Skip to main content

ऑलिंपिक २०१२ - २५ जुलै ते ०३ ऑगस्ट २०१२

ऑलिंपिक्स २०१२ ची अधिकृत सुरवात व्हायची आहे. अजून दोन दिवसांनी २७ तारखेला 'ओपनिंग सेरेमनी' असेल. मात्र फुटबॉलच्या स्पर्धा मात्र आजपासून (म्हणजे २५ जुलै) पासूनच सुरू होत आहेत.
तेव्हा आजपासून "ऑलिंपिक २०१२ Live!" या धाग्याद्वारे ताज्या घटना, पदक तालिका, व दर दिवसांचे खेळ या धाग्यावर दिले जातील. जर एखाद्या दिवसाची चर्चा रंगली किंवा एखाद्या दिवशी भारताचा मोठा सहभाग असेल तर त्या दिवसासाठी वेगळा धागा काढला जाईल.

ऑलिंपिक्सच्या खेळांची माहिती पुढील धाग्यांवर वाचता येईल.
A-B C-E F-H I-S T U-Z

सदस्यांना ऑलिंपिक्सच्या खेळाडुंबद्दल, बातम्यांबद्दल, एखाद्या नियमाबद्दल शंका विचारण्यासाठी किंवा संबंधीत विषयावर गप्पा मारण्यासाठी ऑलिंपिक गप्पा हा धागा उपलब्ध आहेच. त्याचाही लाभ घेता येईल.

पदक तालिका

क्रमांक देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका २१ १० १३ ४४
चीन २० १३ ४२
ग्रेट ब्रिटन २३
दक्षिण कोरीया १६
फ्रान्स १९
३२ भारत

पदकविजेत्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी या धाग्याचा वापर करावा

०३ ऑगस्ट नंतर होणार्‍या स्पर्धांचे अपडेट्स वेगळ्या धाग्यावर दिले जात आहेत

ऑलिंपिक २०१२ Thu, 02/08/2012 - 20:27

In reply to by ऋता

हीच बातमी टाकायला आलो होतो.. आभार :)
काय तुफान सामना झाला विशेषतः दुसरा सेट. शेवटच्या क्षणापर्यंत टिव्हीला चिकटून होतो.

ऑलिंपिक २०१२ Thu, 02/08/2012 - 16:15

नेमबाजी (शुटिंग) डबल ट्रॅप स्पर्धेची पात्रता फेरी सुरू झाली आहे
पहिल्या सेटच्या पन्नास शॉट (२५ डबल्स) नंतर रंजन ४८ गुणांसह संयुक्त रित्या पहिल्या स्थानावर आहे :)
पात्रता फेरीत एकूण ७५ डबल्स ३ सेट मध्ये खेळायचे असतात
दुसर्‍या फेरीत ५० पैकी सहा हुकल्याने ४४ गुणांसह रंजन ६ व्या स्थानावर घसरला आहे
तिसर्‍या फेरीच्या शेवटी शेवटी बरेच शॉट हुकल्याने केवळ ४१ गुण रंजन मिळवू शकला आहे. एकूण १३४ गुणांसह तो एकदम ११व्या स्थानावर फेकला गेला आहे. :(
याच बरोबर रंजन सोढी चे आव्हान समाप्त झाले आहे :(

नेमबाजी मध्ये २५ मी रॅपिड फायर (पुरुष) याची पात्रता फेरी सुरू झाली आहे.
विजय कुमारचा नंबर येणे बाकी आहे
पात्रता फेरीच्या स्टेज१ मध्ये आतापर्यंत १८ पैकी १२ खेळाडुंचे खेळुन झाले आहे. त्यात २९३ गुणांसह विजय कुमार तिसर्‍या स्थानावर आहे.
सगळ्या खेळाडूंचे खेळुन झाल्यावर अंतीम क्रमांक इथेच देईन.
सर्व १८ खेळाडूंचे खे़ळुन झाल्यावर विजय कुमार ५ व्या स्थानावर आहे.
आज केवळ पात्रता फेरीची पहिली स्टेज होती

उद्या होणार्‍या दुसर्‍या स्टेजमध्ये तीन गटात स्पर्धात होईल. विजय कुमार रिले-१ या गटात आहे (त्याच्या गटात त्याचा स्टेज१ स्कोर सर्वोत्तम आहे)

ऑलिंपिक २०१२ Thu, 02/08/2012 - 20:30

६० किलो वजनी गटाच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत जय भगवान याला ८-१६ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या वजनी गटात आपले आव्हान संपले आहे.

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 09:31

In reply to by ऑलिंपिक २०१२

७५ किलो वजनी गटात आतितटिच्या सामन्यात विजेंदर सिंग याने १६-१५ गुणांसह विजय प्राप्त केला व उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 02/08/2012 - 22:22

पुरूपल्ली कश्यप पुरूष एकेरी बॅडमिंटनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत हरला. दुसर्‍या सेटचा उत्तरार्ध पाहिला. त्याचा मलेशियन प्रतिस्पर्धी झकास खेळला.

अभिजितमोहोळकर Fri, 03/08/2012 - 10:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सध्या जगातील दोन सर्वोत्तम खेळाडूत आहे. मधे पायाचा स्नायू फाटल्याने तो खेळू शकला नव्हता. कश्यप हरला पण तो चांगला खेळला. त्याच्यासमोर एक ग्रेट प्लयेर होता. हरल्याचं वाईट वाटतं पण चांगलं खेळल्याचं समाधानही आहे. आता साईनावर लक्ष आहे.

ऋषिकेश Fri, 03/08/2012 - 11:26

In reply to by अभिजितमोहोळकर

अगदी सहमत. हरला खरा पण चांगली झुंज दिली!
आता महिला एकेरीत सायना विरुद्ध चायना मामला आहे :)
उपांत्यफेरीतील चार खेळाडूंपैकी उर्वरीत तीन चायनाचे आहेत आहे :)

अभिजितमोहोळकर Fri, 03/08/2012 - 11:34

In reply to by ऋषिकेश

सगळेच चायनीज आयटम शॉर्ट टर्म मध्ये चांगला परफॉर्मन्स देतात आणि लाँग रन मधे कधी गंडतील ह्याची गॅरेंटी नसते.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 02/08/2012 - 22:48

पेस-सानिया विरूद्ध सर्बियन जोडीच्या टेनिस मिक्स्ड डबल्स सामन्यात सानिया मिर्झा फारच झकास खेळते आहे. पहिला सेट जिंकून सानिया-पेस दुसर्‍या सेटमधे ४-२ असे आघाडीवर आहेत.

सानिया आणि पेस दोन सेटमधे जिंकले.

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 10:16

आज अ‍ॅथलेटिक्स खेळ सुरू होत आहेत.

३ ऑगस्ट २०१२ रोजी खेळले जाणारे खेळः
आज एकूण २५ क्रीडाप्रकार खेळले जातील. व २३ सुवर्णपदके प्रदान होणार आहेत

क्रीडाप्रकार

भारताचा सहभाग?

फेरी

पदक प्रदान?

तिरंदाजी (पुरूष) नाही अंतीम होय
अ‍ॅथलेटिक्स (गोळाफेक - पुरूष) होय सर्व होय
अ‍ॅथलेटिक्स (ट्रिपल जम्प - महिला) होय पात्रता नाही
अ‍ॅथलेटिक्स (थाळी फेक- महिला) होय पात्रता नाही
अ‍ॅथलेटिक्स (इतर २ खेळ) नाही पात्रता/अंतीम होय
बॅडमिंटन महिला (एकेरी) होय उपांत्य नाही
बॅडमिंटन पुरूष (एकेरी) नाही उपांत्य नाही
बॅडमिंटन (दुहेरी) नाही अंतीम होय
बास्केट बॉल (महिला) नाही प्राथमिक नाही
बीच व्हॉलिबॉल (महिला व पुरुष) नाही उप-उपांत्यपूर्व नाही
बॉक्सिंग(५२, ६९किग्रॅ.पुरुष) होय(६९ किलो) उप-उपांत्यपूर्व नाही
सायकलिंग - ट्रॅक (तीन प्रकार) नाही सर्व होय (दोन)
डायविंग (महिला मी स्प्रिंगबोर्ड) नाही पात्रता नाही
घोडेस्वारी(वैयक्तीक, सांघिक) नाही ड्रेसेज नाही
तलवारबाजी(पुरूष सांघिक साब्रे) नाही सर्व फेर्‍या होय
फुटबॉल महिला नाही उपांत्यपूर्व नाही
हॅन्डबॉल (महिला) नाही प्राथमिक नाही
हॉकी(पुरूष) नाही प्राथमिक नाही
ज्युडो (महिला व पुरूष) नाही सर्व फेर्‍या होय (दोन)
रोईंग (चार प्रकार) होय (केवळ रँकिंगसाठी) अंतीम होय (चार)
नौकानयन (महिला व पुरूष) नाही शर्यती नाही
नेमबाजी (पुरूष ५०मी रायफल प्रोन) होय सर्व होय
नेमबाजी (पुरूष २५ मी रॅपिड फायर पिस्टल) होय सर्व होय
जलतरण (१५०० मी फ्रीस्टाईल - पुरूष) होय पात्रता नाही
जलतरण (उर्वरीत) नाही सर्व होय (चार)
टेबल टेनिस(पुरूष,महिला -सांघिक) नाही प्राथमिक नाही
टेनिस (मिश्र दुहेरी) होय उपांत्यपूर्व नाही
टेनिस (उर्वरीत) नाही उपांत्यपूर्व नाही
ट्रॅम्पोलाईन (पुरूष) नाही सर्व होय
व्हॉलिबॉल (महिला) नाही प्राथमिक नाही
वॉटर पोलो (महिला) नाही प्राथमिक नाही
भारोत्तोलन नाही सर्व होय (दोन)

आजचा भारताचा सहभागः

बॅडमिंटन महिला(एकेरी): आज सायना नेहवाल उपांत्य फेरीत खेळेल. अवघ्या १५ तासांच्या गॅपनंतर सायना नेहवालला उपांत्य फेरी खेळायची आहेच शिवाय तिची झुंज प्रथम क्रमांकाच्या चीनी खेळाडू "यिहान वँग" हिच्याशी असेल.
निकाल सायना नेहवाल हिला सरळ सेट्स मध्ये पराभव पत्करावा लागला. आता ती ब्रॉन्झ मेडल साठी खेळेल

जलतरण: गगन उल्ल्हलमाथ १५०० मी फ्रीस्टाईलच्या प्राथमिक फेरीत खेळेल
निकाल गगन प्राथमिक फेरीतून पुढे जाऊ शकला ही. आव्हान समाप्त

अ‍ॅथलेटिक्स (महिला -तिहेरी उडी): मयुखा जॉनी ट्रिपल जम्पच्या पात्रता फेरीत खेळेल
निकाल मयुखा जॉनी स्वतःचा सर्वोत्तम खेळही दाखवू शकली नाही. स्पर्धेतून बाहेर

हॉकी (पुरूष): आज भारताची टिम जर्मनीशी भिडेल.
निकाल भारताची टिम २-५ ने पराभूत झाली. भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. दोन उर्वरीत मॅचेस भारत खेळेल

टेनिस: मिश्र दुहेरीत पेस-सानिया उपांत्यपूर्व फेरी खेळतील. त्यांचा सामना बेलारूसची जोडी मॅक्स मिर्नी आणि व्हिक्टोरिया अझारेन्का सोबत असेल.
निकाल

अ‍ॅथलेटिक्स (महिला -थाळी फेक): कृष्णा पुनिया आणि सीमा अन्टिल थाळी फेक स्पर्धेच्या प्रात्रता फेरीत खेळतील
निकाल

बॉक्सिंग: विकास कृष्णन यादव ६९ किलो वजनी गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
निकाल

एक ब्रॉन्झ पदक मिळवून आता गगन नारंग आज ५० मी रायफल प्रोन स्पर्धेत खेळेल. जर तो अंतीम फेरीत पोचला तर आजच सुवर्णपदकासाठी खेळेल. गेल्या स्पर्धेच्या अंतीम फेरीनंतर त्याला मानदुखी सुरू झाली आहे जो त्याच्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो कारण प्रोन स्पर्धेत तासभर पोटावर झोपून खेळावे लागते जयत मानेवत ताण येतो.
निकालः .
गगन नारंग अंतीम फेरीत पात्र होऊ शकला नाही
.
.
.
याच सोबत जॉयदिप करमरकर आज ५० मी रायफल प्रोन स्पर्धेत खेळेल. जर तो अंतीम फेरीत पोचला तर आजच सुवर्णपदकासाठी खेळेल.
निकालः .
जॉयदीप करमरकर अंतीम फेरीत पात्र
अंतीम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कांस्य थोडक्यात हुकले :(
.
काल पहिल्या पात्रता स्टेजमध्ये पाचव्या स्थानावर असणारा विजय कुमार आज २५ मी रॅपिड फायर स्पर्धेत दुसरी पात्रता फेरी खेळेल.. जर तो अंतीम फेरीत पोचला तर आजच सुवर्णपदकासाठी खेळेल.
निकालः .
विजय कुमार अंतीम फेरीत पोचला.

विजय कुमारने रौप्य पदक जिंकले

.
.
भारतातर्फे ओमप्रकाश सिंग अ‍ॅथलेटिक्स -गोळाफेक स्पर्धेत क्वालिफिकेशनसाठी खेळेल. जर तो पात्र झाला तर दिवस अखेर सुवर्णपदकासाठी खेळेल.
निकालः .
ओमप्रकाश सिंग १९ व्या स्थानी आला व अंतीम फेरीसाठी पात्र होऊ शकला नाही
.
.
.
आज खेळले जाणारे हॉकी पुरूष सामने:

वेळ(भा.प्र.वे)

गट

स्पर्धेक

निकाल

१२:३० A अर्जेंटिना वि. ऑस्ट्रेलिया बरोबरी २-२
१४:४५ B न्यूझीलंड वि. नेदरलँड नेदरलँड विजयी ५-१
१७:४५ B जर्मनी वि. भारत जर्मनी विजयी ५-२
२०:०० A पाकीस्तान वि. ग्रेटब्रिटन
२३:०० A दणिण आफ्रीका वि. स्पेन
०१:१५ B द.कोरीया वि. बेल्जियम

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 13:30

सायना नेहवालचा उपांत्य फेरीतील सामना सुरू होत आहे..

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 13:32

५० मी रायफल - प्रोन स्पर्धेची पात्रता फेरी काही वेळातच सुरू होत आहे. यात गगन नारंग व जॉयदिप करमरकर खेळतील

ऋता Fri, 03/08/2012 - 14:52

In reply to by ऑलिंपिक २०१२

पात्रता फेरीत जॉयदिप करमरकर चौथा (इतर नऊ जणांसोबत !) तर गगन नारंग आठरावा आहे...किति जण पात्र ठरतात?
---
चौथ्या क्रमांकावर असणार्या नऊ जणांची शूट ऑफ राऊंड आहे !

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 15:00

In reply to by ऋता

पहिले आठ जण पात्र ठरतात. जॉयदीप चैथा असला तरी तसे एकूण ९ जण आहेत.
माझ्यामाहितीप्रमाणे प्रोन स्पर्धेत असे झाल्यास शुट ऑफ खेळवला जातो जो या नऊ जणांत आता सुरु होईल
त्यातील सर्वोत्तम पाच अंतीम फेरीत पोहोचतील
खात्री करून सांगतो

नशीबाने प्रोनमध्ये अंतीम फेरीच्या पात्रतेसाठी फक्त 'इनर १०' बघितले जात नाहीत. ते बघितल्यावर जॉयदिपचा क्रम १० वा लागतो. :)

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 15:30

In reply to by ऑलिंपिक २०१२

शुटाअऊट नंतर जॉयदीप सातव्या क्रमांकासह अंतीम फेरीत पात्र ठरला आहे :)
अंतीम फेरी आजच असेल

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 16:21

In reply to by ऑलिंपिक २०१२

२५ मी रॅपिड फायर पिस्टलमध्ये ५८५ मार्कांसह सध्या विजय कुमार पाचव्या स्थानावर आहे.
सगळ्यांचे खेळून व्हायचे आहे. ते झाल्यावर कळेल विजय कुमार अंतीम आठात पात्र होतो का ते

समांतरः याआधीचा ऑलिंपिक रेकॉर्ड ५८३ चा होता जो नक्कीच तुटला आहे. बहुदा रशियाचा क्लिमोव्ह हा नवा विश्वविक्रम स्थापित करू शकतो

ऋता Fri, 03/08/2012 - 17:10

In reply to by ऑलिंपिक २०१२

विजय कुमार चौथ्या क्रमांकावर आहे आणि अंतिम फेरीस पात्र ठरला आहे..
आधीच्या फेर्यांचे गूण पुढे गणले जात नाहीत.. बघू पुढे काय होतं..

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 15:34

अ‍ॅथलेटिक्स मध्ये पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत ओमप्रकाश सिंह १९ व्या स्थानावर आहे. सर्व खेळाडूंचे खेळणे बाकी आहे.
त्याचे अंतीम फेरीत पात्र होणे अतिशय कठीण दिसते
स्पर्धे अखेरीस १९.८६ मीची फेक अंतीम ठरली व ओमप्रकाश सिंह १९ व्या स्थानावर राहिला. त्याचे या ऑलिंपिकमधील आव्हान संपले आहे

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 15:37

तिहेरी उडी अर्थात ट्रिपल जम्प मध्ये सद्य स्थितीत मयुखा जॉनी १७ व्या स्थानावर आहे. तिची तिसरी उडी शिल्लक आहे

ऑलिंपिक २०१२ Fri, 03/08/2012 - 16:32

अपेक्षेप्रमाणे पहिल्या फेरीत आपल्या हीटमध्ये गगन १ मिनिटापेक्षा अधिक वेळेने शेवटचा आला व अर्थातच अंतीम फेरीत पोहचु शकला नाही. त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे

अशोक पाटील Fri, 03/08/2012 - 17:17

साईनाचा पराभव तमाम भारतीय क्रीडाप्रेमींसाठी दुर्दैवाची घटना असली तरी चीनच्या यिहान वाँग या जगातील क्रमांक १ च्या खेळाडूसमोर ती कधीच टिकू शकलेली नाही हा इतिहास आहे. यापूर्वी झालेल्या ५ सामन्यात साईनाने तिच्यासमोर पराभव पत्करला आहे... ऑलिम्पिक्स हा अपवाद होईल अशी आशा होती...पण इथेही यिहान वरचढ ठरली.

काही का असेना, पण लंडन ऑलिम्पिक्समध्ये आपल्या साईनाचा खेळ पाहाण्यासाठी तिथल्या भारतीयांनी जी गर्दी केली होती ते पाहून या मुलीने तिथे आणि एकूणच या देशात किती प्रेम मिळविले आहे याचा अंदाज आला. असो. आता चीनच्याच झीन वँग हिच्याशी साईना कांस्यपदकासाठी लढेल, त्यासाठी तिला शुभेच्छा.

ऋषिकेश Fri, 03/08/2012 - 19:39

विजय कुमार याने २५ मी रॅपिड फायर मध्ये रौप्य पदक मिळवल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!

ऋषिकेश Fri, 03/08/2012 - 20:14

जे.एम.पोर्टो आणि फेडररची मॅच काय चालु आहे.
दोघेही एकेक सेट जिंकले आहेत. तिसर्‍या सेट मध्ये १०-१० मॅच चालु आहे.
फेडररने १९व्या गेममध्ये सर्विस ब्रेक केली होती तर विसाव्या गेममध्ये पोर्टोने पुन्हा ब्रेक करून बरोबरई साधली आहे

आता कोणीही जिंको टेनिस नक्की जिंकले आहे.
एरवी वैयक्तीक खेळ खेळणारे देशासाठी खेळताना वेगळीच विगिजिषु वृत्ती दाखवतात हे अशावेळी अगदी पटते

ऋता Sat, 04/08/2012 - 00:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा सामना इथे बघायला मिळेल..अत्ता थाळीफेक दाखवत आहेत...नंतर पेस-सानिया मॅच दाखवणार आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 04/08/2012 - 00:23

In reply to by ऋता

THIS CHANNEL IS NOT AVAILABLE OR IT HAS BEEN REMOVED. :-( कदाचित इथून हा चॅनल उपलब्ध नसेल.

टीव्हीवर जोकोविच वि. अँडी मरे सामना पहाते आहे. मरे पहिला सेट ७-५ जिंकला, दुसर्‍या सेटमधे २-२ अशी बरोबरी झाली आहे. मरे सुरूवातीला थोडा अडखल्यासारखा वाटला पण आता तुफान खेळतो आहे. द्दोघेही प्रचंड अ‍ॅथलेटीक आहेत, बघायला मजा येत आहे.

ऋता Sat, 04/08/2012 - 02:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पहिला सेट ७-५ असा गमावला.दुसर्यात ३-२ मागे आहेत...आता सामना काही कारणानी थांबला आहे बहुतेक..कुणाला माहिती आहे का काय चाललय ते?
----
सामना पावसामुळे थांबवला आहे.

अशोक पाटील Fri, 03/08/2012 - 22:53

एकीकडे जर्मनीने भारताचा हॉकीमध्ये ५-२ असा धुव्वा उडविला तर दुसरीकडे पाकिस्तानचा ब्रिटनने ४-१ असा.

एकेकाळचे जगज्जेते हे दोन देश या खेळातील आणि आजची यांची ससेहोलपट पाहून खेद वाटतो.

ऋता Sat, 04/08/2012 - 00:19

थाळी फेक या खेळात भारताची पूनिया फायनल साठी पात्र ठरली आहे. तिची फेक ६३ मी. पेक्षा पुढे (६३.५४ मी.) पडल्याने तिने फायनल आठी ऑटोमॅटिक पात्रता मिळवली.

ऋता Sat, 04/08/2012 - 02:07

In reply to by ऋता

सीमा अंतिल आत्ता बाराव्या क्रमांकावर आहे...अजून पात्रता फेरी चालू आहे.त्यामुळे सांगता येत नाही. पहिले बारा क्रमांक अंतिम फेरीत खेळतील.

ऋता Sat, 04/08/2012 - 01:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी चीड येत आहे या कारणामुळे...काय म्हणायचं प्रसारण करणार्यांना?आधी बडबड करतात तेव्हा पेस-सानिया सामना दाखवणार असं म्हणाले होते..तो संपल्यावर यांना आठवण होणार बहुतेक.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 04/08/2012 - 09:45

In reply to by ऋता

डीडी स्पोर्ट्सचं स्वतःचं फीड असेल असं वाटत नाही. याच्या-त्याच्याकडून उधार घेत असावेत.

इथे मरे-जोकोविच सामन्यात मधेच पुरूष दुहेरीचा स्कोर दाखवत तरी होते. मिक्स्ड डबल्सचा उल्लेखही नाही. भारतीय चॅनेल पहावा तर तिथेही अमेरिकन टीव्हीवर होतं त्याच सामन्याचं प्रसारण.

ऋता Sat, 04/08/2012 - 02:25

विकास क्रिशन त्याचा सामना १३-११ असा जिंकत उप-उपांत्यफेरीत पोचला आहे !
त्याने अमेरिकेच्या स्पेंसला हरवलं.

ऋषिकेश Sat, 04/08/2012 - 15:14

पहिल्या राऊंड नंतर महिला नेमबाजी ट्रॅप स्पर्धेत शगुन चौधरी १०व्या स्थानावर आहे.
दुसर्‍या राउंड मध्ये केवळ १७ चकत्या भेदून शगुअन चौधरी शेवटच्या स्थानावर फेकली गेली आहे
तिथून पहिल्या आठात येणे जवळजवळ अशक्याच दिसते