनोद वाचण्याच्या अपेक्षेनं आले होते. तुम्ही निराशा केलीत. तुमच्यासारख्या लोकांनी पटकीचं डॉक्यूमेंटेशन केलं नाहीत, तर ते औषधालाही सापडणार नाही. सुलताण बघूनसुद्धा तुमच्या डोक्यात सुलेमानी किडे आले नाहीत.

बसमधले सिणेमे या प्रकाराचा मलाही मर्यादित अनुभव आहे. पण एवढा वाईट अनुभव नाही. एकदा मात्र अजयदेवगणआणिमंडळींचा 'ऑल द बेस्ट' नावाचा सिनेमा लागला होता. त्यात काही जोक अगदी वाईट होते; so bad that it's good छापाचे. (किंवा नंदनची आठवण येईल असे.) ते ऐकून बसमध्ये हसावं का नाही, असा प्रश्न पडला. पण आजूबाजूची जनताही अशाच प्रश्नात अडकलेली दिसली. एक सहप्रवासी हसायला लागल्यावर बाकीचेही सुटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा छान प‌रीक्ष‌ण्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प‌ट‌की चे डॉक्युमेंटेश‌न क‌राय‌ला सुच‌ले नाही हे ख‌रे. प‌ण त्याव‌रुन एक आठ‌व‌ण झाली. एक‌दा सिंह‌ग‌डाव‌र गेलो होतो. व‌र गेल्याव‌र‌ इत‌रांसाठी थांब‌लो होतो. तिथ‌ल्या कात‌क‌री बाय‌का 'ताक‌' विचार‌त होत्या. माझा मित्र‌, हे प‌ट‌की स्पेश‌ल ताक‌ आहे, असे पुट‌पुट‌ला. प‌ण त्या बाय‌कांनी ते ऐक‌ले. म‌ग आम‌चा जो काही उद्धार झाला! शेव‌टी, मीच‌ पुढाकार घेऊन ताक‌ विक‌त घेत‌ले आणि वादाव‌र प‌ड‌दा पाड‌ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व‌र गेल्याव‌र‌ इत‌रांसाठी थांब‌लो होतो.

हे वाक्य (माग‌चा संद‌र्भ ल‌क्षात न‌ आल्यास - किंवा न‌ घेत‌ल्यास‌) भ‌यंक‌र वाट‌ते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झ‌कास‌! 'इमोस‌ण‌मा प्र‌मोस‌ण‌' वाचून‌ ख‌प‌लो आहे. अर्थात‌ हे सूत्र‌ चित्र‌प‌ट‌, साहित्य‌, राज‌कार‌ण‌, साहित्यात‌ले राज‌कार‌ण‌ अशा साऱ्याच‌ ठिकाणी लागू प‌डावे म्ह‌णा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोठे हेडफोन्स वापरले तर आवाज कमी होतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लडी बँक

लौल.

मी बस मधे पाहिलेला भंगार चित्रपट म्हणजे "हैप्पी न्यू इयर"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मणसोक्त हसले. धण्यवाद ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेबी को बेस पसंद है हे गाणं कसं वाटलं? मी रिपीट वर लावून गाडीत ऐकतो. सलमानच्या डान्सला तोड नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेबी को बेस पसंद है हे गाणं कसं वाटलं?
हे म्ह‌ण‌जे, त‌र्ख‌ड‌क‌रांना, अॅंटाय‌, काऊच‌, स्केड्युल‌, हे उच्चार‌ आव‌ड‌ले का?, असं विचार‌ण्यासार‌खं आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा म‌ल्टाय‌व्हाय‌टॅमिन, कॅल्सिअम, ऑय‌ल, माय‌ल्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुल‌ताण‌ Smile अजूण‌ पाहिलेला णाही..
प‌ण व्होल्वोत‌ले माझे फेव‌रिट्स‌ - (किती वेळा पाहिला असावा)

१. अप‌ने - स‌नी, बॉबी इत्यादी ध‌व‌ल‌ मंड‌ळींचा घ‌र‌चाच‌ चित्र‌प‌ट्. पुणे ते बोरीव‌ली ब‌स‌ होती म्ह‌णून‌ शेव‌ट‌ त‌री कळ‌ला इत‌का मोठा चित्र‌प‌ट‌. क‌था व‌गैरे सोडून‌ द्या. (३)
२. चुप‌चुप‌के अर्थात‌ प्रिय‌द‌र्श‌न‌चा निर‌मा - य‌च्च‌याव‌त‌ म‌ंड‌ळींचे पांढ‌रे स‌दैव‌ क‌प‌डे, प‌रेश‌ राव‌ल‌चा "आता ह‌स‌व‌तोच‌ तुम्हाला भेंडी" विनोद‌. (४-५)
३. राम‌ गोपाल‌ व‌र्मा की आग‌ - नो कॉमेंट‌स‌ (१)
४. नील अॅंड‌ निक्की - नो कॉमेंट‌स‌ (२)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अफाट प‌रिक्ष‌ण आहे. त्यापेक्षा दंग‌ल कैक‌पटींनी आव‌ड‌ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.